सत्यमेव जयते!

(29)
  • 89.5k
  • 2
  • 49k

दिल्ली भारताची राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर!! शहर नेहमीच गजबजलेले असायचे. पण फक्त रात्री नऊ पर्यंत काही दिल्ली मधील फेमस बाजार आणि प्लेसेस गजबजलेले असायचे. इतर ठिकाणी मात्र तुरळक लोक असायची. कधी कधी नसायची देखील!! दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये तर शांतता असायची आणि ती मुलींसाठी भयानक असायची. कारण एकच काही मवाली, गुंड लोकांचा हा वेळ असायचा. जेव्हापासून निर्भया प्रकरण घडलं होत. तेव्हापासून प्रत्येक जण आपल्या मुलीला दिल्लीत पाठवताना विचार करत असायचे. पण ती मात्र आईला बाबांना धीर देऊन त्यांना समजावून दिल्लीत आली होती. आपलं कॉम्प्युटर सायन्स या मध्ये तिला डॉक्टरेट डिग्री पूर्ण करायची होती. ते देखील तिने केलं आणि आता ती एका नावाजलेल्या कंपनीत उच्च पदावर कामाला होती. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करून तिने त्यांना दिल्ली मध्येच राहायला एक हक्काचे घर तयार केले. आता ते दिल्लीतच राहत होते!!

Full Novel

1

सत्यमेव जयते! - भाग १

भाग १.स्थळ :- दिल्ली वेळ:- रात्रीचे १२:३० दिल्ली भारताची राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर!! शहर नेहमीच गजबजलेले असायचे. पण रात्री नऊ पर्यंत काही दिल्ली मधील फेमस बाजार आणि प्लेसेस गजबजलेले असायचे. इतर ठिकाणी मात्र तुरळक लोक असायची. कधी कधी नसायची देखील!! दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये तर शांतता असायची आणि ती मुलींसाठी भयानक असायची. कारण एकच काही मवाली, गुंड लोकांचा हा वेळ असायचा. जेव्हापासून निर्भया प्रकरण घडलं होत. तेव्हापासून प्रत्येक जण आपल्या मुलीला दिल्लीत पाठवताना विचार करत असायचे. पण ती मात्र आईला बाबांना धीर देऊन त्यांना समजावून दिल्लीत आली होती. आपलं कॉम्प्युटर सायन्स या मध्ये तिला डॉक्टरेट डिग्री पूर्ण करायची होती. ते ...Read More

2

सत्यमेव जयते! - भाग २

भाग २ कालच्या महालक्ष्मी वर घडलेल्या प्रसंगामुळे तिचं पूर्ण आयुष्य संपले होते. एका रात्रीच बऱ्याच गोष्टीचा सामना तिच्या आई करावा लागला. पण याची भनक देखील तिला नव्हती. कारण ती तर जिवंत असूनही या जगात नसल्यासारखी एकदम शांत होऊन बेडवर पडली होती. सकाळी उशिरा तिने डोळे उघडले होते, पण चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचे हावभाव तिच्या नव्हते. सगळं तेज तिच्या चेहऱ्यावरचे कमी झाले होते. होते फक्त ते नखांचे ओरखडे अंगावर आणि ते पाहून तिच्या आईला रडू येत होतं. त्या स्वतःच्या हातांनी तिचं अंग साफ करत होत्या. पण मनावरचा आघात मात्र त्यांना पुसता येत नव्हता. काही दिवसांपूर्वी त्यांची हसणारी मुलगी आज अचानक शांत ...Read More

3

सत्यमेव जयते! - भाग ३

भाग ३."आजपासून दिल्लीचा नवीन डीएसपी मी आहे. त्यामुळे ही केस मीच सॉल्व्ह करणार आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करेन. कारण सत्याचा नेहमी विजय होतो. आपली बाजू खरी आहे. सत्यमेव जयते!!"राजवीर थोडासा शांत होत बोलतो. त्याचे बोलणे ऐकून महालक्ष्मीचे आई बाबा थोडेसे आश्चर्यकारक पणे त्याला पाहायला लागतात. "तू इथे कसा काय?"महालक्ष्मीचे बाबा विचारतात. "अंकल, ते नंतर सांगतो. तुम्ही, महीकडे लक्ष द्या!! मी पाहतो बाकीच" तो एवढं त्यांना बोलून कोणाला तरी कॉल करतो आणि हिंदीतून इन्स्ट्रकशन देतो आणि कॉल कट करतो. "अंकल, मला चेंज करायला रूम मिळेल काय?"राजवीर त्यांच्याकडे पाहून विचारतो. "हो, महालक्ष्मीच्या बाजूची रूम आहे. तू तिथे चेंज ...Read More

4

सत्यमेव जयते! - भाग ४

भाग ४. "दुर्गा हरली आहे !! कोमेजून गेली आहे दुर्गा."तो निराश होऊन बोलतो. तशी ती महिला काळजीने त्याच्याकडे पाहते. झालं राजवीर? एवढं सिरीयस का बोलत आहे?"ती काळजीने विचारते. "अपर्णा, माझ्या दुर्गा वर नराधम लोकांनी बलात्कार केला आहे. जी दुर्गा निर्भया प्रकरणच्या वेळी तिला न्याय कसा मिळेल? याचा विचार करून रात्र दिवस विचारात हरवलेली असायची. आज तिच्याच बाबतीत हे सगळं घडलं आहे....."राजवीर अस बोलून तिला महालक्ष्मी सोबत जे घडलं ते सगळं सांगायला लागतो.ते सगळं ऐकून अपर्णा शॉक होते. थोडासा चेहऱ्यावर राग देखील तिच्या येतो. "अश्या नराधम लोकांना चांगली अद्दल घडली पाहिजे!! मग पुन्हा कधी अश्या विचारसरणीचे लोक पुढे कोणत्याही मुलीला ...Read More

5

सत्यमेव जयते! - भाग ५

भाग ५. सकाळी महालक्ष्मीला शुद्ध यायला लागते. तशी ती डोक्याला पकडून हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न करते. ती आपला हात प्रयत्न करत असते, पण तिचा हात काही हलत नाही. त्यामुळे ती जराशी उठून बसून आपला हात पाहायला लागते. तिचा नाजूक असा हात राजवीरने घट्ट धरला होता. त्यावर त्याने स्वतःचे डोकं ठेवलं होतं. त्या कारणाने तिला स्वतःचा हात हलवता आला नाही. राजवीरला अस पाहून थोडस वाईट तिला वाटतं. भरल्या डोळ्यांनी ती तिच्याही नकळत त्याच्या केसांत हात घालते. "लहान पण बरं होत ना राज. या जगात माझा होणारा नवरा सगळं काही माझं अस्तित्व मिटवून गेला. पण तू मात्र माझ्यासोबत उभा आहे. नको ...Read More

6

सत्यमेव जयते! - भाग ६

भाग ६. राजवीरने महालक्ष्मीला बाहेर तर आणले होते. पण महालक्ष्मी गाडीत देखील थोडीशी घाबरून आसपास पाहत बसलेली होती. आपल्या पदर ती अंगावर टाकून अंग झाकून घेण्याचा प्रयत्न करत होती. राजवीरची नजर ड्राइव्ह करता करता तिच्यावर पडली की, त्याला देखील कसतरी होत असायचं.आधी तर महालक्ष्मी अस कधीच करत नसायची. पण या घटनेनंतर मात्र ती खूप घाबरून राहायला लागली होती. "आय स्वेअर महालक्ष्मी, तुझ्यावर असा प्रसंग आणणाऱ्या लोकांना मी अजिबात सोडणार नाही. कोर्टला तर त्यांना नंतर पोहचवणार. पण त्या आधी मात्र त्यांना चांगली शिक्षा देणार!!"राजवीर मनातच म्हणाला. खूप वेळाने त्याची गाडी एका सुनसान रस्त्यावर थांबते. तसा तो महालक्ष्मीला पाहून गाडीचा दरवाजा ...Read More

7

सत्यमेव जयते! - भाग ७

भाग ७."माझी महालक्ष्मी$$$"ते रडतच बोलतात. त्यांना अस पाहून त्याला वाईट वाटत. "काका, शांत व्हा!! तुम्ही , असे हतबल झालात महालक्ष्मी पण तशीच होईल. त्यामुळे तुम्ही सावरा स्वतःला. निदान तिच्यासमोर तरी चांगले रहा!!" राजवीर त्यांना धीर देत म्हणाला. त्याने त्यांना बाजूला केले आणि व्यवस्थित धरून उभे केले. "काका, महालक्ष्मी वर आज जी वेळ आली आहे, तशी इतर कोणावरही येऊ नये !! यासाठी मी नेहमी कार्यरत राहीन. आपल्या महालक्ष्मी मुळे पोलीस महिलांसाठी एक हेल्पलाईन सुरू झाली आहे "दुर्गा" नावाची. त्या हेल्पलाईन मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या मुली आहेत. जेव्हा अशी मुलगी घाबरलेली दिसली आणि तिने आमच्याकडे मदत मागितली की, दुर्गा हेल्पलाईन तिला मदत ...Read More

8

सत्यमेव जयते! - भाग ८

भाग ८. "सगळं संपलं आहे महालक्ष्मी तुझं. स्वतःच अस आता काहीच नाही आहे माझ्याकडे. काय गुन्हा होता माझा? की अशी परिस्थिती आली? मी तर फक्त माझ्या फॅमिलीचा आणि माझा विचार करून आपल्याच जगात सुखी राहण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याने माझं सुख हिरावून घेतलं. सगळं काही माझं घेतलं. आमच्यातील नात्याला देखील त्याने डाग लावला आहे." महालक्ष्मी खिडकीतून बाहेर चंद्राला पाहत मनातच रडत बोलत असते. आता ती फक्त मनात रडायची. चेहऱ्यावर काहीच हावभाव सध्या तरी तिच्या नव्हते!! कारण तिचा रडवलेला चेहरा पाहून राजवीर आणि तिच्या आई वडिलांना त्रास व्हायचा. त्यामुळे महालक्ष्मी त्यांना दुःखी न करण्यासाठी आता मनातच कोलमडून राहायचा प्रयत्न ...Read More

9

सत्यमेव जयते! - भाग ९

भाग ९. महालक्ष्मीने सगळ्यांच्या सपोर्टमुळे ही केस लढण्याचा निर्धार केला. राजवीर आणि अपर्णा तिला कशाप्रकारे कोर्ट मध्ये प्रश्न विचारले उत्तर आपण कशी दिली पाहिजे? हे शिकवत असायचे. कारण विरुद्ध बाजूच्या लोकांचे वकील कसे प्रश्न विचारून ? महालक्ष्मीचा कॉन्फिडन्स कमी करण्याचा प्रयत्न करतील. हे , अपर्णा आणि राजवीर जाणून होते. त्यामुळे ते आधीच तिला तसले प्रश्न विचारून तिचा कॉन्फिडन्स कमी न करण्यासाठी प्रयत्न करत होते. महालक्ष्मी पण आता हळूहळू आत्मविश्वासाने बोलत असायची. तिचा आधीचा बोलण्याचा आत्मविश्वास तिच्यात आता परतत होता. केस साठी आणि कोर्ट कचेरी साठी आता ती पूर्णतः तयार झाली होती. उद्या महालक्ष्मीची केस दिल्लीच्या कोर्टमध्ये चालणार होती. आता ...Read More

10

सत्यमेव जयते! - भाग १०

भाग १०. आज महालक्ष्मीच्या केसचा दिवस होता त्यामुळे राजवीर लवकरच उठला होता. त्याने महालक्ष्मीला मात्र उठवले नव्हते, कारण आता ती उशिरा उठली की , फ्रेश दिसेल या विचारानेच तो तस करतो. स्वतः फ्रेश होऊन आल्यावर तो महालक्ष्मीला उठवतो आणि फ्रेश व्हायला पाठवतो. काहीवेळात महालक्ष्मी फ्रेश होऊन खाली येते. साधासा पंजाबी ड्रेस घातला होता तिने आणि एकदम साधी सिम्पल राहूनच ती खाली येते. मात्र, चेहऱ्यावर कॉन्फिडन्स झकळत होता. आज काहीही झालं तरीहि ती घाबरणार नव्हती. अस जणू तिने मनाला सांगितले होते, असे वाटत होतं."महालक्ष्मी, आज काहीही झालं तरीही घाबरायचं नाही आहे तुला. ती लोक विचारतील तसेच उत्तर द्यायचं आहे. ते ...Read More

11

सत्यमेव जयते! - भाग ११

भाग ११."अहो, तुम्ही सगळीकडे हेल्प करतात ना? मग मला पण हेल्प करा!!",ती शांतपणे हसून बोलते."मिस, तुम्ही कोण आहात? ते आधी? मग पाहू पुढचं!! कसली हेल्प हवी आहे?",तो आता डोकं खाजवत बोलतो. तसं काहीवेळ पलीकडे शांतता असते."मला एका मुलाला माझ्या मनातील सांगायचे आहे!!त्यासाठी तुम्ही मला मदत करा. खूप काही बोलायचं आहे त्याच्याशी. त्याने मला जगायल शिकवलं आहे. खंबीरपणे मागे राहून मला साथ दिली आहे. मी मात्र त्याला आज पर्यंत लांब ठेवले आहे. पण आता मला नको हा दुरावा. सहा महिन्यानंतर मला त्याला भेटण्याची ओढ लागली आहे. त्याच्याजवळ जाऊन रडून त्याला सांगायचे आहे, नको आता, बस्स कर !! हा दुरावा.",ती भरल्या ...Read More

12

सत्यमेव जयते! - भाग १२

भाग १२. काही दिवसांनी महालक्ष्मी आणि राजवीरच लग्न होत!! एका नवीन आयुष्याची सुरुवात ते करायला लागतात. पण त्यांचं लग्न साध्या पध्दतीने कोर्ट मॅरेज करण्यात येत. डीएसपी राजवीर आणि महालक्ष्मी लग्नाच्या तीन महिन्यानंतर गोव्याला फिरायला जातात. ते आता पर्यंत चांगले एकमेकांसोबत रुळले होते. पण शरीराने मात्र ते अजूनही एकत्र आले होते. आज मात्र हॉटेलच्या लोकांनी महालक्ष्मीच्या सांगण्यावरून त्यांची रूम डेकोरेट त्यांना करून दिली होती!! पदोपदी तिचा विचार करणारा राजवीर मुळे तिचं आता पुढाकार घेते. मेडिकली आणि फिजिकली जवळपास ती चांगली झाली होती. त्यामुळे आता तिला राजवीर आणि तिच्यात दुरावा नको होता!! राजवीर आपला फोनवर बोलत रूमच्या आत रात्रीचा पाय ठेवतो ...Read More

13

सत्यमेव जयते! - भाग १३ (शेवट)

भाग १३(शेवट)काही वर्षानंतर:-"मम्माऽऽऽऽऽ मम्माऽऽऽऽऽऽ" एक छोटीशी मुलगी पळत येत महालक्ष्मीला शोधत आवाज देत असते. तशी महालक्ष्मी तिला रूममध्ये दिसताच पटकन जाऊन तिला बिलगते."मम्मा, डॅडला बेश अवॉल मिलाल. तू मीच केलं",ती हातात एक ट्रॉफी दाखवत आनंदी होऊन बोबड्या स्वरात बोलते. तिचं बोलणं ऐकून महालक्ष्मी हसते."रक्षु, तुझे डॅड आहेच हिरो. मग मिळणारच ना त्यांना अवॉर्ड. चला आता, पिल्लू हात धुवून फ्रेश होऊन या. मग आपण मस्त जेवण करू.",महालक्ष्मी गुढग्यावर बसून तिची बॅग काढत म्हणाली. तशी ती छोटी मुलगी आपली हातातील ट्रॉफी ठेवून पळतच आतमध्ये निघून जाते. महालक्ष्मी फक्त तिला पाहत राहते."तुझे डॅड, नेहमी हिरोच राहतील!! तुझे हिरो आणि माझे पण हिरोच ...Read More