साक्षीदार

(50)
  • 149.4k
  • 13
  • 79.4k

माझी नवीन रहस्य कथा क्रमशः प्रसिद्ध करत आहे. यातील सर्व पात्रे ,प्रसंग,घटना काल्पनिक असून वास्तवाशी किंवा अन्य कोणत्याही भाषेतील कोणत्याही कथेशी याचा संबंध नाही. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.सदर कथा किंवा त्याचा कोणताही भाग कोणीही माझ्या पूर्व परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये. साक्षीदार प्रकरण १ “ तुम्ही पाणिनी पटवर्धन आहात? ” पाणिनी समोर बसलेल्या त्या तिशीतल्या तरुणीने पाणिनीला च प्रश्न केला. “ तुम्ही ईशा गरवारे आहात हे खरं असेल तर मी पाणिनी पटवर्धन आहे हे खरं आहे.” पाणिनी म्हणाला तिचे डोळे पाणिनी कडून हो या उत्तराची अपेक्षा करत होते ,ते एकदम स्तब्ध झाले आणि पाणिनी चे उत्तरं ऐकून तिला एकदम हसू फुटले. “ मी अडचणीत आहे.” ती म्हणाली. पाणिनी ने थंडपणे मान डोलावली, रोजचीच प्रश्नोत्तरे.रुटीन मधील.त्याला आपल्या उत्तराचे काहीच वाटले नाही म्हणून ती नाराज झाली.

Full Novel

1

साक्षीदार - 1

साक्षीदार माझी नवीन रहस्य कथा क्रमशः प्रसिद्ध करत आहे. यातील सर्व पात्रे ,प्रसंग,घटना काल्पनिक असून वास्तवाशी किंवा अन्य कोणत्याही कोणत्याही कथेशी याचा संबंध नाही. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.सदर कथा किंवा त्याचा कोणताही भाग कोणीही माझ्या पूर्व परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये. साक्षीदार प्रकरण १ “ तुम्ही पाणिनी पटवर्धन आहात? ” पाणिनी समोर बसलेल्या त्या तिशीतल्या तरुणीने पाणिनीला च प्रश्न केला. “ तुम्ही ईशा गरवारे आहात हे खरं असेल तर मी पाणिनी पटवर्धन आहे हे खरं आहे.” पाणिनी म्हणाला तिचे डोळे पाणिनी कडून हो या उत्तराची अपेक्षा करत होते ,ते एकदम स्तब्ध झाले आणि पाणिनी चे उत्तरं ऐकून तिला एकदम ...Read More

2

साक्षीदार - 2

प्रकरण २ फिरोज लोकवालाची त्वचा खडबडीत होती त्याने लोकरी सारख्या कापडाचा सूट घातला होता. त्याचे डोळे सौम्य तपकिरी, पण आणि निर्जीव वाटत होते. त्याचे नाक मोठे होते, प्रथम दर्शनी तो सौम्य आणि निरुपद्रवी वाटत होता. "ठीक आहे," तो म्हणाला, "आपण येथे बोलू शकता." पाणिनी ने मानेनेच नाही म्हंटले. “ या जागेत तुम्ही यांत्रिक करामती करून ठेवल्या असतील,आपल्यातले बोलणे रेकोर्ड होण्यासाठी.मला अशा ठिकाणी बोलायचंय जिथे आपल्या दोघांशिवाय कोणी नसेल.” पाणिनी म्हणाला “ कुठे?” फिरोज लोकवाला ने विचारलं “माझ्या ऑफिसात.” पाणिनी म्हणाला फिरोज लोकवाला हसला. “ म्हणजे मी इथे जे केलंय असं तुम्हाला वाटतंय तेच तुमच्या ऑफिसात तुम्ही केलं असेल. मी ...Read More

3

साक्षीदार - 3

प्रकरण -३ पाणिनी पटवर्धन त्याच्या गाडीत बसला, बोटात थोटूक धरून त्याने सिगारेट पेटवली.खरं तर थोड्या वेळेपूर्वीच त्यानं धूम्रपान केलं त्याचा चेहेरा पूर्ण एकाग्र झाला होता., त्याचे डोळे चमकले. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेचे भाव नव्हते. फक्त त्याचा अस्वस्थपणा दर्शवणारी एकच गोष्ट म्हणजे तो सतत सिगारेट पेटवत होता, एक झाली की दुसरी, दुसऱ्या नंतर तिसरी,, एका तासापेक्षा जास्त काळ. थेट रस्त्याच्या पलीकडे ती इमारत होती ज्यामध्ये मिर्च मसाला चं ऑफिस होतं. तेवढ्यात फिरोज लोकवाला इमारतीतून बाहेर आला. लोकवाला त्याच्या कडे यंत्रवत दृष्टीक्षेप करून, चालता झाला.पाणिनी पटवर्धनने सिगारेट ओढली आणि स्टार्टरवर पाय दाबला.आणि गाडी वाहतुकीच्या प्रवाहात घातली. लोकवाला कोपऱ्यात उजवीकडे वळला आणि टॅक्सी ...Read More

4

साक्षीदार - 4

साक्षीदार प्रकरण ४ पाणिनी पटवर्धन पोलीस मुख्यालयातल्या गुप्तहेर विभागात आला. “इथे प्रेरक पांडे आहे ?”- त्याने विचारलं त्यांने ज्या हे विचारलं, त्याने प्रेरक पांडेला हाक मारली. “तुझ्याकडे आलंय कोणीतरी ”- तो म्हणाला. दार उघडलं गेलं आणि प्रेरक पांडे बाहेर आला. त्याने पाणिनी पटवर्धन कडे बघितलं आणि हसला. तो उंच आणि सडपातळ देहयष्टीची असलेला माणूस होता. पाणिनी पटवर्धन ने त्याच्याकडे बघून हात केला. “ प्रेरक मला वाटते तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे.” पाणिनी त्याला म्हणाला “ छान. येतो मी तुझ्या बरोबर बाहेर.” तो म्हणाला ते दोघे दारातून बाहेर पडले. “ माझ्याकडे आलेल्या एका प्रकरणात मी एका साक्षीदाराच्या मागावर आहे आता ...Read More

5

साक्षीदार - 5

साक्षीदार प्रकरण ५ईशा अरोरा पाणिनी च्या ऑफिसात बसून मुसमुसत होती. पाणिनी तिच्या कडे कोणतीही सहानुभूती न दाखवता बघत होता.“ हे करायला नको होत.” ईशा म्हणाली.“ काय?” पाणिनी म्हणाला.“ त्याला भेटायला नको होत तुम्ही.अत्यंत निर्दयी आहे तो.”“ त्याच्या पेक्षा मी जास्त आहे.”“ तुम्ही त्यांच्या म्हणण्या प्रमाणे पेपरात जाहिरात का नाही दिली?” –ईशा“ फार पैसे मागत होते ते.त्यांना वाटलं आपण नमवू शकू ” पाणिनी म्हणाला“ तुम्ही घरी येऊन अरोराला धमकी द्यायला नको होती.धमकी ने घाबरणारा माणूस नाहीये तो.मांजराला जसं कोपऱ्यात घेरलं तर ते उलटून हल्ला करतं ना ,तसा तो आहे. ”-ईशा“ काय करेल तो करून करून?”“ तो तुम्हाला बरबाद करेल.त्याच्या कडे ...Read More

6

साक्षीदार - 6

साक्षीदारप्रकरण ६हृषीकेश बक्षी उंचापुरा आणि रूबाबदार माणूस होता त्याने स्वतःचा एक वेगळेपणा जपला होता. पक्षांमध्ये तर त्याचं स्थान चांगलं पण सर्वसामान्य लोकांना तो स्वतःचा मित्र वाटत असे. लवकरच होणाऱ्या निवडणुकांच नियोजन करण्यात तो सध्या व्यस्त होता“सागरिका हॉटेल मध्ये झालेल्या होल्ड अप आणि गोळी बारा बद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे” हृषीकेश बक्षी ला पाणिनी म्हणाला. पण हृषीकेश ने त्यावर काही प्रतिसाद दिला नाही तेव्हा पाणिनी म्हणाला,“त्यावेळेला एका विवाहित स्त्री बरोबर तुम्ही तिथे उपस्थित होतात” आपल्या पोटात एखादा गुद्दा बसल्यावर माणसाला कसं होईल तसा हृषीकेश चा चेहरा झाला. त्याने आवंढा गिळला. मोठ्या प्रयत्नपूर्वक आपल्या चेहऱ्यावर कुठलेही भाव न आणता तो पाणिनीला ...Read More

7

साक्षीदार - 7

साक्षीदार प्रकरण ७ पाणिनी पटवर्धन गाढ झोपलेला असताना त्याचा लँड लाईन फोन वाजला. फोनवर ईशा अरोरा बोलत होती “,थँक्स फोन उचलला मी ईशा बोलते आहे तुम्ही ताबडतोब गाडीत बसा आणि या” ती म्हणाली. पाणिनी पटवर्धन चा आवाज एकदम झोपाळलेल्या आला.“या म्हणजे कुठे या ?आणि काय झालं एकदम?” पाणिनी ने विचारलं“अहो काहीतरी भयानक घडलंय.” ती म्हणाली. “आणि ऐका घरी येऊ नका मी घरी नाहीये.” “मग कुठे आहात तुम्ही?”“ मी कोपऱ्यावरच्या एका औषधाच्या दुकानात आहे तुम्हाला तिथे मोठे फ्लड लाईट लागलेले दिसतील औषधाच्या दुकानात. तिथं मी त्याच्या समोरच उभी आहे” ती म्हणाली.“ ऐकून घे, मी यापूर्वी असे रात्रीचे फोन अनेक वेळा ...Read More

8

साक्षीदार - 8

साक्षीदार प्रकरण ८ “ ईशा, तू मागच्या दाराने आत जाऊन पुढचा दरवाजा आतून उघड.मी ही किल्ली पुन्हा होती तिथे लाऊन पुढच्या दाराने आत येतो. ” पाणिनी म्हणालातिने मान हलवली आणि मागील दार उघडून आत गेली किल्ली पुन्हा पाणिनी कडे दिली.पाणिनी ने दार लाऊन घेतले आणि पुन्हा पुढच्या बाजूला आला. पाणिनी पुढच्या बाजूला दारा बाहेर आला.ईशा च्या पावलांचा आवाज त्याला आतून आला.तिने दार उघडले.पाणिनी ला दिसलं की हॉल मधला नाईट लँप लागला होता, तिथून वरच्या मजल्या वर जाणारा जिना दिसत होता, हॉल मधील फर्निचर ,आरशाचे कपाट, छत्री चा स्टँड,रॅक या सर्वाकडे त्याचे लक्ष गेले. रॅक वर स्त्रीचा कोट होता.तीन छत्र्या ...Read More

9

साक्षीदार - 9

प्रकरण ९ पाणिनी च्या फोन नंतर थोड्याच वेळात, इन्स्पेक्टर हर्डीकर अरोरा च्या घरात हजर झाला होतं आणि त्याने प्राथमिक पूर्ण करून घेतली होती. “ आम्हाला जी कागदपत्र मिळाली आहेत त्या नुसार अरोरा हा मिर्च मसाला या ब्लॅकमेल करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पेपर चा मालक होता,मिस्टर पटवर्धन. ” तो पाणिनी ला म्हणाला. “ मला माहीत होत ते.” पाणिनी म्हणाला. “ कधी पासून माहिती होत हे तुम्हाला?” “ अत्ता एवढ्यातच.” पाणिनी म्हणाला “ तुम्हाला समजलं कसं पण हे?” “ ते मात्र मला सांगता येणार नाही.”. पाणिनी म्हणाला “ पोलिसांच्या आधी तुम्ही कसे आलात घरी?”-हर्डीकर “ तुम्ही ईशा ने काय सांगितलं ते ऐकलय ...Read More

10

साक्षीदार - 10

साक्षीदार प्रकरण १० रात्री तीन वाजता कनक ओजस च्या घरचा फोन खणखणला.त्याने वैतागून उचलला.पलीकडून पाणिनी पटवर्धन चा आवाज ऐकून उडालाच. “ तू झोपतोस तरी कधी रात्री?” त्याने फोन घेत विचारले. “ तुला देण्यासाठी एक अर्जंट काम आहे.” पाणिनी ने कनकच्या प्रश्नाला बगल देत सांगितलं. “ तू तुझी माणसं एका कामगिरीवर लावू शकतोस का अत्ता?” कनक , सौम्या, आणि पाणिनी खास मित्र होते. वर्ग मित्र.एकमेकांना काहीही बोलू शकत होते,एकमेकांसाठी कधीही काहीहीकरू शकत होते. कनक गुप्त हेर झाला,पाणिनी च्याच मजल्यावर त्याने ऑफिस थाटले. इन्स्पे.तारकर हा त्यांच्याच बरोबरचा खास मित्र.पण तो पोलीस झाला. या प्रकरणात काम करणाऱ्या हर्डीकर चा तो साहेब होता.अनेकदा ...Read More

11

साक्षीदार - 11

साक्षीदार प्रकरण ११ मी जरा बाहेर निघालोय आपल्या प्रकरणाच्या दृष्टीने काही नवीन क्लू मिळतात का ते मी बघणार आहे पोलिस त्यांचा फास आवळायला सुरुवात करतील आपल्याला फार काही करता येणार नाही त्याच्या आधीच आपल्याला काहीतरी हालचाल करायला लागेल तू इथेच बस ऑफिसमध्ये आणि किल्ला लढव. मी कधी येईन ते आता सांगता येणार नाही.मी फोन करीन आणि तुला माझं नाव जयकर आहे असं सांगेन. तुला विचारीन पाणिनी ऑफिसमध्ये आहेत का? त्याचा मित्र अशी माझी ओळख करून देईन. आणि तुला विचारलं की त्यांनी माझ्यासाठी काही निरोप ठेवला आहे का? मग तू मला माझ्याशी म्हणजे पाणिनी पटवर्धन शी बोलते असं न भासवता ...Read More

12

साक्षीदार - 12

साक्षीदार प्रकरण १२ तिथून बाहेर पडल्यावर पाणिनी लगोलग हृषीकेश च्या घरी गेला आणि तिथे त्याच्या नोकराणीला भेटून आपली ओळख दिली. “ तुम्ही कोणीही असा, मला फरक पडत नाही. साहेब इथे नाहीयेत आणि कुठे आहेत ते मला माहीत नाही.ते काल मध्यरात्री पर्यंत बाहेरच होते.ते आले आणि पुन्हा त्यांना एक फोन आला आणि ते पुन्हा बाहेर गेले. त्यानंतर पुन्हा ते घरी आलेले नाहीत,घरचा फोन मात्र सारखा वाजतोय दहा-दहा मिनिटाला.” ती म्हणाली. “ मध्यरात्री तो परत आल्या नंतर किती वेळाने फोन आला?”पाणिनी ने विचारलं. “ फार वेळाने नाही तसा लगेचच आला.” “ त्याला तो फोन यायची अपेक्षा होती?” “ ते मला कसं ...Read More

13

साक्षीदार - 13

साक्षीदार प्रकरण १३ चक्रवर्ती हॉटेल च्या रूम नंबर ९४६ च्या बाहेर पाणिनी पटवर्धन क्षणभर उभा राहिला आणि बेल वाजवली. एका तरुणीचा आवाज आला, “ कोण आहे?” “ कुरियर” पाणिनी म्हणाला तिने दार उघडताच पाणिनी आत घुसला आणि दार लावून घेतलं. तिच्या डोळ्यावरची झोप उडाली नव्हती अजून. “ काय आगाऊ पण आहे हा?, एकदम आत काय घुसलात?” “ मला बोलायचं आहे तुझ्याशी.” “ कोण आहात कोण तुम्ही? कुरियर वाला नक्कीच नाही. पोलीस? गुप्त हेर?” “ पटवर्धन.वकील आहे मी.” “ बर मग?” “ मी ईशा अरोरा चा वकील आहे. काही संदर्भ लागतोय?” पाणिनी म्हणाला . “ मुळीच नाही.” “ फिरोज लोकवाला ...Read More

14

साक्षीदार - 14

साक्षीदार प्रकरण १४ फिरोज लोकवाला त्याच्या ऑफिस मधे बसला होता.पाणिनी पटवर्धन त्याच्या समोर होता “ ते तुला शोधताहेत.” फिरोज पाणिनी चा चेहेरा बिनधास्त होता. “ ते म्हणजे कोण?” “ बरेच जण., पत्रकार, पोलीस, वगैरे.” “ सगळ्यांना भेटलोय मी.” पाणिनी म्हणाला “ आज दुपारी?” फिरोजने विचारलं “ नाही काल रात्री.” पाणिनी म्हणाला. “ का बरं?” “ नाही सहजच. मला वाटतंय आता तू त्यांना वेगळ्या भूमिकेतून हवा आहेस. असो. तू कशाला आलायस इथे?” -- फिरोज “ एवढंच सांगायला आलो होतो की ईशा अरोरा ने तिच्या नवऱ्याच्या मालमत्तेचा प्रशासक म्हणून तिला नेमले जावे यासाठी कोर्टात अर्ज केलाय.” पाणिनी म्हणाला “ असेल.मला काय ...Read More

15

साक्षीदार - 15

प्रकरण १५ पाणिनी ने अंदाज केल्या प्रमाणे पोलिसांनी ईशा अरोरा ला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि लगेचच वर्तमान पत्रात बातम्या फोटो छापून आले. खुनात प्रेम प्रकरण असल्याचा संशय. खून झालेल्या माणसाचा भाचा आणि मोलकरणीची मुलगी यांचा साखरपुडा मयताच्या विधवा पत्नीचं मृत्यू पत्र खोटे असल्याचा आरोप. बंदुकीच्या मालका पर्यंत पोलिसांची पोच. अनावधानाने बोलून गेलेल्या वाक्याच्या आधारे खुनाच्या वेळी हजर असलेल्या वकिलाच्या शोधात पोलीस.आतल्या पानात आणखी बातम्या होत्या पोलीस स्टेशन मधे विधवा पत्नी ला अश्रू अनावर असा मथळा होता.बातमी वाचता वाचता पाणिनी च्या लक्षात आलं की पोलीस मधुदीप माथूर पर्यंत पोचलेत. परंतू गोळीबार झाल्यानंतर तो गूढ रित्या गायब झालाय.असं असलं तरी गुन्हा ...Read More

16

साक्षीदार - 16

प्रकरण १६“ सर, तुम्ही फार लवकर तिच्या तावडीतून स्वतःला सोडवून घेतलं,बर झालं.तिच्या कडून सगळ लेखी घेतलंत सही करून .” आल्यावर सौम्या पाणिनी ला म्हणाली.“ तुला खरं सांगू? रागवू नको, सौम्या,पण जो पर्यंत न्यायाधीश तिला निर्दोष ठरवत नाही तो पर्यंत ती गुन्हेगार आहे अस होत नाही.” पाणिनी म्हणाला“ ते कायद्याने ठीक आहे.पण आता तिचा जबाब आपण लेखी घेतलाय,प्रेरक पांडे ने एव्हाना तिची सही सुध्दा घेतली असेल. आता तिचं तुमच्याकडे काय काम असणारे? ती दुसरा वकील बघेल,पण तो सुध्दा तिला कसा सोडवू शकेल शंकाच आहे.” सौम्या म्हणाली.“ दुसरा वकील नाही,पण मी अजून तिला बाहेर काढू शकतो.मी फक्त न्यायाधिशांच्या मनात ती दोषी ...Read More

17

साक्षीदार - 17

प्रकरण १७ कनक ओजस च्या ऑफिसात दोघे बसले होते. “ पाणिनी, मानलं तुला, फार मस्त डाव टाकलास.तू तर सुटलासच खुनी अशिला कडून लेखी जबाब घेण्यात ही यशस्वी झालास ! तू नेहेमी अशील निवडताना तो निर्दोष असल्याची खात्री असेल तरच निवडतोस पण पहिल्यांदाच तुझ्या अशिलाने तुला दगा दिला पाणिनी.” कनक म्हणाला. “ पण मला सांग पाणिनी, तुला अंदाज होता, काय झालं असावं याचा?” “ मला होता अंदाज, पण अंदाज असणं आणि पुरावा मिळवणं या वेगळ्या गोष्टी आहेत. पण आता मात्र तिला वाचवायचं आव्हान आहे समोर.” शून्यात पहात पाणिनी पुटपुटला. “ विसरून जा ते आता. पाहिली गोष्ट म्हणजे ती त्या लायकीची ...Read More

18

साक्षीदार - 18

प्रकरण १८ लोटलीकर हा एक सडपातळ शरीरयष्टीचा आणि निराश चेहेरा असलेला इसम होता.आपले डोळे सारखे मिचकावण्याची आणि जिभेने ओठ करण्याची त्याला सवय होती.घरातच एका लोखंडी पेटीवर तो बसला होता. कनक कडे बघून त्याने नकारार्थी मान हलवली . “ तुम्ही, चुकीच्या माणसाकडे आलाय.माझं लग्न झालं नाहीये.” “ सुषुप्ती वायकर नावाच्या मुलीला ओळखतोस?” –कनक “ नाही.” आपली जीभ ओठावर फिरवत तो म्हणाला. “ तू घर सोडून चाललायस हे?” घरातल्या सामानाकडे बघत कनक ने विचारलं. “ हो. मला भाडं परवडत नाही याच.” “ कुठे जाणारेस रहायला?”-कनक “ अजून नक्की केलं नाही. कमी भाड्याची खोली बघीन एखादी.” दोघांनी पुढे काही न विचारता त्याच्याकडे ...Read More

19

साक्षीदार - 19 (शेवटचे प्रकरण)

साक्षीदारप्रकरण १९ ( शेवटचे प्रकरण)ते चौघे अरोरा च्या बंगल्यात जमले होते.“ पटवर्धन, काहीही गडबड करायची नाही हां, तुझ्या वर ठेऊन मे आलोय इथे.स्वत:चा स्वार्थ साधायचा नाही.” हर्डीकर ने पाणिनी ला तंबी भरली.“ तुझे डोळे उघडे ठेव.तुला जर वाटलं की मी कोणत्यातरी रहस्याची उकल करतोय, तर तो धागा पकडून बेलाशक पुढे हो आणि त्याचे संपूर्ण श्रेय तू घे. या उलट ज्या क्षणी तुला संशय येईल की मी तुला डबल क्रॉस करतोय, त्या क्षणी तू बाहेर निघू जा आणि जे वाटेल ते कर. ठीक आहे?” पाणिनी म्हणाला“हे ठीक वाटतंय, पटवर्धन.” हर्डीकर म्हणाला.“ आपण सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचं लक्षात घे, हर्डीकर, मी आधी ...Read More