अष्मांड

(12)
  • 36.3k
  • 2
  • 14.5k

मध्यरात्र उलटून गेली तरी शंकर अजून झोपला नव्हता. खाटेवर उताणा पडून आकाशाकडे एकटक पाहत तो आपल्याच विचारात गुंग होता. आकाशात सर्वत्र पौर्णिमेचे चांदणं विखुरलेलं होतं. वाऱ्याची एक मंद झुळूक वातावरण उल्हसीत करत होती. प्रत्येक झुळूक हवेतला गारवा आणखीनच वाढवत होती. नेहमी उकाड्याने हैराण करणारी रात्र आज मात्र मनमोहक सौंदर्याने नटली होती. पण शंकर ते सौंदर्य अनुभवण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हता. किंबहुना वातावरणातला बदल त्याच्या लक्षातसुद्धा आला नव्हता.

New Episodes : : Every Wednesday

1

अष्मांड - भाग १

मध्यरात्र उलटून गेली तरी शंकर अजून झोपला नव्हता. खाटेवर उताणा पडून आकाशाकडे एकटक पाहत तो आपल्याच विचारात गुंग होता. सर्वत्र पौर्णिमेचे चांदणं विखुरलेलं होतं. वाऱ्याची एक मंद झुळूक वातावरण उल्हसीत करत होती. प्रत्येक झुळूक हवेतला गारवा आणखीनच वाढवत होती. नेहमी उकाड्याने हैराण करणारी रात्र आज मात्र मनमोहक सौंदर्याने नटली होती. पण शंकर ते सौंदर्य अनुभवण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हता. किंबहुना वातावरणातला बदल त्याच्या लक्षातसुद्धा आला नव्हता. आजूबाजूचा परिसर त्या मनमोहक गारव्यात चिंब न्हात असताना शंकरच्या डोक्यात मात्र विचारांचा भडका उडाला होता. ...Read More

2

अष्मांड - भाग २

मोहन नुकताच शाळेतून घरी आला होता. हात पाय धुता धुता त्याने बापाला विचारले, " आज नाही गेलात तुम्ही?" मान न करताच शंकर फक्त "हं " म्हणाला. कसल्यातरी जुनाट लालसर कागदात, जो कधी काली पांढरा असावा, त्यात डोकं खुपसून तो बसला होता. "कसलं खुळ लागलयं कुणास ठाऊक ? दुपारपासनं त्यात डोकं घालून बसलेत." शांता वैतागुन बडबडत होती. नेहमी कामावर जाणारा माणूस आज घरीच बसला त्यामुळे आजचा रोजगार बुडाला, तेवढेच शे - दोनशे रुपये रोजचे मिळतात तर आज ते पण नाही. शंकरकडं त्याच्या वडिलोपार्जित एक नाव होती. तिच्यावरच तो आणखी दोन साथीदारांसोबत मासेमारी करत. पण तीही ...Read More

3

अष्मांड - भाग ३

धक्क्यावर बरीच गर्दी होती. अनेक लोक इकडून तिकडे घाई घाईत जात होते. काही आपली नाव पाण्यात उतरवायची तयारी करत तर काहीजण नुसतेच उभे होते. त्यापैकीच एकाकडे जात शंकरने राम राम केला. त्यानेही किंचित हसून शंकरला प्रत्युत्तर दिले. आणि दोघांमध्ये काहीतरी बोलणं सुरु झालं. त्यांच्या बोलण्यात मोहनला काहीच रस नव्हता. त्याने आपली नजर पुन्हा समुद्र किनाऱ्यावर वळवली. मगाशी पाहिलेले चित्र अजूनही तसेच होते. गडबड गोंधळ, इकडून तिकडे जाणारी माणसं, मोटारींचा आवाज करत खोल समुद्रात मासेमारीसाठी निघालेल्या मोठ्या बोटी आणि त्यांच्या मागोमाग पाण्यात उतरणाऱ्या लहान लहान होड्या. "फट्ट फट्ट फट्ट" अचानक शेजारून येणाऱ्या आवाजाने तो दचकला. शंकर त्या ...Read More

4

अष्मांड - भाग ४

घरी गेल्या गेल्या महादुने बायकोच्या हातात तो गोफ ठेवला आणि घडलेली हकीकत सांगितली. ते ऐकून आश्चर्याने तिच्या चेहऱ्याचा रंगच पण तिला हि गोष्ट आवडली नाही. देवीच्या मंदिरातला दागिना असा उचलून आणायला नको होता असं तिला वाटत होतं. उगाच देवीचा कोप वैगेरे व्हायचा. पण महादुने आपल्या देवभोळ्या पत्नीकडे दुर्लक्ष करत तो हिरा आणि गोफ घरातच ठेवला. पुढे आठवडाभराने शहरात जाऊन त्याने दोन्ही सोन्याचे गोफ सराफाकडे विकून टाकले. एकदम एवढं सोनं पाहून कुणाला शंका येऊ नये म्हणून त्याने प्रत्येक गोफेचे ३-४ तुकडे केले. आणि प्रत्येक तुकडा वेगळ्या सराफाला विकला. हिरा विकणं मात्र जरा जिकीरीचंच होतं. "एवढा मौल्यवान हिरा तुझ्याकडे कुठून आला?" या प्रश्नाचं कोणतंही समाधानकारक उत्तर त्याच्याकडे ...Read More

5

अष्मांड - भाग ५

रात्री ते चौघेजण नावेतून बेटावर पोहोचले. झपाझपा पावले टाकत त्यांनी मंदिर गाठले. आणि कुदळ फावड्याने आसपासची जमीन उकरू लागले. वेळ उकरल्यानंतरही खजिन्याचा काहीच मागमूस दिसेना. "सोनं सापडलं ही गोष्ट तर खरी आहे मग खजिनाही असलाच पाहिजे...... पण त्याचं दार कुठं असल ?" याच विचारांनी त्यांनी एकूण एक ठिकाणी उकरून पहिले. अगदी मंदिराची भिंतही फोडून टाकली. शेवटी एकाने शक्कल लढवली. 'कदाचित मूर्तीच्या चौथऱ्याखाली खजिन्याचं गुप्त दार असावं'. मग काय? दणादण घनाच्या घावाखाली मूर्तीच्या ठिकऱ्या उडू लागल्या. ती शेकडो वर्षे जुनी ऐतिहासिक मूर्ती फोडताना त्यांना काहीच वाटत नव्हते. सोन्याची चमक त्यांच्या डोळ्यात बसली होती आणि तिने ...Read More