१ हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥ हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥ जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥३॥ हरिरूप झालें जाणीव हरपले । मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥४॥ हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥ २ हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥ नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥ सुखी त्याणें व्हावें जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥ मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥४॥ जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥

1

हरि - पाठ १

श्री संत एकनाथ महाराजपाठ१हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥हरी मुखीं गातां हरपली चिंता त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥३॥हरिरूप झालें जाणीव हरपले । मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥४॥हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥२हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥सुखी त्याणें व्हावें जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥४॥जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ...Read More

2

हरि - पाठ २

“हरि पाठ” 2 १० स्वहिताकारणें संगती साधूची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥ हरि तेथें संत संत तेथें । ऐसें वेद चारी बोलताती ॥२॥ ब्रह्मा डोळसातें वेदार्थ ना कळे । तेथें हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥ वेदार्थाचा गोंवा कन्याभिलाष । वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥४॥ वेदांचीं हीं बीजाक्षरें हरी दोनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥ ११ सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया । आनंदपदीं जया म्हणती हरी ॥१॥ सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥ तत्सदिति ऐसें पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥ हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी । अभिमानियांसी नर्कवास ॥४॥ अस्ति भाति प्रिय ऐशीं ...Read More

3

हरि - पाठ ३

हरि पाठ ३ १० हाचि नेम सारीं साधेल तो हरी । नाम हें मुरारी अच्युताचें ॥१॥ राम गोविंद हरे गोविंद हरे । यादव मोहरे रामनाम ॥२॥न लगती कथा नाना विकळता । नामचि स्मरतां राम वाचे ॥३॥ नाम म्हणे राम आम्हां हाचि नेम । नित्य तो सप्रेम जप आम्हां ॥४॥ ११ करूं हें कीर्तन राम नारायण । जनीं जनार्दन हेंचि देखें ॥१॥ जगाचा जनक रामकृष्ण एक । न करितां विवेक स्मरें राम ॥२॥ तुटेल भवजाळ कां करिशी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ॥३॥ नामा म्हणे गोविंद स्मरें तूं सावध । नव्हे तुज बाधा नाना विघ्नें ॥४॥ १२ मायेचीं भूचरे रज ...Read More

4

हरि - पाठ ४

हरिपाठ ४ २६ नामाचेनि पाठे जातील वैकुंठें । तो पुंडलीक पेठे प्रकट असे ॥१॥ विठ्ठल हा मंत्र सांगतसे शास्त्र आणिक नाही शस्त्र नामाविण ॥२॥ पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती । मुनि हरिपंथी गेले ॥३॥ नामा म्हणे हरी नामेंचि उद्धरी । जन्माची येरझारी हरे नामें ॥४॥ २७ सर्वांभूतीं भजें नमन करीं संता । नित्य त्या अच्युता स्मरण करी ॥१॥ ऐसी भजनी विनट सांपडेल वाट । रामकृष्ण नीट वैकुंठींची ॥२॥ न लगतीं साधनें वायाचि बंधन । हरिनामपंथीं जाण मुनि गेले ॥३॥ नामा म्हणे थोर नामचि साधार । वैकुंठीं बिढार तयां भक्‍ता ॥४॥ २८ तूं तव नेणता परि हरि तो जाणता । ...Read More

5

हरि - पाठ ५

हरिपाठ५ ५ जपतां कुंटिणी उतरे विमान । नाम नारायण आलें मुखा ॥ १॥ नारायण नाम तारक तें आम्हां । पैं महिमा अन्य तत्त्वीं ॥ २॥ तरिले पतित नारायण नामें । उद्धरिले प्रेमें हरिभक्‍त ॥ ३॥ निवृत्ति उच्चार नारायण नाम । दिननिशी प्रेम हरी हरी ॥ ४॥ ६ एक तत्त्व हरि असे पैं सर्वत्र । ऐसें सर्वत्र शास्त्र बोलियलें ॥ १॥ हरिनामें उद्धरे हरिनामें उद्धरें । वेगीं हरि त्वरें उच्चारी जो ॥ २॥ जपता पैं नाम यमकाळ कांपे । हरी हरी सोपें जपिजे सुखें ॥ ३॥ निवृत्ति म्हणे हरिनामपाठ जपा । जन्मांतर खेपा अंतरती ॥ ४॥ ७ गगनींचा घन जातो ...Read More

6

हरि - पाठ ६

हरि पाठ—६ २१ ज्याचे मुखीं नाम अमृतसरिता । तोचि एक पुरता घटु जाणा ॥ १॥ नामचेनि बळे कळिकाळ आपणा ब्रह्मांडा येसणा तोचि होय ॥ २॥ न पाहे तयाकडे काळ अवचिता । नामाची सरिता जया मुखीं ॥ ३॥ निवृत्ति नामामृत उच्चारी रामनामे । नित्य परब्रह्म त्याचे घरीं ॥ ४॥ २२ नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥ १॥ रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचे । दहन पापाचें एका नामें ॥ २॥ ऐसा तो नित्यता पुढे तत्त्व नाम । नाहीं तयासम दुजें कोणी ॥ ३॥ निवृत्ति अव्यक्‍त रामनाम जपे । नित्यता पैं सोपें रामनाम ॥ ४॥ २३ ...Read More

7

हरि - पाठ ७

हरिपाठ६ २१ ज्याचे मुखीं नाम अमृतसरिता । तोचि एक पुरता घटु जाणा ॥ १॥ नामचेनि बळे कळिकाळ आपणा । येसणा तोचि होय ॥ २॥ न पाहे तयाकडे काळ अवचिता । नामाची सरिता जया मुखीं ॥ ३॥ निवृत्ति नामामृत उच्चारी रामनामे । नित्य परब्रह्म त्याचे घरीं ॥ ४॥ २२ नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥ १॥ रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचे । दहन पापाचें एका नामें ॥ २॥ ऐसा तो नित्यता पुढे तत्त्व नाम । नाहीं तयासम दुजें कोणी ॥ ३॥ निवृत्ति अव्यक्‍त रामनाम जपे । नित्यता पैं सोपें रामनाम ॥ ४॥ २३ अखंड ...Read More

8

हरि - पाठ ८

हरि पाठ ८ ९ विष्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचे ॥ १॥ उपजोनी करंटा नेणें वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥ २॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । त्या कैंचें कीर्तन घडे नामीं ॥ ३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचें ॥ ४॥ १० त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं । चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥ १॥ नामासी विन्मुख तो नर पापिया । हरीविण धांवया न पावे कोणी ॥ २॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्ही लोक उद्धरती ॥ ३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥ ४॥ ...Read More

9

हरि - पाठ ९

हरिपाठ ९ २३ सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वी कळा दावी हरी ॥ १॥ तैसें नव्हे नाम वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥ २॥ अजपा जपणें उलट प्राणाचा । येथेंही मनाचा निर्धार असे ॥ ३॥ ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥ ४॥ २४ जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥ १॥ न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥ २॥ जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात । भजकां त्वरित भावनायुक्‍त ॥ ३॥ ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनीं घर केलें ॥ ४॥ ...Read More