सा य ना ई ड

(26)
  • 143.2k
  • 12
  • 77.8k

गुंगीत असलेली ती मुलगी कोचावर पहुडली होती,तिचा डावा हात लांब पसरला होता. तिच्या बाजूला जो माणूस उभा होता,त्याने आपल्या हातात टेप रेकॉर्डर चा मायक्रोफोन धरला होता. "तुझं नाव काय आहे?" त्याने विचारले. माणसाच्या आवाजाच्या कंपनाने टेप रेकॉर्डर वरचा एक दिवा लुकलुकला. त्याने डाव्या हाताने टेप रेकॉर्डर च्या आवाजाच्या पातळीत थोडा बदल केला. त्याचा आवाज शांत,ठाम, सकारात्मक वाटावा असा होता. गरजेपुरता भारदस्त, अधिकार युक्त होता. मुलीच्या अंतर्मनात उत्तर देण्यासाठी विरोध निर्माण होणार नाही इतपत हुकुमी आवाजात त्याने सावकाश पुन्हा प्रश्न विचारला "तुझं नाव काय आहे?" गुंगीत असलेली मुलगी चुळबुळली,तिच्या पापण्या फडफडल्या.

Full Novel

1

सा य ना ई ड - (भाग १)

माझी रहस्य कथा सायनाइडक्रमशः प्रसिध्द करत आहे.यातील सर्व प्रसंग घटना भूमिका पात्रे काल्पनिक असून त्याचा अन्य कोणत्याही भाषेतील कोणत्याही तसेच वास्तवातील भूमिका पात्रे प्रसंग याच्याशी संबंध नाही.सायनाईड सायनाईड प्रकरण १गुंगीत असलेली ती मुलगी कोचावर पहुडली होती,तिचा डावा हात लांब पसरला होता. तिच्या बाजूला जो माणूस उभा होता,त्याने आपल्या हातात टेप रेकॉर्डर चा मायक्रोफोन धरला होता."तुझं नाव काय आहे?" त्याने विचारले.माणसाच्या आवाजाच्या कंपनाने टेप रेकॉर्डर वरचा एक दिवा लुकलुकला.त्याने डाव्या हाताने टेप रेकॉर्डर च्या आवाजाच्या पातळीत थोडा बदल केला.त्याचा आवाज शांत,ठाम, सकारात्मक वाटावा असा होता. गरजेपुरता भारदस्त, अधिकार युक्त होता. मुलीच्या अंतर्मनात उत्तर देण्यासाठी विरोध निर्माण होणार नाही इतपत हुकुमी आवाजात त्याने ...Read More

2

सा य ना ई ड - (भाग २)

सायनाईडप्रकरण दोन दुपार च्या कामासाठी पाणिनी पटवर्धन ऑफिस मधून बाहेर पडायच्याच तयारीत होता. त्याच वेळी त्याची सेक्रेटरी सौम्या म्हणाली, “ बाहेर च्या ऑफिस मध्ये डॉ. कार्तिक बसले आहेत, ते आपल्या ऑफिस मधे सारखे अस्वस्थ पणे येरझऱ्या घालत होते. मी त्यांना सांगितलं की ५ वाजायला आलेत आणि....”“काय हवंय त्यांना ? “ पाणिनी पटवर्धन ने मधेच विचारलं. “ ते म्हणताहेत की काही झालं तरी तुम्हाला भेटायच आहेच त्यांना , त्यांच्याकडे एक मोठ उपकरण आहे, ते टेप रेकॉर्डर सारखे दिसतंय “‘ मी भेटतो त्यांना , “ पाणिनी पटवर्धन म्हणाला. “काहीतरी अती महत्वाचे असल्या शिवाय डॉ. कार्तिक असे तडकाफडकी येणार नाहीत ““तडकाफडकी?” सौम्या सोहनी ने ...Read More

3

सा य ना ई ड - (भाग ३)

सायनाईड प्रकरण ३दुसऱ्या दिवशी बरोबर साडेनऊ वाजता सौम्या सोहनी पाणिनी पटवर्धन ला म्हणाली, “ डॉ.डोंगरे आलेत इथे, त्यांना दिलेल्या वेळे नुसार.”“ त्यांच्या बरोबर ती मुलगी आहे? “तिने मान डोलवली.“ कशी आहे ती दिसायला सौम्या ? “सौम्या जरा संकोचली.नंतर म्हणाली,’’ चांगली आहे दिसायला.”आणखी काय विशेष असं ? ““ लाजरी बुजरी ““ नकारात्मक व्यक्तिमत्व ? ““ नाही , नाही ,तसं अजिबात नाही.पण नेमकी कशी आहे माहित्ये का, घोटीव पाय आहेत, उभारीचे शरीर आहे पण त्याचे प्रदर्शन करणारी नाही.सुंदर डोळे आहेत पण नजर खाली आहे.,हात छानच आहेत पण घडी घालून बसली आहे.डोळे खूप बोलके आहेत पण हळुवार पणे संवाद साधणारे आहेत.तुमच्या लक्षात आले ...Read More

4

सा य ना ई ड - (भाग ४)

सा य ना ई डप्रकरण ४पाणिनी पटवर्धन चे डॉक्टर आणि अनन्या शी बोलणे झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी घाई घाईत पाणिनी पटवर्धन च्या केबिन मध्ये शिरली.तो त्यावेळी एका अशिला बरोबर मिटींग मध्ये होता पण सौम्या ने इतर कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने मान हलवून त्याचे लक्ष वेधून घेतल्यामुळे, तो उठून सौम्या बरोबर ऑफिस मधील लायब्ररी च्या खोलीत आला.तिने फोन च्या दिशेने त्याचे लक्ष वेधले. “ डॉ.डोंगरे लाईन वर आहेत,ते म्हणताहेत खूपच तातडीचे काम आहे.तुम्हाला भेटलेच पाहिजे.मी सांगितलं त्यांना की तुम्ही दुसऱ्या अशीलाबरोबर आहात पण मी त्यांना बाहेर बोलावून आणते.”पाणिनी पटवर्धन ने फोन उचलला. “ हॅलो.” “ पाणिनी पटवर्धन,” डॉ.डोंगरे उद्गारले. त्याचा आवाज ...Read More

5

सा य ना ई ड - (भाग ५)

सा य ना ई ड प्रकरण ५हेमंत कोरगावकर, हा रसायन शास्त्र विषयक सल्लागार होता.डोक्यावर घट्ट बसणारी आणि कपाळा पर्यंत टोपी ,बारीक ,चमकदार डोळे,त्याच्या जाड चष्म्याच्या आतूनही दिसत होते. चेहेरा, चंद्रा सारखा गोल गरगरित होता. आपुलकीने हात पुढे करून त्याने पाणिनी पटवर्धन शी हस्तांदोलन केले.“ वा: वा: वा: पाणिनी पटवर्धन, किती तरी दिवसांनी तुझ्यासाठी काम करण्याची संधी मिळाली ! नाही का ? ““ अगदीच फार काळ नाही, दोन वर्ष असतील.”“ खूप काळ गेलाय. काय विशेष या वेळी ? ““ कोरगावकर, हा झुल्पीपरकारनावाचा मुलगा आहे.त्याला काहीतरी सापडलंय.त्यानेच तुला सांगू दे स्वत:च्या तोंडून कुठे मिळाली आहे ही वस्तू.”“ हो हो चालेल ना. “ ...Read More

6

सा य ना ई ड - (भाग ६)

सा य ना ई डप्रकरण ६पोलीस स्टेशन मधे आल्यावर खून,हत्या, वध अशा विषया संबंधित विभागात पाणिनी आला.दार ढकलले आत आला. “ इन्स्पे. तारकर आहे का आत? दारावरच्या हवालदाराला त्याने विचारले.इन्स्पे. तारकर आणि पाणिनी जिवाभावाचे मित्र होते पण दोघांचे कामाचे स्वरूप परस्परांशी विरोधी असल्याने,त्यांच्यात कायम वाद होत असत. दोघेही आपल्या कर्तव्यात कसूर करत नसत. तत्वाचा प्रश्न येई तेव्हा मैत्री बाजुला ठेऊन भांडणे करीत. पाणिनीने स्वतःच्या हुशारीने सोडवलेल्या अनेक प्रकरणात यशाचे श्रेय तारकर ला दिले होते पण त्याचा बोभाटा केला नव्हता. याची सुप्त जाणीव तारकर ला होती आणि त्या मुळे पाणिनी विषयी त्याला आदर होता आणि त्याच वेळी नको त्या प्रकरणात ...Read More

7

सा य ना ई ड - (भाग ७)

सायनाइड प्रकरण ७पाणिनी ने त्याच्या खाजगी ऑफिस चे कुलूप उघडले, फोन उचलून ऑपरेटर ला म्हणाला, “ मी आलोय, हाय मोटेल ला फोन लावून सौम्या ला जोडून दे.”“ देते मी जोडून फोन, पण इथे एक बाई आली आहे बाहेर , ती म्हणत्ये की अनन्या गुळवणी च्या प्रकरणात तुम्हाला तातडीने भेटायचं आहे ““ आत ये तू आणि मला सांग त्या बाई बद्दल “ पाणिनी म्हणाला.“ तुम्हाला आधी सौम्या जोडून देऊ का ? ““ नको तू आधी आत ये , नंतर सौम्या ला लाव फोन.”“बाहेर मिसेस लीना बुद्धीसागर नावाच्या बाई आल्या आहेत., साधारण एकतीस-बत्तीस वय असेल. त्या हर्षल मिरगल च्या नातलग आहेत.” ऑपरेटर ...Read More

8

सा य ना ई ड - (भाग ८)

सा य ना ई ड (भाग ८)सौम्या ऑफिस चे दार उघडून आत आली तेव्हा पाणिनी सुप्रीम कोर्टाचे अद्ययावत निवाडे बसला होता.” कशी झाली सहल, सौम्या?”“ मी त्या होटेल मध्ये बसून समुद्र किनारी स्नान करत असल्याच्या आणि लाटांवर तरंगत असल्याच्या कल्पना मन:चक्षू समोर आणत होते !”“आणि मी हेरंब खांडेकर बरोबर व्यावसायिक तत्वे, गुन्ह्या बाबतचा पुरावा, असल्या घाणेरड्या विषयावर चर्चा करत असल्याचे मनासमोर रंगवत होतो.”“ आणि आता सगळा विषय संपलाय?, कसा काय ?”अनन्याला शेल्फ वर गोड गोळ्यांची एक जास्तीची बाटली सापडली. हर्षल चॉकलेट पिऊन पडे पर्यंत आणि तिच्या वर आरोप करे पर्यंत ती नेहेमीची बाटली नसावी असे तिला अजिबात वाटले नाही.ती लगेच तिच्या ...Read More

9

सा य ना ई ड - (भाग ९)

सा य ना ई ड प्रकरण ९ अच्छा, तर तुम्ही पाणिनी पटवर्धन आहात, प्रसिद्ध वकील.” हस्तांदोलन करता करता म्हणाला.“ हो, आणि तुम्ही बलदेव.” पाणिनी थोडावेळ त्याचा अंदाज घेत म्हणाला.सरळ ताठ उभा राहिला असता तर तो चांगला सह फूट उंच भरला असता पण वयामुळे आता त्याच डोक थोड पुढे आलं होत, खूपच हडकुळा होता तो.“ बस खाली . ओजस ने मला सांगितलं की तुमचं व्यक्तिमत्व खुपच उत्कंठा वाढवणारे आहे, मला तुम्हाला काही विचारायचं आहे.““ विचारा पुढे, त्यांनी मला इथे यायला आणि बोलायला म्हणून पैसे देऊ केले. माझ्या आयुष्यातला आजवरचा पैसे मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग होता. काय विचारायचे आहे तुम्हाला?”“ मला समजलंय ...Read More

10

सा य ना ई ड - (प्रकरण १०)

सा य ना ई ड प्रकरण १० बलदेव गेल्या नंतर जवळ जवळ तासभर पाणिनी येरझाऱ्या घालत होता. सौम्या सारखी बघत होती.शेवटी तिने विचारले, “ काम करणाऱ्या स्त्री ला खाण्यासाठी तरी संधी मिळणार का?”आपल्या चालण्याच्या लयीत कोणताही बदल न करता तो म्हणाला.” आपण खायला मागवू इथे. डॉ.डोंगरे यांना पोलिसांनी संपर्क करण्यापूर्वी त्यांचं व माझं बोलणे होणे आवश्यक आहे. तसचं अनन्या गुळवणी ची भेट होणे ही महत्वाचे आहे.तुला काय वाटत सौम्या, निमिष जयकर ला ती कुठे आहे हे कसे समजले असेल?”“ तिने , मी जाताच लगेच त्याला फोन केला असेल. ती मुलगी म्हणजे एक कोडेच आहे.मला वाटतंय तिच्या मनात काहीतरी चाललंय.”ओजस ने दारावर ...Read More

11

सा य ना ई ड - (प्रकरण ११)

सा य ना ई ड प्रकरण ११पाणिनी ने आपली गाडी हम रस्त्याला वळवली. “ कुठे चाललोय आपण?” जयकर विचारले.“ अत्ता तरी आपण जिथे जास्तीत जास्त गर्दी आणि वर्दळ असेल अशा ठिकाणी चाललोय.पोलीस तुला शोधताहेत , बहुतेक मलाही शोधात असावेत.म्हणून मी विचार केला की तुला बरोबर घ्यावं आणि पोलिसांनी अनन्याला शोधण्यापूर्वी आपण तिला शोधण्याचा प्रयत्न करावा. आता मुख्य अडचण अशी आहे की आपण हे प्रकरण हाताळण्याचा काही मार्ग जोवर शोधत नाही तो पर्यंत पोलीसाना तुझ्या पर्यंत कसे पोचू द्यायचे नाही.”“ काय पद्धत आपण वापरायची?’’“ मला हे उत्तर माहीत असतं तर अशा प्रकारे आपण गाडीतून भटकत बसलो नसतो. एक गोष्ट तुला सांगू ...Read More

12

सा य ना ई ड - (प्रकरण १२ आणि प्रकरण १३)

सा य ना ई ड प्रकरण १२जवळ जवळ मध्य रात्र झाली होती सौम्या तिच्या खुर्चीत बसून पाणिनी कडे घाबरून होती . ते दोघे बाहेरून जेवून ऑफिस मधे आल्यापासून पाणिनी सतत येरझाऱ्या घालत होता .बाहेरचे जेवण सुद्धा त्यांना चवीने घेता आले नव्हते. “ घरी जा सौम्या” पाणिनी म्हणाला. तिने मानेने नकार दिला.” आपल्याला काही कळे पर्यंत मी जाणार नाही.“ सव्वा बारा वाजून गेले आहेत. संध्याकाळपासून पोलीस जयकर च्या घराजवळ ठाण मांडून बसले आहेत.साडे दहा वाजता त्यांना संशय यायला सुरुवात झाली की त्याने त्यांच्या हातावर तुरी दिली ...Read More

13

सा य ना ई ड - (प्रकरण १४ आणि १५ )

सा य ना ई ड प्रकरण १४. आणि १५ १४- पाणिनी तुरुंगातल्या एका खोलीत अनन्या ला भेटायला आला होता. पडद्याच्या पलीकडे ती शांतपणे आणि समाधानी चेहेऱ्याने बसली होती. नेहेमी पेक्षा जास्तच सुंदर दिसत होती.“ मला तुम्ही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे करणार आहात ? “‘’ एक गोष्ट स्पष्ट पणे ध्यानात घे, तुला पिंजऱ्यात उभं केलं तर आईने तुझ्या कडे दिलेल्या त्या पत्रा बद्दल तुला सांगावच लागेल. त्यामुळे त्यात काय मजकूर होता हे मला समजायला हवं.” पाणिनी म्हणाला.“ मी तुम्हाला सांगितलं ना, की मी ते कधी ही कोणालाही सांगणार नाही.”“ तुझा वकील म्हणून मला ते माहीत असणे गरजेचे आहे.तुला समजत नाहीये की परिस्थिती किती ...Read More

14

सा य ना ई ड - (प्रकरण १६)

सा य ना ई ड प्रकरण १६ अलक्षचंद्र मालशेटवार हा बॅलॅस्टिक म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ होता , समोरच त्याने वजन केले.” पाणिनी पटवर्धन म्हणतात ते एकदम बरोबर आहे.घरातील बंदुकीच्या खोलीतून मिळालेल्या कवचावर क्र.५ असा अंक कोरला आहे. त्यातील शिशाच्या गोळ्या सरासरी एकशे सत्तर औंस वजनाच्या आहेत.हे कवच रेमिंग्टन कंपनीने बनवले आहे. पुरावा क्र २ मधील गोळ्या याच कवचातील आहेत. या दोन कवचातील गहाळ असलेल्या शिशाचे वजन आणि या बाटलीतल्या गोळ्यांचे वजन अगदी सारखे आहे. या उलट पुरावा क्र.अ विषाची बाटली यातील शिशाच्या गोळ्या या आकाराने लहान आहेत आणि ते घरात सापडलेल्या कवचा मधील असतील असे मला वाटत नाही.”तो पुढे म्हणाला.” ...Read More

15

सा य ना ई ड - (प्रकरण १७) शेवटचे प्रकरण

सा य ना ई ड प्रकरण १७ (शेवटचे प्रकरण)कोर्टाचे कामकाज थांबल्यामुळे, खटला ऐकायला आलेल्या प्रेक्षकांना पूर्ण गोंधळातच टाकले. अत्ता कुठल्याच प्रकरणात, अगदी पाणिनी पटवर्धन असलेल्या प्रकरणात सुध्दा अशी गोंधळाची स्थिती झाली नव्हती असे एका वर्तमान पत्रकाराने जाहीर केले.खांडेकर यांचा चेहेरा बघवत नव्हता, अचानक घडामोडीमुळे त्यांना क्लेश झाल्याचे जाणवत होते.दार ढकलून,चिडचिड करत ते कोर्टातून बाहेर पडले.मिलिंद बुद्धीसागर आणि लीना ला कैदेत टाकले होते.तो तिला सत्य सांगण्याबद्दल विनवणी करताना दिसत होता तर ती त्याला अर्वाच्च्य शिवीगाळ करत होती. “ माझ्यातली एक पै सुध्दा तुला मिळणार नाही.” ती म्हणाली“ मला देण्यासाठी तुझ्याकडे काही नाहीच आहे.” तो तिला म्हणाला .सौम्या सोहनी आणि कनक ओजस ...Read More