मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी...

(117)
  • 188.7k
  • 15
  • 87k

आयुष्य म्हणजे नेमकं काय असावं??? कोणी म्हणतं जीवन आणि मृत्यू यांच्यातील द्वंद म्हणजे आयुष्य...!! कोणी बोलतं, अपूर्ण असलेल्या स्वप्नांचा मागोवा घेऊन त्यांना पूर्णत्वास घेऊन जाणं म्हणजे आयुष्य तर कोणाचं हे मत आहे की अपेक्षा भंग झाला असूनही ज्याला सुख आणि समाधान मिळवता येतं ते आयुष्य....!!! प्रत्येकाची व्याख्या वेगळी...ज्याला जो अनुभव आला, जी समज आली, त्याने तसं रूप दिलं आयुष्याला.... पण मला काय वाटतं माहीत आहे??? मला वाटतं आयुष्य म्हणजे एक पुस्तक, एक कादंबरीच....त्या कादंबरीचं एक एक पान उलटत जावं आणि तसा तसा एक एक धडा समोर यावा अन तसे आयुष्यातले दिवस पालटत जातात....आता ह्या कादंबरीत बऱ्याच ओळी, बरेच पात्र असे असतात जे अधोरेखित होतात...काही मागची पानं अशी असतात की आपण पुढे जात असताना सुद्धा त्यांचा आशय आपला पिछा सोडत नाही...

Full Novel

1

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 1

आयुष्य म्हणजे नेमकं काय असावं??? कोणी म्हणतं जीवन आणि मृत्यू यांच्यातील द्वंद म्हणजे आयुष्य...!! कोणी बोलतं, अपूर्ण असलेल्या स्वप्नांचा घेऊन त्यांना पूर्णत्वास घेऊन जाणं म्हणजे आयुष्य तर कोणाचं हे मत आहे की अपेक्षा भंग झाला असूनही ज्याला सुख आणि समाधान मिळवता येतं ते आयुष्य....!!! प्रत्येकाची व्याख्या वेगळी...ज्याला जो अनुभव आला, जी समज आली, त्याने तसं रूप दिलं आयुष्याला.... पण मला काय वाटतं माहीत आहे??? मला वाटतं आयुष्य म्हणजे एक पुस्तक, एक कादंबरीच....त्या कादंबरीचं एक एक पान उलटत जावं आणि तसा तसा एक एक धडा समोर यावा अन तसे आयुष्यातले दिवस पालटत जातात....आता ह्या कादंबरीत बऱ्याच ओळी, बरेच पात्र असे ...Read More

2

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 2

पुढे.... माझ्या मनातली उलथापालथ मी कुण्णाला काय कुण्णालाच सांगू शकत नव्हती...एक तर ते वय असं होतं की कुणी समजून याची शाश्वती नव्हती...ताईला किंवा घरी सांगणं तर अशक्यच..!! आणि मैत्रिणींना सांगणं म्हणजे या ' आ बैल मुझे मार ' ही गत झाली असती...त्यांनी चिडवून चिडवूनच जीव घेतला असता...आणि ज्याला सांगावं वाटत होतं त्याला सांगायची हिम्मत होत नव्हती... सांगणं तर दूर त्या प्रसंगानंतर माझी अतुल कडे बघायची हिम्मत होत नव्हती...शेवटपर्यंत त्याला जे सांगायचं होतं ते बोलूच शकली नाही..हां, तो मात्र शेवटच्या भेटीला असं काही बोलून गेला की ते बाणासारखं टोचलं मला...काय बोलला होता तो..अम्म्मम.. हां.. आठवलं... बिछड के फिर मिलेंगे कितना ...Read More

3

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 3

पुढे... काही भावना अश्या असतात ज्यांना आपण ओळख आणि नाव दोन्ही ही देऊ शकत नाही... त्या शेवटपर्यंत तश्याच राहून आता बघा ना, त्यादिवशी अचानक अतुलला काय झालं काय माहित आणि तो लगेच निघून गेला... मला माझ्या मनात काय चाललंय हे जाणवत होतं पण ते नक्की आहे काय हे ओळखता येत नव्हतं...आणि तसंच काहीसं अतुलच्या बाबतीतही होत असावं...आता विचार केला तर वाटतं की त्या वयात घडतं असं, अचानक कोणीतरी वाटायला लागतं 'खास'...पण मला त्या वयातही आणि आताही का तोच एक 'खास' वाटतो??? काय म्हणावं याला?? हं...बोलली ना, काही भावनांना नाव आणि ओळख नाही देऊ शकत.. चेतनला येऊन आठवडा झाला होता...आता ...Read More

4

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 4

पुढे... अनपेक्षितपणे आपली अपेक्षा पूर्ण झाली तर??? कसं वाटेल??? अरे...हे काय विचारानं झालं का?? असं झालं तर आपण अगदी आसमान' वर पोहचून जाऊ...हो ना...!! होतं असं... माझ्यासोबत ही त्यावेळी तेच झालं...दोन वर्षांपासून माझं आणि अतुलचं 'आंधळी कोशिंबीर' खेळणं सुरू होतं...त्यात एकमेकांना दोन वर्षांपासून पाहिलं ही नव्हतं, आता त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळेल याची अपेक्षा होती...शेवटी आता मी आणि अतुल एवढ्या मोठ्या कालावधी नंतर एकमेकांच्या समोर येणार होतो...हळुवार उलगडणाऱ्या नात्यांची गुंतागुंत सोडवणं फार कठिण असतं...त्यात समोरचा आपल्याबद्दल काय विचार करत असेल, आपलं वागणं, आपलं बोलणं त्याला कसं वाटत असेल हे विचार सतत डोक्यात असतात आणि त्यात त्यांचं अव्यक्त राहणं मात्र आपल्याला ...Read More

5

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 5

पुढे... मानवी मन किती अतर्क्य आणि अजब आहे ना??? म्हणजे जर सगळं आपल्या मनाप्रमाणे होत असेल तर ठीक, नाहीतर जरी थोडी विसंगती आढळली तर मनाला वाटेल ते निष्कर्ष काढून मोकळा होतो...खूप वेळा तर असं होतं की, आपण जे डोळ्याने पाहतो, किंवा कानाने ऐकतो ते तसं नसतंच.. हकीकत वेगळीच असते.. पण तेच आहे ना, आपण ज्या नजरेने त्या गोष्टी कडे पाहणार आपल्याला समोरची गोष्ट तशीच दिसणार... अश्यावेळी कोणत्याही तर्क वितर्कावर न जाता स्पष्ट बोलून मोकळं व्हावं म्हणजे पुढचे गैरसमज टळतात... पण हेच नाही जमलं ना..मलाही आणि अतुललाही...आम्ही दोघेही फक्त लाटा येतील तसं वाहवत होतो पण थोडा विसावा घेऊन त्यावर विचार ...Read More

6

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 6

पुढे... प्रत्येकच गोष्ट लपवता येते का?? मनात दाबून ठेवता येते का?? माहीत नाही...पण ज्या खऱ्या भावना असतात त्या मात्र धोका देऊन चेहऱ्यावर त्यांचे रंग सोडूनच जातात...मग आपण कितीही प्रयत्न केले खोटं बोलण्याचे तरी ओठांची भाषा आणि डोळ्यांची भाषा जुळतच नाही...मनातले सगळे भाव डोळ्यांत उतरतात आणि मग डोळे मात्र शब्दांची साथ सोडतात...असंच काहीसं माझ्या आणि अतुलच्या बाबतीत होत होतं...जे चेहऱ्यावर झळकत होतं ते लपवण्याचा अतोनात प्रयत्न करत होतो आम्ही...आणि त्यातल्या त्यात मी तर सगळं काही मनात अगदी तळाशी गाडून ठेवण्याचा प्रयत्न करायची, कारण भीती वाटायची जर चुकून माझ्याकडून काही चुकीचं झालं किंवा चुकीचं बोलल्या गेलं अतुल समोर तर आमच्या मधात ...Read More

7

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 7

पुढे... आपण मैत्री कितीही लोकांशी वाटू शकतो,पण प्रेमात वाटा पडलेला नको असतो आपल्याला...म्हणजे कसं आहे ना, आपण प्रेमात असलो आपल्याला वाटतं, की त्या खास व्यक्तीने केवळ आपल्यालाच महत्त्व द्यावं... सतत आपल्याच आजूबाजूला असावं, त्याला केवळ आपलाच ध्यास असावा...आणि हे का वाटतं? कारण प्रेम आपल्या मनात संचारलेलं असतं..पण प्रेम समजून घेण्यासाठी ते केवळ मनात रुजवून चालत नाही तर त्याची समज ही असावी लागते...आणि ही समज केंव्हा येते?? जेंव्हा आपण आपल्या भावनांना वाट मोकळी करून देऊ तेंव्हा...कधी कधी भावना प्रकट करायला शब्दही अपुरे पडतात, तर कधी कधी ते बोलण्याचं धाडस होत नाही...आणि खूप वेळा तर आपण स्वतःच्या मनानेच काहीही गृहीत धरून ...Read More

8

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 8

पुढे... आपण सतत प्रेम शोधत असतो, पण प्रेमाला शोधण्याची आवश्यकता असते का??? अजिबात नाही... प्रेम शोधायचं नसतं तर प्रेम पारखायचं असतं...जर तुम्हाला प्रेम शोधायची गरज पडत असेल तर तुम्हाला कधी प्रेम झालंच नाही असं समजावं...सरळ चालत असताना अचानक एखाद्या वळणावर पाऊलं थांबावित आणि त्या वळणामुळे आपल्या गंतव्याची तमा न बाळगता प्रवासच बदलून जावा, असं असतं प्रेम...!! एकदम साधं सरळ आयुष्य जगत असताना मी कशी एवढी अतुल मध्ये गुंतली हे कळलंच नाही... काळानुसार हा गुंता एवढा वाढला की तो सोडवता येत नव्हता...आणि जेंव्हा तो सोडवता येत नाही तेंव्हा मात्र त्याला कापूनच त्यातून बाहेर पडू शकतो... त्यामुळे अतुलकडे जाणारे सगळे मार्ग ...Read More

9

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 9

पुढे... न बोलवता, न सूचित करता आपल्या आयुष्यात येऊन धडकणारं वादळ म्हणजे प्रेम...!! आणि त्यामुळेच या जगातलं सगळ्यांत कठीण आहे कोणावर प्रेम करणं...एकदा का प्रेम नावाच्या भावनेने आपल्या आयुष्यात प्रवेश केला तर ते आपल्याला सगळ्यांमध्ये असतांनाही, सगळ्यांपासून दूर करून ठेवतं....सगळे सुटून जातात पण प्रेम मात्र शेवटपर्यंत सोबत असतं, मग ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तो सोबत असो किंवा नसो...मी आणि अतुल एकमेकांसोबत तर राहिलोच नाही, पण एकमेकांपासून दूर जाण्याच्या हट्टाने मात्र सगळ्यांपासून लांब गेलो... चेतन...माझ्या आयुष्यातील सगळ्यांत खास मित्र, नेहमीच माझी साथ देणारा, माझ्या कठीण परिस्थितीत मला मानसिक आधार देणारा आणि अतुलचा जिवलग भाऊ...तो आमच्यामुळे आमच्यापासून दुरावला...आता विचार केला तर ...Read More

10

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 10

पुढे... प्रेम लपवता येत नाही म्हणतात... खरं आहे...पण काही वेळा प्रेम हे अलगद जपून ठेवल्या जातं, ते बोलून दाखवल्या नाही आणि मिरवल्याही जात नाही...ते प्रेम फक्त त्या दोन व्यक्तींनाच कळत असतं, तिसऱ्या कोणालाही त्याची फारशी कल्पना नसते...अबोल असतं पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते व्यक्त होतंच असतं...अशी ही नजरेची, स्पर्शाची, इशाऱ्यांची भाषा त्या दोन लोकांना कधी अवगत होऊन जाते हे त्यांनाही कळत नाही....असं प्रेम खूप विशेष असतं... अगदी खास..!!आणि सोप्प नाही हं प्रेमाची ही परिभाषा समजणं...त्यामुळेच तर मनोहर श्याम जोशी म्हणतात की प्रेमाचा आनंद प्रेमाच्या पिडेतून वेगळा करता येत नाही...जिथे आनंद अन पीडा सोबत नांदत असतात ते घर म्हणजे ...Read More

11

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 11

पुढे... आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच्यावर नाराज राहू शकतो, त्याचा राग करू शकतो, पण त्याचा तिरस्कार करू शकत राग, नाराजी आपण त्याच व्यक्तीवर करतो ज्याच्यावर आपण आपला हक्क समजतो.. आणि हक्क कोणावरही गाजवल्या जात नसतो ना...!! प्रेमात नकळत आपण त्या व्यक्तीला आपण मानून घेतो, त्यामुळे त्याच्यावरचा रागात किंवा नाराजीतही त्याच्यावरचं प्रेम सुतभरही कमी होत नाही.... प्रेमात राग म्हणजे कसं असते माहीत आहे का??? जसा एखाद्या गडद रंगाच्या कपड्याला आपण जितकं घासणार, जितकं धुणार त्यातून तेवढाच रंग बाहेर पडत जाणार...प्रेमाचंही तसंच आहे...जितके भांडणं होतील, एकमेकांवर नाराजी असेल तरी ते प्रेम वाढतंच जाणार...आजपर्यंत तरी माझं अतुलवरचं प्रेम कमी झालं नाहीये...मग ...Read More

12

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 12

पुढे... आपल्या प्रिय व्यक्तीने आपल्याशी न बोलणं हे किती जीवघेणं असतं याची प्रचिती मला येत होती...मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी वेळ शोधत होतो आणि जेंव्हा वेळ आली तेंव्हा मात्र भावनांची एवढी ओढाताण झाली की केवळ रागच व्यक्त झाला...मनाच्या चक्रव्यूहात अडकल्यावर खूप धडपड होतं असते प्रेम व्यक्त करण्यासाठी.. पण चक्रव्यूह ना ते...!! सहजासहजी त्यातून बाहेर कसं पडता येईल..?? आणि कॉलेजमध्ये उगाच चर्चेला उधाण येवू नये, मनीचे भाव जगाला उमजू नये यासाठी काही ठराविक वेळीच बोलण्याचं प्रयोजन करायचो आम्ही अणि त्यात ही अशी डोक्याला मारून घ्यायची वेळ यायची... "जीस दिन सोचते है, आज पुरी बात करेंगे, 'झगडा' भी कहता है, हम भी ...Read More

13

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 13

पुढे... किती अजब असतं ना पहिलं प्रेम..!! एका जादुई पण अनामिक नात्याची सुरुवात तर होते, पण त्याचा अंत कधीही नसतो नियतीने...हं, आता हे फार उशिराने कळतं, ही गोष्ट वेगळी...आणि तेही कळतं फक्त, वळत काही नाही...कोवळ्या वयात निर्माण झालेल्या भावना म्हणजे एक कोडंच...! हे जे पहिलं प्रेम असतं ना, ते ओठांवरती मंद मंद स्मित निर्माण करतं, पण खळखळून हसण्याची परवानगी यात नसते...पहिल्या पावसाआधी शीतल वारा वाहत असताना उन्हाची दाहकता जशी कमी होते तसंच पहिल्या प्रेमात होतं, पण जेंव्हा हा पाऊस धोधो कोसळत असतो तेंव्हा, कोणाला सांगून यात भिजण्याची परवानगी मागता येत नाही...गुपचूप त्या पाण्याचे थेंब अलगद खिडकीतून हात बाहेर काढून ...Read More

14

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 14

पुढे... कधी कधी नात्यातील ओलावा सुखद क्षणांना आत्मिक समाधान देऊन जातो. या ओलाव्यामुळेच जर गैरसमज होतही असतील तरी ते होतात, जास्त दिवस दुरावा राहत नाही....सहवासातून बहरणारं नातं चांगल्या गोष्टी घडवून आणल्यास अजून फुलतं. कोणावर प्रेम करताना आपल्याला सुख किंवा समाधान केंव्हा मिळतं?? हा प्रश्नही आपल्याला बऱ्याचदा पडतो. मला तरी वाटतं, आपल्यामुळे जवळच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आपल्याला सुखाच्या क्षणाची विलक्षण अनुभूती देऊन जातो. जेंव्हा स्टेशन वर मी अतुलच्या हातात हात दिला, मला जो आनंद झाला तो वेगळा पण त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटलं होतं ते मला माझ्या आनंदापेक्षाही मोठं होतं.... खरं तर प्रेमात खूप कमी क्षण येतात सुखाचे नशिबात ...Read More

15

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 15

पुढे... "कब कैसे ना जाने ये, कहाणी रुहानी हो गई। तुम मिले ऐसे मुझे की, जिंदगी सुहानी हो गई।" सगळ्यात मोठं सुख कोणतं असावं??? आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याची साथ..!! प्रेमाची सोबत मोठी सुखावणारी असते, असं म्हंटलं जातं. आपली प्रिय व्यक्ती भेटल्यावर एक अतीव आंनद होतो. त्या व्यक्तीशी हितगुज करताना आपण आपलं अस्तित्व विसरून जातो...कधी कधी हितगुज करायला शब्दही लागत नाहीत... थोडेसे ओझरते स्पर्श, हावभाव आणि डोळ्यांची भाषा ही पुरेशी असते संवाद साधायला...आणि हे फक्त प्रेमातंच घडू शकतं... आयुष्यात प्रेम नावाची गोष्ट अगदी चोर पावलांनी येते, काहीही चाहूल न करता, हळूहळू... पण आल्यानंतर मात्र आयुष्याचा चेहरा मोहराच बदलून ...Read More

16

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 16

पुढे... या जगात प्रत्येकाला प्रेमाचे पूर्ण रूप जपण्याचे भाग्य लाभत नाही, प्रत्येकाला ते प्रेम आयुष्यभर जगता ही येत नाही...काही जन्माला येतात, ते फक्त त्या प्रेमाचा संक्षेप अनुभवण्यासाठी...जसं की मी आणि अतुल...!! आपण सतत बोलत असतो की आयुष्याचा काही भरवसा नाही, कधीही काहीही होऊ शकतं; आयुष्य कितीही अनिश्चित असलं तरी आपण ते जगणं सोडत नाही... मग प्रेमाचंही तसंच असावं ना...जर आपण आयुष्याची साथ सोडत नाही तर छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेऊन प्रेमाला बगल का द्यायची..?? प्रेम आयुष्यात स्थिरता आणतं आणि त्या एका क्षणानंतर ते स्थैर्य आपल्याला टिकवून ठेवता आलं पाहिजे....आपल्या जीवनाप्रमाणे प्रेमही खूप असुरक्षित, अनिश्चित आहे. ते नकळत आपल्या जीवनात ...Read More

17

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 17

पुढे... "सब्र की आंच पर थोडा तपने दो इसे, इश्क है या वहम, सारे पर्दे हट जायेंगे।" मी बोलली ना...संयम ही प्रेमाची सगळ्यात कठीण पायरी आहे, आणि तीच पार करणं होतं नाही...पण कदाचित मी आणि अतुलने केली होती, कमीतकमी आम्हाला तरी असं वाटत होतं...खूप वेळा असं वाटतं की बोलून मोकळं व्हावं, मनात दाबून ठेवलेल्या भावनांना वाट मोकळी करून द्यावी, पण ते शक्य होत नाही; कारण त्यावेळी आपणच जाणत नसतो की नक्की ह्या भावना आहेत कोणत्या...आणि जोपर्यंत त्या भावनांना काय नाव द्यावं हे कळते तोपर्यंत खूप उशीर होऊन जातो, पण आता उशीर करायचा नव्हता मला.... मनाच्या गाभाऱ्यातून दिलेली साद त्या ...Read More

18

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 18

पुढे... "मंजिल पानेवाला हर कोई खुशनसीब नही होता, सफर गर प्यार का हो, तो उसका अंजाम नही होता।" प्रेमात कुठलेच कष्ट लागत नाही म्हणतात..खरंय की ते..!! आपण बेसावध असतो आणि प्रेम नावाचं वादळ आपल्याला येऊन धडकतं. वादळात तर कोणीही फसू शकतं, त्यातून सुखरूप बाहेर पडायला मात्र कस लागतो...पण या प्रेमाच्या वादळातून बाहेर पडताच येत नाही, उलट आपल्याला आपले पाय तिथे घट्ट रोवून आयुष्यभर त्याचा सामना करत राहावा लागतो... सतत.. अविरत...! काय बोलला होता चेतन त्यादिवशी?? अम्म्म...हं... आम्ही प्रेमाच्या समुद्रात बुडालो आहे... वेडा कुठला...!! पण काहीवेळा असा फिलॉसॉफी झाडतो की त्याचे शब्द विचार करायला भाग पाडतात... त्याचं आणि साक्षीचं प्रेम ...Read More

19

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 19

पुढे... "ये किसी नाम का नहीं होता, ये किसी धाम का नहीं होता। प्यार में जब तलक नहीं टूटे, किसी काम का नहीं होता।" किती तंतोतंत लिहिल्या आहेत ना अंजुम रेहबार यांनी या ओळी...!! सगळेच दुःख पचवून घेण्याची ताकत देवाने माणसाला दिली आहे, पण मन दुखल्यावर त्याचा ईलाज कसा करायचा याचं उत्तर जगात कुणाकडेच नाही...या जगात जितकं सोप्प प्रेमात पडणं आहे, तितकंच कठीण त्यातून निघणं... म्हणजे जवळजवळ अशक्यच...!! त्यामुळेच आपले वपु म्हणत असावे की जिवंतपणी मरण यातना भोगायाच्या असतील तर प्रेम करावं... आणि मी ते केलं...कोणावर प्रेम करणं म्हणजे त्याच्यावर मालकी हक्क आपण प्रस्थापित करत नाही, की जेणेकरून आपण ...Read More

20

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 20

पुढे... "कुछ किस्से कहाणीयां मिटाये नही जाते, कुछ लोग बिछड कर भी भुलाये नही जाते।" गैरसमजाच्या चक्रव्युव्हात नातं भरकटलं त्या नात्याचा प्रवास संपतो...आपल्या ढासळणाऱ्या भावनिक नात्याची बांधणी पुन्हा करण्यासाठी लागतो तो संवाद, आणि तोही वेळेवर...माझ्या हातून ती वेळ आणि ते नातं दोन्हीही निघून गेलं...उरली ती पोकळी...कधीही भरून न निघणारी... कोणाच्या जाण्याने आयुष्य संपत नाही किंवा थांबतही नाही पण ती एक खास व्यक्ती निघून गेली तर आयुष्य पूर्ण ही होत नाही...आपल्याला आवडणारी व्यक्ती अनपेक्षितपणे दूर जाण्यासारखं मोठं दु:ख नाही... मनाच्या हळव्या कोपऱ्यात त्या व्यक्तीला स्थान द्यावं; आणि नियतीच्या एका खेळीने ती जागा रिकामी करण्याची वेळ आली तर ते दुःख असहनिय ...Read More

21

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 21 (अंतिम)

पुढे... "ये कैसा सिलसिला है तेरे मेरे दरमियाँ फ़ासले बढते रहे पर मोहब्बत कम न हुई।" आपण खरंच प्रेमात किंवा आहे हे कसं ओळखायचं?? खरं तर ते प्रेम आहे हे कळायलाचं भरपूर वेळ जातो...अनेक चढउतार पाहावे लागतात, मोहाचे क्षण गाळून पाडावे लागतात, जेंव्हा सगळ्यांमध्ये असूनही दोन जीव विरक्त होऊन, त्यांच्यातल्या अंतराला न जुमानता मनाने एक होतात, तेंव्हा समजावं हे प्रेम आहे... अर्थातच यासाठी खूप वेळ आणि संयम लागतो...आणि मी अन अतुल अश्याच प्रकारच्या प्रेमात पडलो होतो..... आयुष्यात जीवन जगण्याचे क्षण अतिशय कमी येतात आणि ते जीवन नष्ट करून टाकावे ही वेळ पाऊलोपावली येते, पण त्या मरणाच्या क्षणानांही आपल्याला जीवनात ...Read More