हिरवे नाते

(24)
  • 101.3k
  • 1
  • 42.3k

गणेशा समोर कंदी पेढे ठेऊन मनोभावे नमस्कार करत अपर्णाने श्रद्धेने डोळे मिटले. आज पायलचा बारावीचा रिझल्ट लागला होता. बोर्डातून पहिली येण्याचा मान तिला मिळाला होता. गोल्ड मेडलची ती मानकरी ठरली होती . डोळे उघडून निरांजनाच्या प्रकाशाने भारलेल्या आणि जाईच्या सुवासाने तृप्त झालेल्या गणेशाकडे तिने नजर टाकली, चांदीच्या वाटीत एक पेढा ठेवून बाकी पेढे वाटण्यासाठी हॉलमध्ये आली. तिथे उत्साहाला उधाण आले होते. क्षणभर तिला आपण पिक्चर पहातोय असच वाटू लागलं . सासू सासरे, कौतुकाने निथळत्या नजरेने पायलकडे बघत होते. वडील अभिमानाने लेकीला न्याहाळत होते. आरव आपल्या मोठ्या बहिणीच्या यशाने फुलून आला होता. मित्र मैत्रिणींंच्या गराड्यात बसलेल्या पायलशी सगळेच एकदम बोलत होते

New Episodes : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

हिरवे नाते - 1

गणेशा समोर कंदी पेढे ठेऊन मनोभावे नमस्कार करत अपर्णाने श्रद्धेने डोळे मिटले. आज पायलचा बारावीचा रिझल्ट लागला होता. बोर्डातून येण्याचा मान तिला मिळाला होता. गोल्ड मेडलची ती मानकरी ठरली होती . डोळे उघडून निरांजनाच्या प्रकाशाने भारलेल्या आणि जाईच्या सुवासाने तृप्त झालेल्या गणेशाकडे तिने नजर टाकली, चांदीच्या वाटीत एक पेढा ठेवून बाकी पेढे वाटण्यासाठी हॉलमध्ये आली. तिथे उत्साहाला उधाण आले होते. क्षणभर तिला आपण पिक्चर पहातोय असच वाटू लागलं . सासू सासरे, कौतुकाने निथळत्या नजरेने पायलकडे बघत होते. वडील अभिमानाने लेकीला न्याहाळत होते. आरव आपल्या मोठ्या बहिणीच्या यशाने फुलून आला होता. मित्र मैत्रिणींंच्या गराड्यात बसलेल्या पायलशी सगळेच एकदम बोलत होते ...Read More

2

हिरवे नाते - 2 - नियती

नियती ग्रॅज्युएट झालो आणि नोकरी मिळवण्याची धडपड चालू झाली. खूप मोठी स्वप्न उराशी होती. खूप पैसे कमवायचे होते. त्यासाठी ते करायची तयारीही होती. आईला हे सगळे बोलून दाखवताना एकप्रकारचा अहंभाव तिला जाणवत होता. ती बोलूनही दाखवायची पण माझ्या तारुण्यातल्या धुमाऱ्यां पर्यन्त तिचे शब्द पोहोचत नव्हते. बाबा हे तारुण्याचे वारे जाणून होते. ...Read More

3

हिरवे नाते - 3 - बुढाबाबा

बुढाबाबा छकवा उंटीणीच्या बाळाच्या आगमनाने सगळं घर आनंदलं होतं. रात्रभर छकव्याला होणाऱ्या बाळंत वेदनांनी घरदाराला पिळवटून काढलं होतं. जरा उशिरानेच सगळं घर जागं झालं. फुलवाने उठल्यावर अंगण झाडताना, दहावेळा त्या बाळाच्या अंगावरून हात फिरवला होता. ४ ते ५ फुटांची ऊंची, लांबसडक कमानदार मान, त्यावर एखादं त्रिकोणी भांड बसवावं तसं ...Read More

4

हिरवे नाते - 4 - बदल

बदल कडूगोड आठवणी साठवून जीवनचक्र फिरत असते. घरामध्ये काही बदल घडत असल्याचे जाणवू लागलं होतं. आता वीणाला जाण आली होती. आई बाबा आपसात काही चर्चा करत आहेत, असं वारंवार दिसू लागलं होतं. आजी आजोबां बरोबरही चर्चा होत होती. वातावरण ताणत ताणत एक दिवशी ते तुटलं. मग मुलांशीही चर्चा ...Read More

5

हिरवे नाते - 5 - तात्याकाका

साधारण १९४६ चा काळ होता. पुण्याला वाड्यामध्ये बिऱ्हाड करून रहायची त्याकाळी मोठ्या प्रमाणावर सोय होती. नवीन लग्न झालेले, शिक्षणासाठी कुटुंब, मुलं गावी ठेवून बदलीवर आलेले असे बरेच लोकं वाड्यांमधून दोन खोल्या घेऊन रहात असायचे. आम्ही पण असेच बाबांची बदली झाली त्या निमित्ताने पुण्याला आलो होतो. आम्हा मुलांना चांगल्या शाळेत घालता येईल म्हणून बाबांनी गुहागरहून सगळ्यांनाच इकडे आणले होते. त्यांच्या मित्राच्या ओळखीने वाड्यातल्या तीन खोल्या मिळाल्या होत्या. सामान सुमान घेऊन आम्ही त्या वाड्यावर आलो. परांजपे वाडा होता तो. तेव्हा पुणं एव्हढं गजबजलेलं नव्हतं. झाडांनी वेढलेल्या वाडयाचं दर्शन फार छान वाटलं. सगळ्या प्रकारच्या फळझाडांनी आणि फुलझाडांनी आवार बहरलं होतं. ...Read More

6

हिरवे नाते - 6 - जीवन

जीवन निळ्याभोर आकाशाखाली, झाडाच्या गर्द सावलीत निखिल एकटाच बसला होता. उव्दिग्न मनःस्थितीने त्याला सभोवतालचे सौंदर्यही जाणवत नव्हते. शुन्यात एक बनवून त्यातच हरवून गेला होता. काय झाले एव्हढे आपल्याला की जीवनातला रसच संपवून निरसता यावी. सगळ्या जाणिवा बोथट व्हाव्या ? कुठेही कशाची कमी नाही. आई वडील अतिशय महत्वाकांक्षी नव्हते. सहज जीवन जगण्याकडे त्यांचा कल ...Read More

7

हिरवे नाते - 7 - जोडीदार

जोडीदार “ सिध्दाली आटोप लवकर.” “ मला नाही आटपायचय, सांगितलं ना एकदा.” “ अगं बाई त्याला ये म्हणून सांगून ठेवलय ना आता. मग आता सामोरं जायला नको का ?” “ मी सांगितलं का त्याला ये म्हणून ?” “ काही म्हण बाई, पण आजच्या दिवस तरी माझ्यासाठी तयार ...Read More

8

हिरवे नाते - 8 - गर्भ

गर्भ - 8 सृजनाची ओढ पियूला नेहमीच आतून जाणवत असायची. ...Read More

9

हिरवे नाते - 9 - कॉकटेल पार्टी

कॉकटेल पार्टी - 9 विदुला विचारमग्न होऊन बसली होती. लंचटाईम झाला याचही तिला भान नव्हतं. कामं समोर तशीच होती. “ विदुला, अग चल ना जेवायला.” आभा म्हणाली. “ नको आभा, तू ये जेऊन. मला भूक नाहीये. फक्त माझ्यासाठी कडक कॉफी पाठवून दे.” “ का ग ? बरं नाही ?” आभा “ ...Read More

10

हिरवे नाते - 10 - सुगंधी बाबा

सुगंधी बाबा - 9 खुप वर्षांनी औरंगाबादला गेले की तिथे जुन्या आठवणींच्या वाटांवरून फेरफटका मारायची माझी जुनी सवय. बालपणाचं धरून बदलत गेलेल्या वाटांवरून चालताना भूतकाळ आणि वर्तमानकाळातल्या सांगड घालणाऱ्या आठवणींची त्रेधातिरपीट उडायची. बालपणातल्या किंवा तारुण्यातल्या त्या सवयींच्या जागेकडे पहाताना समोर दिसणाऱ्या वेगळ्याच नजाऱ्यांनी मनाची घालमेल व्हायची. तिथल्या बदललेल्या रूपानी जुन्या ...Read More

11

हिरवे नाते - 11 - गुंफण

गुंफण : 12 “ कुठेतरी जाऊया ना रे आपण .” नीताने आळसावतच शेजारी पेपर वाचत पडलेल्या वरूणकडे टाकली. “ काय झालं ?” पेपर मधून नजर न हटवता वरुण म्हणाला. तेव्हा रागारागाने नीताने त्याच्या हातातला पेपर ओढून घेतला. काहीतरी बिनसलय हे लक्षात येऊन वरुणने समजूतदारपणे तिच्याकडे मोर्चा वळवला. नीता आपल्याच ...Read More

12

हिरवे नाते - 12 - काळी माय

काळी माय : 13 मिल मधली नोकरी सुटली आणि शंकरला बायको मुलाला घेऊन गावी यावं लागलं. गावी वाटण्या झाल्या आपापले हिस्से घेऊन तिघेही भाऊ जमिन कसत आणि इतर जोडधंदेही करत होते. आई वडील वडिलोपार्जित घरात त्यांचे हातपाय हालतात तोपर्यंत तिथेच रहाणार होते. त्यांच्या पश्चात घराच्या वाटण्या होणार होत्या. शंकरने आपले बस्तान चांगलं बसलय म्हणून तिघा भावाना मोठेपणाने ...Read More

13

हिरवे नाते - 13 - मुकी

मुकी :14 बदली झाली आणि आम्ही औरंगाबादला रहायला आलो. आपलच गाव होतं. पण परत नवीन शेजार पाजार, शाळा, बाई सगळच नवीन. सामानाच्या बॉक्सनी घर भरून गेलं होतं. स्वैपाकघरातलं सामान आधी लागतं म्हणून ते बॉक्स उघडायच्या तयारीत असताना बेल वाजली. आता आपल्याकडे कोण येणार अशा प्रश्नार्थक मुद्रेने काम आवरत राहिले. कुणीतरी ...Read More