अजब लग्नाची गजब कहाणी

(14)
  • 147.4k
  • 11
  • 83.7k

" अरु, जयु,मनु अग कुठे आहात ग सगळ्या, लवकर या बरं इकडे" माई फोनवरच बोलणं संपवून मोठ्याने आवज देत म्हणाल्या ."माई अहो काय झालं??काही हवंय का तुम्हाला?" अरुताई म्हणाल्या." मला काहीही नको ग ..आता माहिती का कुणाचा फोन होता?? माझी बालमैत्रीण रुख्मिणी चा " माई म्हणाल्या.."काय सांगताय काय माई..अहो तुम्ही रुख्मिणी मावशींबद्दल नेहमी सांगत असता.. आणि बरेच वर्षात तुमची गाठ भेट सुध्दा नाही मग हे अचानक कस घडलं." अरुताई आश्चर्याने म्हणाल्या .." अग ..आपण नाही का जानूच नावं नोंदवलं विवाह मंडळात .तिच्याही नातवाच नोंदवलं आहे त्यात नाव तिथेच त्यांनी आपल्या जानूची सगळी माहिती वाचली आणि फोन केला ..बघ न काय

New Episodes : : Every Tuesday & Saturday

1

अजब लग्नाची गजब कहाणी (भाग १)

" अरु, जयु,मनु अग कुठे आहात ग सगळ्या, लवकर या बरं इकडे" माई फोनवरच बोलणं संपवून मोठ्याने आवज म्हणाल्या ."माई अहो काय झालं??काही हवंय का तुम्हाला?" अरुताई म्हणाल्या." मला काहीही नको ग ..आता माहिती का कुणाचा फोन होता?? माझी बालमैत्रीण रुख्मिणी चा " माई म्हणाल्या.."काय सांगताय काय माई..अहो तुम्ही रुख्मिणी मावशींबद्दल नेहमी सांगत असता.. आणि बरेच वर्षात तुमची गाठ भेट सुध्दा नाही मग हे अचानक कस घडलं." अरुताई आश्चर्याने म्हणाल्या .." अग ..आपण नाही का जानूच नावं नोंदवलं विवाह मंडळात .तिच्याही नातवाच नोंदवलं आहे त्यात नाव तिथेच त्यांनी आपल्या जानूची सगळी माहिती वाचली आणि फोन केला ..बघ न काय ...Read More

2

अजब लग्नाची गजब कहाणी (भाग २)

माईंनी अण्णांच्या कानावर त्यांचं रुख्मिणी आजींसोबत झालेलं बोलणं घातलं..अण्णांना ही आनंद झाला पण प्रश्न त्यांच्या लाडकीच्या आयुष्याचा होता म्हणून शहानिशा केल्या शिवाय ते पुढील बोलणी करणार नव्हते.अण्णांनी जानकीला त्यांच्या खोलीत बोलवले.." अण्णा बोलावलं तुम्ही?" जानकी म्हणाली.." हो ..बस इथे माझ्यासमोर " अण्णा म्हणाले.." काय झालंय अण्णा ,तुम्हाला काही बोलायच आहे का माझ्याशी" अण्णांचा चिंतेत असलेला चेहरा बघून जानकी म्हणाली"जानू बाळा तुझ्यासाठी एक स्थळं आलंय आणि येत्या रविवारी ते आपल्या घरी यायच म्हणतं आहेत" अण्णा म्हणाले" अहो अण्णा काय इतकी घाई माझ्या लग्नाची..वर्षभरात 3 मुलं येऊन गेलेत मला पाहायला..मला त्या कांदेपोहे कार्यक्रमाचा कंटाळा आलाय हो अण्णा.." जानकी काहीशी वैतागून म्हणाली.." ...Read More

3

अजब लग्नाची गजब कहाणी (भाग ३)

" काय !! रविवारी अकोला जायच आहे मुलगी पाह्यला ..मला न विचारता ठरवलंच कस तुम्ही?? मी येणार नाही अजिबात ..तुम्हीच जात बसा" रघुवीर चिडून म्हणाला.. " म्हणजे तुझ्या आयुष्याचा इतकाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे का आम्हाला आणि तुला मुलीचा फोटो बघ म्हणलं तर तेही नको म्हणतोय " रुख्मिणी रागात आजी म्हणाल्या.. " जिजी अग तस कुठे म्हणलं मी पण मला एकदा विचारायचं तर खरी ..मला काम असतं बँकेत आणि प्लिज आता फोटो वगैरे पाहण्याची जबरदस्ती नको करू मला" रघुवीर नरमाईने बोलला.. " रविवारी कसली काम असतात रे तुला..ते काही नाही आपण जातोय रविवारी ..अरे तुला माहिती का मुलीची ...Read More

4

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ४)

बघता बघता शनिवार आला.अग्निहोत्रींकडे पाहुणे येणार म्हणून सगळी तयारी झाली होती.जानकी मात्र मनातल्या मनात मात्र देवाकडे प्रार्थना करीत होती हे लग्न जुळू नको देऊ.." सुन सुन सुन दीदी तेरे एक रिश्ता आया है " गाणं म्हणत ओंकार जानकी जवळ आला.."ओंक्या.. माकडा गप बस न .मी इकडे टेंशन मध्ये आहे अन गाणी सुचत आहेत " जानकी ओंकार कडे उशी फेकत म्हणाली.." ओय टेंशन कशाला घेते? लग्न तर करावंच लागणार होतं न एक ना एक दिवस मग .." ओंकार म्हणाला.." हो पण इतकी काय घाई आहे घरच्यांना , तू बघ एकच वर्षाने लहान आहे माझ्या पेक्षा तुझ्या लागलेत का मागे लग्न ...Read More

5

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ५)

जानकी बैठकीत आली..रघुवीरला तिच्याकडे बघून अस वाटत की बहुतेक ही नाराज आहे तिलाही लग्न करायची इच्छा नसावी . वडीलधाऱ्या तिने वाकून नमस्कार केला..तिने हळूच नजर रघुवीर वर टाकली तो तिच्या कडेच बघत होता. दोघांची नजरानजर झाली .जिजींनी तिला त्यांच्या जवळ बसवलं.औपचारिकता म्हणून प्रश्न विचारले,जानकी ची आवड निवड विचारली..रघुवीर आणि जानकी ला निवांत बोलता यावं म्हणून दोघांना वरच्या मजल्यावर बोलायला पाठवलं.खुर्चीवर दोघे बसले खरतर काय बोलाव त्यांना कळतं नव्हतं. " काय उकडतं हो तुमच्या अकोल्यात .जेमतेम फेब्रुवारी महिना सुरू आणि इतकी गर्मी" रघुवीर शांतता भंग करत म्हणाला..जानकी आश्चर्या ने त्याच्याकडे बघत होती तो अस काही बोलेल हे तिला ...Read More

6

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ६)

अमरावती पोहचत पर्यंत रघुवीर ला जानकी पसंत आहे नाही हे विचारत विचारत सगळ्यांनी वैतागून टाकले पण रघुवीर नंतर सांगतो उत्तर देत होता..घरी आल्यावर ही पुन्हा जिजींनी त्याला विचारलं तरीही त्याच उत्तर तेच विचार करून सांगतो..आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला.." काय एवढा विचार करतोय काय माहिती..इतकी गोड मुलगी आहे जानकी ,सुंदर तितकीच सालस आहे हो मला तर बाई फार आवडली" जिजी म्हणाल्या.." हो मला सुध्दा खूप आवडली जानकी.खूप चांगल्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे.मला तर अस झालय की कधी लग्न करून ती आपल्या घरी येतेय" रमाताई म्हणाल्या.." एकुलती एक मुलगी इतक्या लाडात वाढलेली पण जिजी कामाचा किती उरक आहे तिला ...Read More

7

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ७)

शेवटी जानकी आणि रघुवीर च एकदाच लग्न ठरलं होतं.नातेवाईकांना ही फोन करून कळवण सुरू झालं होतं..येत्या रविवारी अग्निहोत्री कडले मंडळी देवांच्या घरी जाणार होते.जानकी मनातून आनंदी नव्हती .घरच्यांना फसवतोय ही सल तिच्या मनाला टोचत होती पण सगळ्यांसमोर आनंदी असण्याचं ती दाखवत होती. दोन्ही घरी उत्साहाच वातावरण होत.लग्नात काय काय करायच ह्याची योजना आखली जात होती. एकदाचा रविवार उजाडला आणि अग्निहोत्री मंडळी देवांच्या वृंदावनात पोहचली.त्यांचं छान स्वागत करण्यात आलं.जानकी ,मंदार आणि मिनाक्षीताई सोडून सगळेच तिथे गेले होते.अण्णांनी सोबत त्यांच्या गुरुजींना देखील नेले होते जेणे करून साक्षगंध आणि लग्नाचा मुहूर्त काढता येईल.रघुवीर ला आशा होती की घरच्यांसोबत जानकी येईल पण जानकी ...Read More

8

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ८)

साखरपुड्याच्या तयारीत पंधरा दिवस कसे गेले कळलंच नाही. या पंधरा दिवसात जानकी आणि रघुवीर च एकदाच बोलणं झालं होतं.त्यानंतर एकमेकांना ना फोन केला न मॅसेज. रघुवीरच्या घरून मात्र जानकीला वरचेवर फोन यायचे.रघुवीर ची मोठी बहीण गायत्री तिच्या नवरा आणि मुलासोबत अकोल्याला पोहचली होती. तीच ही जानकी सोबत फोनवर बोलणं व्हायच..घरातलं उत्साहच वातावरण बघून जानकीला सगळ्यांना फसवत असल्याने अपराधी वाटायच..काळजी,हुरहूर, सल अश्या अनेक भावनांची गुंफण तिच्या मनात होती..पाहता पाहता साखरपुड्याचा दिवस उजाडला..देव कुटूंबीय त्यांच्या पाहुण्यांसकट सकाळी अकराच्या सुमारास हॉल वर पोहचले .साखरपुड्याचा मुहूर्त तसा दुपारी चार वाजताचा होता..अग्निहोत्रींनी त्यांच अगदी जंगी स्वागत केल .हार,बुके सह फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.आल्या ...Read More

9

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ९)

दोन्ही घरी लग्नाची तयारी सुरू होती.. कपडेलत्ते,दागिने,देण्याघेण्याच्या वस्तू,आहेर,रुखवत, जानकीला देण्याच्या भेटवस्तू अशी बरीच खरेदी सुरू होती..जानकी आणि रघुवीर च्या मात्र वेगळंच होत हे लग्न करण्याची त्यांची कारण वेगळी होती घरच्यांना ह्याची कानोकान खबर नव्हती .दोन्ही घरचे लोक खूप आनंदी होते.. जानकीला मात्र टेंशन होत ,तीच आणि रघुवीरच अधेमधे फोनवर बोलणं व्हायचं आता दोघांमध्ये बऱ्यापैकी मैत्री झाली होती.आवडी निवडी कळू लागल्या होत्या पण अजूनही रघुवीर ने जानकीला रागिणी बद्दल काहीच सांगितले नव्हते.. रागिणीच्या मनातही सारखा रघुवीर चा विचार यायचा..तिचेही मन त्याच्यात गुंतत चालले होते पण अजूनही तिच्या मनातली गोष्ट मनातच होती..रघुवीर ने एक दिवस दिनेश ला त्याच्या मनातलं रागिणीबद्दल असलेलं ...Read More

10

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग १०)

रागिणीला रात्रभर झोप आली नाही.रघुवीर आणि जानकीचे फोटो सारखे तिच्या डोळ्यांसमोर येत होते.सकाळी ती लवकर उठली आणि आज काहीही रघुवीर ला बँकेत जाऊन भेटायचं अस तिने ठरवलं..पण रघुवीर चा ब्रेक टाइम दुपारी दोन चा असतो हे तिला माहिती होत त्यावेळी ती बँकेत पोहचली .रघुवीर कँटीनमध्ये त्याच्या सहकार्यांसोबत होता..सगळे त्याच अभिनंदन करत होते..रघुवीर चा बेस्ट फ्रेंड असलेला दिनेश जाधव हा सुद्धा तीन महिन्याच ट्रेनिंग आटपून बँकेत परतला होता..त्याच लक्ष अचानक रागिनीकडे गेले.."रघु ..समोर बघ ,रागिणी" दिनेश म्हणाला.. रघुवीर ने रागिणी कडे पाहिलं ती रागात होती.ती रागारागाने त्याच्या कडे गेली.." अभिनंदन रघुवीर" रागिणी खोचकपणे म्हणाली.." थँक्स..पण तुला कस कळलं" रघुवीर म्हणाला.."ते ...Read More

11

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग११)

दोन्ही घरी लग्नाची तयारी सुरू होती.. कपडेलत्ते,दागिने,देण्याघेण्याच्या वस्तू,आहेर,रुखवत, जानकीला देण्याच्या भेटवस्तू अशी बरीच खरेदी सुरू होती..जानकी आणि रघुवीर च्या मात्र वेगळंच होत हे लग्न करण्याची त्यांची कारण वेगळी होती घरच्यांना ह्याची कानोकान खबर नव्हती .दोन्ही घरचे लोक खूप आनंदी होते.. जानकीला मात्र टेंशन होत ,तीच आणि रघुवीरच अधेमधे फोनवर बोलणं व्हायचं आता दोघांमध्ये बऱ्यापैकी मैत्री झाली होती.आवडी निवडी कळू लागल्या होत्या पण अजूनही रघुवीर ने जानकीला रागिणी बद्दल काहीच सांगितले नव्हते.. रागिणीच्या मनातही सारखा रघुवीर चा विचार यायचा..तिचेही मन त्याच्यात गुंतत चालले होते पण अजूनही तिच्या मनातली गोष्ट मनातच होती..रघुवीर ने एक दिवस दिनेश ला त्याच्या मनातलं रागिणीबद्दल असलेलं ...Read More

12

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग१२)

जानकीसाठी एक एक दिवस मोठा कठीण चालला होता.घरापासून दुरावण्याचं दुःख तर होतच पण त्याहीपेक्षा आपल्या माणसांना फसवण्याचं दुःख त्यापेक्षाही होत.तिच्या मनात बरेचदा आलं की मानसी जवळ सगळं सांगून मोकळं व्हावं पण तिची हिंमत होत नव्हती. दोन्ही लग्न घरी तर उधाण आलं होतं.मधल्या दिवसात अग्निहोत्रींकडे देव कुटूंबीय व्याही भोजनाला येऊन गेले होते. लग्न पत्रिका वाटून झाल्या होत्या.लग्न घरी पाहुणे मंडळी येणं सुरू झाले होते.कामातून कुणालाही सवड नव्हती.प्रत्येक जण म्हणत होता की जानकीला खूप चांगला नवरा आणि खूपच छान सासर मिळालं.देवांच्या घरीही पाहुणे येऊ लागले होते. सवाष्णीनीं मिळून लग्नाची हळद दळली होती.जानकीला प्रत्येक जण घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शिकवत होते.उखाणे पाठ ...Read More

13

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग१३)

वरमाला घालून झाल्यावर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.नवरदेव नवरी सजवलेल्या खुर्चीवर बसले.सगळ्यात पहिले अण्णा माई आणि जिजी,आप्पांनी सुलग्न लावले आणि शुभाशीर्वाद दिले.एक एक करून दोन्ही कुटूंबाकडल्या व्यक्तींनी वधूवराला आशीर्वाद दिले.रागिणी स्टेज वर त्या दोघांना शुभेच्छा द्यायला गेली.." अभिनंदन रघुवीर, अभिनंदन जानकी" रागिणीचा चेहरा कोमेजला होता.."थँक्स रागिणी..तू आलीस मला खूप आनंद झाला थांब एक सोबत फोटो घेऊ" रघुवीर म्हणाला. फोटोग्राफर ने त्या तिघांचा फोटो काढला ,मग रागिणी तिथून निघून गेली. रघुवीरला मनातून वाईट वाटलं होतं.त्याच्या मनात अजूनही रागिणी बद्दल प्रेम होतं.हे सगळं तो तिला मिळवण्याकरिता करत होता.रागिणी तिथे आल्याच रघुवीरच्या घरच्यांना फारस रुचल नव्हतं.फोटोशूट वगैरे झाल्यावर गुरुजींनी दोघांना सप्तपदीसाठी तयार राह्यला ...Read More

14

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग१४)

रघुवीरच्या घरी भरपूर पाहुणे होते. जानकी नवीन घरी काहीशी गोंधळली होती.गृहप्रवेशा नंतर सगळे महत्वाचे विधी आटोपले.जानकीची व्यवस्था जिजींच्या खोलीत होती. रात्री जेवणे आटपून ती खोलीत चेंज करायला गेली.गायत्री ,मुक्ता आणि राधा ताई तिच्या मदतीला होत्या.तिला एकटं वाटू नये म्हणून सगळे तिच्या अवती भवती राहत होते.जानकीने नवीन साडी सोडून साधी साडी नेसायला घेतली पण काही केल्या तिला साडी नेसता येत नव्हती मग गायत्रीने तिची मदत केली.जानकीने स्वतःला आरशात पाहिले. आज ती स्वतःच वेगळंच रूप ती बघत होती. चेहरा धुतल्याने तिचा मेकअप उतरला होता ,पण तिच्या डोळ्यांतील काजळ तसच होत. तसही तिला कुठल्या सौंदर्य प्रसाधन साधनांची गरज नव्हती. ती तशीच खूपच ...Read More