राधा - रंगा

(4)
  • 24.7k
  • 1
  • 10.9k

दिवस बुडायला आला होता. सूर्याचा तांबूस केसरी गोळा हळूहळू डोंगराआड चालला होता. उसाच्या शेतातली हरभरा टोपायची कामं उरकली होती. कालच्याप्रमाणे आजही रंगाने आग्रहाने कामगार बायकांना बैलगाडीत बसायला सांगितलं. दुडक्या चालीनं बैलगाडी फाट्याच्या बाजू बाजूने चालली होती. एखादा खड्डा आलाच तर गाडी एकाबाजूला हिंदकळायची. दोन्ही चांकांच्यामधून गाडीच्या खाली रंगाचा बंड्या कुत्रा बैलांच्या वेगाबरोबर चालत होता. फाट्यातल्या पाण्यावर पाणपक्षी मासे पकडण्यासाठी घिरट्या घालत होते. छग्या बग्याच्या पाठीवर थाप मारत रंगा मजेत एखादी शीळ वाजवत होता. बायकांचं आपापसांत काहीबाही कुजबुजणं चालू होतं.

Full Novel

1

राधा - रंगा - 1

१. दिवस बुडायला आला होता. सूर्याचा तांबूस केसरी गोळा हळूहळू डोंगराआड चालला होता. उसाच्या शेतातली हरभरा टोपायची कामं उरकली कालच्याप्रमाणे आजही रंगाने आग्रहाने कामगार बायकांना बैलगाडीत बसायला सांगितलं. दुडक्या चालीनं बैलगाडी फाट्याच्या बाजू बाजूने चालली होती. एखादा खड्डा आलाच तर गाडी एकाबाजूला हिंदकळायची. दोन्ही चांकांच्यामधून गाडीच्या खाली रंगाचा बंड्या कुत्रा बैलांच्या वेगाबरोबर चालत होता. फाट्यातल्या पाण्यावर पाणपक्षी मासे पकडण्यासाठी घिरट्या घालत होते. छग्या बग्याच्या पाठीवर थाप मारत रंगा मजेत एखादी शीळ वाजवत होता. बायकांचं आपापसांत काहीबाही कुजबुजणं चालू होतं. 'हो. ती तसलीच आहे. पैशाचा माज दुसरं काय?' 'व्हय बया. एवढी शिकल्याली हाय पर बोलणं एकदम कुचक्यागत. लई श्यानी असल्यावानी ...Read More

2

राधा - रंगा - 2

२. जेवण खाणं उरकून सारी वस्ती सामसूम झाली होती. मरीआईच्या मंदिरासमोरील ओढ्याचं पाणी खळखळत वाहत होतं. बंड्या पायऱ्यांच्यावर घाटावर घालत होता. राधा रंगा दोघेही पाण्यात पाय सोडून पायऱ्यांवर बसले होते. थंडगार पाण्याचा स्पर्श पायांना होत होता. मधूनच एखादा चुकार मासा पायांना धडकून जायचा. आज खूप दिवसांनी त्यांना निवांत वेळ मिळाला होता. पाठीमागे हात टेकवून वर आकाशातल्या चांदण्या पाहण्यात रंगा दंग होऊन गेला होता. "रंगा..." "हं..." "मला खरं खरं सांगशील?" "राधा. मी फक्त खरंच बोलतो. तुलाही माहिती आहे. बोल." "मी का आवडते तुला?" "राधा. कितीवेळा सांगायचं तुला." "तुझ्या तोंडून ऐकलं कि, मन भरून येतं. माझा मलाच हेवा वाटतो." "हं." "सांग ...Read More

3

राधा - रंगा - 3 - अंतिम भाग

३. देवीची जत्रा दोन आठवड्यांवर आली होती. संत्याने बैलांकडून चांगला कसून सराव करून घेत होता. सातारचा त्याचा मावसभाऊ मावशीला आला होता. बारामतीला मोठ्या डॉक्टरांकडे दाखवायचं होतं. चार पाच दिवस इथेच असल्यामुळे संत्याने त्याच्याकडून बैलांचा सराव करून घेतला होता. त्याचा मावसभाऊ सातारच्या निंबाळकरांच्या शर्यतीच्या बैलगाडीवर ड्रॉयव्हर होता. साहजिकच त्याला शर्यतीच्या सगळ्या खाचाखोचा माहिती होत्या. त्याने निंबाळकरांचा बैलगाडा सलग तीन वर्षे जिल्ह्यात पहिल्या नंबराने जिंकण्याचा विक्रम केला होता. चार पाच दिवस त्याने बैलांचा आणि संत्याचाही सराव करू घेतला. त्याने संत्याला शर्यतीच्यावेळी लक्षात ठेवण्यासारख्या खूप गोष्टी सांगितल्या. बैलांना मारायचं किंवा दारू पाजायची नाही. टोच्या लावायचा किंवा शेपटी पिरगळायची नाही. छकड्याची चाकं चांगलं ...Read More