स्पर्धेच्या पलीकडे

(20)
  • 15.2k
  • 1
  • 6.4k

स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग १) सकाळचे सहा वाजले होते, गुलाबी थंडी उतरू लागली होती. सूर्याची किरणे आता कोणत्याही क्षणी डोकावू लागणार होती. शनिवार वाड्याच्या बस स्टॅंडवर फारशी गर्दी नव्हती, सिंहगडला जाणारी बस नुकतीच सुटली होती. त्यामुळेच स्टँडवरची बरीचशी गर्दी कमी झाली होती. राहुल आणि विनोद दोघेही आपापल्या सायकली घेऊन कोणाची तरी वाट पाहत होते. "विन्या, तू निघताना फोन केला होतास न मंदारला? तुला माहितीये न तो नावाप्रमाणेच मंद आहे. सहाला पोचायचे असेल तर तो सहाला बेडमधून बाहेर येतो." - राहुल "अरे हो यार, पाच मिनिटात पोहचतो असे बोलला तो मला. येईल बघ इतक्यात. पण तू रम्याला फोन केलायस न? तो

Full Novel

1

स्पर्धेच्या पलीकडे - (भाग १)

स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग १) सकाळचे सहा वाजले होते, गुलाबी थंडी उतरू लागली होती. सूर्याची किरणे आता कोणत्याही डोकावू लागणार होती. शनिवार वाड्याच्या बस स्टॅंडवर फारशी गर्दी नव्हती, सिंहगडला जाणारी बस नुकतीच सुटली होती. त्यामुळेच स्टँडवरची बरीचशी गर्दी कमी झाली होती. राहुल आणि विनोद दोघेही आपापल्या सायकली घेऊन कोणाची तरी वाट पाहत होते. "विन्या, तू निघताना फोन केला होतास न मंदारला? तुला माहितीये न तो नावाप्रमाणेच मंद आहे. सहाला पोचायचे असेल तर तो सहाला बेडमधून बाहेर येतो." - राहुल "अरे हो यार, पाच मिनिटात पोहचतो असे बोलला तो मला. येईल बघ इतक्यात. पण तू रम्याला फोन केलायस न? तो ...Read More

2

स्पर्धेच्या पलीकडे - (भाग २)

स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग २) आपला मूळ प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला निघायला उशीर झालेला आहे. आणि आता आपण इथे भांडत बसलो तर तो उशीर अजून वाढतच जाणार आहे. त्यामुळे तुमच्या या भांडणात किती वेळ घालवायचा हे तुमच्या सारख्या हुशार मुलांना माझ्यासारख्या मित्राने सांगणे उचित होणार नाही. म्हणूनच मी समोर बसून चहा घेतो. भांडण संपले आणि नेहमीचे सोपस्कार झाले की मला कळवा. माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे आपला हा वेळ भरून काढण्याची." - प्रकाश. नेहमी प्रमाणेच प्रकाशच्या बोलण्यात तथ्य होते. त्याचे मत चौघांनाही पटत होते. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. राहुल आणि मंदारने हात मिळवले, गळा भेट घेतली आणि ...Read More

3

स्पर्धेच्या पलीकडे - (भाग ३)

स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग ३) इथुन पुढे मात्र त्यांची खरी कसोटी होती. सिंहगड चढणे आणि सायकल चालवणे या फरक होता. सायकल चालवायची त्यांना सवय होती, त्या उलट गड मात्र ते क्वचितच चढत असत. गड चढायला सुरुवात केल्यावर पाचच मिनिटात स्पर्धा किती कठीण होणार आहे याची जाणीव झाली. त्यांच्या जवळचे पाणी वापरायला त्यांनी सुरुवात केली होती. थकवा जाणवायला सुरुवात झाली होती. केवळ घाई करून गड चढल्याने जिंकता येणार नाही हे त्यांना जाणवले. त्यामुळेच त्यांनी आपापल्या धोरणात बदल केले. राहुलने आपली चाल मंद केली. तो आता आपली ऊर्जा वाचवून पुढे जात होता. त्या उलट मंदार अधिक धोक्याची वाट पकडून वेळ वाचवण्याचा ...Read More