झुंजारमाची

(11)
  • 28.6k
  • 3
  • 13.4k

बहिर्जी आणि त्यांच्या सवंगड्यांनी तोरणा किल्ला कशाप्रकारे जिंकण्यासाठी शिवरायांना मदत केली आणि तोरणा गडावर खजिना आणि शस्त्रागार यांचा कसा शोध लावला. त्याची काल्पनिक, रंजक अशी ऐतिहासिक दंतकथा. कृपया, वाचकांनी हि काल्पनिक कथा म्हणजे खरा इतिहास समजू नये, हि विनंती." 1. देवीचं मंदिर 2. झुंजार महाल 3. हर हर महादेव

Full Novel

1

झुंजारमाची - 1

एक रहस्यकथा ईश्वर त्रिंबक आगम "बहिर्जी आणि त्यांच्या सवंगड्यांनी तोरणा किल्ला कशाप्रकारे जिंकण्यासाठी शिवरायांना मदत केली आणि तोरणा गडावर आणि शस्त्रागार यांचा कसा शोध लावला. त्याची काल्पनिक, रंजक अशी ऐतिहासिक दंतकथा. कृपया, वाचकांनी हि काल्पनिक कथा म्हणजे खरा इतिहास समजू नये, हि विनंती." 1. देवीचं मंदिर 2. झुंजार महाल 3. हर हर महादेव 1. देवीचं मंदिर ढंगांच्या पांढऱ्या धुरकट छताला भेदून उंच आभाळाला भिडलेलं! घोंघावणारं वादळ, सोसाट्याचा वारा, अंगाची लाहीलाही करणारं ऊन, आणि कितीही मुसळधार पाऊस असो, यांच्याशी अष्टौप्रहर झुंजणारं! जणू आस्मानीच्या सुलतानाशी जवळीक साधू पाहणारं ते उंच गिरी शिखर! पायथ्यापासून वर पाहाताना डोकं ...Read More

2

झुंजारमाची - 2

२. झुंजार महाल उजाडू लागलं तसं रानपाखरांचा चिवचिवाट, किलबिलाट वाढू लागला. पाऊस थांबला होता. तिघांनी माठातल्या पाण्यानं तोंडं धुतली. भिंतीवरच्या खुंटीवर अडकवलेल्या लोखंडी कंदीलात गाभाऱ्यातल्या बुधलीतलं तेल भरलं. कंदील पेटवत तो म्हणाला, "चला... या माझ्या मागून." वातावरणात चांगलंच गारवा होता. मारत्या, बहिर्जी हातावर हात चोळत उब मिळवण्याचा प्रयत्न करत होते. दोघेही म्हातारबाच्या मागे चालू लागले. मंदिराच्या मागे झाडाझुडपांनी गर्दी केली होती. पुढे आलेल्या वेली बाजूला सारत म्हातारबा आतमध्ये गायब झाला. पाठोपाठ दोघेही शिरले. समोर एक बारव होती. गुडघ्याएवढ्या उंच पायऱ्या उतरून खाली आले. डाव्या बाजूला मोकळ्या जागेमधून म्हातारबा वाकून आतमध्ये गेला. बारवचं पाणी हात दीड ...Read More

3

झुंजारमाची - 3 - अंतिम भाग

३. हर हर महादेव दुपारची वामकुक्षी झाली. थोडासा फलाहार करून शिवबाराजे बाजी पासकरांसोबत वाड्याच्या बाजूला असणाऱ्या बागेमध्ये गावकऱ्यांची गाऱ्हाणी होते. घटका दोन घटकांत राजे मोकळे झाले. बहिर्जीने राजांची भेट घेतली. सारी हकीकत सांगितली. ती विलक्षण तलवार राजांसमोर पेश केली. तलवार पाहताच शिवबाराजे स्तिमित झाले. आई जगदंबेची कृपा आणि श्री झुंजारमल देवाचा आशीर्वादच मिळाला. राजांनी आतल्या देवघरात तलवारीचं पूजन केलं. बहिर्जीची पाठ थोपटली. रात्री सदरेवर खलबतं झाली. कोण कुठून आणि केव्हा हल्ला करणार ठरवलं गेलं. राजांनी सर्वांना सक्त ताकीत दिली. 'शक्यतो विना हत्यार काम झाले पाहिजे. जो कुणी हत्यार उगारेल तर गय करू नका. पण शक्यतो जीवानिशी कुणालाही मारणे नाही.' ...Read More