रविवार ची सकाळ होती, सगळं कसं आरामात चाललेलं होतं. सचिन आणि रामभाऊ म्हणजे सचिन चे बाबा, पेपर वाचत होते. दोन्ही मुलं सायली वय वर्षे १० आणि शेखर वय वर्षे ६ आणि साधना बाई म्हणजे सचिन ची आई, ही मंडळी कार्टून नेटवर्क बघत होती. सचिन ची बायको, वर्षा स्वयंपाकघरात रविवारचा नाश्ता बनवत होती. बाहेर सोसायटी च्या छोट्या मैदानात पोरं क्रिकेट खेळत होती. अशातच एक काही तरी जड वस्तु पडल्याचा धडाम असा आवाज आला. सचिन ने मान वर करून इकडे तिकडे पाहिलं. रामभाऊ नव्हते पण त्यात काही विशेष नाही असं समजून त्याने पुन्हा पेपर मध्ये डोक घातलं. आणि शेजारच्या सुतारकाकांची हाक आली. “सचिन खाली ये रामभाऊ गच्चीतून पडले. धाव रे” सचिनला क्षणभर काहीच कळेना पण तो लागलीच खाली धावला. चार चार पायऱ्या उतरून खाली पोचला. रामभाऊ खाली पडले होते आणि भोवती मुलांचा घोळका जमला होता. कोणीतरी त्यांना पाठीवर झोपवून पाणी मारत होतं. रामभाऊ बेशुद्ध होते आणि पाणी मारण्याचा काही उपयोग होत नव्हता. अरे अॅम्ब्युलेन्स बोलवा, कोणीतरी ओरडलं. सचिन जवळ मोबाइल नव्हता, त्यानी सभोवार नजर फिरवली, दीक्षितांच्याकडे मोबाइल होता. त्यांच्या पण लक्षात आलं त्यांनी झटकन फोन लावला. “दहा मिनिटांत येतेय” ते बोलले.
Full Novel
अभयारण्याची सहल - भाग १
रात्रीचे किती वाजले हे कळत नव्हतं. हाताला घडयाळ असूनही इतका गडद अंधार होता की काटे दिसणं तर दूर, घडयाळ दिसत नव्हतं. आपल्याला पंचांग कळत नसल्या मुळे अमावस्या आहे का, हे समजत नव्हतं. अर्थात आता ते समजूनही काही उपयोग झालाच नसता. संदीप नुसता वैतागलाच नव्हता तर सॉलिड घाबरला पण होता. कारण प्रसंगच तसा होता. संदीप च्या मित्राचा वाढदिवस होता. त्याच्या ऑफिस मधले काही मित्र मिळून त्याचा बर्थ डे साजरा करण्यासाठी ताडोबा च्या सफरीवर आले होते. तलावाकाठी असलेल्या गेस्ट हाऊस मधे थांबले होते. वाढ दिवस आणि जेवण खाण झाल्यावर, सर्व जणं थोडं जंगल फिरू म्हणत फेर फटका मारण्यासाठी निघाले. गेस्ट हाऊस च्या वाचमनने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण सर्व तरुण, आणि त्यात दोन तीन पेग पोटात गेलेले, सगळेच एकदम शूर वीर झाले होते. मग काय कोणीच ऐकलं नाही. आणि सर्व सात जणं जंगलात शिरले. ...Read More
अभयारण्याची सहल - भाग २
भाग १ वरुन पुढे वाचा.... “अनोळखी माणसाला कार मध्ये घ्यायचं?” – नलिनी “हे बघ इतर वेळी मी थांबलो पण नसतो, पण वेळ आहे, घनदाट जंगला मधे हा माणूस रस्ता शोधत एकटा पायी फिरतो आहे, तू ऐकलसच की याला पण गेस्ट हाऊसलाच जायचं आहे. जंगलात प्राण्यांचा धोका संभवतो , काही वेडं वाकडं झालं तर आपण स्वत:लाच माफ नाही करू शकणार, बरं चांगला सभ्य दिसतो आहे. काय म्हणतेस?” शशांक म्हणाला. “तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पटतेय मला. आणि मग मागच्या सीट वर बसलेल्या आपल्या नणदे वळून म्हणाली, शलाका, तुझं काय मत आहे?” – नलिनी. “घे दादा त्यांना. आपल्याला पण सोबत होईल. वहिनी तू ये मागच्या सीट वर.” – शलाका म्हणाली. ...Read More
अभयारण्याची सहल - भाग ३
अभयारण्याची सहल भाग ३ भाग २ वरुन पुढे वाचा.... संदीप ज्या झुडपात पडला होता ते निवडुंगाचं बेट होतं आणि शरीरात काटे घुसले होते. चेहऱ्यावर सुद्धा काटे रूतले होते. पंज्याच्या फटकार्याने संदीपचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता, पण संदीपला त्या वेळी काहीच जाणवलं नाही आणि ती वेळ काट्यांची पर्वा करत बसण्याची नव्हती. त्यानी आता खाली पडलेली काठी उचलली आणि पुन्हा एक उरल्या सुरल्या शक्तिनिशी जबरदस्त प्रहार वाघाच्या जबड्या वर केला. वाघ मागे सरकला पण जाता जाता त्याने पंजा मारलाच. संदीप च्या चेहऱ्या वरून आता रक्ताच्या धारा वाहत होत्या. डोळ्यात, नाकात रक्त गेलं होतं त्यामुळे त्याला काही दिसेना. हातानेच त्याने चेहऱ्यावरचे रक्त ...Read More
अभयारण्याची सहल - भाग ४
अभयारण्याची सहल भाग ४ भाग ३ वरुन पुढे वाचा.... BP, पल्स, मोजून झाल्यावर मेट्रन, आराम करो असं सांगून गेली. आता खोलीत फक्त संदीप आणि शलाका. “खूप कोरड पडली आहे जरा पाणी देता का?” – संदीप “हो देते ना. अरे बापरे थांबा, विचारून येते.” – शलाका “कोणाला?” – संदीप “मेट्रन ला.” आणि असं म्हणून ती पळाली. पांच मिनिटांनी वापस आली. म्हणाली, “चालेल म्हणताहेत. चहा, दूध सुद्धा द्यायला हरकत नाही असं मेट्रन म्हणाली.” मग शलाका ने त्याला चमच्याने थोडं पाणी पाजलं. “अहो असं चमच्याने का देता आहात ? भांडं द्या नं.” संदीप कुरकुरला. “अहो तुम्हाला उठता येणार नाही. ...Read More
अभयारण्याची सहल - भाग ५
अभयारण्याची सहल भाग ५ भाग ४ वरुन पुढे वाचा.... संदीप ला शुद्ध आलेली बघून त्यांना आनंद झाला. त्याच्याशी बोलू आणि किती नाही असं आईला झालं, पण बाबांनी समजावलं. गेले पांच दिवस सगळेच टेंशन मध्ये होते. पण आता ते दूर झालं होतं. “काय ग आई, ही मुलगी इथे का थांबतेय?” – संदीप. “अरे तू जिवाची पर्वा न करता तिला वाचवलं ना म्हणून येतेय तुझी काळजी घ्यायला.” – संदीपची आई. “अग पण आपली ओळख नाही, पाळख नाही, अशी कशी येतेय? तिच्या घरचे सुद्धा काही म्हणत नाहीत? अग ती काल रात्री पण इथेच होती.” – संदीप. “चांगली आहे मुलगी.” आई संदीपला ...Read More
अभयारण्याची सहल - भाग ६
अभयाराण्याची सहल भाग ६ भाग ५ वरुन पुढे वाचा.... “आपली कुठलीही ओळख नसतांना तुम्ही माझ्या साठी जिवाची बाजी ते कुठल्या हक्कानी?” शालाकाचा बिनतोड सवाल. “हक्क कसला, ते कर्तव्यच होतं माझं आणि हे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे.” – संदीपने सफाई दिली. “तुम्ही आणखीही म्हणाला होता की जवान लढतात ते कर्तव्य म्हणून बरोबर?” – शलाका. “हो.” संदीप. “कर्तव्य का असतं? कारण त्यांचा देशावर हक्क असतो म्हणून. मग याच न्यायाने मी कर्तव्य करते आहे ते माझा तुमच्या वर हक्क आहे म्हणूनच. कळलं का?” – शलाकाने आपला मुद्दा मांडला. “यावर मी काय बोलणार आता?” – संदीप. “नकाचं बोलू. शांत ...Read More
अभयारण्याची सहल - भाग ७ - (अंतिम )
अभयाराण्याची सहल भाग ७ भाग ६ वरुन पुढे वाचा.... “थांब, थांब, हे बघ आत्ता, तुझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. पण वर्षभरातच ती ओसरून जाईल आणि हे सगळं खटकायला लागेल. तू खूप सुंदर आहेस, आणि माझ्या अंगावर, चेहऱ्यावर या जखमांचे व्रण, आणि त्यामुळे कुरूप झालेला चेहरा, चार लोकं जेंव्हा बोलायला लागतील, तेंव्हा तुला तुझी चूक कळून येईल. पण तेंव्हा फार उशीर झाला असेल. म्हणून म्हणतो. आताच सावध पणे पावलं उचल. नको या भानगडीत पडू. मी पुन्हा पूर्ववत होणं शक्य नाही.” संदीप काकुळतीने म्हणाला. “तुमचं बोलून झालं का?” – शलाका. “हो. आणि माझी विनंती आहे की आजची आपली ही ...Read More