आकाशी झेप घे रे पाखरा !!

(8)
  • 21k
  • 2
  • 9.7k

आज ऊन जरा जास्तच वाटत होतं. केंव्हा एकदा घरी पोहचते असं झालं होतं.बिल्डिंगच्या जवळ आले तर समोरूनच लता येत होती. लता म्हणजे आमच्या बिल्डिंगचं बीबीसी चॅनल.... हिला सगळ्यांच्या घरी काय चाललंय , हे जाणून घ्यायची खूप इच्छा असते.. 'अरे बापरे ! कसं टाळू हिला आता ? मला लवकर जायचं आहे घरी..' आलीच हिची हाक.. आता काय ! आलिया भोगासी असावे सादर .... "काय मग कशी आहेस, आज माझ्याकडे काय काम काढलसं ," मी हसत हसत विचारलं.. "हो बाई.. तुम्ही काय एकदम बिझी माणसं. माझ्या मनात आलं की आपणच तुला एक बातमी द्यावी.. तीही तूझ्या जवळच्या माणसांबद्दलची.." एव्हाना माझ्या लक्षात आलं हिला काय सांगायचंय..पण मी वेड पांघरूण पेडगावला जाणं जास्त पसंत केलं.. मला काही समजलंच नाही असा आविर्भाव दाखवला..

Full Novel

1

आकाशी झेप घे रे पाखरा !! - भाग १

आज ऊन जरा जास्तच वाटत होतं. केंव्हा एकदा घरी पोहचते असं झालं होतं.बिल्डिंगच्या जवळ आले तर समोरूनच लता येत लता म्हणजे आमच्या बिल्डिंगचं बीबीसी चॅनल....हिला सगळ्यांच्या घरी काय चाललंय , हे जाणून घ्यायची खूप इच्छा असते..'अरे बापरे ! कसं टाळू हिला आता ? मला लवकर जायचं आहे घरी..'आलीच हिची हाक..आता काय ! आलिया भोगासी असावे सादर ...."काय मग कशी आहेस, आज माझ्याकडे काय काम काढलसं ," मी हसत हसत विचारलं.."हो बाई.. तुम्ही काय एकदम बिझी माणसं. माझ्या मनात आलं की आपणच तुला एक बातमी द्यावी.. तीही तूझ्या जवळच्या माणसांबद्दलची.."एव्हाना माझ्या लक्षात आलं हिला काय सांगायचंय..पण मी वेड पांघरूण पेडगावला ...Read More

2

आकाशी झेप घे रे पाखरा !! - भाग २

श्रीकांत आणि माझं लग्न अरेंज मॅरेज .. आम्ही दोघं लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहचण्याअगोदर एकदा भेटलोही.. मला त्या भेटीत, त्याला नकार असं त्याच्या स्वभावात काहीच वावगं वाटलं नाही, मी कॉम्प्युटर इंजिनियर आणि श्रीकांत मेक्यानिकल इंजिनीयर , तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत होता, त्याच्या घरची सगळी सुशिक्षित आणि सुसंस्कृत वाटली. माझ्या घरच्यांनाही हे स्थळ खूप आवडलं. फायनली आम्ही लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत आलो. तसं पाहिलं तर श्रीकांतला खूप श्रीमंत मुली सहज मिळाल्या असत्या. तरीसुद्धा माझ्यासारख्या गरीब मुलीला त्याने आणि त्याच्या घरच्यांनी पसंत केले म्हणून सगळे त्याचं कौतुकच करत होते.त्यांनी लग्नात पण खूप समजूतदारपणा दाखविला.. मुलीकडचे आहेत म्हणून आमची कुठेही अडवणूक केली ...Read More

3

आकाशी झेप घे रे पाखरा !! - भाग ३

माझ्यातील स्त्री हार मानायला तयार नव्हती.अर्णवचा विचार मनात येऊन आपण करतोय ते योग्य आहे ना असं किती तरी वेळा मनात आलं पण आता जर ठाम निर्णय घेतला नाही तर परत कधीच हे शक्य होणार नाही हे मला पटलं.. मनातल्या मनात याविषयी बरीच द्वंद झाली आणि शेवटी घटस्फोट घेण्याच्या निर्णयास आले.."आता तुम्हीच सांगा.. काय चुकलं माझं.."मी फक्त हसून तिच्या पाठीवर हात ठेवला.. तिला धीर दिला पण ती चूक की बरोबर यावर त्या क्षणाला भाष्य टाळले..एकदा श्रीकांतलाही भेटून त्यांची बाजू ऐकायची मनात ठरवलं.तशी संधी मला लवकरचं मिळाली.. एक दिवस त्याचाच फोन आला.." तब्बेत बरी नाही. याल का घरी"..घरी गेले तर त्याचं ...Read More