एक रहस्य आणखी

(71)
  • 85.2k
  • 21
  • 43.7k

रेवती रक्ताळल्या डोळ्यांनी समोर येत होती... हातात असलेला धारदार चाकू विजेसारखा लख्ख चमकू लागला होता...रोहनच्या कानात कुठूनतरी जोरदार नगाड्यांचा आवाज घुमत होता..वाऱ्यांचा सन.. सन आवाजही आता त्याला स्पष्ट ऐकू येत होता जणू तो काही सांगत आहे असेच त्याला भासत होते.. मृत्त्यू त्याच्या काही पावलांवरच येऊन ठेपला आहे हे त्याला कळून चुकले होते. अचानक रेड्यांचा कर्कश आवाज त्याच्या कानी पडला जणू काही यमराज अगदी जवळ आले आहे असे त्याला वाटू लागले. रेवती अगदी दोन पावलांवरच येऊन उभी राहिली होती. विजेसारखा धारदार चाकू त्याला मारण्यासाठी वर उचलला गेला.. रोहनने डोळे मिटून "देवा या संकातूनही वाचव रे" असे म्हणून देवाचा धावा सुरु केला आणि क्षणार्धांतच काही महिन्याचे कालचक्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले.

Full Novel

1

एक रहस्य आणखी.. - भाग 1

रेवती रक्ताळल्या डोळ्यांनी समोर येत होती... हातात असलेला धारदार चाकू विजेसारखा लख्ख चमकू लागला होता...रोहनच्या कानात कुठूनतरी जोरदार नगाड्यांचा घुमत होता..वाऱ्यांचा सन.. सन आवाजही आता त्याला स्पष्ट ऐकू येत होता जणू तो काही सांगत आहे असेच त्याला भासत होते.. मृत्त्यू त्याच्या काही पावलांवरच येऊन ठेपला आहे हे त्याला कळून चुकले होते. अचानक रेड्यांचा कर्कश आवाज त्याच्या कानी पडला जणू काही यमराज अगदी जवळ आले आहे असे त्याला वाटू लागले. रेवती अगदी दोन पावलांवरच येऊन उभी राहिली होती. विजेसारखा धारदार चाकू त्याला मारण्यासाठी वर उचलला गेला.. रोहनने डोळे मिटून "देवा या संकातूनही वाचव रे" असे म्हणून देवाचा धावा सुरु केला ...Read More

2

एक रहस्य आणखी... - भाग 2

भाग 1 वरून पुढे "काय म्हणजे तू नक्की काय पाहिलंय? " रेवती म्हणाली. काल रात्री जेव्हा मी झोपलो होतो तेव्हा साधारणतः 2 वाजता अचानक कुणीतरी माझ्या अंगावरून चादर जोरात ओढून फेकून दिली. मी परत अंगावर घेतली तर परत कोणीतरी ती जोरात ओढून फेकून दिली. अचानक पलंगाखालून दोन हात आले आणि माझा गळा दाबायला सुरवात केली. जिवाच्या आकांताने मी ते हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि उठून बसलो. थोडं पाणी प्यावं म्हणून रूममधील बॉटल कडे पहिले तर लक्षात आलं कि बॉटल तर पूर्णपणे रिकामी आहे. रूममध्ये फक्त फॅनचा घर..घर.. आवाज होता. त्याच्या सोबतीला घडाळ्यातील टिक.. टिक आवाजही मला स्पष्ट जाणवत ...Read More

3

एक रहस्य आणखी... - भाग 3

भाग 2 वरून पुढे क्षणातच तिची शुद्ध हरपली आणि ती बेशुद्ध झाली. तिच्या चेहऱ्याला आणि तोंडाला माखले होते. ती बेशुद्ध जरी असली तरीही तिच्या चेहऱ्यावर असणारी निरागसता केव्हाच मावळली होती. एक भयाण असुरता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. रोहनला काय करावे हे समजतच नव्हते त्याच्या सर्व दुःखाला आणि भावनेला अश्रू वाट मोकळी करून देत होते. लगेचच त्याने अश्रू पुसले आणि मोबाईल वर एक नंबर डायल केला " हॅलो.. बोल रोहन एवढ्या रात्री का फोन केलायस? " " अरे अमित तू आत्ता माझ्या घरी ये यार खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ". " का? चोरी बिरी झाली आहे का? " " ...Read More

4

एक रहस्य आणखी... - भाग 4

एक रहस्य आणखी.... भाग 4 रोहन रुद्रदमणचा पत्ता घेऊन आपल्या मिणमिणत्या नेत्रात शेवटची आशा म्हणून रुद्रदमणच्या घरी पोहचतो .रुद्रमणचे अगदी जुनाट वाड्यासारखे होते. घराच्या प्रवेशद्वारावर तुळशीचे वृंदावन त्याची शोभा वाढवत होते . घरात गुलाब आणी मोगरा पुष्पे सुंगधाचा गारवा देत होते. बाजूलाच गोमाता रवंथ करीत बसली होती. एका छोटूस्या आणी टुमुकदार ओट्यावर रोहन रुद्रमणची वाट पाहत उभा होता. एवढ्यात ओम शिवोहंम ...ओम शिवोहंम रुद्रनामम ...भजेहम .. काल त्रिकाल, नेथ्र त्रीनेथ्र, सुल त्रिशूल गाथ्रम सत्य प्रवावं, दीव्य प्रकाश मंत्र स्वरूप मात्रम निश प्रपाधी, निष्ठ लँकोहम ...Read More

5

एक रहस्य आणखी... - भाग 5 - (शेवट )

एक रहस्य आणखी..... भाग 5 (शेवट ) भाग 4 वरून पुढे " कर रोहन पण यापुढे मी तुझी मदत नाही करू शकणार " रुद्रदमण म्हणाला. "पण का? काय कारण आहे? " रोहनच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह होत " सध्या तरी मला तुम्हाला काहीही सांगायची मनस्थिती नाही . तुम्ही सर्व जाऊ शकता " रुद्रदमण म्हणाला. दुसऱ्या दिवशी सर्वजण रोहनच्या घरी विचारविनिमय करायला जमतात. सर्वांच्या चेहऱ्यावर काळजीचे मेघ जमले होते आणि "रुद्रदमणला नक्की झालंय तरी काय? " हा एकच प्रश्न सर्वांच्या तोंडात रेंगाळत होता. रोहन रुद्रदमणला फोन करून शेवटचं भेटायला त्याच्या घरी बोलावतो.रुद्रदमण नुकतीच पूजा ...Read More