असाही एक त्रिकोण

(13)
  • 26.8k
  • 3
  • 14.3k

दारावरची बेल वाजली आणि छोटा विनय बाबा आलेss अस म्हणून दार उघडायला धावला. संध्याकाळची वेळ होती म्हणून त्यांची आई त्यांच्या मागे धावली पण तो पर्यन्त त्यांनी दार उघडलं होतं. दारात एक सुटा बुटातला अनोळखी माणूस उभा होता. विनय गोंधळला. त्याच्या आईने म्हणजे वसुधाने कोण आलंय ते ओळखलं आणि मागेच थबकली आणि दारा आडून बघू लागली. “काय रे हरीचा मुलगा का तू. ? काय नाव तुझं. ?” – गृहस्थ “विनय हरीहर रायरीकर.” छोटा विनय उत्तरला. “छान नाव आहे रे. बरं तुझा बाबा आहे का ?” – गृहस्थ. “नाही ते अजून ऑफिस मधून यायचे आहेत.” – विनय “मग कोण आहे घरी ?” – गृहस्थ. “तुम्हांला का सांगू ?” – विनय. “तुझी आई आहे का ?” – गृहस्थ. “आहे.” – विनय. “बोलाव” – गृहस्थ. आत मधून वसुधा हा संवाद ऐकत होती. तिने येणाऱ्या माणसाला ओळखलं होतं आणि ती स्वयंपाकघरात गेली आणि रेवतीला म्हणाली की “कोणी तरी आलंय, तूच जा समोर.”

Full Novel

1

असाही एक त्रिकोण - भाग 1

असाही एक त्रिकोण भाग १ दारावरची बेल वाजली आणि छोटा विनय बाबा आलेss अस म्हणून दार उघडायला धावला. वेळ होती म्हणून त्यांची आई त्यांच्या मागे धावली पण तो पर्यन्त त्यांनी दार उघडलं होतं. दारात एक सुटा बुटातला अनोळखी माणूस उभा होता. विनय गोंधळला. त्याच्या आईने म्हणजे वसुधाने कोण आलंय ते ओळखलं आणि मागेच थबकली आणि दारा आडून बघू लागली. “काय रे हरीचा मुलगा का तू. ? काय नाव तुझं. ?” – गृहस्थ “विनय हरीहर रायरीकर.” छोटा विनय उत्तरला. “छान नाव आहे रे. बरं तुझा बाबा आहे का ?” – गृहस्थ. “नाही ते अजून ऑफिस मधून यायचे आहेत.” ...Read More

2

असाही एक त्रिकोण - भाग 2

असाही एक त्रिकोण भाग २ भाग १ वरुन पुढे वाचा........... हा एवढा अपमान झाल्यावर दोघी जणी तिथे थांबण शक्यच पण हा प्रसंग यशोदेच काळीज विदीर्ण करून गेला. त्या नंतर ती कुठे बाहेर निघेनाशी झाली. आतल्या आत कुढत राहिली. घरातल्या सगळ्या कामाचा भार तिने आपल्या अंगावर घेतला. तिला कसं समजवाव हे रेवती आणि हरीहरला कळत नव्हतं. दिवस असेच जात होते. अशातच तिचा भाऊ एक दिवस तिला न्यायला आला. तो तिला घरी चल म्हणत होता. “आता इथे तू आश्रित म्हणून राहणार, त्यापेक्षा माझ्याबरोबर चल. तिथे तुला काही खायला प्यायला कमी पडणार नाही अस म्हणाला.” तो असं म्हणाला खरं पण त्यांची देह ...Read More

3

असाही एक त्रिकोण - भाग 3 - अंतिम भाग

असाही एक त्रिकोण भाग ३ भाग २ वरून पुढे वाचा ......... आणि मग एक दिवस हरेश्वराच्या सभामंडपात हरीहर यशोदेच लग्न झालं. यशोदेला जशा पूर्वीच्या आठवणी नको होत्या तसंच नाव पण नको होतं. हरीहर ने तिचं वसुधा नाव ठेवलं. साधारण वर्षभरात त्यांनी आपलं बस्तान पुण्याला हलवलं. वाडया मधल्या दोन खोल्या ठेऊन बाकी भाड्याने दिल्या. हरीहर एक हुशार वकील होता त्यामुळे पुण्याला जम बसवणं काही जड गेलं नाही. रेवतीला विकास आणि वसुधाला विनय अशी मुलं झाली. सगळं कसं छान चाललेलं होतं आणि आता जवळ जवळ १२ वर्षांनंतर अचानक विश्वास घरी आला होता घरातलं वातावरण गढूळ करायला. सुखी संसारात मिठाचा खडा ...Read More