सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची)

(15)
  • 89.7k
  • 4
  • 46k

हळूहळू विक्रांत ने आपले डोळे उघडले त्याच्या नाकात त्याला औषधाचा वास जाणवू लागला. डोकं जड झाले होते. उजवा हात बांधलेला जाणवत होता. त्याने पूर्ण डोळे उघडले पाहतो तर तो एका हॉस्पिटलमध्ये बेडवर होता. त्याने आपला उजवा हात उचलला पण त्याला प्लास्टर होते. मग डाव्या हाताने त्याने आपल्या डोक्याला स्पर्श केला तर डोक्याला बैंडेज होते. त्याला झटकन आठवले की त्याचा आणि गीतु चा एक्सीडेंट झाला होता तो ही हाय वे वर. जेव्हा ते दोघे त्यांची दूसरी मॅरेज एनिवर्सरी गोव्यात साजरी करून परत निघाले होते. त्यांच्या ध्यानिमनी नसताना अचानक एक टैंकर मागून येवून जोरात त्यांच्या कार ला धडकला होता. संयोगीता विक्रांत ची बायको तिने नेमका सीट बेल्ट लावला नव्हता. कार ला धड़क बसली आणि संयोगीता जोरात बाहेर फेकली गेली. गीतु ची आठवण येताच (विक्रांत तिला प्रेमाने गीतु म्हणायचा) विक्रांत बेड वरुन उठला . अहो मिस्टर विक्रांत कुठे निघालात रूम मध्ये येणाऱ्या नर्स ने त्याला आवाज दिला. नर्स माझी वाईफ़ कुठे आहे संयोगीता नाव तीच. मि.विक्रांत तुमची वाईफ आय सी यू मध्ये आहे. नर्स ती बरी आहे ना? मी बघू शकतो का तिला प्लीज. नर्स ला माहित होते की संयोगीता ची कंडीशन क्रिटीकल आहे सध्या ती अंडर ऑब्झरवेशन होती. ओके मि. विक्रांत तुम्ही फ़क्त त्यांना बाहेरुन बघू शकता. ठीक आहे तो म्हणाला.

New Episodes : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 1

हळूहळू विक्रांत ने आपले डोळे उघडले त्याच्या नाकात त्याला औषधाचा वास जाणवू लागला. डोकं जड झाले होते. उजवा हात जाणवत होता. त्याने पूर्ण डोळे उघडले पाहतो तर तो एका हॉस्पिटलमध्ये बेडवर होता. त्याने आपला उजवा हात उचलला पण त्याला प्लास्टर होते. मग डाव्या हाताने त्याने आपल्या डोक्याला स्पर्श केला तर डोक्याला बैंडेज होते. त्याला झटकन आठवले की त्याचा आणि गीतु चा एक्सीडेंट झाला होता तो ही हाय वे वर. जेव्हा ते दोघे त्यांची दूसरी मॅरेज एनिवर्सरी गोव्यात साजरी करून परत निघाले होते. त्यांच्या ध्यानिमनी नसताना अचानक एक टैंकर मागून येवून जोरात त्यांच्या कार ला धडकला होता. संयोगीता विक्रांत ची ...Read More

2

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 2

विक्रांत संयोगीता चा विचार करत होता . ती लवकर बरी व्हायला हवी तिच्या शिवाय आयुष्याला काही अर्थ नाही. का अपघात झाला ? दोन वर्ष ख़ुप छान आनंदात गेली संयोगीता ही ख़ुप प्रेम करायची विक्रांत वर . विक्रांत ची गीतु जान होती. तिला थोड़ सुद्धा तो दुखवत नव्हता त्याला कोणाचे प्रेम आयुष्यात मिळाले नाही जे सोबत होते ते त्याचे मित्रच त्याला जीव लावत होते. संदीप तर भावा सारखा त्याला जीव लावत होता. विक्रांत पुण्यातील टॉप टेन बिझनेस मन पैकी एक होता. त्याच्या हुशारीवर कर्तुत्वा वर आज तो इथ पर्यंत पोहचला होता. त्याचे काम चांगले होते त्यामुळे मार्केट मध्ये त्याच नाव ...Read More

3

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 3

अनाथ मुलांना त्या पैशाचा उपयोग होईल . आज विक्रांत आणि संयोगिताला हॉस्पिटल मध्ये येवून चार दिवस झाले होते. विक्रांत संयोगीता ला बघुन आला होता. ती अजुन शुद्धिवर आली नव्हती. दुपारी संदीप आला त्याने विक्रांत साठी नवीन सेल फोन आनला होता कारण एक्सीडेंट मध्ये विक्रांत आणि संयोगीता चा फोन ही डैमेज झाला होता. विक्रांत हा न्यू फोन तुझ्या साठी यात मी माझ्या कडचे बरेच कॉन्टैक्ट ऍड केलेत बघ अजुन कोणाचे नम्बर हवेत तुला. ओके सैंडी . मि. विक्रांत देयर इज अ गुड़ न्यूज फ़ॉर यू म्हणत डॉक्टर रूम मध्ये आले. काय झाले डॉक्टर विक्रांत ने विचारले? मि. विक्रांत तुमची वाइफ ...Read More

4

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 4

मी ,विराज आहोत ना सोबत तुझ्या सगळ निट होईल.मग संदीप ने जबरदस्ती विक्रांत ला झोपवले. संदीप ही आता विचारात होता की संयोगीता ला लग्ना आधी चे सगळं आठवत होते पण लग्ना नंतरचे काहीच कसे आठवत नाही ? असे खरच झाले असेल तर विक्रांत कसा जगणार संयोगीता शिवाय ? आणि तिची मेमरी परत नाही आली तर काय? विक्रांत ला तर ही गोष्ट सहनच नाही होऊ शकणार खूप प्रेम करतो तो संयोगीता वर. त्याला तिच्या शिवाय जवळच आपलं अस कोणीच नाही . तो नालायक मल्हार मात्र संयोगीता च्या अजून लक्षात आहे . कसे होणार पुढे ? मी काय मदत करू शकतो ...Read More

5

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 5

टॉप टेन बिझनेस मेन पैकी विक्रांत एक होता त्याच्या कडे पॉवर ,पैसा सगळं होत त्याच्या मनात आले तर तो क्षणात मल्हार ला उध्वस्त करू शकला असता. विक्रांत ची तब्येत आता पूर्ण ठीक झाली होती त्याला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होता. तो तयार होऊन संयोगिता च्या रूम मध्ये आला. गीतु कशी आहेस तू? आय एम फाइन मि. विक्रांत . आज मला डिस्चार्ज दिला आहे मी घरी चाललो आहे. तुला अजुन थोड़े दिवस इथे रहावे लागेल . मी येत राहीन तुला भेटायला. ओके संयु इतकेच बोलली. गीतु हा फ़ोटो बघ तुला काही आठवते का? म्हणत विक्रांत ने त्याचा मोबाइल तिच्या समोर ...Read More

6

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 6

विक्रांत घरी आला तसे सुरेखा मावशी बोलल्या साहेब जरा थांबा . काय झाले मावशी तो विचारत होता तितक्यात मावशी ताट घेवून आल्या विक्रांत चे औक्षण करायला. मावशी माझा विश्वास नाही या सगळ्या वर . माझ आणि देवाच कधी पटले नाही. असु दे ख़ुप मोठ्या अपघातातून सुखरूप बाहेर आलात ही त्या देवाचीच कृपा आता वहिनी साहेब असत्या तर त्यांनी पण हेच केले असते. विकी असु दे तुच म्हणतो ना कि कोणाच्या भावना दुखवू नयेत. संदीप म्हणाला. मग विक्रांत ने औक्षण करून घेतले. गीतु ची ख़ुप आठवण झाली त्याला. तो रूम मध्ये आला .सगळीकडे संयोगीता च्या आठवणी होत्या.संयोगीता त्याच्या आयुष्यात आली ...Read More

7

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 7

आय एम फाईन. तू चहा घे मग आपण हॉस्पिटल कडे जाऊ विक्रांत म्हणाला. विक्रांत आणि संदीप हॉस्पिटल मध्ये आले. च्या रूम कड़े गेले. मल्हार संयोगिता चे केस विंचरून देत होता आणि संयोगिता च्या चेहऱ्यावर हासु होते. विक्रांत ने ते पाहिले तसे त्याच्या हाताच्या मुठी आपोआप वळल्या. रागाने त्याच्या कपाळा वरची शिर तड़तड़ करत राहिली. मल्हार ला खावु का गिळु या नजरेने विक्रांत बघत होता. संदीप ने विक्रांत कड़े बघितले म्हणाला,विकी शान्त रहा. मल्हार ने गीतु चे केस बांधले आणि त्याने पाहिले की विक्रांत आला आहे. तसा तो गीतु पासून बाजूला झाला. ते संयु बोलली की माझे केस बांधून दे ...Read More

8

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 8

विक्रांत जेवण करून रूम मध्ये आला. त्याचे आणि गीतु चे फ़ोटो बघू लागला. ख़ुप साऱ्या आठवणीं त्या अल्बम मध्ये एका फ़ोटो जवळ थांबला . त्या दिवसाची आठवण आज ही जशीच्या तशीच त्याच्या लक्षात होती. त्याच्या हस्ते संयोगिता ला शिल्पकलेचे सर्टिफिकेट आणि ती स्पर्धे मध्ये पहिली आली त्याचे मेडल तिला देण्यात आले तो क्षण फ़ोटोत कैप्चर केला होता. तेव्हा संयोगीताला पाहुनच तो तिच्या प्रेमात पडला होता. सिल्की केस,काळेभोर टपोरे डोळे ,गोरा रंग,गुलाबी नाजुक ओठ,आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास ,हस्तमुख अशी संयोगिता तिला पुन्हा पुन्हा पाहन्याचा मोह विक्रांत ला होत होता. तो त्या आठवणीत गढुन गेला. विक्रांत ते एक शिल्पकलेचे प्रदर्शन आहे तुला ...Read More

9

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 9

हो ग मी थांबणार आहे तुझ्या सोबत मल्हार म्हणाला. विक्रांत ने सगळे प्रदर्शन बघितले सगळयांच्या कलाकृती बघितल्या. आता कार्यक्रमाचा भाग म्हणजे बक्षीस समारंभ होता. सगळे जण तिथेच बाजूला असणाऱ्या हॉल मध्ये जमा झाले होते. कार्यक्रमाचे आयोजक,अजून काही मंडळी आणि विक्रांत स्टेजवर खुर्च्यावर बसले होते. आयोजक बोलत होते. सगळ्यांचे काम छान आहे पण तरी ही तीन नंबर आम्ही काढणार आहोत आणि त्यांना बक्षीस दिले जाईल. मग तीन नंबरचे नाव पाहिले जाहीर केले . त्यांनतर दोन नंबर . आता सर्वांना उत्सुकता होती की पहिला नंबर कोणत्या शिल्पा ला मिळाला असेल तसे आयोजकांनी संयोगीता निंबाळकर यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळत आहे असं ...Read More

10

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 10

ती आणि मल्हार ज्या हॉटेलमध्ये आले होते तिथेच विक्रांत ही आला होता. संदीप विक्रांत कडे बघून हसत होता . का हसतो आहेस त्याने विचारले. विकी नक्की तू त्या संयोगीता च्या प्रेमात पडला आहेस चेहरा बघ तुझा कसा फुलला आहे तिला बघून. अस काही ही नाही सँडी. ओहह रियली आता तू मला नको सांगू विकी, मी तुला आज ओळखत नाही. तसा विक्रांत ही गालातल्या गालात हसला. खर आहे तर मान्य कर त्यात काय प्रेम करणं हा गुन्हा थोडीच आहे? जी व्यक्ती आपल्याला मना पासून आवडते तिच्यावर प्रेम करणं काही ही गैर नाही विकी. पण सँडी तिच्या कडे बघ ती त्या ...Read More