श्री सुक्त.

(13)
  • 111k
  • 2
  • 25.9k

श्री सुक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसेच घरात अखंड लक्ष्मी टिकावी यासाठी श्री सुक्त म्हणतात.श्री सुक्त म्हणत असतांना त्याचा अर्थ माहीत असल्यास.म्हणतांना मनाची एकाग्रता होते.त्याची फलप्राप्ती होते.बऱ्याच जणांना श्री सुक्ताचा अर्थ माहीत असेल पण ज्यांना अर्थ माहीत नाही त्यांच्या करिता रोज एका ऋचाचा अर्थ देत आहे. "श्री सुक्त" हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् | चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ||१|| अर्थ:-- हे जातवेद म्हणजे विशिष्ट संस्कारांनी आवाहित केलेल्या अग्ने,त्वम-तू,हिरण्यवर्णाम:सोन्याप्रमाणे चमकणारे जिचे रूप आहे,'हरिणीं या शब्दाचा अर्थ चैतन्याच्या आल्हादक प्रभेने सुवर्णाप्रमाणे एक प्रकारचा जिवंत पणा आला आहे"चैतन्याच्या रसरशीत तेजाने बाहेरची सुवर्णकांती जिची द्विगुणित झाली आहे अशा लक्ष्मीला, सुवर्णरजतस्रजाम:-सोने,चांदी यांची स्रक म्हणजे माला

Full Novel

1

श्री सुक्त - 1 - अर्थासह

श्री सुक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसेच घरात अखंड लक्ष्मी टिकावी यासाठी श्री सुक्त म्हणतात.श्री सुक्त म्हणत असतांना त्याचा अर्थ माहीत मनाची एकाग्रता होते.त्याची फलप्राप्ती होते.बऱ्याच जणांना श्री सुक्ताचा अर्थ माहीत असेल पण ज्यांना अर्थ माहीत नाही त्यांच्या करिता रोज एका ऋचाचा अर्थ देत आहे. "श्री सुक्त" हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् | चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ||१|| अर्थ:-- हे जातवेद म्हणजे विशिष्ट संस्कारांनी आवाहित केलेल्या अग्ने,त्वम-तू,हिरण्यवर्णाम:सोन्याप्रमाणे चमकणारे जिचे रूप आहे,'हरिणीं या शब्दाचा अर्थ चैतन्याच्या आल्हादक प्रभेने सुवर्णाप्रमाणे एक प्रकारचा जिवंत पणा आला आहे"चैतन्याच्या रसरशीत तेजाने बाहेरची सुवर्णकांती जिची द्विगुणित झाली आहे अशा लक्ष्मीला, सुवर्णरजतस्रजाम:-सोने,चांदी यांची स्रक म्हणजे माला ...Read More

2

श्री सुक्त - 2 - ऋचा ६ ते 10

"श्रीसूक्त" "ऋचा ६" तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्वः | तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ||६|| अर्थ:--हे आदित्यर्णे,बालसुर्याप्रमाणे किंचिदारक्त वर्ण आहे जिचा,जिचे मुखमण्डल अरुण वर्णाने शोभत आहे अशा, हे लक्ष्मी! तव-तुझ्या ,तापसोधिजात:-तुझ्या उग्र तापश्चर्येमुळेच,बिल्बवृक्ष नावाची वनस्पती निर्माण झाली,बिल्ब वृक्षाला वनस्पती असे म्हंटले कारण हा केवळ फळे देणारा वृक्ष आहे म्हणून निव्वळ फळे देणाऱ्या वृक्षाला वनस्पती ही संज्ञा आहे"अपुष्पा:फलवंतो ये ते वनस्पतय: स्मृता"तास्य म्हणजे त्या बिल्ब वृक्षाची फलानी,परिपक्व फले,आंतरा:बाह्या म्हणजे अंतर आणि बाह्य आशा उभय विध इंद्रिया कडून घडून येणारे,अज्ञान कार्य आणि पातके (दारिद्र) नुदान्तु -तुझ्या कृपेने नाहीसे होवोत. शंकराच्या आराधानेसाठी विष्णूला ज्या वेळी बिल्बदळे कमी पडू लागली त्या वेळी लक्ष्मीने ...Read More

3

श्री सुक्त - 3 - ऋचा। ११ ते १५

"ऋचा११" कर्दमेनप्रजाभूता मयिसम्भवकर्दम | श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ||११||> अर्थ:--आप-,जल,जलाभिमानी देवता असा या ठिकाणी अभिप्रेत आहे. हे जलदेवतांनो,तुमच्या कडून नेहमी स्निग्ध,स्नेहयुक्त अशीच कार्ये, सृजन्तु-- निर्माण होवोत.तुम्ही नेहमी स्नेहयुक्त अशीच कार्ये करा असा आशय. हे चिक्लीत! हाही कर्दमाप्रमाणेच लक्ष्मीचा आणखी एक पुत्र आहे.हे चीक्लीत नावाच्या श्री पुत्रा, मे-माझ्या गृही-घरी,वस च- राहा आणि मातरम, श्रीयम--तुझी माता लक्ष्मी हिला, मे कुले:-माझ्या कुलांत, निवासय:-राहण्यास सांग.कर्दम,तू आणि लक्ष्मी ही सर्व माझ्या घरी निरंतर राहोत.हा आशय. जलांना उद्देशून या मंत्रात प्रार्थना केली आहे,मोठी रहस्य पूर्ण आहे. पाणी ज्या विशिष्ट शक्ती मूळे निर्माण होते ती शक्तीच जलाची अधिष्टात्री देवता मानली आहे. या ...Read More

4

श्री सुक्त - 4 - फलश्रुती

"श्रीसुक्त" "फलश्रुती"पद्मानने पद्मऊरू पद्मसम्भवे | तन्मेभजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् ।।१।।अर्थ:-हे कमलनायने,कमल वदने,कमलस्वरूप,कमलावर बसलेल्या लक्ष्मी माते,मला ऐश्वर्य,सुख दे.अश्वदायै गोदायै धनदायै महाधने | धनं मे लभतां देवि सर्वकामांश्च देहि मे ।।२।।"अर्थ:- तू मला,गजधन,अश्वधन,गोधन,संपत्ती,असे विविध प्रकारचे ऐश्वर्य प्रदान कर,आणिमाझे मनोरथ पूर्ण कर.पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि | विश्वप्रिये विष्णु्मनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधत्स्व ।।३।।अर्थ:-हे महालक्ष्मी, तू कमलासना,कमल नेत्री असून,या जगतावर तुझी माया आहे.तुझी चरण कमले मी भक्ती भावाने पूजीन.पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरथम् | प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे ।।४।।अर्थ:-हे जगन्माते,तू माझ्या वंशात,मुले,नातवंडे,धन,अन्न, हत्ती,घोडे रथ इत्यादीविपुल वैभव देऊन सुखी कर व मलाभरपूर आयुष्य दे.धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो ...Read More