चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर

(55)
  • 113.3k
  • 5
  • 54.2k

१ बाटलीतला संदेशदूरवर समोर पसरलेला अथांग सागर....पाण्याच्या उसळत्या लाटांवर चमकवणारे सायंकाळचे सूर्यकिरण...मध्येच लाटांवर हेलकावे खात डोलणार्या कोळ्यांच्या नावा...पाण्यात सूर मारत झेपावणारे समुद्रपक्षी अस छान दृश्य होत ते! जिथे आकाश व समुद्र एकमेकांना भेटत होते त्या ठिकाणी तर वेगवेगळ्या रंगाची गर्दी उसळली होती. लाल...गुलाबी...जांभळ्या रंगाची...सतत विविध असे सुंदर आकार धारण करणारी आकाश शिल्पे तिथे पसरली होती. कधी हत्तींचा आकार....कधी होडींचा आकार तर कधी......पर्वत हातावर घेऊन उडणाऱ्या रामभक्त हनुमंताचा आवेश दाखविणारादेखावा... किती सुंदर दृश्य होते ते. हा सारा देखावा किनाऱ्यावरच्या वाळूतहोडीला टेकून चंद्रा देहभान विसरून पाहात होता. मध्येच त्याचे लक्ष डाव्याबाजूच्या डोंगरकपारीमध्ये पाण्याच्या जोरदार लाटामुळे तयार झालेल्यागुहांकडे गेले. तिथे समुद्री लाटा किनाऱ्यावर

Full Novel

1

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 1

१ बाटलीतला संदेशदूरवर समोर पसरलेला अथांग सागर....पाण्याच्या उसळत्या लाटांवर चमकवणारे सायंकाळचे सूर्यकिरण...मध्येच लाटांवर हेलकावे खात डोलणार्या कोळ्यांच्या नावा...पाण्यात सूर झेपावणारे समुद्रपक्षी अस छान दृश्य होत ते! जिथे आकाश व समुद्र एकमेकांना भेटत होते त्या ठिकाणी तर वेगवेगळ्या रंगाची गर्दी उसळली होती. लाल...गुलाबी...जांभळ्या रंगाची...सतत विविध असे सुंदर आकार धारण करणारी आकाश शिल्पे तिथे पसरली होती. कधी हत्तींचा आकार....कधी होडींचा आकार तर कधी......पर्वत हातावर घेऊन उडणाऱ्या रामभक्त हनुमंताचा आवेश दाखविणारादेखावा... किती सुंदर दृश्य होते ते. हा सारा देखावा किनाऱ्यावरच्या वाळूतहोडीला टेकून चंद्रा देहभान विसरून पाहात होता. मध्येच त्याचे लक्ष डाव्याबाजूच्या डोंगरकपारीमध्ये पाण्याच्या जोरदार लाटामुळे तयार झालेल्यागुहांकडे गेले. तिथे समुद्री लाटा किनाऱ्यावर ...Read More

2

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 2

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर२) सफरीवर त्या रात्री चंद्राला झोप येईना. झोपडीच्या बाहेर ओट्यावरच तो झोपायचा.समुद्री वार्यावर छान झोप आज समोर चांदण्यात चमकणारा समिंदर त्याला झोपू देईना. वेडा वारा, उसळत्या लाटा त्याला खुणावत लागल्या.अखेर न राहवून तो उठला आणि वाळूत जाऊन बसला.त्याच्या पाठोपाठ वाघ्याही त्याच्या पायापाशी येऊन बसला.पाण्यावर चमकणार्या लाटा बेभानपणे नृत्य करत होत्या.सळसळतं येणारा वारा त्याच्या अंगा-खांद्याला स्पर्श करत होता. चंद्राच्या मनात निळ्या बेटाने ठाणमांडले होते. त्याला साहस दाखविण्याची संधी आपोआपच चालून आलीहोती. त्या निळ्या बेटाच्या शोधात जाण्याचा त्याचा पक्का निर्णय झाला होता. पण जाण्याअगोदर सागरी प्रवासाची तयारी करायची होती आणि तीसुद्धा कुणाला कळू न देता. प्रश्न होता ...Read More

3

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 3

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर३३. संकटाशी सामनाचंद्राला जाग आली तेव्हा त्याला जाणवले की त्याचे हात-पाय बांधलेले आहेत. त्याने सभोवार फिरवली. आजूबाजूला उंच झाडांची गर्दी होती. ती सारी झाडे वेलींनी वेढलेली होती. वेलींना पेल्यासारखी निळसर-जांभळ्या रंगाची फुले होती. त्याचे लांब पुंकेसर फुलाच्या बाहेर डोकावत होते. पुंकेसर पिवळसर सोनेरी रंगाचे होते. फुलपाखरे, भुंगे व पाखरे त्याभोवती रुंजी घालत होते. त्याला ज्या ठिकाणी बांधलेले होते त्या सभोवताली गोलाकार जागा मुद्दामहून साफ केलेलीहोती. मध्ये एक सरळसोट झाडाचे गुळगुळीत केलेले खोड खांबासारखे रोवले होते. पण त्याहीपेक्षा भीतिदायक गोष्ट त्याच्या नजरेत आली ती म्हणजे त्या खांबाच्या बाजूला असलेली दगडाची विचित्र आकाराची भयंकर मूर्ती. अशा प्रकारची ...Read More

4

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 4

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर ४४. नवा दोस्तत्या रात्री चंद्राला निवांत झोप लागली. सकाळी बऱ्याच उशिराने तो उठला. त्याला ताजेतवाने वाटू लागले. इथे उभे राहून सभोवार बघताना त्याच्या लक्षात आले की हे बेट बरेच मोठे आहे. बेटावर मध्ये मध्ये छोट्या टेकड्याही दिसत होत्या. एक गोष्ट सर्वत्र सारखी होती. झाडांच्या शेंड्याजवळची पाने निळसर होती. चंद्राच्या मनात असा विचार आला की हे निळे बेट तर नसावे ना! तसे असेल तर तो त्या रहस्यमयी बेटावर व त्या संदेश पाठवणाऱ्या अज्ञात माणसाजवळ पोहोचला होता.- सध्या त्याला तातडीने दोन-तीन गोष्टी कराव्या लागणार होत्या. एक म्हणजे तीर-कमठा तयार करणे, दुसरी गोष्ट म्हणजे होडी किंवा एखादा ...Read More

5

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 5

५. जंगलाची ओळखडुंगा पिळदार शरीराचा, पण काळ्याकभिन्न वर्णाचा होता. त्याने कंबरेभोवती कुठच्या तरी झाडाचे पान गुंडाळले होते. ते थोडे होते. सुती कपड्याप्रमाणे वाटत होते. अचानक चंद्राच्या लक्षात आलं की, त्याला मिळालेल्या बाटलीतील संदेश ज्या पानावर लिहिलेला होता ते पान अगदी याच प्रकारचे होते. म्हणजे तो नक्कीच निळ्या बेटावर पोहोचला होता. आता त्या अज्ञात माणसाचा शोध घ्यावा लागणार होता. डुंगाच्या डोक्यावर दोन मोरपिसे तिरकी खोवलेली दिसत होती. चंद्राच्या लक्षातआलं की डुंगाच्या उजव्या मनगटावर मोराची आकृती गोंदलेली दिसत होती. चंद्रा डुंगाचे निरीक्षण करत होता. त्या वेळी डुंगा हळूहळू मागे सरकत होता. त्याचं संपूर्ण लक्ष गुरगुरणाच्या वाघ्यावर होतं. बहुधा तो वाघ्याला घाबरत ...Read More

6

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 6

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर ६६. मयुरांच्या वस्तीमध्येदुसऱ्या दिवशीही डुंगा अगदी कालच्याच वेळेवर आला. चंद्रा त्यालाघेऊन नदीकिनारी गेला. तिथे तराफा तयार करण्यासाठी जमा केलेले मोठ्या बांबूचे तुकडे... वळलेल्या दोर्या दाखवल्या. डुंगाला त्या दोर्या पाहून आश्चर्य वाटले. त्याची जमात आणि शिंगाडे बांधण्यासाठी वेली वापरत. त्या वेलींपेक्षा वेलींपासून पीळ देऊन बनविलेल्या दोऱ्या अतिशय मजबूत व टिकाऊ होत्या. चंद्राने त्याला मासे पकडण्यासाठी बनविलेलं जाळं व छोट्या प्राण्यांना पकडण्यासाठी बनवलेलीफासकी दाखवली. हे सारं पाहून डुंगा खूश झाला. चंद्राकडून त्याला हे शिकायचं होतं. खरे म्हणजे निळ्या बेटावरचे हे आदिवासी इतर जगापेक्षा खूपच मागास होते. बाहेरच्या जगाशी त्यांचा कधी संबंध आला नव्हता. भीतीमुळे व निळ्या ...Read More

7

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 7

. नव्या साहसावरदुसऱ्या दिवशी चंद्रा सकाळी थोडा उशिरानेच उठला. तोंड वगैरे धुवून ताजातवाना झाल्यावर डुंगाने त्याच्यासमोर फळे, पाणी व फळांपासून बनविलेले पेय ठेवले. डुंगाच्या पाहुणचाराचा आस्वाद घेतल्यावर त्याने डुंगाच्या बाबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. डुंगाने हसतच मानेने होकार देत त्याला आपल्या झोपडीत नेलं. तिथं डुगाचा बाबा ‘मंगा' मातीने तयार केलेल्या एका उंचवट्यावर बसला होता. चंद्राने मंगाला हात जोडून नमस्कार केला. मुला तुला आमचा उत्सव आवडला?'' मंगाने चंद्राला हसून विचारले"होय बाबा.. ते नृत्य व गाणी छान होती." चंद्राने तेउत्तर दिले. 'तुला त्या.. अनोळखी माणसाविषयी विचारायचं होतं ना?', “होय. मी त्याच्याच शोधात इथं आलोय. कुठं दिसला तो तुम्हाला?”"तो नदीच्या उताराच्या दिशेने ...Read More

8

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 8

८. दंतवर्मांची कहाणीखरं म्हणजे परतीचा प्रवास खूपच कठीण होता. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचे होते. तराफ्यावर दोघांऐवजी आता तिघेजण होते. जादा शक्तीचा वापर तराफा वल्हवायला करावा लागत होता. त्याने तराफा थोडा उजव्या कडेने हाकायला सुरुवात केली. मध्यभागापेक्षा कडेला पाण्याचा वेग कमी होता. आणखी काही वेळाने काळोख पडणार होता. त्यापूर्वी जास्तीतजास्त अंतर पार करणे गरजेचे होते. झाडांचे निळसर शेंडे तांबूस सूर्यकिरणांनी चमकत होते. पश्चिमेला नारिंगी-गुलाबी रंगाची उधळण सुरू झालीहोती. पक्षी घरट्याकडे परतत होते. एकेठिकाणी तर नदीकाठचं झाड लांबून पांढरेशुभ्र दिसत होतं. चंद्राला कळेना, या झाडाला कशा प्रकारची पांढरी फळं धरली आहेत? पण थोडं पुढं येताच त्यांच्या डोक्यावरून बगळ्यांचा कळप उडत गेला ...Read More

9

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 9

. ९ शिंगाड्यांशी पुन्हा सामनादुसऱ्या दिवशी पक्ष्यांच्या किलबिलाटानं चंद्राला जाग आली. त्याने बाजूला पाहिले, दंतवर्मा कुठेही दिसले नाहीत. डुंगा अजूनही झोपेत होता. काल रात्री दंतवर्मांचीची गोष्ट ऐकता ऐकता झोपायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे डुंगाला अजून जाग आली नव्हती. चंद्रा शरीराला झटका देत उठला. तो दंतवर्मांच्या कहाणीचा विचार करत होता. भद्रसेनांच्या बंधूने केलेल्या अविचारामुळे सारा मद्र देश भयावह संकटात सापडला होता. त्यातून सुटका होण्यासाठी तो मुकूट देवीच्या डोक्यावर विधिवत स्थापन करणे गरजेचे होते. तसा मुकूटही दंतवर्मांनी .तयार करून आणला होता. पण जोपर्यंत त्या मुकुटावरचा गुलाबी हिरा सापडत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ होते. रुद्रसेन तो गुलाबी हिरा घेऊन कुठे गेला ...Read More

10

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 10

१०. मंगाची सुटका आणि शिंगाड्यांची वाताहतचंद्रा, दंतवर्मा व इतर सारे शिंगाड्यांच्या नरबळी देण्याच्या जागी पोहोचले. तिथे सारे शिंगाडे जमले भयाण किंकाळ्या मारत सारे नाचत होते. त्यांच्या त्या विचित्र देवाच्या शेजारीच असलेल्या लाकडी खांबावर मंगाला बांधलेले होते. समोर मोठा जाळ पेटत ठेवलेला होता व त्यात तो पुजारी ती माती फेकत होता व त्यामुळे पिवळसर-नारिंगी रंगाच्या ज्वाळा वर उसळत होत्या. आज सारे शिंगाडे खुशीत होते, कारण मयुरांच्या जमातीचा प्रमुख ‘मंगा’ त्यांच्या तावडीत सापडला होता.त्याचा बळी देऊन नरमांस भक्षण करण्यास ते अधिकच उत्तेजित होऊन नाचत होते. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरची शिंगे गदागदा हलत होती. विविध प्राण्यांची पोकळ हाडे फुंकून ते भयावह आवाज निर्माण ...Read More

11

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 11

११. निळ्या बेटावरून प्रयाणदुसऱ्या दिवशी चंद्रा, दंतवर्मा व डुंगाने परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली. चंद्रा व दंतवर्मा जात आहेत, ऐकून साऱ्या मयुरांना वाईट वाटले. काही मयूर चक्क रडू लागले. गेल्या काही दिवसांत चंद्रा, वाघ्या व दंतवर्मा हे मयुरांमध्ये मिसळून गेले होते. त्यांच्यातीलच एक होऊन गेले होते. त्यामुळे साऱ्यांना वाईट वाटणे साहजिकच होते. चंद्राला एकीकडे इथून आपण आपल्या घरी जाणार म्हणून आनंद झाला होता, तर दुसरीकडे हे अद्भुत निळे बेट, इथले पशुपक्षी, विलक्षण झाडे, डंगासारखा मित्र, इथे केलेली साहसे... हे पुन्हा मिळणार नाही म्हणून वाईटही वाटत होते. मंगाने साऱ्यांना समजावले. चंद्राला आपण आनंदाने निरोप देऊ या. त्यासाठी रात्री खास मेजवानी ...Read More

12

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 12

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर 12१२. पुन्हा समुद्रावर व नवी आव्हानेदुसऱ्या दिवशी भल्या पहाटे चंद्रा व दंतवर्मा उठले. अजून दिशा प्रकाशली नव्हती. पण पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. मंद सुगंधाची पखरण करत पहाटवारा अंगाला स्पर्श करून जात होता. त्यामुळे मन उत्साहित होत होते. दोघांनीही झऱ्यावर जाऊन स्नान केलं. एव्हाना आकाश नारिंगी रंगाचं झालं होतं. निघण्याची सारी तयारी झाली होती. मयूरांनी दिलेला फलाहार व पाणी पिऊन ते नदीकिनारी गेले. सोबत मंगा, डुंगा व काही मयूर होते. पाण्याचे दोन छोटे बुधले,तीरकमठा, दंतवर्मांचा अनमोल खजिन्याची पेटी तराफ्यावर ठेवण्यात आली. सोबत फळांनी भरलेली टोपलीही होती. चंद्राने डोळे भरून साऱ्यांकडे पाहिले... त्याने साऱ्यांना हात ...Read More

13

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 13

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर भाग 13भाग १३गुलाबी हिऱ्याची प्राप्तीतोपर्यंत बरचशे कोळी लोक व दंतवर्मा गलबतावर पोहचले होते.गलबतावर एकच सुरू होता. लपून बसलेल्या डाकूंवर दंतवर्मां व कोळी लोक तुटून पडले. दंतवर्मांसारख्या कसलेल्या सेनानीच्या युद्ध कौशल्यासमोर डाकूंचा आडदंडपणा चालेना. इकडे चंद्रा सावधगिरीने पुढे सरकत होता. आत सात ते आठ माणसे होती. गलबतवरची सारी कामे हेच लोक करायचे. बाहेर चाललेल्या गलक्याने व किंकाळ्यांनी सारे घाबरले होते.भीतीने थरथर कापत होते. सारी कामे टाकून कोपऱ्यात जमा झाले होते."कोणतीही गडबड न करता तिथेच उभे रहा...घाबरु नका....मी तुम्हाला कोणतीही इजा करणार नाही." चंद्रा शांतपणे म्हणाला. ते लोक खूष झाले. डाकूंच्या तावडीतून आपली आता सुटका होईल ...Read More

14

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 14

भाग -14 रेवतीनगरच्या दिशेने ज्या रात्री चंद्रा व वाघ्या निघून गेले होटे त्याच्या दुसऱ्या दिवशी चंद्रा नाही हे बघून धाबे दणाणले.आपली जुनी होडी नाही हे सरजूच्या लक्षात आले.चंद्रा होडी घेऊन समुद्रावर गेला होता हे निश्चित. चंदेलच्या किनाऱ्यावरून सात आठ होड्या वेगवेगळ्या दिशेने गेल्या.दिवसभर शोध घेऊनही त्यांना चंद्राचा माग लागला नाही.सतत दोन दिवस ते शोध घेत होते. सरजू चिंतेत पडला होता.या अफाट दर्यावर क्षणाक्षणाला नवीन संकटे समोर येत असतात.त्यांना चंद्रसारखा मुलगा तोंड देऊ शकेल का? हा प्रश्न सरजूला पडला होता.खर म्हणजे चंद्रा सरजूच्या तालिमीत तयार झाला होता व सहजासहजी डगमणारा नव्हता हे साऱ्यांना माहीत होते.पण तो नेमका कुठे व का ...Read More

15

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 15

भाग -१५रेवतीनगरात - स्वागतघामाघूम झालेले मद्रवासी गलबातवर पोहचले.दंतवर्मानी सरजूला काही कोळ्यांना माघारी पाठवायला सांगितले.चंदेलमध्ये चंद्राची आई, बहीण गौरी वाट होते.चंदेलवासीय कोळी चार होड्यांतून चंदेलला रवाना झाले. सरजू, चंद्रा,वाघ्या व आणखी चार कोळी एवढेच रेवातीनगरला जाण्यासाठी थांबले.आता प्रवास थोडफारच शिल्लक होता.सुरवातीला काळोखातून व नंतर चंद्राच्या शीतल चांदण्यात प्रवास सुरू झाला.चंद्रा, सरजू व दंतवर्मां गलबताच्यां फळ्यांवर पहुडले होते.आकाशात त्रयोदशीचा चंद्र चांदण्याची बरसात करत होता.या चांदण्यात काही तारका लक्ष वेधून घेत होत्या. मध्येच पाण्यात सूर मारणारे माशे चांदण्यामुळे चमकत होते.मधे मधे निशाचर पक्ष्यांच्या पंखाचा आवाज कानात घुमत होता. समुद्री पक्षांचे पंख लांब व मजबूत असतात.कारण त्यांना शिकार पायात किंवा चोचीत पकडून दूर ...Read More

16

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 16 - अंतिम भाग

भाग -१६समारोहआज रेवातीनगरमध्ये उत्साहाला उधाण आले होते.दिशा अजून उजळल्या नव्हत्या.पण रेवती देवीच्या मंदिराचा गाभारा,सभामंडप व त्यापुढील विस्तीर्ण मैदान प्रजाजनांनी गेले होते. मंदिरासमोरील किनारा...तिथली सोनेरी वाळू ..त्यात विसावलेल्या असंख्य होड्या....दूरवर उभी असलेली गलबत अजूनही अस्पष्ट दिसत होती.समुद्रावरून येणारा गार वारा..लाटांचा खळखळाट व उच्चस्वरात चालू असलेले मंत्रोच्चार यामुळे सारे वातावरण भरून गेलं होते.आज रेवतीनगरचा शाप व मद्र देशावरच संकट संपणार होते.सारे रेवतीनगर सजवलेलं होत. गुड्या, तोरण, मंडप जागोजागी उभारले होते.प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या.चौकाचौकात सुंदर देखावे उभारले होते. मद्र देशातील व शेजारच्या देशातील लोक हा सोहळा पाहण्यासाठी ठाण मांडून होते.रेवतीनगरमधील धर्मशाळा...देवालये..यजमानांची घरे पाहुण्यांनी व प्रवाश्यानी भरून गेली होती....गजबजून गेली होती.रेवतिदेवीच्यामस्तकावर ...Read More