धुक्यात हरवलेलं माथेरान...

(5)
  • 22.6k
  • 1
  • 10.3k

विजांच्या कडकडाटने अचानक जाग आली.. मोबाईल बघितला, तर पहाटेचे साडेतीन वाजले होते.. थोड्याच वेळात आम्हाला माथेरानसाठी निघायचं होतं.. तसा मी सव्वा चारचा गजर लावला होता पण "दामिनी मॅडमनी" थोडं अगोदरचं मला उठवलं.. बेडरूमचा पडदा बाजूला करून बघितलं तर मॅडम एकट्याच नव्हत्या त्यांच्या सोबत वरुण देवही आपलं अस्तित्व दाखवत होता..... मनात आलं आज काही खरं नाही आपल्या ट्रिपचं ... तशीच थोडा वेळ पडून राहिले पण झोपच येईना मग उठून तयारीला लागले.. अनिलला उठवून अंघोळीला जायला सांगितलं.. फक्कडसा चहा बनवावा या विचाराने मी दुधासाठी फ्रिज उघडला.. अरेच्चा ! दुध कुठं गेलं. काल तर अगदी आठवणीने चहा पुरतं काढून ठेवलं होत.. आधी वाटलं माझी झोप उडाली नाही.. म्हणून डोळे चोळले पण काही उपयोग झाला नाही.. फ्रिज मधे खरचं दूध नव्हतं.. माझं लक्ष्य सिंककडे गेलं तर त्यात दुधाचा ग्लास मला वाकुल्या दाखवत होता .. मला अंदाज आला काय झालं असणार, आम्ही दोन दिवस घरी नसणार आणि आहे ते दूध खराब होऊ नये म्हणून आमच्या घरच्या मांजरीने कधी नव्हे ते रात्रीच दूध पिऊन टाकलं होतं..( चाणाक्ष वाचकांनी मांजर कोण ते ओळखलं असेलचं ??)

Full Novel

1

धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 1

धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 1 विजांच्या कडकडाटने अचानक जाग आली.. मोबाईल बघितला, तर पहाटेचे साडेतीन वाजले होते..थोड्याच वेळात आम्हाला निघायचं होतं..तसा मी सव्वा चारचा गजर लावला होता पण "दामिनी मॅडमनी" थोडं अगोदरचं मला उठवलं..बेडरूमचा पडदा बाजूला करून बघितलं तर मॅडम एकट्याच नव्हत्या त्यांच्या सोबत वरुण देवही आपलं अस्तित्व दाखवत होता..... मनात आलं आज काही खरं नाही आपल्या ट्रिपचं ...तशीच थोडा वेळ पडून राहिले पण झोपच येईना मग उठून तयारीला लागले..अनिलला उठवून अंघोळीला जायला सांगितलं.. फक्कडसा चहा बनवावा या विचाराने मी दुधासाठी फ्रिज उघडला..अरेच्चा ! दुध कुठं गेलं. काल तर अगदी आठवणीने चहा पुरतं काढून ठेवलं होत.. आधी वाटलं माझी ...Read More

2

धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 2

प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर तोबा गर्दी होती त्यातले बरेचजण पर्यटक वाटत होते. प्रवासाच्या बॅगा सांभाळत ट्रेनची वाट बघणारे एवढे बघितले आणि माझ्या मनात आलं, बापरे! सगळे माथेरानला निघाले की काय ? आपल्याला नेरळ स्टेशन येईपर्यंत ट्रेनमध्ये बसायला जागा मिळेल की नाही ??.पण तेवढ्यात तेजस एक्स्प्रेसची घोषणा झाली.. मग समजलं की अरे ,हे सगळे तर गोव्याला चालले आहेत..तेजस एक्स्प्रेस गेली आणि प्लॅटफॉर्म वरील गजबजाट थोडा कमी झाला..कर्जत ट्रेनची वेळ होऊन गेली तरी ट्रेन यायचं नावचं घेईना..माझा जीव परत वर खाली होऊ लागला.. कारण ही कर्जत ट्रेन आली नाही तर अर्ध्या तासाने असणाऱ्या खोपोली ट्रेनमध्ये आपल्याला काही चढायला मिळणार नाही आणि ...Read More

3

धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 3

हॉटेलच्या लॉबीत आम्ही स्थानापन्न झालो.. अनिलने रिसेप्शन काउंटरला जाऊन आमची ओळखपत्र जमा केली.. रिसेप्शनिस्टने हसून स्वागत केले आणि थोडा बसण्यास सांगितले.. लॉबी चांगलीच प्रशस्त होती.. एका बोर्डवर आजचा नाश्त्याचा आणि जेवणाचा मेनू लिहला होता.. मेनू बघून जेवण मस्तच असणार याचा अंदाज येत होता.. कमीत कमी पाच ते सहा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ नाश्त्यामध्ये होते.. दुपारच्या जेवणाचीही अशीच चंगळ दिसत होती.. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ आणि त्यात खूप सारे पर्याय... अस्सल खवय्ये लोकांसाठी तर पर्वणीच होती ही.. एकदम पैसा वसूल काम !! ..बाजूच्याच बोर्ड वर .. संध्याकाळी कोणकोणते मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहेत याची लिस्ट होती.. त्यात संगीत खुर्ची, डी. जे. , ...Read More