अकल्पित

(13)
  • 28.4k
  • 3
  • 11.3k

सकाळी ६ वाजताचा अलार्म वाजला. निशाने तो बंद केला..तिला आज मॉर्निंग वॉकला जायचा कंटाळा आला होता.. ते थंडीचे दिवस होते..म्हणून ती परत डोक्यावर चादर घेऊन झोपली..पण नंतर तिच्या लक्षात आले की रिमा तीची वाट बघत असेल..म्हणून ती मनात नसताना ही उठून गेली.. बाहेर अजून अंधारच होता..

Full Novel

1

अकल्पित (भाग १)

सकाळी ६ वाजताचा अलार्म वाजला. निशाने तो बंद केला..तिला आज मॉर्निंग वॉकला जायचा कंटाळा आला होता.. ते थंडीचे दिवस ती परत डोक्यावर चादर घेऊन झोपली..पण नंतर तिच्या लक्षात आले की रिमा तीची वाट बघत असेल..म्हणून ती मनात नसताना ही उठून गेली.. बाहेर अजून अंधारच होता.. निशा नेहमीच्या ठिकाणी पोहोचली. तरीही अजून रिमाचा काहीच पत्ता नव्हता. तसेच रीमा चा फोन ही लागत नव्हता. "शीट यार, ही रीमा पण ना..जर यायचे नव्हते तर आधीच सांगायचे ना..मेसेज तरी करायचा होता..किती झोप येत होती आज..अरे यार..जाऊ देत...हिला नंतरच बघते मी" असे ती स्वतःशीच पुटपुटली. खूप वेळ रिमाची वाट बघितल्यानंतर तिने तिचा मॉर्निंग वॉक ...Read More

2

अकल्पित (भाग २)

रजत निशाला त्या बंगल्यात न्यायला तयार झाला. आपण येत्या दोन दिवसात निघुयात असे बोलून रजत आणि बाकी सगळे निघाले. आल्यावर अचानक स्नेहा म्हणाली, 'अरे यार, मी माझी पर्स निशाच्या घरातच विसरली. तुम्ही पुढे व्हा मी आलेच.' निशाच्या घराचा दरवाजा उघडाच होता. तिने हाक मारली, 'निशा.' निशा हॉलमध्येच होती. 'अरे स्नेहा, काय झाले काही विसरलीस का?' निशा म्हणाली. 'हो, माझी पर्स विसरले होते......ही बघ मिळाली..चल बाय' असे बोलून स्नेहाने सोफ्यावरची पर्स उचलली व ती बाहेर निघणार इतक्यात ती थांबली आणि निशाला म्हणाली,"निशा मला तुला काही सांगायचंय, रिमाबद्दल. खर तर मगाशीच सांगणार होते. पण सगळ्यांनी माझी मस्करी केली असती. कारण तू ...Read More

3

अकल्पित (अंतिम भाग)

दुसऱ्या दिवशी सकाळीच रजत आणि निशा भेटले. दोघेही रजतच्या काकांच्या राहत्या घरी पुण्याला गेले. रजतने आधीच काकांना तो आणि घरी भेटायला येण्याची कल्पना दिली होती. निशा काकांचे घरावरचे नाव 'जयराम सरपोतदार' वाचताच भारावून गेली. काकांनी दोघांचे स्वागत केले. औपचारिक ओळख झाल्यानंतर काकांनी दोघांना येण्याचे कारण विचारले. तेव्हा निशाने आतापर्यंत घडलेली सगळी हकीकत काकांना सांगायला सुरवात केली. हे सगळं ऐकताना काकांच्या चेहऱ्याचे भाव बदलले. नंतर रजतने काकांना लोणावळ्याच्या बंगल्यात मिळालेला फोटो दाखवला. काकांचा तो फोटो बघताच चेहऱ्यावरचा रंगच उडाला. हे निशाने टिपले. 'काका, तुम्ही ह्या दोघांना ओळखता का? हे कोण आहेत? तुम्हाला याबाबत काही माहीत आहे का?', निशा म्हणाली. यावर ...Read More