येवा कोंकण आपलोच असा.

(12)
  • 51.9k
  • 2
  • 23.5k

हिरवी गर्द वनराई, अथांग सागर, पांढरे शुभ्र समुद्रकिनारे ,पर्यटकांना अंगाखांद्यावर खेळवणारा सह्याद्री!! आणि अस्सल मालवणी भोजन यासह मिळणारे कोकणातील आतिथ्यशील वातावरण !! "येवा कोंकण आपलोच असा" असं मनापासून स्वागत करणारी कोंकणी माणसं.. यामुळे मालवण "पर्यटकांची पंढरी" झालं आहे. पर्यटकांच्या मौखिक प्रसिद्धीमुळे गोव्याच्या मद्य संस्कृतीला कंटाळलेल्या पर्यटकांचे लक्ष सिंधुदुर्गाकडे वळले.. कोकण रेल्वे सुरु झाल्यामुळे मुंबई आणि इतर राज्यातील पर्यटकांना कोंकणाने आकर्षित केलं. शिवाय रस्त्यांची कामेही शासनाने पुढाकार घेऊन वेळीच केल्याने चारचाकीचा प्रवासही ब-यापैकी सुसह्य झाला. त्यामुळे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना कोकणात येणे सोपे झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांच्या हातात ऊस, कापूस अशा नगदी पिकांमुळे पैसा खेळू लागला होता. आर्थिक स्थिरता प्राप्त झाल्याने काहींना कोकण खुणावू लागले होते.

Full Novel

1

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग १

हिरवी गर्द वनराई, अथांग सागर, पांढरे शुभ्र समुद्रकिनारे ,पर्यटकांना अंगाखांद्यावर खेळवणारा सह्याद्री!! आणि अस्सल मालवणी भोजन यासह मिळणारे कोकणातील वातावरण !!"येवा कोंकण आपलोच असा" असं मनापासून स्वागत करणारी कोंकणी माणसं..यामुळे मालवण "पर्यटकांची पंढरी" झालं आहे. पर्यटकांच्या मौखिक प्रसिद्धीमुळे गोव्याच्या मद्य संस्कृतीला कंटाळलेल्या पर्यटकांचे लक्ष सिंधुदुर्गाकडे वळले..कोकण रेल्वे सुरु झाल्यामुळे मुंबई आणि इतर राज्यातील पर्यटकांना कोंकणाने आकर्षित केलं. शिवाय रस्त्यांची कामेही शासनाने पुढाकार घेऊन वेळीच केल्याने चारचाकीचा प्रवासही ब-यापैकी सुसह्य झाला.त्यामुळे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना कोकणात येणे सोपे झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांच्या हातात ऊस, कापूस अशा नगदी पिकांमुळे पैसा खेळू लागला होता. आर्थिक स्थिरता प्राप्त झाल्याने काहींना कोकण ...Read More

2

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग २

साधारण तासाभरात आम्ही "नक्षत्र होम स्टे' जवळ पोहचलो. रस्त्यावर पाटी बघून रिक्षावाल्याने रिक्षा गल्लीत वळवली.. जसजशी रिक्षा पुढं पुढं होती तसतसा लाटांचा आवाज कानावर पडत होता..अचानक रिक्षा थांबली. रस्ता संपला होता. सामोरं अथांग निळा रत्नाकर!! अरे! होम स्टे कुठं आहे??रस्ता तर संपला!!तेवढ्यात समोरून एक काका आले. आम्ही त्यांना नक्षत्र होम स्टे कुठं आहे विचारलं.."हंयच उतराचा लागतला तुमका. रिक्षा रेतिसून पुढ जावूची नाय.डाव्या हाताक चलत जावा . थयच असा तुमचा ठिकाण.."बॅगा घेऊन आम्ही सगळे तिथंच उतरलो... बाकीचे पुढे झाले.लाटांचा जोरजोरात येणारा आवाज ऐकून माझे पाय मात्र तिथंच थबकले.तो गुंजारव मला तिथेच थांबायची गळ घालत होता. लाटांच्या संगीतात रत्नाकर माझं स्वागत ...Read More

3

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ३

तासभर विश्रांती घेऊन आम्ही सिंधूदुर्गकडे रवाना झालो..मालवण मध्ये फिरण्यासाठी रिक्षा खूप चांगलं साधन आहे. स्वस्त आणि मस्त!!अजून एक, प्रवास करता तिथल्या स्थानिक लोकांशी आपल्याला संवादही साधता येतो.. तिथली त्यांची बोलीभाषा, त्यांचे सणवार, जवळपास बघता येण्यासारखी ठिकाणं सगळं सगळं माहिती करून घेता येतं..आम्हालाही असेच वेंगुर्लेकर काका भेटले.. मग काय बाहेर पडलो की काकांच्या घराच्या अंगणात उभं राहून काकांना हाक दिली की काका "इलो , इलो' म्हणत आम्हाला कुठंही घेऊन जायला तयार!!आम्ही किल्ला बघण्यासाठी मालवणात जात असताना काकांनी सांगितलं, "उद्या मालवणची जत्रा आसा.तुमका वेळ मिळालो तर याचो आनंद घ्या".... या जत्रेविषयी मी पुढे लिहणारचं आहे.. त्यामुळे आता सविस्तर सांगत नाही..पंधरा मिनिटातच ...Read More

4

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ४

येवा कोंकण आपलोच असा... मालवण डायरी भाग ४ किल्ला बघून बोटीने परत येईपर्यंत सूर्यास्त होत आला होता.रूमवर येऊन थोड झाले आणि त्याला भेटायला चार पावलं चालत किनाऱ्यावर आले.. आता निवांत बसून त्याच्याशी गुजगोष्टी करायच्या होत्या ..सूर्यदेव अस्ताला गेले होते.त्यांचा लालिमा स्वतःच्या अंगावर घेत तो शांतपणे फेसाळत लाटांच्या रुपात माझ्याकडे किनाऱ्यावर येत होता. संध्याकाळच्या थंडीत माझ्या पायांना होणारा त्याचा गरम स्पर्श मला सुखावत होता..असं नुसतचं त्याला बघणंही कितीतरी सुंदर वाटत होतं.फक्त नजरेचा नजरेशी चाललेला मूक संवाद..काहीही न बोलताही मन हलकं हलकं झालं होतं..साऱ्या दूनियाचा कचरा, निर्माल्य, पाप आपल्या पोटात सामावून घेणारा तू..माझ्या मनातील खळबळही स्वतः मध्ये सामावून घेतोस आणि प्रत्येक ...Read More

5

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ५

आज आमचे दोन ग्रुप झाले होते.मी आणि भावाचे कुटुंब आंगणेवाडी जायला निघालो आणि अनिल आर्या स्कुबा डायव्हिंग साठी.मालवण वरून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.. रिक्षाने जाऊन येऊन पाचशे रुपये पडतात.रिक्षाने साधारण तासाभरात आपण आंगणेवाडीत पोहचतो.. मालवण सोडले की सुरवातीला रस्ता सुस्थितीत आहे नंतर नंतर मात्र बऱ्यापैकी खराब रस्ता आहे..दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंगणेवाडीच्या जत्रेला येतात.. शासनाने पुढाकार घेऊन जिथं जिथं रस्त्याची दुरवस्था आहे तिथं डांबरीकरण करून घेतलं तर भाविकांना होणारा त्रास नक्कीच कमी होईल..रस्ता खराब होता पण सोबत असलेला हिरवागार निसर्ग , नागमोडी वळणे, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं यामुळे प्रवासाचा त्रास जाणवत नाही..या प्रवासातील अजून एक प्रकर्षाने जाणवलेली ...Read More

6

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ६

भराडी देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही रूमवर आलो.. आर्या आणि अनिलही नुकतेच स्कुबा डायव्हिंग करून पोहचले होते..दोघांनीही स्कुबा डायव्हिंगचा मनसोक्त घेतला होता.. इथे स्कुबा डायव्हिंग इतर ठिकाणापेक्षा बऱ्यापैकी स्वस्त आहे.. सहाशे रुपये माणशी घेतात.. त्यातच आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करून मिळतं.. सिंधूदुर्ग किल्ल्याच्या जवळ जे स्कुबा डायव्हिंग करतात तिथं करावं असा मी सल्ला देईन.. कारण अगोदरच्या वेळी आम्ही देवबागला केलं होत तिथं आमच्या पैकी काहींना त्रास झाला..( त्रास म्हणजे समुद्राच्या बरच आत बोट जेंव्हा उभी राहते आणि एकेक करून माणसं स्कुबा डायव्हिंग साठी जात असतात.. आम्ही जी लोकं बोटीत होतो त्यांना सतत वाऱ्याने हलणाऱ्या बोटीमुळे उलटी- मळमळ, चक्कर सारखं वाटत होतं.. ...Read More