निर्णय.

(53)
  • 178.6k
  • 11
  • 92.1k

"कशाचा एवढा माज आलाय तुला?" मंगेशनी चिडून विचारलं .इंदीरानी मात्र चेह-यावर काही भाव न दाखवता शांतपणे आपली बॅग भरायला सुरुवात केली. मंगेशनी रागानी तिचा हात पकडून पुन्हा तोच प्रश्न केला तेव्हा ती शांतपणे म्हणाली "मी निर्णय घेतला आहे. तो आता बदलणार नाही." "एक दिवस बाहेर राहीलीस की कळेल जगायला पैसा लागतो. तेव्हा माझ्याकडे येऊ नको हात पसरून. एक छदाम मिळणार नाही तुला. समजलं?" मंगेश जितक्या रागानी बोलत होता तेवढीच इंदीरा शांत होती. ती शांत आहे याचाच त्याला जास्त राग येऊ लागला. आत्तापर्यंत आपल्यासमोर थरथर कापणारी ही बाई आज कोणाच्या जीवावर एवढी धीट झाली आहे हे त्याला कळत नव्हतं. ते कळत नव्हतं म्हणून त्यांची आणखी चिडचीड वाढत होती. शांतपणे इंदीरानी आपली बॅग भरली. आणि ती खोलीबाहेर गेली. मंगेश दणदण पावलं आपटत तिच्या मागे गेला.ती स्वयंपाक घरात कामाला लागली. तिला उद्देशून तो म्हणाला, "आज जेवायला मिळणार आहे नं? की तुझी बॅग भरण्याच्या नादात मला उपाशी ठेवणार आहेस?"

Full Novel

1

निर्णय - भाग १

निर्णय.भाग१ला"कशाचा एवढा माज आलाय तुला?" मंगेशनी चिडून विचारलं .इंदीरानी मात्र चेह-यावर काही भाव न दाखवता शांतपणे आपली बॅग भरायला केली. मंगेशनी रागानी तिचा हात पकडून पुन्हा तोच प्रश्न केला तेव्हा ती शांतपणे म्हणाली "मी निर्णय घेतला आहे. तो आता बदलणार नाही.""एक दिवस बाहेर राहीलीस की कळेल जगायला पैसा लागतो. तेव्हा माझ्याकडे येऊ नको हात पसरून. एक छदाम मिळणार नाही तुला. समजलं?" मंगेश जितक्या रागानी बोलत होता तेवढीच इंदीरा शांत होती. ती शांत आहे याचाच त्याला जास्त राग येऊ लागला. आत्तापर्यंत आपल्यासमोर थरथर कापणारी ही बाई आज कोणाच्या जीवावर एवढी धीट झाली आहे हे त्याला कळत नव्हतं.ते कळत नव्हतं म्हणून ...Read More

2

निर्णय - भाग २

निर्णय भाग२मागील भागावरून पुढे…मंगेश घरातला पहिला मुलगा म्हणून खूप लाडाचा होता. या लाडामुळेच त्यांच्यात हट्टीपणा आला. मी म्हणीन ती दिशा असं तो वागू लागला. कंपनीत मोठ्या पोस्टवर होता. नोकरीसाठी मुलाखत तोच घ्यायचा यात तो त्याची इच्छा थोडी पुर्ण करीत असे.नियुक्त केलेल्या मुलींचा गैरफायदा अगदी निर्लज्जपणे घेत असे.हे सगळं इंदीरेला पटत नव्हतं पण मुलांकडे बघून ती गप्प बसत असे. रोज घरात भांडणं होऊन घरातलं वातावरण बिघडवण्याची इंदीरेला अजीबात इच्छा नव्हती. मुलांच्या दृष्टीनं तिनी हे शांत राहण्याचा पाऊल उचललं होतं. मुलं कधी कधी फार चिडत.वडलांच्या विचीत्र वागण्यानी,नको तेवढ्या शिस्तीनी मुलं कंटाळली होती. त्यांना स्वतंत्रपणे वागण्याची मुभा नव्हती." आई तू बाबांना काहीच ...Read More

3

निर्णय - भाग ३

निर्णय कादंबरी भाग४बंगलोरला पोचल्यावर जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा तो जे बोलला ते ऐकून इंदीरेला विचित्र वाटलं पण याला जबाबदार मंगेशच होता.मिहीर म्हणाला," आई बंगलोर स्टेशन वर उतरताच मला बाबांच्या कडक शिस्तीच्या जोखडातून मुक्त झालो याचा खूप आनंद झाला. आई कदाचित तुला माझं बोलणं. आवडणार नाही पण ही माझी भावना खरी आहे. तू कशी इतकी वर्ष त्यांचा हा जाच सहन करत आलीस."इंदिरा म्हणाली, "मिहीर तुझ्या आणि माझ्या भूमिकेत फरक आहे. मला तुझ्या सारखं वाटलं जरी असत तरी मी तसं वागू शकले नसते.तुम्हा दोघांचं आयुष्य माझ्यावर अवलंबून होतं. कोणताही विचार करण्यापूर्वी मल दहादा विचार करावा लागत असे. तू बाहेर पडावस ...Read More

4

निर्णय - भाग ४

निर्णय भाग ४मागील भागावरून पुढे...मिहीर पाठोपाठ मेघनापण बंगलोरला गेली.दोघही एकाच फ्लॅटवर रहात होते. मेघनाचही काॅलेज साधारण आठवड्यांनी सुरू झालं तिही मिहीर सारखीच बिझी होणार.दोघंही इंदीरेला फोन करत पण मंगेशशी कधी बोलत नसत. यामुळे मंगेशच्या अंगाचा तिळपापड होत असे." मुलांना बाप परका वाटतोय का? एवढे दिवस झाले आपण काय करतोय हे बापाला कळवावसं वाटतं नाही?"" मला माहित नाही." इंदीरा कपड्यांच्या घड्या करता करता म्हणाली." तुला कसं माहिती असणार! सांगीतलं तूच त्यांना.म्हणाली असशील बापाला कशाला कळवायला पाहिजे."इंदीरा अजीबात विचलीत न होता आपलं काम करत होती. तिच्या या वागण्यामुळे मंगेश इतका चिडला की त्याने सगळ्या घड्या केलेले कपडे उचलले आणि भिरकावून दिले." ...Read More

5

निर्णय - भाग ५

निर्णय भाग५मागील भागावरून पुढे…मिहीर ने एकदा वेळ बघून शुभांगीला विचारलं. तिनी विचार करायला वेळ मागीतला. नंतर मिहीरचा इंदीरेला फोन आई मी शुभांगीला विचारलं. तिनी वेळ मागीतला आहे विचार करायला."" तिचं बरोबर आहे.आता तिनी काही सांगेपर्यंत तिला विचारु नकोस. एका दिवसात किंवा काही क्षणात लग्नाचा निर्णय घेता येत नाही.तू तिला सुरवातीपासून त्याच नजरेनी बघतो आहेस.तुला तिच्या बद्दल बरीच माहिती आहे पण तुझ्या मनात काय आहे हे तिला आत्ता कळलं आहे.तुझ्या मनात असं काही आहे याचा अंदाज बहुदा तिला आधी आला असेल.मुलींच्या लक्षात येतं.त्यामुळे तिला स्वतःहून विचारू नकोस."" ठीक आहे." मिहीरने फोन ठेवला.इंदीरा फोन ठेवून मागच्या अंगणातील बगीच्यात जायला वळली तसं ...Read More

6

निर्णय - भाग ६

निर्णय भाग ६मागील भागावरून पुढे" आई मी शुभांगीला काय सांगू?" मिहीरचा आवाज रडवेला झाला होता." बाबांबद्दल खरं सांगायचं. ती घरात येणार आहे तिला सगळ्यांबद्दल नीट माहिती हवी."" आई हे सगळं ऐकून तिनी नाही म्हटलं तर!"" नाही कशी म्हणेल एकदम. ती विचार करेल. तू तिला पसंत असशील तर इतर गोष्टीसाठी ती तडजोड करेल."" आई तुला माहिती होतं का ग लग्नाआधी बाबा असे आहेत हे?"" नाही.आमचा प्रेम विवाह नव्हता. ठरवून लग्न करताना मुलीला विचारण्याऐवजी मुलांच्या आजूबाजूची चौकशी करून मुलीचं लग्न लावून हीच पद्धत पूर्वापार चालत आली आहे. मुलाला चांगली नोकरी आहे,स्वतःचं घर आहे, मोठ्ठं कुटुंब आहे, हसतं खातं आहे एवढंच बघतात.आता ...Read More

7

निर्णय - भाग ७

निर्णय भाग ७मागील भागावरून पुढेमेघना जेमतेम आठ दिवस रहीली. तो वेळ अगदी कापरा सारखा उडून गेला. इंदीरा मनातून खूप होती. दोन्ही मुलांना हवं तसं करायला मिळतंय म्हणून. तिला वाटलं आपण जर खमकेपणानी मिहीर आणि मेघनाला बंगलोरला पाठवायला हिम्मत केली नसती तर दोघांचं शिक्षण, नोकरी माहिती नाही कोणत्या दिशेने गेली असती.मेघनाचं बंगोलर बरोबर दिल्लीला पण सिलेक्शन झालं होतं. मिहीर बंगलोरला असल्यामुळे मेघनानीपण विचार करून बंगलोर निवडलं.आता या वर्षांनंतर मेघनालापण नोकरी मिळेल. मगआपल्या जीवाला स्वस्थता येईल असं इंदीरेला वाटलं.आज मिहीरचा फोन आला की तो‌ शुभांगीशी काय बोलला विचारायला हवं.विचारांच्या नादात इंदीरेचं बागेतली काम खूप लवकर संपलं. ऊद्या झाडांची पिकली पानं काढून ...Read More

8

निर्णय - भाग ८

निर्णय भाग ८मागील भागावरून पुढे…शुभांगी आणि तिच्या घरची मंडळी ठरलेल्या दिवशी इंदीरेच्या घरी आले.त्यावेळेस मिहीरपण होता. मेघना मात्र आली कारण तिची असाईन्टमेंट पूर्ण करायची होती.इंदिरेचं मंगेशकर बारीक नजर होती.मिहीरला धाकधुक होतं होती.ती मंडळी स्टेशनवरून जशी निघाली शुभांगी ने मिहीरला फोन करून सांगितलं. तशी इंदीरा मंगेशला म्हणाली" मी जे काय सांगीतलं तुमच्या लक्षात आहे नं ?"मंगेश नी नुसतं इंदिरेकडे बघीतलं" मी काय विचारतेय?"" दहावेळेला तेच सांगायला नको मला "तुमच्यावर विश्वास नाही माझा""माझा पण तुझ्यावर विश्वास नाही.""तुम्ही कधी कोणावर विश्वास ठेवला आहे? माझ्यावर तरी कसा ठेवावा.""फार बोलू नकोस.मी शांत आहे तोपर्यंत ठीक आहे.""तुम्ही रागामध्ये कोणतंही वाकडं पाऊल उचललं तर मग मी ...Read More

9

निर्णय - भाग ९

निर्णय भाग ९मागील भागावरून पुढे...शुभांगी मंगेशच्या पसंतीस उतरल्यामुळे पुढचं सगळं काम सोपं झालं. यथावकाश साखरपुडा झाला.साखरपुडा थोडक्यात झाला. साखरपुड्या इंदिरेने काही गोष्टी स्पष्ट केल्या," साखरपुड्याच्या वेळी मुलाला आणि मुलीला फक्त कपडे करायचे.बाकी सगळं देणंघेणं लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे श्रीमंत पूजनाला होतच म्हणून ते सगळं आत्ता साखरपुड्याला करायचं नाही.दुसरं तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आहेर द्या आम्ही आमच्या नातेवाईकांना आहेर देऊ.तुमच्या मुलीला तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या. मुलाकडचे म्हणून काही मागणार नाही. आम्हाला आमच्या सुनेला जे करायचंय ते करु."इंदिरा हे सगळं एका दमात बोलून गेली.मंगेश तिच्याकडे आश्चर्याने बघू लागला.लग्नासारख्या महत्वाच्या कार्याची बोलणी इंदिरानी अचानकपणे आणि झटक्यात केली." हो चालेल.तुम्ही म्हणाल तसं ...Read More

10

निर्णय - भाग १०

निर्णय भाग १०मागील भागावरून पुढे..मंगेशच्या या नवीन पावित्र्यामुळे इंदिराला फार संताप आला.माणसानी किती आपल्या अहंकाराला जपावं.पोटच्या मुलाचं लग्नात अश्या खोडा टाकायचा.इंदीरानी मनाशी काहीतरी ठरवलं आणि ती बागेत आली. झाडाला आळं करता करता तिने शरदला फोन लावला. इंदीरेनं आपल्या कानात मुद्दाम हेडफोन घातला होता आणि तिचं सगळं लक्ष दाराकडे होतं. मंगेशचा काही भरवसा नाही कधीही तो आपलं बोलणं ऐकायला मागे येईल अशी शक्यता इंदीरेला वाटत होती म्हणून हा सावधपवित्रा इंदिरेने घेतला." हॅलो, वहिनी बोला.""शरद भाऊजी आज संध्याकाळी घरी आहात का?"" हो.काही काम आहे का?""आज यांनी वेगळाच गोंधळ घातलाय. म्हणून तुमच्याशी बोलायला यायचं होतं.""मंगेशनी गोंधळ घातला आहे.कमाल आहे मंगेशची. या वहिनी ...Read More

11

निर्णय - भाग ११

निर्णय भाग ११मागील भागावरून पुढे…इंदिरा आता एका वेगळ्या निश्चयाने मिहीरच्या लग्नाची तयारी करत होती. कालच लग्नाच्या पत्रिका छापून आल्या. आणि देवीला पत्रिका ठेऊन मग काही जवळच्या जेष्ठ नातेवाईकांना पत्रिका देऊन लग्नाची अक्षत द्यायला जायला हवं हे लक्षात घेऊन इंदिरा मंगेशला म्हणाली," ऊद्या शुभदिवस आहे. कालच लग्नाच्या पत्रिका छापून आल्या आहेत. ऊद्या आधी गणपती आणि देवीला पत्रिका देऊन मग जेष्ठ नातेवाईकांना पत्रिका आणि लग्नाची अक्षत द्यायला जायला हवं.त्यामुळे ऊद्या सकाळी साडेसात पावणे आठच्या सुमारास तयार रहा. बाबू ड्रायव्हरलापण सांगीतलं आहे."" माझा काय संबंध? लग्नाच्या पत्रिका तू द्यायला जा. मला यायची इच्छानाही.लग्नं तू ठरवलं." मंगेश तिरसटासारखा बोलला."तुमची इच्छा विचारत नाही तुम्हाला ...Read More

12

निर्णय - भाग १२

निर्णय भाग १२मागील भागावरून पुढे…म्हणता म्हणता मिहीरच्या लग्नाचा दिवस येऊन ठेपला.सगळी तयारी झाली असली तरी शेवटी धावपळ ऊडतेच तसंच पण झालं.शरदनी मुलीकडच्यांना कार्यालयाचा, जेवणाचा, बसचा खर्च विचारून अर्धे पैसे शुभांगीच्या बाबांना पाठवले होते.इंदिरेने हे शुभांगीच्या आईवडिलांना आधीच स्पष्ट केले होते. लग्नाचा पूर्ण खर्च त्यांनी करायचा नसून अर्धा खर्च आम्ही करू.ही सगळी बोलणी मंगेश समोरच झाली. त्यावेळी तो काही बोलला नाही. इंदिरेला जरा धाकधुक वाटत होती की मध्येच काहीतरी बोलून मंगेश बैठकीचा बेरंग करेल.पण तसं काही झालं नाही.***इंदिरा कमात मग्न असतानाच शुभांगीच्यावडलांचा फोन आला." हॅलो.झाली का लग्नाची तयारी?" इंदिरेने विचारलं."तयारी होत आली आहे.तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.""बोला.""त्यादिवशी बैठकीत तुम्ही म्हणालात लग्नाचा ...Read More

13

निर्णय - भाग १३

निर्णय भाग १३मागील भागावरून पुढे…मिहीर आणि शुभांगी दोघंही हनीमूनला गेले आणि इंदिरेला घरातील चहाळ कमी झाल्यासारखी वाटली. मेघना काही थांबणार होती कारण नुकतीच तिची परीक्षा संपल्यामुळे सध्या ती मोकळीच होती.मिहीरचं लग्नं सुरळीत पार पडेपर्यंत इंदिरेच्या मनावर ताण होता.मंगेशचा तिला भरवसा वाटत नव्हता. एवढी वर्षे त्याच्याबरोबर संसार केल्यामुळे इंदिरेला कळून चुकलं होतं की मंगेश कधीही घात करू शकतो.मंगेश तशाच स्वभावाचा माणूस असल्याने तिला लग्न पार पडेपर्यंत दक्षता घ्यावी लागली.लग्नानंतर इंदिरेला आज जरा उसंत मिळाली होती.ती डोळे मिटून आपल्या खोलीत निजली होती.मिटल्या डोळ्यासमोर तिच्या लग्नानंतरचे दिवस आठवले.म़गेश कधी बिथरेल याचा नेम नसायचा.एक दिवस मंगेश ऑफीसमध्ये गेल्यावर घरातील कामं आटोपल्यावर इंदिरा जरा ...Read More

14

निर्णय. - भाग १४

निर्णय भाग १४निर्णय भाग १४मागील भागावरून पुढे…बघता बघता शुभांगीची पहिली मंगळागौर आली. इंदिरेला उत्साह आला. ती मंगळागौरीची तयारी करू शुभांगीसाठी सोन्याचा एखादा दागिना घ्यावा अशी तिची इच्छा होती.मंगेश याला राजी होणार नाही हे तिला माहीती होतं पण तरी तिने हा विषय मंगेश समोर काढला."अरे पूजा करा.ते सोन्याच्या दागिन्यांची काय गरज आहे? लग्नात दिले तेवढे दागीने पुरेसे नाही का?"" सुनेला पहिल्या मंगळागौरीला सोन्याचा दागीना देण्याची पद्धत आहे."" असेल पद्धत पण मला मान्य नाही."" तुम्हाला मान्य आहे की नाही हे कुठे विचारते आहे. तुम्हाला सांगतेय की अशी पद्धत आहे तेव्हा मला पैसे द्या मी सोनाराकडे जाऊन आवडेल तो दागीना घेऊन येईन."" ...Read More

15

निर्णय. - भाग १५

निर्णय भाग १५मागील भागावरून पुढे…मिहीरच्या लग्नानंतर सहज म्हणून शरद आणि प्रज्ञा भेटायला घरी आले होते. मिहीरच्या लग्नाच्या वेळी मंगेश खूप वेडंवाकडं काही बोलला नाही म्हणून शरदला वाटलं की मंगेशचा स्वभाव आता बदलला असेल म्हणून ती दोघं घरी आली. कितीतरी वर्ष झाली म्हणजे शरदचं लग्न झालं आणि तो वेगळा राहू लागला. मंगेशचं विचीत्र वागणं सतत काहीही कारण नसताना शरदला प्रज्ञाला, इंदिरेला टोमणे मारणं चालू असायचं.इंदिरा शांत असायची पण प्रज्ञा कशी शांत राहील? त्रास सहन करण्याची एक मर्यादा असते. गंम्मत म्हणून बोलताना भान राखलं पाहिजे हे मंगेशला कधी कळलंच नाही. म्हणूनच शरद वेगळा राहू लागला. शरदकाका मिहीर आणि मेघना चे लाडके ...Read More

16

निर्णय. - भाग १६

निर्णय भाग १६मागील भागावरून पुढे…मेघना साठी वरसंशोधन सुरू होतं.इंदिरा आवडलेल्या मुलांची माहिती आणि फोटो मेघनाला पाठवत असे.या सगळ्या गोष्टी करता सहा महिने उलटले.इंदिरेला शंका आली की एवढी मुलं बघून मेघनाला एकही कसा पसंत पडत नाही. तिने सरळ मेघनाला फोन लावला." हॅलो.बोल ग." मेघना "मेघना तुझ्या मनात काय आहे एकदा सांग मला."इंदिरा "माझ्या मनात कुठे काय आहे असं का विचारते आहेस तू "मेघना "मी इतक्या चांगल्या चांगल्या मुलांची माहिती आणि फोटो पाठवते.तुला एकही पसंत पडत नाही.मी तुझ्यावर जबरदस्ती केली म्हणून तू तयार झालीस का? आणि प्रत्येक स्थळाला नकार देते आहेस का? मुलांचे फोटो तरी बघीतलेस का?""अगं आई मी तू पाठवलेल्या ...Read More

17

निर्णय. - भाग १७

निर्णय भाग १७मागील भागावरून पुढे…निर्णय मागील भागावरून पुढेमेघनाच्या फोटो पत्रीका मुलाकडच्यांना देऊन दोन दिवस उलटले होते.आजच्या दिवस थांबून.ऊद्या फोन बघू असं इंदिरेने मनाशी ठरवलं.दिवसभर नेहमीचीच काम होती पण इंदिरेला कंटाळा आला कारण मेघनाचा फोटो मुलाला पसंत पडला असेल का? काय झालं असेल या विचारात असल्यामुळे तिला बाकी काही सुचत नव्हतं.यंत्रवत तिने संध्याकाळी बगीच्यात झाडांना पाणी घातलं. रात्रीचा स्वयंपाक केला. स्वयंपाक तो काय दोघांचा म्हणजे भातुकलीच असायची. मंगेशचे खाण्यात नखरे असायचे. इंदिरेला मात्र जेवताना भाजी प्रमाणे कोशींबीर चटणी सारखी डावी बाजू पण आवडायची. ती तिच्यासाठी तिला आवडतं ते करायची पण आज तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं.जेवताना सुद्धा ती आपल्याच तंद्रीत ...Read More

18

निर्णय. - भाग १८

निर्णय भाग १८मागील भागावरून पुढे…मेघना साठी वरसंशोधन सुरू होतं.इंदिरा आवडलेल्या मुलांची माहिती आणि फोटो मेघनाला पाठवत असे.या सगळ्या गोष्टी करता सहा महिने उलटले.इंदिरेला शंका आली की एवढी मुलं बघून मेघनाला एकही कसा पसंत पडत नाही. तिने सरळ मेघनाला फोन लावला." हॅलो.बोल ग.""मेघना तुझ्या मनात काय आहे एकदा सांग मला.""माझ्या मनात कुठे काय आहे असं का विचारते आहेस तू ""मी इतक्या चांगल्या चांगल्या मुलांची माहिती आणि फोटो पाठवते.तुला एकही पसंत पडत नाही.मी तुझ्यावर जबरदस्ती केली म्हणून तू तयार झालीस का? आणि प्रत्येक स्थळाला नकार देते आहेस का? मुलांचे फोटो तरी बघीतलेस का?""अगं आई मी तू पाठवलेल्या सगळ्या मुलांचे फोटो बघीतले.पण ...Read More

19

निर्णय. - भाग १९

निर्णय भाग १९मागील भागावरून पुढेमेघनाच्या फोटो पत्रीका मुलाकडच्यांना देऊन दोन दिवस उलटले होते.आजच्या दिवस थांबून.ऊद्या फोन करून बघू असं मनाशी ठरवलं.दिवसभर नेहमीचीच काम होती पण इंदिरेला कंटाळा आला कारण मेघनाचा फोटो मुलाला पसंत पडला असेल का? काय झालं असेल या विचारात असल्यामुळे तिला बाकी काही सुचत नव्हतं.यंत्रवत तिने संध्याकाळी बगीच्यात झाडांना पाणी घातलं. रात्रीचा स्वयंपाक केला. स्वयंपाक तो काय दोघांचा म्हणजे भातुकलीच असायची. मंगेशचे खाण्यात नखरे असायचे. इंदिरेला मात्र जेवताना भाजी प्रमाणे कोशींबीर चटणी सारखी डावी बाजू पण आवडायची. ती तिच्यासाठी तिला आवडतं ते करायची पण आज तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं.जेवताना सुद्धा ती आपल्याच तंद्रीत होती.मंगेशला समोर असलेली ...Read More

20

निर्णय. - भाग २०

निर्णय भाग २०मागील भागावरून पुढे…मेघना आणि आनंद दोघांची भेट छान झाली. आनंदला भेटून आल्यावर मेघनाच्या चेहरा आनंदाने उजळला होता." दिसतात आहेत मॅडम.'"हो. ""कसं वाटलं भेटून?""आम्ही चॅट करत होतो तेव्हा जे वाटतं होतं एकमेकांबद्दल ते प्रत्यक्षातही जाणवलं. प्रत्यक्ष पहिल्यांदाच भेटलो. पण असं जाणवलं नाही.आम्ही नेहमीच भेटतो असं वाटलं.""तुला पसंत आहे नं?""हो.दोघांमध्ये सगळे विषय क्लियर आहेत.""हे छान झालं.मग पुढे जायचं.""हो. तो आजच घरी सांगणार आहे.""होका मग थोड्यावेळाने किंवा संध्याकाळी फोन करते त्यांच्या घरी."".हो""मेघना तुझ्या लग्नाची सगळी तयारी करणं मला एकटीला जमणार नाही.मिहीरच्या वेळी तू होतीस मदतीला.""तू काळजी नको करूस. मी आणि शुभांगी आहोत नं.""तुम्हाला इथे सुट्टी घेऊन यावं लागेल.तेव्हा बरीच कामं ...Read More

21

निर्णय. - भाग २१

निर्णय भाग २१निर्णय भाग ऐकोणचाळीसमागील भागावरून पुढे…बरेच वेळा मंगेशीशी हुज्जत घातल्यावर मंगेश ने काही पैसे इंदिरेच्या खात्यात जमा केले.मेघना शुभांगी या शनिवारी येणार आहेत त्या आधी मंगेश ने इंदिरेच्या खात्यात पैसे जमा केले म्हणून इंदिरेने सुटकेचा निःश्वास सोडला.शनीवारी ठरल्याप्रमाणे दोघी चिमण्या आल्या आणि इंदिरेला आपलं घरटं भरल्यासारखं वाटू लागलं." आई आपण नाश्ता करून शाॅपींगला बाहेर पडू. शाॅपींग करता करता भूक लागली तर बाहेरच जेऊ." मेघना म्हणाली." अगं आपण बाहेर जेऊ पण बाबांचं जेवण…"इंदिरा" आई आज तुम्ही बसा.मेघना आणि मी सकाळचा आपला नाश्ता आणि बाबांसाठी जेवायचं करुन ठेऊ." शुभांगी" हो आई तू आता.."" चिल मारु का?" इंदिरेने हे म्हणताच मेघनाला ...Read More

22

निर्णय. - भाग २२ - अंतिम भाग

निर्णय भाग २२मागील भागावरून पुढे…"मिहीर तु,मी आणि शुभांगी आज संध्याकाळी शरदकाकांकडे जाऊ.मी काकांना फोन करून कळवते."" कशाकरता जायचयं?""माझं महत्वाचं आहे त्यावर तुम्हा दोघांचं आणि काका काकूंचं मत घ्यायचं आहे..""ठीक आहे.किती वाजता?""पाच वाजता निघू.कुठे जातोय हे बाबांना. सांगायचं नाही." इंदिरा"ठीक आहे."आईला काय एवढं महत्वाचं बोलायचं आहे ज्यात आम्ही दोघं आणि काकूंचं मत घ्यायचं आहे हे मिहीरच्या लक्षात येतं नव्हतं.***संध्याकाळी इंदिरा, मिहीर आणि शुभांगी तिघही शरद कडे आले. मिहीरप्रमाणेच शरद आणि प्रज्ञालापण उत्सुकता होती की इंदिरा एवढं महत्वाचं काय बोलणार आहे." तुम्ही सगळे विचारात पडला असाल की मला एवढं महत्वाचं काय बोलायचं आहे. मी एक निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्यासंबंधीचे कोणतेही ...Read More