बावरा मन

(45)
  • 193.4k
  • 7
  • 101.1k

ही कथा संपूर्ण काल्पनिक आहे.... कल्पकतेतून उल्लेख केलेल्या घराणे ,ठिकाण , कंपनी , मॉल , हॉटेल्स आणि व्यक्तींचा कोणाशीही संबंध नाही.... ही कथा वास्तव जीवनाशी संबंधित नाही....असे आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा....धन्यवाद..) 1) कथेचे भाग जमेल तसे पोस्ट केले जातील.. 2) ही कथा रोमॅंटिक आहे... काही भागानंतर तुम्हाला वाचण्यास छान वाटेल.... त्यामुळे कथेला जास्तीत जास्त रेटिंग कमेंट आणि शेअर करा.... ------------- 0×0-------------- कथेतील कुटुंबातील व्यक्तींना संबंधी माहिती अभिमन्यू पुरोहीत .... वय साधारण २९-३०....उंची साधारण ५'१०"..... ना गोरा ना सावळा , अरुंद चेहरा , ब्लॅक फ्लॉपी हेअर , हलकेच ब्राउनिश डोळे , लांब नाक , गुलाबी ओठ... हॉलिवूडमधील हिरोला लाजवेल अशी toned बॉडी , शर्ट काढल्यावर नक्की सिक्स पॅक असतील त्याची खात्री.... स्मार्ट , कमाल फॅशन सेन्स आणि त्याची किल्लर स्माइल जी कधीतरी दिसायची... PS डायमन्ड चा एकुलता एक वारस... आणि जयपुरचा प्रिन्स....

New Episodes : : Every Monday & Thursday

1

बावरा मन.. - 1

( ही कथा संपूर्ण काल्पनिक आहे.... कल्पकतेतून उल्लेख केलेल्या घराणे ,ठिकाण , कंपनी , मॉल , हॉटेल्स आणि व्यक्तींचा संबंध नाही.... ही कथा वास्तव जीवनाशी संबंधित नाही....असे आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा....धन्यवाद..) 1) कथेचे भाग जमेल तसे पोस्ट केले जातील.. 2) ही कथा रोमॅंटिक आहे... काही भागानंतर तुम्हाला वाचण्यास छान वाटेल.... त्यामुळे कथेला जास्तीत जास्त रेटिंग कमेंट आणि शेअर करा....------------- 0×0-------------- कथेतील कुटुंबातील व्यक्तींना संबंधी माहितीअभिमन्यू पुरोहीत .... वय साधारण २९-३०....उंची साधारण ५'१० ..... ना गोरा ना सावळा , अरुंद चेहरा , ब्लॅक फ्लॉपी हेअर , हलकेच ब्राउनिश डोळे , लांब नाक , गुलाबी ओठ... हॉलिवूडमधील हिरोला लाजवेल अशी toned ...Read More

2

बावरा मन - 2

रिद्धी सकाळी पटकन रेडी होऊन डायनिंग रूम मध्ये येते... सगळे तिची वाट बघत होते.."Good Morning Dadu.. " रिद्धी यशवंतला मारून बोलते." Good Morning माऊ..." यशवंत तिच्या केसांवरुन हात फिरवतात.." चला नाश्ता करूया का मला खूप भूक लागली आहे..." सारारिद्धी चेअर वर जाऊन बसते ... सुधा ( कुक ) तिची प्लेट घेऊन येते... " वॉव... मसाला डोसा कोणी बनवला... " रिद्धी" दुसरं कोण असणार मॉम हो ना ... " अंकित" हो तिला आवडतात माझ्या हातचे डोसे... " रोहिणी" दादू दुपारी विकी येईल तुमच्या डान्स प्रॅक्टिस साठी तर सियाला बोलवून घे अजून कोणी असेल तिच्या घरचे तर त्यांना सांग... मी येईल ...Read More

3

बावरा मन - 3

रिद्धी बंगलोरला येऊन आठवडा झाला होता.... निंबाळकर आणि सरंजामे फॅमिली गोवा पोहचली होती... रिसॉर्टमध्ये सर्व सोय केली गेली होती.. टीम ऑलरेडी कामाला लागली होती... 1 दिवस संपूर्ण गोवा फिरून काढला.... दुसऱ्या दिवशी मेहेंदी होती.... सियाचे रिद्धिला कॉल वर कॉल चालू होते... संध्याकाळी ब्युटीशियन ने तिला छानस तयार केलं .... सिया रिद्धिला कॉल केला... "कुठे आहेस यार रिधु " सिया " जस्ट रिसॉर्ट वर पोहोचले आरव अजून बॅग्ज काढतो आहे ... आले मी ५ मिनीटांत... " रीद्धि" Ok डिरेक्ट रूम मध्ये येणार आहेस... " सियाने तिला बजावल.. " हो ग बाई आले.. " रिद्धीने कॉल कट केला आणि रूम कडे ...Read More

4

बावरा मन - 4

आज संगीत होते... नाश्ता करून सगळे तयारीला लागणार होते... सगळे आले पण रिद्धी आणि अभिमन्यु अजून आले नव्हते.... काही रिद्धी येउन सिया शेजारी बसते... " काय ग किती उशीर..." सिया "अग ते विकी आणि सायली येताय ना तर त्यांच्याशी बोलत होते काही वस्तू आणायला सांगायच होत... " रिद्धी " बर मला खुप भूक लागली आहे..." अपेक्षा सगळे ब्रेकफास्ट करत संगीतवर चर्चा करत असतात... रिद्धीची खात असताना नजर समोर जाते तर वंशला बघून तिच्या हातातला घास तसाच राहतो.. ती एकटक त्याला पाहत होती... अभिमन्यू मोबाईलमध्ये बघत येत असल्यामुळे त्याला काही समजलं नाही... त्यांच्याजवळ आल्यावर त्याने सगळ्यांना पाहिलं... रिद्धिच्या बघण्याने तो ...Read More

5

बावरा मन - 5 - गिफ्ट..

आज लग्न असल्यामुळे सगळीकडे लगबग सुरु होती... रुचिका आणि रिद्धी अंकितला तयार करत होत्या... दुसरी कडे ब्युटीशिअन सियाला रेडी होती.. विराज च्या मदतीला सगळे गँग बॉईज बाहेरच बघत होते... लग्नाचा मंडप समूद्रावर टाकला गेला होता... अंकित रेडी झाल्यावर मंजिरीने रुचिका आणि रिद्धिला तयार होण्यासाठी पाठवल... अंकित कडून लग्नाआधीचे विधी करून घेतले... रिद्धिने आल्यावर त्याला फेटा बांधला... रोहिणीने त्याची नजर काढली... सगळी तयारी झाली होती... निंबाळकर कुटुंबीय खूप आनंदात होते... विराजने रक्ष , आदि , आरव आणि वीरला व्हेंन्यूला पाठवुन दिलं... सगळी तयारी झाल्यानंतर अंकित बाहेर आला...विराजने खाली बसून हात पुढे केल्यावर अंकित हातावर पाय देऊन घोड्यावर बसला... आणि बँड ...Read More

6

बावरा मन - 6 - मागणी

सरंजामे कुटुंबाबरोबर बाकी गँग देखील घरी गेली... उद्या सर्व पूजेला येणार होते.... धरा सिया सोबत वृंदावनला जातं होती... रिसेप्शन ती राज पुरोहितांसोबत परतणार होती... गाडीत सिया अजूनही रडत होती... अंकित तिला मिठीत घेतो.. काही वेळात ती शांत होते... अंकित तिला स्वतः पासून दूर करतो... आणि तिचे डोळे पुसतो... " आज रडली ते शेवटच... आज नंतर मला तुझ्या डोळ्यांत पाणी नकोय... तुला रडताना पाहिलं कि मला त्रास होतो... आणि तु का रडते आहेस आता तर मी रडायला हवं... " अंकितच बोलण ऐकून सिया हसायला लागते.... " थँक गॉड हसली... मला वाटलं आपल्या घरी न जाता तुझ्या घरी जावं लागतं कि ...Read More

7

बावरा मन - 7 - अभिमान..

" तुला सियाच्या आत्या माहीत आहे... त्यांच्या मुलासाठी म्हणजे वंश साठी राजमातांनी तुला मागणी घातली आहे... " मंजिरी " " रिद्धी साठी हे खूप शॉक्ड झाली होती... वंशच्या वागण्याला तिने एवढं सिरीयस घेतलं नव्हतं.. पण तिला तो कुठे तरी आवडला होता... त्यामुळे तिला मनातून आनंद झाला होता... " रिधु तुला लग्नानंतर कामं करायला त्यांची काही हरकत नाही... " मंजिरी रिद्धीला राजमातांसोबत झालेल बोलणं सांगतात... " आई तुला आणि बाबांना काय वाटत... " रिद्धी" बाबा तयार आहेत पण त्यांनी तुला तुला विचारल आहे... तुला कोणीही जबरदस्ती करणार नाही हे तुलाही माहीत आहे... नीट विचार कर आम्हांला जरी पसंत असलं तरी ...Read More

8

बावरा मन - 8 - सियांकित..

सर्व कार्यक्रम आवरल्याने घरातील पाहुणे रिसेप्शन नंतर परतले होते.... समिधाची फॅमिली ब्रेकफास्ट नंतर निघणार होते... रिद्धीने सकाळी उठल्यावर वंशला Morning msg केला होता... त्यावर त्याचा good morning msg आणि emoji आला होता.. रिद्धी आणि सिया रेडी होऊन खाली आल्या.... मंजिरी आणि रोहिणी मंदिरात घेऊन जाण्याचे साहित्य चेक करत होत्या... "Good Morning आई... Good morning मम्मी" ( रोहिणी )... रिद्धी दोघींना हग करते..." Good Morning..." मंजिरी आणि रोहिणी दोघींना विश करतात.... " बर सिया तयारी झाली ना.... आणि रात्री वंशच्या घरचे येणार आहेत लक्षात आहे ना... " मंजिरी मागे वळत बोलतात." रिधु हे काय तु अजून तयार नाही झालीस... ...Read More

9

बावरा मन - 9 - South Seap Pearl Necklace

सकाळी सियाला जाग आली तेव्हा ती अंकितच्या मिठीत होती... त्याच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत होता... कालची रात्र आठवून तिच्या गालावर लाली चढली... ती उठायला बघते तर अंकितच्या हातांचा तिच्या कमरेभोवती विळखा होता.. हळुच त्याचा हात बाजूला करून ती पटकन रेडी होऊन येते.... छान अशी सिम्पल साडी नेसून ती आरशासमोर उभी राहते आणि तयारी करायला घेते... तिच्या कमरेला हातांचा विळखा बसतो तेव्हा ती मिरर मध्ये बघते... अंकित तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून तिला बघत होता.. " Good Morning बायको..." अंकित तिचे मानेवरचे केस पुढे करून ओठ टेकवतो.. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा येतो... पण ती पटकन भानावर येते... " अंकित सोड मला.... ...Read More

10

बावरा मन - 10 - तिलक...

अंकित आणि सियाची पहाटेची फ्लाईट होती... त्यांना सोडवायला विराज जाणार होता... मंजिरी आणि रोहिणीने त्यांना कितीतरी सुचना केल्या होत्या... यशवंतने त्यांना निघायला सांगितलं... सगळ्यांना नमस्कार करून दोघे निघाले... आज पासून धरा ऑफिस जॉईन करणारा होती... ब्रेकफास्ट करून धरा आणि वंश बाहेर आले.... तर समोर Audi Q 7 होती.... " wow भाई... न्यू कार...." धरा एक्साइटेड होऊन बोलली.... " धरा हे राजू.... तुम्हांला जिथे जायच असेल तिथे ह्यांना घेऊन जायच.... आणि हि तुमची नवीन कार...." वंशने तिच्या समोर कारची चावी धरली.... धराने आनंदात त्याला मिठी मारली.... आणि दोघे ऑफिसला निघाले.... रिद्धी सकाळी ऑफिसला आल्यानंतर पुजाने ...Read More

11

बावरा मन - 11 - सोबत..

रिद्धी ऑफिसला जाण्यासाठी रेडी होऊन खाली यायला निघते... तेव्हा तिला तन्वीचा कॉल आला... " बोला मॅडम..." रिद्धी स्टेअर उतरत " कामात आहेस का...?" तन्वी " नाही ग ऑफिस साठी निघते आहे... बोल तु..." रिद्धी " नेक्स्ट वीक फ्रेंडशिप डे आणि काय आहे......" तन्वी " काय आहे..." रिद्धी विचार करत... डायनिंग टेबलवर येऊन बसते... मग तिला क्लिक होत... " ओह्ह शीट... पियुचा बर्थडे आहे... आणि दोन्ही पार्टी मी अरेंज करणार होते..." रिद्धी मनात कपाळावर हात मारून बोलते... " बर आठवलं... मला वाटलच तु विसरली असणार..." तन्वी " अरे यार विसरले नाही... सध्या ऑफिस लोड खूप वाढला आहे त्यात खूप कामं ...Read More

12

बावरा मन - 12 - प्रेमाचा पाऊस

दुसऱ्या दिवसापासून रिद्धी दोन तीन तासांसाठी ऑफिसला जायची आणि नंतर संपूर्ण वेळ अकॅडेमी मध्ये असायची.... सोबत पार्टीची तयारी सुरु वंश देखील कामात बिझी झाला होता... तरी दोघे ना चुकता... एकेमेकांना कॉल करत होते.... दिवसाची सुरुवात आणि शेवट दोघांच्या कॉलने व्हायचा... अंतरा आल्यावर धरा त्यादिवशी घरीच थांबली होती... दोघींचा पूर्ण दिवस गप्पांमध्ये गेला होता... वंश आल्यावर अंतरा त्याला पुन्हा सर्व सांगत बसली.... रात्री बऱ्याच उशिरा सगळे झोपले.... दुसरीकडे तिलकची तयारी सुरु होती... सियाची आई निंबाळकर कुटुंबीयांनी माहीत असलेल्या गोष्टी सांगत होत्या... बाकी काही अडलच तर अर्पितांना कॉल करून विचारल जायच...समरला एका हार्ट सर्जरी साठी मुंबईला आला होता... दोन दिवस राहून ...Read More

13

बावरा मन - 13 - Your time has begun.....

तिलकला पाच दिवस बाकी होते... उद्या रक्षाबंधन असल्याने सर्वजण आज जयपुर जाणार होते... रिद्धी सगळ्यांना भेटायला त्यांच्या घरी आली सीमा खाली हॉलची क्लिनिंग करत होत्या... " कुठे आहेत सर्वजण..." रिद्धी " सगळे जण खोलीत आहेत... तुम्ही बसा ना मी तुमच्यासाठी चहा नाश्ता आणते..." सीमा " नाही नको मला काही... तुमच चालू देत..." रिद्धी वंशच्या रूमकडे जाते... रिद्धी रूममध्ये आली तर तो तिथे नव्हता... तिने सर्व रूम चेक केल्या... बेडच्या साईडला बॅग उभी होती... कपडे घड्या करून बेडवर ठेवले होते... तिला काहीतरी क्लिक झालं तशी ती फ्लोअरच्या गार्डन एरिया मध्ये आली... तिथून आत गेल्यानंतर जीम होती... तिचा अंदाज बरोबर निघाला ...Read More

14

बावरा मन - 14 - अश्रु....

दोन दिवसांनी निंबाळकर परिवार जयपुर जाण्यासाठी निघाले... पहाटेची फ्लाईट असल्याने सगळे लवकर उठले होते... रिद्धी त्यांना बाय करायला उठली " रिधु काळजी घे बाळा... आम्ही उद्या परत येऊ तरी देखील..." मंजिरी" आई तु नको काळजी करुस... मी घेईल स्वत:ची काळजी आता लहान नाही आहे मी... " रिद्धी त्यांना मिठी मारत बोलते... " तु कितीही मोठी हो... आमच्यासाठी लहानच आहे.." यशवंत तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलले... " आई - बाबा निघूया... बच्चा काळजी घे स्वतःची आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ नको थांबूस नाही तर मी नाही म्हणून कामं करत बसशील..." विराज" हो दादू... मी घेईल स्वतःची काळजी आणि लवकर घरी येईल..." ...Read More

15

बावरा मन - 15 - श्वास माझा....

सकाळी वंशच्या डोक्यावर हात फिरवल्याने त्याला जाग आली... " वंश तुम्ही आता घरी जा... रात्रभर इथे होतात... थोड्या वेळ करा... आम्ही आहे इथे... " मंजिरी " रिधुची काही हालचाल झाली का..." विराज " नाही अजून काहिच रिस्पॉन्स नाही... डॉक्टर येतील आता चेक करायला..." वंश " good morning everyone... " डॉक्टर आत येउन रिद्धीला चेक करतात... " आशिष रिद्धीला शुद्ध यायला हवी होती आतापर्यंत..." विराज " हो विराज... पण मी कालही बोललो होतो कि अजून नक्की काही सांगता येत नाही... आजचा दिवस आहे अजून... hope for best... have a good day... " डॉक्टर निघून जातात.... " वंश बाहेर मीडिया आहे... ...Read More

16

बावरा मन - 16 - Lucky You.....

निंबाळकर घरी पोहचतात... त्यांच्या मागे पुरोहित फॅमिली देखील येते... " काय झालं.. सगळ्यांना अचानक का बोलावल आहे..." यशवंत " पण माहित नाही... आम्हांला वंशचा कॉल आला कि इथे या..." मनीष " तुम्ही बसा ना... रुचिका पाणी आण..." रोहिणी रुचिका आणि सिया चहा पाणी बघायला जातात... नक्की काय झालय कोणाला काही कळत नव्हतं... त्यामुळे सगळेच अस्वस्थ होते... " विराज अरे एकदा त्यांना कॉल करून बघ ना..." समीर " हो काका..." विराज मोबाइल काढतो... तितक्यात वंशची एन्ट्री होते... " राहू देत... आले वंश..." राजमाता विराजला थांबवतात... " बसा... सिया पाणी..." मंजिरी सियाला बोलतात... सिया त्याला पाणी देते... " काय झालं वंश... ...Read More

17

बावरा मन - 17 - श्रावण सरी....

आज रिद्धी आणि वंश बाहेर जाणार होते... म्हणून रिद्धी पटकन रेडी होऊन खाली आली.... डायनिंगला सगळे ब्रेकफास्ट साठी जमले " Good morning everyone.... " रिद्धीने येऊन यशवंतला मिठी मारली आणि चेअरवर येवुन बसली... " रिधु कुठे बाहेर चालली आहेस का..." विराज मुद्दाम तिला चिडवतो... " हो..... अरे मी ना वहिनीला घेऊन tracking ला चालले आहे..." रिद्धी पण कमी नाही... तिच्या बोलण्यावर सगळे हसतात... " तिला घेऊन चाललीस हे सांगण्यापेक्षा हे सांग ना कि वंश सोबत चालली आहेस..." विराज " oh dadu you are so smart yaar..." रिद्धी विराजचे गाल ओढत बोलते... " ये रिधु गाल सोड पटकन..." विराज तिचे ...Read More

18

बावरा मन - 18 - जयपूर

दुसऱ्या दिवशी रिद्धी , विराज आणि धरा जेनीच्या लग्नासाठी गोव्याला गेले..... रिद्धीने वंशला तिच्या look चे फोटो send केले  धराने पहिल्यांदा ख्रिश्चन वेडिंग पाहिली होती..... त्यामुळे तिला खूप भारी वाटलं होत.... वेडिंग आणि रेसिप्शन अटेंड करून तिघे दुसऱ्या दिवशी मुंबईला परत आले.... ............................ ..................................... ............................................... गोव्या वरून आल्यापासून रिद्धी फुल्ल बिझी झाली होती.... फॅशन वीक जवळ येत असल्याने कामाचा लोड वाढला होता.... रुचीकाला त्रास होत असल्याने सगळ्यांनी विराजला तिच्या जवळ राहायला सांगितल होत.... पण घरी राहून तो रिद्धीला जमेल तशी मदत करत होता.... बऱ्यापैकी मिटिंग ह्या कॉन्फरेन्सने केल्या जातं होत्या..... दिवसरात्र रिद्धीच्या डिझाइनच कामं सुरु असल्याने अकॅडेमीला देखील ...Read More