कंस मज बाळाची

(11)
  • 68.7k
  • 5
  • 36.2k

आसं मज बाळाची ... भाग पहिला.काल अनघा खूप आनंदात होती कारण जवळपास दीड महिना पाळी न आल्याने तिला यावेळी तरी नक्कीच गोड बातमी असेल याची खात्री वाटत होती. म्हणूनच तिने प्रेग्नेंट प्रेग्नेंसी टेस्ट केली होती. त्याचा रिपोर्ट येईपर्यंत मनातल्या मनात तिने स्वतःचं बाळंतपण झालेलं सुद्धा बघितलं होतं. एका छोटसं गोंडस बाळ आपल्या कुशीत पहुडलं आहे असं बघितलं.थोड्यावेळानी वास्तव लक्षात येताच ती खुदकन स्वत:शीच हसली.खरंच मनाबद्दल म्हणतात ते काही खोटं नाही मन कसं असतं कुठल्याही काळात जाऊन विहार करु शकतं. मनाच्या शक्तीमुळेच तर आपण जिवंत राहतो. मनाला मुक्तपणे विहार करायला जगाचा कोणताही कोपरा चालतो. पण या सगळ्या गोष्टी कालच्या होत्या आज

Full Novel

1

कंस मज बाळाची - भाग १

आसं मज बाळाची ... भाग पहिला.काल अनघा खूप आनंदात होती कारण जवळपास दीड महिना पाळी न आल्याने तिला यावेळी नक्कीच गोड बातमी असेल याची खात्री वाटत होती. म्हणूनच तिने प्रेग्नेंट प्रेग्नेंसी टेस्ट केली होती. त्याचा रिपोर्ट येईपर्यंत मनातल्या मनात तिने स्वतःचं बाळंतपण झालेलं सुद्धा बघितलं होतं. एका छोटसं गोंडस बाळ आपल्या कुशीत पहुडलं आहे असं बघितलं.थोड्यावेळानी वास्तव लक्षात येताच ती खुदकन स्वत:शीच हसली.खरंच मनाबद्दल म्हणतात ते काही खोटं नाही मन कसं असतं कुठल्याही काळात जाऊन विहार करु शकतं. मनाच्या शक्तीमुळेच तर आपण जिवंत राहतो. मनाला मुक्तपणे विहार करायला जगाचा कोणताही कोपरा चालतो. पण या सगळ्या गोष्टी कालच्या होत्या आज ...Read More

2

कंस मज बाळाची - भाग २

वैभव हळूच उठला आणि फोन घ्यायला दुस-या खोलीत गेला. त्याची चाल अगदी गळून गेल्यासारखी दिसत होती.मेहतांचा दवाखाना नेहमीच गर्दीने असायचा. त्यांच्या हाताला यश होतं. म्हणून बाळाच्या ओढीनी पेशंटला त्यांच्या दवाखान्यापर्यंत खेचून आणत असेल. त्यांच्याबद्दल वैभवला त्याच्या मित्रानी सांगीतल होतं म्हणूनच ती दोघं कालचे रिपोर्ट घेऊन त्यांच्याकडे आले होते. आपल्या नावाचा पुकारा होईपर्यंत बसल्या बसल्या तिथे आलेल्या प्रेग्नंट बायकांच्या पोटाचं अनघा निरीक्षण करत होती. प्रत्येकीच्या पोटाचा आकार वेगवेगळा होता. कोणी सोफ्यावर सहजपणे बसली होती तर कोणाला बसणं अवघड जात होतं तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हे सगळं आपल्या आयुष्यात घडावं असं वाटत असतानाच हा खेळ सुरू झाला होता. ...Read More

3

कंस मज बाळाची - भाग ३

'आसं मज बाळाची भाग ३मागील भागावरून पुढे...वैभवनी उत्तरादाखल फक्त हं असा हुंकार दिला.कारण इथे अनघाला वैभवन काही बोलावं हे नव्हतं. अनघाला फक्त ही गोष्ट त्याला सांगायची होती. वैभव हे जाणून होता म्हणून डोळे मिटून बसला होता.आज दहा वर्षं झाली वैभव अनघाला ओळखत होता. तिच्या स्वभावानुसार आपण कधी उत्तर द्यायचं कधी फक्त हुंकारच द्यायचा हे तो जाणून होता. म्हणूनच आत्ता तो काही बोलला नाही. तसाही खूप दु:खाच्या प्रसंगात कोणालाच चर्चा आवडत नाही तर स्पर्शातून, चेह-यावरून, डोळ्यातून सांत्वना हवी असते.दु:ख झेलणाराच बोलत असतो. त्यालाच बोलू द्यावं.आपण फक्त श्रोत्याची भूमिका करावी. बोलणारा भडभडून बोलतो आणि तणावमुक्त होतो. हे त्यानी कुठंतरी वाचलं होतं. ...Read More

4

कंस मज बाळाची - भाग ४

आंस मज बाळाची भाग ४मागील भागावरून पुढे…आईचं ऐकून आपण कंटाळा न करता सगळ्या तपासण्या करायच्या कितीही वेळ लागू दे. आपल्या बरोबर आहे ही किती महत्वाची गोष्ट आहे. पोहे होताच तिनी पोळ्या केल्या आणि मग कुकर लावला. आता अनघाचं मन जरा शांत झालं.तिचं मन शांत झालं तसा तिचा चेहराही शांत दिसू लागला.अनघा विचारात इतकी गढली होती कि नाश्ता आणि वैभवचा डबा दोन्ही कधी तयार झालं हे तिच्याच लक्षात आलं नाही. तिला कळलं तेव्हा पुन्हा ती स्वत:शीच खुदकन हसली. माणसाचं मन विचारात गुंतलं की किती यांत्रिकपणे आपल्यासमोरची कामं करतो कळतही नाही. वैभवाचा डबा भरून ठेवला.अनाघानी समोर डायनिंग टेबलावर पोह्याची कढई आणून ...Read More

5

कंस मज बाळाची - भाग ५

'आसं मज बाळाची' भाग ५मागील भागावरून पुढे..वैभव सकाळी ऑफीसला जाण्याची तयारी करत असतांनाच त्याच्या आईचा फोन आला. तयारी करता-करता स्पीकरवर ठेवून तो बोलू लागला."हं आई बोलं.""काय बोलणार? बोलायला काही बाकी ठेवलस?"असं का म्हणतेस आई? मला कळलं नाही." वैभवनी गोंधळून विचारलं."कसं कळणार. काल आपल्या बाबांशी बोललास. आई तुझी कोणीच नाही. हो नं?"अग असं का म्हणतेस? रात्र खूप झाली होती म्हणून बाबांना सांगितलं तुला आज सविस्तर फोन करणार होतो. बाबांनी तुला सांगितलं असेल नं?""हो सांगितलं. किती खर्च येणार आहे या उपचारांना ?अजून माहित नाही. ही शस्त्रक्रिया करायची ठरवली की ते सांगतील. बीजांड देऊ शकेल अशी स्त्री पण शोधायची आहे.""वेड लागलाय तुला. ...Read More

6

कंस मज बाळाची - भाग ६

आसं मज बाळाची भाग ६मागील भागावरून पुढे...वैभवचा फोनवर रडवेला आवाज ऐकल्यावर ताईलापण भडभडून आलं.किती वर्षांनंतर हा उपाय सापडला होता आणि अनघाला आई-बाबा होण्याचा.त्याच्यात आईचा कुचकटपणा आड येतोय.ताई म्हणाली,"हे बघ मी आज तुझ्या घरी जाते. जेवायच्या वेळेसच जाईन कारण आज अनायसे अनघाच्या आवडीची फणसाची भाजी केली आहे. ती घेऊन जाते. बघते ती काय बोलते. वाटलच ती खूप अस्वस्थ आहे तर आजची रात्र मी थांबीन तुझाकडे."वैभव चटकन म्हणाला "ताई तू थांबच मला सुद्धा धीर येईल ग. मी एकटा तिला कसं समजावू शकेन कळत नाही. तू घरी सांगून दे आज तू माझ्याच कडे राहणार आहे म्हणून.""बरं. मी सांगते घरी आणि आज तुझ्याकडेच ...Read More

7

कंस मज बाळाची - भाग ७

आंस मज बाळाची भाग ७मागील भागावरून पुढे…रात्री सगळ्यांची जेवणी आटोपल्यावर ताई मुलांना म्हणाली "थोडं थांबा मला तुमच्याशी काही बोलायचं."आनंद निनादला आश्चर्य वाटलं आई कधीच अशी प्रस्तावना करून बोलत नाही. जे बोलायचं आहे ते धड-धड बोलून मोकळी होते आज काय एवढं महत्वाचं आहे. दोघांनी मुकुंदरावांकडे बघून मानेनीच काय असं विचारलं. त्यांनी मानेनीच माहित नाही असं उत्तर दिलं. तिघही समोरच्या खोलीत येऊन बसले. स्वयंपाकघरातील मागचं आवरून ताईही समोरच्या खोलीत आली.तिघही ताईकडे उत्सुकतेनी बघत होते. ताईनी बोलायला सुरवात केली. "अनघा बाळासाठी उपचार घेते आहे हे तुम्हाला माहिती आहेच."तिघांनी होकारार्थी माना डोलावल्या. आता तिला जो उपचार सांगितला आहे तो जरा जास्त खर्चिक आहे. ...Read More

8

कंस मज बाळाची - भाग ८

आसं मज बाळाची भाग ८मागील भागावरून पुढे...ताई काय बोलली हे वैभवनी अनघाला सांगितलं. हे ऐकताच अनघानी आनंदाने वैभवला मिठीच वैभव मला न जाम भीती वाटत होती."" भीती कसली?" "अरे ताईनी तिची इच्छा घरी बोलून दाखवल्यावर घरचे काय म्हणतील? होकार देतील की नाही म्हणतील.पण आता सगळ्या चिंता दूर झाल्या. ताई आणि मुकुंदराव डॉ.ना भेटून आले की पुढे सगळं लगेच सुरु होईल.वैभव पैशाची तजवीज कशी करायची?"" त्याची तू काळजी करू नकोस. आता तू हसतमुख रहा." वैभव म्हणाला. त्यावर अनघानी छान स्माईल दिलं. स्वयंपाकघरात जाता-जाता अनघा म्हणाली"आज इस खुशीमे मै कुछ मिठा बनाती हुं."अनघा आनंदाने म्हणाली."अरे...आज एकदम हिंदी?"तिचा हसरा चेहरा बघून वैभवला ...Read More

9

कंस मज बाळाची - भाग ९

आंस मज बाळाची भाग ९मागील भागावरून पुढे…आसं मज बाळाची भाग ९संध्याकाळी ताई आणि मुकुंदराव डॉ. मेहतांच्या दवाखान्यात आले होते. नंबर येईपर्यंत वाट बघत बसले होते. जवळपास अर्धा तास झाला होता त्यांना येऊन. एवढ्यात त्यांचं नाव पुकारल्या गेलं. "ममता मुकुंदराव कोल्हटकर कोण आहे?" ममता गडबडीनं उभी राहिली आणि म्हणाली,"मी आहे". "आत जा." रीसेप्शानिस्ट बोलली. दोघाही आत गेले."नमस्कार डॉ. मी ममता कोल्हाटकर""नमस्कार बसा."डॉ. म्हणाले. "डॉ. मी आपले पेशंट असलेल्या वैभव पांगारकर यांची मोठी बहीण. ""अच्छा." डाॅक्टर बोलले."मी माझं बीजांड माझ्या वहिनीला द्यायला तयार आहे."तिचं बोलण मधेच तोडत मुकुंदरावांनी बोलण्याची सूत्र आपल्याकडे घेतली."डॉ. ममताला तिचं बीजांड द्यायचं आहे पण हे मोठ ऑपारेशन ...Read More

10

कंस मज बाळाची - भाग १० (अंतिम भाग)

आसं मज बाळाची भाग १०मागील भागावरून पुढे...अनघाच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमासाठी माधवराव आणि मालतीबाई म्हणजेच वैभवाचे आईवडील आले होते.माधवरावांनी या संपूर्ण फक्त मालतीबाई कडेच लक्ष देण्याचं काम केलं कारण त्यांना आपल्या बायकोच्या कुचकट स्वभावामुळे तिच्यावर विश्वास नव्हता. मालतीबाईंना ते क्षणभर दृष्टीआड होऊ देत नव्हते.एकदा मालतीबाईनी विचारलही "काय तुम्ही सारखे माझ्या मागे मागे करतात? असं करत नाही तुम्ही कधी?""हो मी नेहमी असं करत नाही पण आज खूप आनंदाचा दिवस आहे. कुठे आनंद दिसला की त्याच्यावर विरजण कसं घालता येईल याचाच विचार तू करत असते.म्हणून मला तुझ्यावर लक्ष ठेवावं लागतंय."माधवरावांच्या या बोलण्यावर मालतीबाईं रागानी नाकाचा शेंडा उडवून तरतर चालत सोफ्यावर जाऊन बसल्या. शांतपणे ...Read More