श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा

(3)
  • 57k
  • 1
  • 28.9k

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा उर्फ विठ्ठल अर्थात विठू माऊली थोर आद्य समाज सेवक आहे. भगवंत विठ्ठलाने भक्त किंवा वारकरी यांच्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही. त्यांची जात पाहिली नाही. त्यांचा धर्म पाहिला नाही. त्यांचे रंग रूप पाहीले नाही. सगळ्यांना समान वागणूक दिली . त्यांना आपल्या चरणाशी त्याने घेतले. अनेकांना तर त्याने कित्येकदा मदत केली. त्यांना उराशी कवटाळून आधार दिला. वारकऱ्यांसोबत पंढरपूरला अनेक धारकरी सुद्धा विठ्ठल दर्शनाला येतात. शेतकरी येतात. लहान-थोर, गरीब-श्रीमंत सर्वजण विठ्ठलाचा आशीर्वाद घ्यायला दरवर्षी येतात. श्री भगवंत विठोबा माऊली सर्वधर्मसमभाव राखणारी आहे. श्री विठोबाने पुरुष आणि महिला असा कधीच भेदभाव केला नाही अथवा लहान मुले यांचा सुद्धा भेदभाव केला नाही. सगळ्यांना स्वतःच्या अंगाखांद्यावर बसवले. कुणावर कधीही शस्त्र चालवले नाही किंवा कुणाला कधी अस्त्र दाखवले नाही .त्याने युगे अठ्ठावीस आपले हात कटेवरी ठेवले. हात कटेवर ठेवून भक्तांना किंवा त्याच्या मदत मागायला आलेल्या लोकांना त्याने मदत केली .असा हा एकमेवाद्वितीय विठ्ठल मोठा थोर समाजसेवक आणि समाजसुधारक आहे. इथे विठ्ठल समाज सेवक होता हा शब्द न वापरता. समाज सुधारक आहे. हा शब्द वापरला आहे. याचे कारण तो अजूनही तशीच मदत सगळ्यांना करतो आहे. पंढरीच्या मंदिरातून. दीनदुबळ्या गरीब जनतेला. त्याच्या भक्तांच्या तो हाकेला धावून जात आहे.

Full Novel

1

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 1

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा उर्फ विठ्ठल अर्थात विठू माऊली थोर आद्य समाज सेवक आहे. भगवंत विठ्ठलाने भक्त वारकरी यांच्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही. त्यांची जात पाहिली नाही. त्यांचा धर्म पाहिला नाही. त्यांचे रंग रूप पाहीले नाही. सगळ्यांना समान वागणूक दिली . त्यांना आपल्या चरणाशी त्याने घेतले. अनेकांना तर त्याने कित्येकदा मदत केली. त्यांना उराशी कवटाळून आधार दिला. वारकऱ्यांसोबत पंढरपूरला अनेक धारकरी सुद्धा विठ्ठल दर्शनाला येतात. शेतकरी येतात. लहान-थोर, गरीब-श्रीमंत सर्वजण विठ्ठलाचा आशीर् ...Read More

2

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 2

साधुसंत वाट्याला आलेल्या आयुष्याबद्दल कधी नाराजी करत नाहीत. त्यांना मिळालेले जीवन दयाळू विठ्ठलाची कृपा आहे अशी त्यांची धारणा स्वतःची प्रत्येक कृती ही विठ्ठलाच्या रूपाने होत असते ती अशी साधुसंतांची दृढ श्रद्धा असते. जे आपल्याला मिळाले त्यात आपण समाधानी असावे. दुःखी गोष्टीचे बाऊ करत बसू नये .आयुष्यातील आनंदसुख हेच सत्य आहे असे समजावे ही शिकवण श्री विठ्ठलाने संत साधुसंतांच्या मार्फत समाजांमध्ये दिली. संत तुकारामांचे आजोबा कन्हैया होते. त्यांचे वडील बोल्होबा होते. संत तुकारामाचा पिंड व्यापाऱ्याचा नव्हता. तर विठ्ठल भक्तीचा होता. हा त्यांचा स्वभाव होता. नामाचे स्मरण ही त्यांची सेवा होती. संत तुकारामांचे स्वतःचे दुकान होते. ते स्वतः दुकान ...Read More

3

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 3

ज्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या .ज्यांनी पांडुरंगाचे सम चरण पाहिले .त्या मनुष्याला अनंत तीर्थ केल्याचे पुण्य लाभते. अशी धारणा विठ्ठलभक्त मनात निर्माण झाली. श्री विठ्ठलाला फक्त दही दुध भाताचा साधा नैवेद्य चालतो. त्याला पेढे नकोत. त्याला मोठमोठ्या मिठाया नकोत. गळ्यामध्ये सोन्याचा हार नको. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली की विठ्ठल प्रसन्न झाला . असा सोपा विठ्ठल खेडूत लोकांच्या आवडीचा आहे. शेख महंमद इस्लाम धर्मीय होता. विठोबाच्या भक्तीमुळे तो मराठी संत वाड्मयात अमर झाला. सजन कसाई फकीर सुद्धा विठ्ठलाचे भजन गाऊ लागला. शेख महंमद वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करीत होता. तो सुफी पंथाशी संबंधित होता. शेख मोहम्मद यांचे गुरु ...Read More

4

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 4

विठ्ठल लोकदेव देव आहे. तो लोकांचा देव आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचा पंढरपूर आहे. त्या कारणाने कर्नाटक मधली भक्त मंडळी सुद्धा येतात. त्यामुळेच म्हटले जाते कानडा विठ्ठल माझा. पुंडलिक मातृ-पितृ भक्त असण्याच्या आधी भक्त पुंडलिक स्वतःच्या पत्नीची सेवा करायचा. तिला त्रास होईल असे काही करायचा नाही. तो आई-वडिलांना रागवायचा. माझ्या पत्नीला काही कामे सांगायचे नाहीत. तिला आरामात ठेवायचे. असा दम तो स्वतःच्या आईवडिलांना द्यायचा... पंढरपूरच्या यात्रेला निघताना त्याने स्वतःच्या बायकोला खांद्यावर घेतले होते आणि आई-वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना मागून खेचत तो पुढे निघाला. ते दृश्य बघून लोकं त्याला हसत. परंतु त्याची त्याला जराही लाजलज्जा वाटली नाही... त्याच्या खांद्यावर ...Read More

5

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 5

संत कबीरां प्रमाणे इस्लामी संत शेख महंमद सुद्धा विठ्ठलाचे भक्त होते. हे मागे सांगितले आहे. शेख महंमद यांचे ऐकण्यासारखे आहे. देवावरी कां रुसावे। देव ठेवील तैसे रहावे।। १।। कोणी दिवशी खावी तूपसाखर । कोणे दिवशी मिठासंगे भाकर। खाऊन पिऊन बसावे।शेख महंमद म्हणे रे बापा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।। विठोबा माऊलीला भाषेचे, धर्माचे, जातीचे, सीमेचे कसलेही वावडे नव्हते . विठू माऊली सर्वांना समान मानते. सारी लेकुरे विठ्ठलाची पोरे. विठ्ठलाची शिकवण थोर वैचारीक होती . संत मीराबाईची श्रीकृष्णावर खूपच भक्ती होती. ती त्याला म्हणायची मी तुमची चाकरी करन. तुम्ही मला आपली दासी म्हणून ठेवा. तुमच्या बागेची मी काळजी घेईन. सकाळी ...Read More

6

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 6

सत्संग शक्ती समाजाचा आत्मा आहे. समाजाची प्रगती समाजाची विकास समाजाची स्थिती हे सर्व संतमंडळी वर अवलंबून असते. संतांचा केल्याशिवाय आत्मानंद मिळणे शक्य नसते. संतांच्या आचरणाने निर्भेळ आनंदाचा समाज आस्वाद घेतो. भागवत धर्माच्या म्हणजे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत असलेल्या पांडुरंग किंवा श्री विठ्ठल सर्वांना एकत्र करून मार्गदर्शन करतो. संत, भक्त, विठ्ठल नामाचे नामस्मरण करून भजन ,पूजन ,कीर्तन ,प्रवचन करून त्याची प्रार्थना करतात . त्याला मनापासून सामुहिकपणे आळवतात . संत सेना महाराज हे बांधवगडचे होते .बांधवगड मध्य प्रदेशामध्ये आहे. तिथल्या एका किल्ल्यावर सेना महाराजांचे वडील नोकरी करीत. वडील देविदास आणि आई प्रेम कुंवर बाई होती. सेना महाराजांचे गुरू आचार्य रामानंद ...Read More

7

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 7 - अंतिम भाग

लोकं अनेक प्रकारच्या निंदा करतात. नावे ठेवतात. अशी लोकं समाज बिघडवण्याचे कार्य करतात. अशा लोकांमध्ये राहून सेवेचे कार्य करण्यासाठी श्री विठ्ठल कृपेने अनेक लोकांची योजना विठ्ठल कृपेने तिकडे झाली. समाज, मनुष्य आणि जीवन यांची सांगड घातली गेली. विठ्ठलाच्या कीर्तनाचा आणि प्रवचनाचा आश्रय घेऊन अनेक लोकांनी आपली मुक्ती घडवली .मोक्ष घडवला. त्यांच्यामध्ये भेदभाव राहिला नाही. नुसते विठोबाचे कीर्तन ऐकले तरी त्यांच्या डोळ्यासमोर साक्षात विठोबा येऊन उभा राहतो.विठ्ठल कीर्तनाच्या आठवणी त्यांच्या मनात येतात. त्यांच्या मनात दुसऱ्या कसल्याही विचार आस्था निर्माण होत नाही. विठ्ठलमूर्ती त्यांच्या मनामध्ये स्थिर राहते . त्या कारणाने अनेक लोकं गळ्यात तुळशीच्या माळा घालून विठ्ठल विठ्ठल असा ...Read More