रोजच्या जगण्यात असे खुप लोक येतात त्यांना ऐकत असतो आपण. बघत असतो. कुणाच्या नजरत आपण नमुने असतो. तर आपल्या नजरेत दुसरे. पण यांना बघताना हसायच की थांबवायच यात गोंधळ होतो. दुनिया गोल आहे. कागदपत्र नाहीत त्याची. पण लोक म्हणतात म्हणुन मी हि म्हणतोय. तशी दुनिया चौकोनी असली तरी काही फरक पडला नसता. सकाळी उठुन कोण विचार करत बसत का? यार आज पृथ्वी थोडी षटकोनी दिसतेय. आता या गोष्टी चारचौघात बोलायच्या नसतात. हे त्याला सांगणार कोण होत? समोरच सायंन्सचा स्टुडंट बसलेला. सायंन्सला चालेंज करतोय म्हणत सरळ मोबाईलवर वर डिस्कव्हरी चॅनल वरचे कार्यक्रम बघायला लावले. बघाणारा विचार करतोय भाई साब, दुनिया गोल चौकोनी त्रिकोणी कशी पण असली तरी चालतेय ना रोज सारखी त्यात येवढ काय भडकायच? तु डोक्यावर पडलेलास का रे?

New Episodes : : Every Monday, Wednesday & Friday

1

नमुने - 1

रोजच्या जगण्यात असे खुप लोक येतात त्यांना ऐकत असतो आपण. बघत असतो. कुणाच्या नजरत आपण नमुने असतो. तर आपल्या दुसरे. पण यांना बघताना हसायच की थांबवायच यात गोंधळ होतो. दुनिया गोल आहे. कागदपत्र नाहीत त्याची. पण लोक म्हणतात म्हणुन मी हि म्हणतोय. तशी दुनिया चौकोनी असली तरी काही फरक पडला नसता. सकाळी उठुन कोण विचार करत बसत का? यार आज पृथ्वी थोडी षटकोनी दिसतेय. आता या गोष्टी चारचौघात बोलायच्या नसतात. हे त्याला सांगणार कोण होत? समोरच सायंन्सचा स्टुडंट बसलेला. सायंन्सला चालेंज करतोय म्हणत सरळ मोबाईलवर वर डिस्कव्हरी चॅनल वरचे कार्यक्रम बघायला लावले. बघाणारा विचार करतोय भाई साब, दुनिया गोल ...Read More

2

नमुने - 2

रिक्शा सोसायटीच्या गेटवर थांबली. मी उतरलो. पैसे दिले. गेट समोर पारधे काका आणि अम्या बोलताना दिसले. " मी आता सांगितल ते ऐक. बाकीच विसर. साॅरी म्हण आधी. आणि परत अस रस्त्यावर बोललास तर याद राख." पारधे काका एकमद सुनावण्याच्या मुड मध्ये होते. अस दिसत होत. समोरुन मी येतोय बघताच. रोजच्या टोमण्याच्या स्वरात काका म्हणाले," काय रे बॅटरी कुणी कडे गेलेलास उंडगायला? जेव्हा बघाव तेव्हा हात फळकुट घेऊन फिरतोय? बॅट तरी पकडता येते का?" अम्या कडे बघत म्हणाले," हे टोनक क्रिकेट खेळतय?" आपण काही सर्वोत्तम विनोद केला अशा गैरसमजातून काका माझ्याकडे बघून हसले. तेवढ्यात बाजूने दुबे काकांचा पोरगा बाईक वरुन ...Read More

3

नमुने - 3

आमच्या सोसायटीच्या पारथे काका, अम्याचे बाबा, इरशाद चाचा आणि दुबे काकांना तुम्ही ओळखत असालच. उरलेल्या लोकांशी हळुहळु ओळख होईलच. येवढी वर्ष एकत्र चाळीत राहिल्यामुळे अचानक झालेल्या बदलांना आपल करन जरा कठिन होत. चाळीच्या घरचे दरवाजे उघडे असायचे. बिल्डिंगचे मात्र बंद. पण सवयी काही केल्या बदलल्या नव्हत्या. सोसायटीत तस मीनी इंडीया राहत होती. चाळीच्या जागेवर आता उंच टाॅवर बांधला होता. 4-5 लोकांनी रुम विकल्याने आता ते या नविन सोसायटीत दिसत नव्हते. पण चाळीतले बाकीचे सगळी कुटुंब मात्र आपल्या वाढवडीलांची जागा सोडायला तयार नव्हते. काही नवीन लोक हि राहायला आले. चाळ गेली बिल्डींग आली. नोकीया गेला स्मार्ट फोन आला आणि सोसायटीत ...Read More