तांडव- भाग-1 मी चहाचा घोट घेता- घेता वर्तमानपत्र वाचत होतो.वाफाळणारा चहा व सकाळच प्रसन्न वातावरण यामुळे मी मूडमध्ये होतो. अचानक एका बातमीने माझे लक्ष वेधले...बातमी अशी होती. सलग तिसरी रहस्यमय हत्या तळगांव- दि.५/२/२०२१ आज पहाटे तळगाव घाटीतील शेवटच्या वळणार एक मृतदेह आढळून आलाय.दूध घेवून येणार्या टेम्पोचालकाने घाटात भररस्त्यात पडलेला हा मृतदेह पाहिला व पोलीसांना खबर दिली. मृतदेह तरूणाचा असून मृतदेहाचा चेहरा अत्यंत क्रूरपणे विद्रूप केलेला आहे.त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले आहे. गेल्या महिनाभरात तळगांव परीसरात झालेली ही तिसरी हत्या असून आधिच्या दोन हत्यांप्रमाणेच याही वेळा पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनांमुळे तळगाव परीसरात भितीच वातावरण पसरलं
Full Novel
तांडव - भाग 1
तांडव- भाग-1 मी चहाचा घोट घेता- घेता वर्तमानपत्र वाचत होतो.वाफाळणारा चहा व सकाळच प्रसन्न वातावरण यामुळे मी मूडमध्ये होतो. एका बातमीने माझे लक्ष वेधले...बातमी अशी होती. सलग तिसरी रहस्यमय हत्या तळगांव- दि.५/२/२०२१ आज पहाटे तळगाव घाटीतील शेवटच्या वळणार एक मृतदेह आढळून आलाय.दूध घेवून येणार्या टेम्पोचालकाने घाटात भररस्त्यात पडलेला हा मृतदेह पाहिला व पोलीसांना खबर दिली. मृतदेह तरूणाचा असून मृतदेहाचा चेहरा अत्यंत क्रूरपणे विद्रूप केलेला आहे.त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले आहे. गेल्या महिनाभरात तळगांव परीसरात झालेली ही तिसरी हत्या असून आधिच्या दोन हत्यांप्रमाणेच याही वेळा पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनांमुळे तळगाव परीसरात भितीच वातावरण पसरलं ...Read More
तांडव - भाग 2
तांडव - भाग-2 तळगांव हे एक छोट गाव होत. गावात एकूण दोनच लाॅज होती.त्यातल्या त्यात एका बऱ्या लाॅजमध्ये मी रूम बुक केली. माझी बॅग मी रूममध्ये ठेवली पण बॅगेला दोन कुलपं लावून बॅग काॅटखाली ठेवली.हातपाय धुवून विश्रांती घेण्यासाठी मी बेडवर कंलडलो.मनात मी घडलेल्या घटनांची उजळणी करत होतो. मी पंढरी रंगसूरला फोन लावला.ते त्या बांधकामाच्या ठिकाणी होते.मला त्यांनी तिथेच भेटायला बोलावलं.मी उतरलेल्या लाॅजकडून ती जागा पाच मिनिटांच्या अंतरावर होती.मी रूम बंद करून चावी देण्यासाठी काउंटरवर गेलो. काउंटरवर पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा होता.मी सहज त्याला विचारले" सहा महिन्यांपूर्वी ज्या घराला आग लागलेली ते घर नेमकं कुठे आहे.?" "जवळच आहे, मेन रोडला लागूनच ...Read More
तांडव - भाग 3
तांडव भाग 3 एक कार वेगाने तळगावची घाटी ओलाडंत होती.एक पंचविस वर्षाचा तरूण ती गाडी चालवत होता.तो भारावल्या सारखा होता.यंत्रवत तो गाडी चालवत होता.हेडलाईटच्या प्रकाश झोतात रस्त्याच्या कडेला कुणीतरी उभे असलेले त्याला दिसले.थोड जवळ जाताच त्याच्या लक्षात आल की ती एक तरूणी आहे.ती गाडीला हात दाखवत थोडी पुढे आली.अभावितपणे तरूणाने ब्रेक दाबले. जांभळ्या रंगाची साडी...जांभळा ब्लाउज...खांद्याला जांभळी पर्स...दोन धनुष्याकृती भुवयांमध्ये गोलाकार जांभळ कुंकू .. पायात जांभळ्या रंगाच्या चपला......चेहर्यावर मोहक हसू व डोळ्यात मधाळ मोहिनी असा तिचा वेष होता. वेळ होती रात्री दोन वाजून दोन मिनीटांची ! हे काहीतरी वेगळ आहे ...हे कुणाच्याही लक्षात आल असत पण त्या तरुणांचा मेंदू ...Read More
तांडव - भाग 4 (अंतिम भाग )
तांडव 4 मी पंढरीला फोन केला .तो रिकामा होता.मी त्याला घेवून धरणावर गेलो. एकमेकांना टेकलेल्या दोन त्रिकोणी टेकड्यांना समोरून घालून धरण बनवले होते. आजूबाजूला ऊसाची लागवड केलेली दिसत होती. परीसर छान दिसत होता. " पंढरी ..इथे शांत वाटतय...पर्यटक येत असतील नाही?" " येतात साहेब...पण ..कधीकधी.." " इथे फार्महाऊसही आहेत. मेजर दळवींचही फार्महाऊस इथे आहे ना?" " तूम्हाला कस माहित? " त्याने दचकून विचारले. " मेजर म्हणत होते की ते नसतात तेव्हा तूम्हाला तिथ ठेवतात...सहा महिन्यांपूर्वी तूम्ही तिथे होता...त्यावेळी सात तरूण आलेले...बरोबर ना?" पंढरी घाबरला. " साहेब...हे मेजरना सांगू नका..मी त्यांना नाही म्हणत होतो पण त्यांनी मला दोन तासांचे एक ...Read More