बम्पी राइड

(11)
  • 12.8k
  • 2
  • 5.5k

एका माणसाच्या आयुष्यातील एका प्रवासाची कहाणी... आयुष्याच्या दोन वेगळ्या टप्प्यांवर केलेल्या प्रवासातून त्याला झालेल्या बोधाची कहाणी.... बम्पी राईड

Full Novel

1

फुलके - बम्पी राइड - 1

एका माणसाच्या आयुष्यातील एका प्रवासाची कहाणी... आयुष्याच्या दोन वेगळ्या टप्प्यांवर केलेल्या प्रवासातून त्याला झालेल्या बोधाची कहाणी.... बम्पी राईड ...Read More

2

बम्पी राइड - 2

त्या दिवशीचा तो प्रवास मला आजही चांगलाच आठवतो. गावातल्या घरच्या अंगणात बसलो की अगदी काल घडल्याप्रमाणे तो प्रसंग मा‍झ्या येतो. “अरे बॅग भरलीस का? चार वाजून गेलेत. उशीर होतोय. उद्या ऑफिसला दांडी मारणार आहेस का?” – बायको म्हणाली. दारातून ओरडलीच म्हणाना. तिचाही स्वर निर्वाणीचा इशारा द्यावा तसाच होता. प्रकरण गंभीर आहे हे ओळखून मी हातातील चहाचा कप बाजूला ठेवून अंगणातील झोपाळ्यावरून उठलो. बायकोचा संवाद आणि स्वर नेहमीचाच ठेवणीतला असल्यामुळे नकळत गालावर हसू उमटले. ते आईने समोरच्याच आराम खुर्चीत बसून बरोबर हेरले आणि त्याच वेळी मी तिच्याकडे बघितल्याने आम्ही दोघे मोठ्याने हसणे आवरू शकलो नाही. हे पाहून बायको काहीतरी पुटपुटत ...Read More

3

बम्पी राइड - भाग ३

आता गाडी वेगाने पुढे जात होती. ड्रायव्हरने पहिला पेट्रोल पंप बघितला आणि टाकी भरून घेतली. जवळच्याच एका हॉटेल मध्ये आम्ही जेवून घेतले. कोणीही कुणाशी बोलत नव्हते. माही परत गाडीत बसलो. आता ए.सी. सुरू केला होता, रेडीयोवर जुनी गाणी परत सुरू झाली होती. पंपावर ड्रायव्हरने गाडी साफ करून धुवून घ्यायला सांगितली होती. त्यामुळे हीच गाडी आताच कच्च्या रस्त्यावरून आली आहे त्याचा मागमूसही राहिला नव्हता. प्रवास सुखकर चालू होता. सगळे थोड्याच वेळात शांत झोपले. उर्वरित रस्ता कसा संपला आम्हाला कळलेच नाही. ड्रायव्हरने गाडी पार्किंग मध्ये लावली. मी सामान उतरवण्यास सुरुवात केली. ते तिघं अजूनही झोपलेच होते. मी मुद्दामचं कोणाला उठवले नव्हते. ...Read More