जल तू ज्वलंत तू!

(19)
  • 52.9k
  • 2
  • 22.3k

त्यावेळी त्या दालनात एकूण अकरा लोक होते. ते इतर देशातून आलेले प्रवासी होते. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या होत्या. कदाचित विचारसुद्धा! परंतु सगळे एकाच दिशेने विचार करत होते. बहुतेक लोकांचे मत असे होते की, या आत्महत्याच होत्या. कसेही करून यांना थांबवायला पाहिजे होते. कदाचित थांबवण्याचा प्रयत्न झालाही असेल, पण आता ते एखाद्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या योद्ध्यांसारखे इतिहासजमा झाले होते. अमेरिकेतील एका लहानशा नगरात बफलोच्या एका मुख्य रस्त्यावर ते स्मारक-संग्रहालय बनले होते. ते अशा लोकांची कथा सांगत होते ज्यांनी कधी विश्वविख्यात धबधबा ‘नायगारा फॉल्स’च्या अति उंचावरून पडणार्‍या पाण्यावरून वहात खाली येण्याचा धोकादायक प्रयत्न केला होता. हे धाडस करून त्यांना काय मिळणार होते कोण जाणे! पण त्यामुळे त्यांनी काय घालवले हे आता जग पहात आहे. अनेक पर्यटकांनी संवेदना आणि समर्थन प्रकट करण्यासाठी त्यांच्या चित्रावर हस्ताक्षरं केली होती. हृदयविदारक संदेश लिहिले होते. पाणी, ज्याला जीवन, अमृत म्हणतात, त्याने त्यांचे जीवन गिळून टाकले होते. यात दोष पाण्याचा नव्हता. अशा प्रकारची धोकादायक जोखीम उचलणार्‍यांचा होता. ते चांगले पोहणारे असावेत. एकाने लाकडी बॉक्स बनवून, त्यात स्वत:ला बंद करून, वरून विजेच्या गतीने वाहणार्‍या पाण्यात उडी घेतली होती. कोणी प्लास्टिकची नावेसारखी पाणबुडी बनवून, त्यात बंद होऊन वरून उडी मारली होती. कोणी पॅराशूटसारखा पारदर्शक चेंबर बनवून त्यात जलसमाधी घेतली होती. त्या सगळ्यांनी यश मिळवले नाही. यशाची स्वप्नं इतिहासात कैद केली. हा धबधबा पहायला येणारे पर्यटक या लोकांबद्दल ऐकून आश्चर्यचकीत होत होते.

Full Novel

1

जल तू ज्वलंत तू! - 1

(कादंबरी) मूळ हिंदी लेखक प्रबोधकुमार गोविल मराठी अनुवाद डॉ. सुशीला दुबे अनुवादिका परिचय --------------------- * सुशीला दुबे : 22-7-1936 * शिक्षण- एम.ए.पीएच्.डी. (पुणे विद्यापीठ) * साहित्य- हिंदीतून मराठीत अनुवाद केलेल्या एकवीस कादंबर्‍या व नऊ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. हिंदीतून मराठीत व मराठीतून हिंदीत अनुवाद केलेल्या कथा दर्जेदार मासिकांतून प्रकाशित झालेल्या आहेत. * संपर्क- डॉ. सुशीला दुबे, फ्लॅट क्र. 303, बिल्डिंग डी-2, शिवसागर को-ऑप. सोसायटी, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे-411051 मो.- 9923011613 *** मूळ लेखक परिचय ------------------ * प्रबोधकुमार गोविल जन्म : 11 जुलै 1953 * साहित्य- देहाश्रम का मनजोगी (हिंदी व सिंधीमध्ये), बेस्वाद मांस का टुकडा, रेत ...Read More

2

जल तू ज्वलंत तू! - 2

2 ------------- आजोबांकडून सोमालियाच्या फिंजानची कहाणी ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले होते. फिंजान लहानपणापासून नायगारा धबधबा पाहत होता. तो त्या असा मन लावून बघायचा जशी लहान मुलं सिनेमा किंवा टी.व्ही. बघतात. पडणार्‍या पाण्याचा तो दैत्याकार पडदा त्याला भिजलेल्या रजतपटासारखा वाटत असे. तो त्याला फार आवडत असे. फिंजानचे वडील अमेरिकन सैन्यात तैनात होते. त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यावरसुद्धा त्याने तिथे येऊन बसणे सोडले नव्हते. फिंजानच्या आईची-रस्बीची इच्छा होती की, आता फिंजानने सैन्यात भरती व्हावे. पंधरा वर्षांच्या फिंजानला मनात नसताना आईचे म्हणणे मान्य करावे लागले. इतरांच्या इच्छेला माणूस मान देतो, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. पण हे तो आयुष्यभर करू शकत नाही. फिंजान लपूनछपून ...Read More

3

जल तू ज्वलंत तू! - 3

3 --------------- रात्र बरीच झाली होती. मुलांच्या आई-वडिलांना आश्चर्य वाटत होते की, रोज लवकर झोपणारी मुले आजोबांची गोष्ट ऐकण्यात तल्लीन झाली की, दुपारची संध्याकाळ आणि संध्याकाळची रात्र झाल्याचे त्यांना जाणवले नाही. फिन्जानच्या कथेचा शेवट जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता होती. त्यामुळे कोणाला भूक-तहान आठवली नाही. मुलांनी आणि आई-वडिलांनी काही वेळेपूर्वी बफलो नगरात हिंडून फिरून त्या सगळ्या जागा पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटत होते, त्यांच्यासमोर ती घटना घडली आहे. गोष्ट संपल्यावर आजोबांच्या लक्षात आले की, त्यांच्या पाहुण्यांनी दुपारपासून काही खाल्ले नाही. तेवढ्यात दार उघडले. भारतीय परिवाराला तिथे सोडणार्‍या दोघी बहिणी आल्या. त्या जवळच फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांच्या हातात मोठी टोपली होती. ...Read More

4

जल तू ज्वलंत तू! - 4

4 ------------------ फिन्जानची आई मूळची भारतात राहणारी होती. तिचा जन्म जैसलमेर जवळच्या एका लहान गावात झाला होता. रस्बीने वयाच्या वर्षांपर्यंत चंद्र पाहिला नव्हता. तिला हेही माहीत नव्हते की, तारे म्हणजे काय? पानं, फुलं, झाडं, पक्षी चार वर्षांपर्यंत दिसले नव्हते. वाळू आणि वाळू! चारी बाजूला उंच दगडी भिंत आणि आकाशातून येणारे ऊन एवढेच तिला माहीत होते. तिची आई अशा उन्हात इतर स्त्रियांबरोबर दळण दळत असे. कापड विणत असे. कधी बांबूच्या परड्या बनवत असे. कधी खडी फोडत असे. हे करत असताना तिला कांदा, चटणी, वरण आणि चार भाकरी मिळत. त्या भाकरी आई खात असे व काही तुकडे रस्बीला देत असे. तेव्हा ...Read More

5

जल तू ज्वलंत तू! - 5

5 ----------------- त्यादिवशी वॉशिंग्टनमध्ये फारसे ऊन नव्हते. तिथे रात्री नऊ वाजता सूर्य मावळत असे. आज संध्याकाळी ढगाळ वातावरणाने सूर्य मावळल्यासारखे वाटले. व्हाईट हाऊसच्या समोरच्या प्रशस्त लॉनमध्ये फिरणार्‍यांची रहदारी नेहमीसारखीच होती. एकीकडे तरुण आणि मुलांच्या घोळक्यात तर जणू जत्रा भरली होती. लोक कुतुहलाने त्या लहानशा ब्राजिलियन वंशाच्या कुत्र्याला पाहत होते. त्याला कोणीतरी दारू पाजली असणार. तो दोन पायांवर नाचत होता. त्याच्या गळ्यात बांधलेला सोनेरी स्कार्फ ध्वजासारखा लहरत होता. त्याला पाहून टाळ्या वाजवणार्‍या लोकांमध्ये मुलंच नाही तर त्या कुत्र्याची मालकीण मॉमग्रेटा पण सामील होती. तिच्याबरोबर न्यूयॉर्कहून आलेली तिची मैत्रीणपण होती. थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या फोटोग्राफरने हे दृश्य कॅमेरात कैद करणे सुरू ...Read More

6

जल तू ज्वलंत तू! - 6

6 ------------ ऋतू बदलला होता. कडाक्याची थंडी पडली होती. बफलोचे तापमान शून्य डिग्रीच्या बरेच खाली गेले होते. जसे भारतीय विहिरीतून पाणी घेण्यासाठी पायर्‍या उतरत जातात, जसजसे धरतीच्या गर्भात पाय जातात तसतशी थंडी वाढतच जाते. तेथील नद्या, सरोवर बर्फाच्या लाद्या झाल्या होत्या. हिरवी पानं पांढरी दिसू लागली होती. झाडांनी वेगवेगळी रूपं घेतली होती. आकाश पृथ्वीवर पाणी नाही, बर्फ टाकत होते. रस्त्यावर एखाददुसरा माणूस फिरताना दिसत होता. प्रवासीसुद्धा जे धाडसी होते तेच फिरत होते. फिन्जान आणि पेरिनाने डेलाला तिच्या खोलीत पाठवले. त्यांनी अंथरुणावर कागदाच्या लहान लहान पिशव्या पसरल्या. या पिशव्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पन्ना होते. पेरिनाला ते फार प्रिय होते. अनेकवेळा मोजून ...Read More

7

जल तू ज्वलंत तू! - 7

7 -------------- सना आणि सिल्वा दोघी हसतमुख होत्या. आनंदी स्वभावाच्या होत्या. त्यांची बुद्धी त्यांच्या वयाच्या मानाने जास्त तीव्र होती. त्यांना जास्त शिक्षण घेण्यापेक्षा जग बघण्याची इच्छा होती. त्यांना कुठेही जायची संधी मिळाली की, त्या सोडत नव्हत्या. पाणी त्यांनाही आवडत होते. समुद्र, झरे, सरोवर त्यांची आवडती ठिकाणं होती. गेल्या शनिवारी त्यांनी एका पॉप स्टारचा कार्यक्रम पाहिला. तेव्हापासून त्या हे गाणे सतत गुणगुणत होत्या. कभी पत्थर पे पानी कभी मिट्टी में पानी कभी आकाश पे पानी कभी धरती पे पानी दूर धरती के तल में बूँदभर प्यास छिपी है सभी की नजर बचाकर वहाँ जाता है पानी (कधी दगडावर पाणी, कधी ...Read More

8

जल तू ज्वलंत तू! - 8 - अंतिम भाग

8 --------------- आजोबांनी जेव्हा ही कथा पूर्ण केली. सगळे मन लावून ऐकत होते. हा रोजचा कार्यक्रम होता. रात्रीच्या जेवणानंतर मुलं आजोबांजवळ येऊन बसत आणि कथा पुढे सुरू होई. त्या मुलांच्या आई-वडिलांनी सुद्धा ही गोष्ट ऐकली होती. या गोष्टीचा फायदा असा झाला की, मुलांच्या मनातून ‘आत्मा’ची भीती नाहीशी झाली. गेल्या काही दिवसात घडलेल्या चमत्कारिक घटनांनी त्यांच्या मनात भीती दडली होती. त्यांना कळले होते की, आत्मा एक निरागस प्राण असतो. तोसुद्धा आपल्या दु:खात बुडालेला. तो कोणाला काय त्रास देणार? आजोबांनी सांगितले की आत्मा पाण्याच्या बुडबुड्यासारखा जाणवतो. तो कायमचा नसतो. त्याच्यामुळे कोणाला काही त्रास होताना किंवा भीती वाटताना पाहिले, तर ते सुद्धा ...Read More