शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते..

(16)
  • 88.6k
  • 11
  • 41.2k

परमपूज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना शिकवले होते. त्यांना प्रशिक्षित केले होते .त्याच प्रमाणे छत्रपती राजाराम महाराज हे त्यांचे दुसरे पुत्र होते .त्यांनाही त्यांनी शिकवले. प्रशिक्षित केले. छत्रपती शिवाजी राजांनी अख्ख्या महाराष्ट्राला लढायला शिकवले.... स्वराज्यवाद ,राष्ट्रवाद यांची शिकवण त्यांनी दिली. राष्ट्रवादाचे प्रशिक्षण त्यांनी घडवलेल्या इतिहासातून दिले. ज्वलंत राष्ट्रप्रेम कसे असते. याची शाळाच त्यांनी जणू स्वराज्यामध्ये भरवली होती. त्यातून निरनिराळे मावळे विद्यार्थीरत्न रूपाने

Full Novel

1

शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग १

राजे स्वतः प्रशिक्षक आणि शिक्षक बनले... शिवाजी राजांच्या जीवनाचा हा आणखी एक नवा पैलू जसा दिसला तसा वाचकांसाठी मांडण्याचा प्रयत्न केला. एक जून रोजी शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक केला. त्याचे औचित्य साधून सदर लिखाण पूर्ण करण्याचा योग आला. यात खूप समाधान वाटले... ....शिवाजीराजांच्या या पराक्रमाला माझ्यासारख्या विद्यार्थी पामराचा मानाचा मुजरा..... लेखक: ( C ) चंद्रकांत पवार चंद्रेय शिवराज्याभिषेक सोहळा दिन... १ जून. २०२१. संपर्क: ७४००२१७२१५. ...Read More

2

शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग २

असे म्हटले जाते की समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहून सांगितले होते . महाराज मी तुमच्या स्वराज्या आलेलो आहे. आपण माझी उत्तम व्यवस्था करण्यास आपल्या माणसांना सांगावे. मात्र ही एकदम वेगळी गोष्ट आहे. शिवाजी महाराज हे उत्तम प्रशिक्षक आणि शिक्षक होते .याचा मोठा दाखला म्हणजे हिरकणीचा प्रसंग. हिरकणी नावाची गवळण गडावर दूध विकायला आली होती .दूध विकताना तिला वेळेचे भान राहिले नाही . संध्याकाळच्या समयी गडाचे दरवाजे बंद झाले. तिला सत्वर घरी जायचे होते. तिने गडाचा दरवाजा बंद करणाऱ्याला विचारून पाहिले . दादा गडाखाली मला सोडा . गडाच्या खाली मला जायचे आहे. माझ्या घरी माझे लहान बाळ आहे. ...Read More

3

शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ३

याच्या उलट एक घटना शिवाजीराजांच्या नातलगा बाबत घडली. शिवाजीराजांचे नातलग बजाजी निंबाळकर होते. बजाजी निंबाळकर हे सईबाईचे सख्खे भाऊ . शिवाजी महाराजांचे सख्खे मेहुणे होते. महाराणी सईबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या..... मात्र बजाजी निंबाळकर हे हिंदू नव्हते. ते मुसलमान होते. जन्माने नाही. जबरदस्तीने झालेले मुसलमान. बजाजी निंबाळकर यांचे धर्मांतर झाले होते. त्यामुळे त्यांच्या घराण्याला कलंक लागला होता. तो कलंक काढण्याचे काम शिवाजी महाराजांनी ठरवले . त्या मध्ये सुद्धा एक प्रकारची कला राजांनी वापरली होती. दुसऱ्यांचे मन वळवणे.... जिजाबाई महाराजांचे मन वळवणे आणि त्यांची परवानगी घेणे. बजाजीचे शुद्धीकरण करायचे आहे ही गोष्ट फक्त राजांनी आधी स्वतःजवळ गुप्त ठेवली होती. त्या ...Read More

4

शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ४

छत्रपती शिवाजी महाराज शिक्षकांप्रमाणे एक उत्तम प्रशिक्षक होते. यात जराही संदेह नव्हता.त्यांनी असंख्य मावळे आपल्या हाताखाली तयार केले स्वराज्याची शिस्त सैन्यामध्ये वापरून त्यांनी गनिमी कावा हा अद्भुत प्रकार आणून स्वतःच्या मावळ्यांचे मानसिक बळ वाढवले होते. गनिमीकावा हा एक अद्भुत प्रकार होता . गनिमी काव्याच्या सहाय्याने कोणत्याही लढाईला गेल्यास आपणच जिंकणार अशी भावना त्या मावळ्यांमध्ये तयार होत होती . दिवसेंदिवस हीच भावना अधिकाधिक दृढ होत होती. त्यामुळेच स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यास गनिमी कावा एक प्रचंड महाशक्ती बनली होती. स्वतः शिवाजी महाराज हे उत्तम प्रशिक्षक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मावळ्यांमध्ये उत्तम शिस्त निर्माण केली होती. ती शिस्त होती स्वराज्याची... स्वतःच्या मावळ्यां साठी ...Read More

5

शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ५

राज्याभिषेक सोहळ्याला जो खर्च झाला होता.तो जवळजवळ एक कोटी होन इतका होता. एक कोटी होनचे सध्याचे भारतीय रुपयात चलन एकहजार साडेआठशे कोटी रुपये. त्यामध्ये सगळा खर्च आला. अगदी संभाजीराजांनी कलावंतीणीना दिलेली देणगी सुध्दा धरली गेली होती. संभाजीराजांना कलावंतीनीचे नृत्य पहाण्याचा नाद जडला होता. त्या कलावंतीणींला संभाजी राजे राज्याभिषेकाच्या वेळी विसरले नाहीत. त्यांनी त्यांना बिदागी देऊन त्यांची योग्य प्रकारे रवानगी केली. राजे एक कोटी होन खर्चाबद्दल विचार करून एक दिवस सर्वांना म्हणाले . दिलेरखा ...Read More

6

शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ६

शिवाजी महाराज अध्यात्मिक वृत्तीचे होते. अध्यात्माचे अधिष्ठान त्यांच्या राज्यात महाराष्ट्रात स्थिरस्थावर झाले होते. तरीसुद्धा परकीयाकडून मंदिरे लुटली जात होती पाडली जात होती. पूजा बंदी होती .उत्सव बंदी होती .अशा अनेक घटना या काळात घडत होत्या त्याचा शिवाजीमहाराजांच्या मनावर खूपच परिणाम होत होता. स्वराज्याचे परकीय शत्रू म्हणजे इराणी, पठाण , मुस्लिम , इंग्रज होते. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात प्रवेश करणाऱ्या मावळ्यांच्या रूपात पक्के गुप्तहेर खाते तयार केले होते. याचा अर्थ औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांचे असंख्य गुप्तहेर होते. त्यामुळे तिकडची माहिती इकडे महाराष्ट्रात लगेच कळत होती. राजांनी सैनिकांमध्ये, मावळ्यामध्ये समानतेचे तत्व ठेवले होते. त्यांच्याशी जिवाभावाची मैत्री निर्माण केली होती. त्यामुळे एकोपा वाढायला ...Read More

7

शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ७ - अंतिम भाग

शिवाजी महाराज स्वतः औरंगजेबा सोबत लढाई करायला उत्साहीत झाले होते... त्यांनी सर्वांना आदेश दिले. सर्व सरदारांना दक्ष राहायला सांगितले. दक्षिणेकडे येतो आहे मोठी संधी आहे. औरंगजेबाचा खातमा करून त्याला महाराष्ट्रातच गाडायचा आहे. असा संदेश त्यांनी त्यासोबत पोहोचला होता. मावळ्यांच्या अंगात सुद्धा विरश्री संचारली होती. शिवाजी महाराजांसोबत असलेले मावळे आता वयस्कर झाले होते .त्यासोबत शिवाजी महाराजांचे वय सुद्धा वाढले होते शिवाजी महाराज सुद्धा वयस्कर झाले होते. मात्र त्यांचे लढण्यासाठी मनगट अजूनह ...Read More