पहिले प्रेम – अनंत एकतर्फी निरागस...

(23)
  • 40.7k
  • 9
  • 11.2k

आपला नाव गणपत, गल्लीत आपल्याला सगळे भाई नावानेच ओळखतात. दाराराच तसा आहे आपला, अगदी लहानपणापासूनच. त्यावेळीसुद्धा तालमीत गेल्यामुळे चार पाच पोरांना आपण एकटाच चोपत असू. समोरच्याशी चार हात करायला आपण कधी फार विचार करत नाही, डायरेक्ट भिडतो. उगा जास्त डोकं खाजवायची आपल्याला कधीच गरज भासली नाही, कारण एक घाव अन दोन तुकडे असा आपला स्वभाव आहे. तसे पाहता आपल्या घावा नंतर बऱ्याचदा दोन तुकड्या ऐवजी भूगाच होतो हे समजायला आपल्याला फार वेळ लागला नाही, पण त्याचा एक फायदा असा झाला की कोणीही आपल्याला विनाकारण नडला नाही, आणि जो नडला त्याचे काय झाले हे तुम्हाला गल्लीतली पोरंच अधिक चांगले सांगतील.

Full Novel

1

पहिले प्रेम – अनंत, एकतर्फी, निरागस...

आपला नाव गणपत, गल्लीत आपल्याला सगळे भाई नावानेच ओळखतात. दाराराच तसा आहे आपला, अगदी लहानपणापासूनच. त्यावेळीसुद्धा तालमीत गेल्यामुळे चार पोरांना आपण एकटाच चोपत असू. समोरच्याशी चार हात करायला आपण कधी फार विचार करत नाही, डायरेक्ट भिडतो. उगा जास्त डोकं खाजवायची आपल्याला कधीच गरज भासली नाही, कारण एक घाव अन दोन तुकडे असा आपला स्वभाव आहे. तसे पाहता आपल्या घावा नंतर बऱ्याचदा दोन तुकड्या ऐवजी भूगाच होतो हे समजायला आपल्याला फार वेळ लागला नाही, पण त्याचा एक फायदा असा झाला की कोणीही आपल्याला विनाकारण नडला नाही, आणि जो नडला त्याचे काय झाले हे तुम्हाला गल्लीतली पोरंच अधिक चांगले सांगतील. ...Read More

2

पहिले प्रेम – अनंत, एकतर्फी, निरागस... (भाग २)

मी अख्ख्या दिवसाचा जमाहिशेब केला तेव्हा बापाची बोलणी, चुकलेले नमस्कार अन मनाची झालेली ओढाताण या पलीकडे हाती काही लागले एकंदरच हे प्रेम किती महाग असते याची पुरती कल्पना आपल्याला पहिल्या दिवशीच आली. त्यामुळे शक्य तर यातून सुटका करून घेणेच फायद्याचे आहे हे आपला मेंदू आपल्याला न चुकता सांगत होता पण मन मात्र भलतीकडेच धावत होते अन खरे सांगतो त्याला आवरण माझ्या बापालापण जमलं नाही. पुढली तीन वर्षे त्याने सगळे उपाय केले, मला बदडून काढले, खुराक कमी केला, घरातली कामे माझ्या मागे लावली, मित्रांना माझ्या विरुद्ध फितवले अगदी सगळे मार्ग अवलंबून पहिले. तसा मी अभ्यासात फारसा हुशार नव्हतो, म्हणून बापाने ...Read More