जव्हार डायरीज

(6)
  • 22k
  • 5
  • 10.2k

आम्ही नुकतीच फोर व्हीलर घेतली होती.मुख्य म्हणजे मी महिन्याभरातच गाडीवर बऱ्यापैकी हात साफ करून घेतला होता. आत्मविश्वास दुणावला होता की आपण कार घेवून लाँग ड्राईव्ह करू शकतो. त्यामुळे मी आणि अनिल ने जवळचेच वन नाईट स्टे आणि दुसऱ्या दिवशी परत घरी येवू असे स्पॉट्स शोधायला सुरुवात केली. नुकताच पावसाळा संपत आला होता . बाहेरचे वातावरण लाँग ड्राईव्ह साठी एकदम झकास होते. बरीच शोधाशोध केल्यावर आम्ही जव्हार जायचे ठरवले. कांदिवली वरून अगदी १२०-१३० कि.मी. असल्यामुळे मला गाडी चालवण्यासाठी पण सोयीस्कर.

Full Novel

1

जव्हार डायरीज - पार्ट १

आम्ही नुकतीच फोर व्हीलर घेतली होती.मुख्य म्हणजे मी महिन्याभरातच गाडीवर बऱ्यापैकी हात साफ करून घेतला होता. आत्मविश्वास दुणावला होता आपण कार घेवून लाँग ड्राईव्ह करू शकतो. त्यामुळे मी आणि अनिल ने जवळचेच वन नाईट स्टे आणि दुसऱ्या दिवशी परत घरी येवू असे स्पॉट्स शोधायला सुरुवात केली. नुकताच पावसाळा संपत आला होता . बाहेरचे वातावरण लाँग ड्राईव्ह साठी एकदम झकास होते. बरीच शोधाशोध केल्यावर आम्ही जव्हार जायचे ठरवले. कांदिवली वरून अगदी १२०-१३० कि.मी. असल्यामुळे मला गाडी चालवण्यासाठी पण सोयीस्कर. आता डेस्टिनेशन तर फायनल झाले. राहायचे कुठे? हा पुढचा प्रश्न. लगेच गुगल ची मदत घेतली. जव्हार हा आदिवासी भाग ...Read More

2

जव्हार डायरीज - पार्ट २

कार पार्क करून आम्ही समोरच असलेल्या रिसेप्शन कडे निघालो. रुपेश ने आमचे टेंपरेचर चेक करून आमची रूम उघडुन दिली.मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जव्हार सारख्या ठिकाणी खूप लक्सरी नाही मिळणार पण आमची जी रूम होती ती स्वच्छ आणि आरामदायी होती. आम्ही आमचे सामान ठेवून रिलॅक्स झालो. दुपारच्या जेवणाची वेळ अजून झाली नव्हती . त्यामुळे आम्ही या फार्म हाऊस चा एक फेरफटका मारायला बाहेर पडलो. इथे राहण्यासाठी ज्या रूम्स आहेत त्या दोन ठिकाणी आहेत. काही रूम्स रिसेप्शनच्या बाजूलाच आहेत. काही रूम्स रिसेप्शन समोरच्या एक मजली बिल्डिंग मध्ये तळ मजला आणि पहिला मजला वरती विभागलेल्या आहेत. डायनिंग हॉल उजव्या हाताला आहे.. हॉलच्या आतमध्ये ...Read More

3

जव्हार डायरिज - पार्ट ३

रात्री गाढ झोप लागल्यामुळे सकाळी उठल्यावर छान फ्रेश वाटत होतं.. आज दोन तीनच पर्यटन स्थळे बघायची असल्यामुळे आम्ही आरामात केली.. नाश्त्याची वेळ झाल्यामुळे आधी नाश्ता करून घेतला.. नाष्ट्यामध्ये ब्रेड ऑमलेट, भुर्जी , पोहा असे दोन तीन प्रकार होते.. आम्ही पोटभर नाश्ता करून पॅकिंग करायला घेतले.. आता चेक आऊट करून , दोन तीन पॉइंट बघून मग परत मुंबई असा आमचा प्लॅन होता.. प्रकृति ॲग्रो फार्म पॅकेजमध्ये राहणे, दोन वेळचे जेवण, नाष्टा आणि संध्याकाळचा हाय टी याचा समावेश होता.. तुम्ही एकस्ट्रा काही मागवले तर आपल्याला त्याचे बिल द्यावे लागते. तुमचा ड्रायव्हर असेल तर त्याचे पण एकस्ट्रा पैसे मोजावे लागतात.. आम्ही आवराआवर ...Read More