सुवर्णमती

(71)
  • 118.2k
  • 5
  • 55k

गंगानगरीच्या राजदरबारात अस्वस्थ शांतता पसरली होती. काही दिवसांपूर्वी हेर खबर घेऊन आला होता. शेजारच्या पंचमनगरी राज्याने गंगानगरीवर आक्रमण करण्याची तयारी सुरू केली होती. गंगानगरीचे सैनिक प्राण पणाला लावून झुंजले असते पण पंचमनगरीच्या सैन्याकडे परकीयांनी पुरवलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा, बंदुका आणि दारूगोळा होता. त्यांचा मुकाबला करण्यासाठी तितकीच चांगली शस्त्रास्त्रे हवी होती. परकीयांची शस्त्रास्त्रे घेऊन आपसात लढू नये असे गंगानगरीचे राजे सुरजप्रतापसिंहांचे मत. त्यामुळे परकीय व्यापारी शस्त्रास्त्रे घेऊन आले तेव्हा त्यांनी एकच लांब पल्ल्याची बंदूक केवळ आवड म्हणून ठेवून घेतली, पण बाकी माल परत पाठवला होता.

Full Novel

1

सुवर्णमती - 1

उपोद्घात / पूर्वपीठिका 1 गंगानगरीच्या राजदरबारात अस्वस्थ शांतता पसरली काही दिवसांपूर्वी हेर खबर घेऊन आला होता. शेजारच्या पंचमनगरी राज्याने गंगानगरीवर आक्रमण करण्याची तयारी सुरू केली होती. गंगानगरीचे सैनिक प्राण पणाला लावून झुंजले असते पण पंचमनगरीच्या सैन्याकडे परकीयांनी पुरवलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा, बंदुका आणि दारूगोळा होता. ...Read More

2

सुवर्णमती - 2

2 राजवाड्यामधे सकाळपासूनच गडबड उडाली होती. महाराज आणि राणीसरकार जातीने सर्व तयारीवर बारीक नजर ठेवून होते. दिवाणजी परत परत सूचना देत होते. मुदपाकखान्यात मुख्य आचारी खास मेजवानीच्या तयारीला पहाटेपासूनच लागला होता. आज त्याच्यावरच्या मोठ्या जबाबदारीची त्याला पुरेपूर कल्पना होती. आणि म्हणूनच, मुदपाकखान्यातले आपले सर्व कसब, त्याने पणाला लावायचे ठरवले होते. प्रत्येक मसाल्याचा आणि इतर पदार्थ त्याने निवडून उत्तम प्रतिचा घेतला होता. खास उत्तमोत्तम आचारी आजच्या मेजवानीसाठी निवडले होते. त्याला कोणतीच त्रुटी राहू द्यायची नव्हती. दरबार सजवण्यासाठी सुगंधी, रंगीत, लहानमोठी, सर्व प्रकारची फुले वेगवेगळ्या मळ्यातून निवडून, वेचून पाट्या भरभरून आणली जात होती. सेवक त्यांचे हार, माळा करण्यात गुंतले होते. ...Read More

3

सुवर्णमती - 3

3 आजचा दिवस होताच तसा विशेष! कन्या उपवर झाली की सर्व मायबापाना असते तशी हुरहूर महाराज आणि होती. पोटची एकुलती एक सौंदर्यवती, गुणवती, कन्या, तिच्या रुपाला, बुद्धीमत्तेला साजेसा अनुरूप वर मिळणे गरजेचे होतेच, पण त्याचबरोबर या राज्याची चढती कमान तशीच उत्तुंग ठेवायला लायक असा जमाईराजाही राज्याला हवा होता. महाराजांना आपल्या कन्येच्या कुवतीचा आणि महत्वाकांक्षेचा अंदाज आणि अभिमान दोन्ही होते. परंतु जनतेला "राजा" हवा असतो राज्यकर्ता म्हणून, हेही ते जाणून होते. अनेकांनी सुचवूनही दत्तकविधान करण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता तो केवळ सुवर्णमतीच्या अफाट बुद्धीमत्तेवरच्या असलेल्या त्यांच्या विश्वासावर. आज राजे शेषनाग त्यांच्या पत्नी आणि दोन पुत्रांसह गंगानगरीत येणार ...Read More

4

सुवर्णमती - 4

4 खाशा स्वाऱ्या वेशीनजीक येऊन पोहोचल्या आहेत आणि लवकरच महालापर्यंत पोहोचतील अशी दिवाणजींची वर्दी घेऊन खास दूत आणि एकच गडबड उडाली. महालातील सर्व दीप प्रज्वलित करून, झुंबरे वर चढवली गेली. वादक, गायक, आपापल्या नियोजित जागी स्थानापन्न झाले. दशसुवासिनी औक्षणासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ सज्ज झाल्या. मुख्य प्रवेश द्वारापासून महालापर्यंत पसरलेल्या पायघड्यांच्या बाजूने उभारलेल्या उंचवट्यांवर, सेविका, सुगंधित पुष्पांची, गुलाबजलांची पात्रे घेऊन, खाशा पाहुण्यांवर हलकेच वृष्टी करण्यासाठी जय्यत तयारीत उभ्या राहिल्या. फळे, पेय, मिष्टपदार्थांची तबके, श्वेत जाळीदार वस्त्रांनी झाकून तयार ठेवण्यात आली. विलायती पद्धतीप्रमाणे चहापानाचीही व्यवस्था चोख ठेवण्यात आली. खुद्द राजे आणि राणीसरकार मुख्य दरवाजाजवळच्या दालनात स्वागतासाठी जाऊन थांबले. सुवर्णमतीसदेखील सेविका सांगावा ...Read More

5

सुवर्णमती - 5

5 तिच्या नाजूक कंकणांनी आधीच तिच्या येण्याची वर्दी दिली. नकळत सर्वांच्याच नजरा प्रवेशद्वारावर आधीच खिळल्या होत्या. सुवर्णमतीचे पाऊल आत पडताच दोन्ही कुवंर, झटकन आसनावरून उठून उभे राहिले. यात शिष्टाचाराचा भाग किती आणि सुवर्णमतीच्या सौंदर्याचा किती, हे त्यांचे त्यांनाही सांगणे जमले नसते. सुवर्णमतीच्या सौंदर्याची ख्याती आधीच त्यांच्यापर्यंत पोहोचली होती, पण तरीही, समोर जी स्वर्गीय सौंदर्यखणी उभी होती तिला पाहताच आपण जे वर्णन ऐकले, ते किती अपूरे आणि तोकडे होते असेच त्या चौघांनाही वाटले. सूर्यनाग क्षणभर अवाक होऊन, तिच्या तेजस्वी सुंदर मुखाकडे पाहतच राहिला. एक अत्यंत अनोखी लहर त्याच्या शरीरभर उमटली. मनोमन 'हीच ती, जिची छबी तारुण्यात प्रवेश केल्यापासून आपल्या ...Read More

6

सुवर्णमती - 6

6 यथावकाश भोजन झाले. चंद्रनाग आपल्या सहज शैलीने, सर्वांना विलायतेतील गमती सांगत राहिला, सुवर्णमती मोठे मोठे डोळे मोठ्या उत्सुकतेने ते ऐकत राहिली. चंद्रनाग स्वत:वर खुश होत राहिला. सूर्यनाग अधिकाधिक स्वत:च्या कोषात गुरफटत राहिला. शेवटी दिवस कलला. सर्वजण आपापल्या कक्षात विश्रांतीसाठी जाऊ लागले. सुवर्णमतीही आपल्या कक्षात निघाली. वाटेतच सूर्यनागाचा कक्ष होता. तो अजून बाहेरच उभा दिसला. लांबूनच त्याची उंच आकृती दिसताच तिची पावले थबकली. सुवर्णमती क्षणभर घुटमळली. 'बोलावे की तसेच पुढे जावे?' मग थांबून म्हणाली "काही हवे होते का आपणास? सेवक कुठे दिसत नाहीत, पाठवून देते कोणास लगेच," तेव्हा सूर्यनाग म्हणाला, "नाही, त्याची आवश्यकता नाही, मीच पाठवून दिले सर्वांस. ...Read More

7

सुवर्णमती - 7

7 घोडसवार निघाले. सर्वात पुढे सुवर्णमती होती. पाठोपाठ चंद्रनाग, सूर्यनाग, त्यांच्यामागे सख्या, सेविका आणि सैनिक काही अंतर निघाले. राजे आणि राण्याही निघाले, परंतु ते प्रथम नगराचा फेरफटका मारून मग वनी पोहोचणार होते. जरा पुढे गेल्यानंतर सुवर्णमतीने सूर्यनागाकडे एक कटाक्ष टाकला. तो परिसराचे बारीक निरीक्षण करण्यात गुंतल्याचे तिला दिसले. किंचित दुखावलेल्या अहंकाराने, तिने चंद्रनागास शर्यत लावण्यास सांगितले. तोही ताबडतोब तयार झाला. सूर्यनाग सर्व बोलणे ऐकत होता, पण तो काहीच बोलला नाही. सुवर्णमतीने घोड्यास टाच दिली. चंद्रनागानेही घोड्यास टाच दिली. वेग वाढत गेला. सर्वांमधे आणि या दोघांमधले अंतर वाढत गेले. सूर्यनाग त्यांच्याबरोबरीने, किंवा खरंतर त्यांच्या पुढे, जाऊ शकत होता, पण ...Read More

8

सुवर्णमती - 8

8 सर्व मंडळी महाली परतली. सेवक घोडे घेऊन येतील, आता सर्वांनी मोटरगाडीनेच जावे असा प्रस्तावबरहुकूम दोन्ही राजांनी तेव्हा कोणीच काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. सायंकाळी दोन्ही राजे आणि सूर्यनाग यांची गुप्त बैठक झाली, ज्यात परकीय संकटावर चर्चा आणि त्यावर एकत्र राहून, एकजुटीने सामना करावा, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते ठेवून, आपल्या जनतेला कमीतकमी कसा त्रास होईल, यासाठी प्रयत्न करावा असे ठरले. सूर्यनागाने आराखडा सर्वांसमोर मांडला. दोन्ही देशांच्या सीमा, त्यांना जोडणारे इतर देश, त्यांच्यातील आपसीसंबंध, त्यांचे परकीयांशी संबंध, त्यांचे आपल्याशी संबंध, सगळ्याचा विचार सूर्यनागाने संपूर्ण मांडला त्या दोघांसमोर. सुरजप्रतापसिंह अत्यंत प्रभावित होऊन, त्याचे मुद्दे ऐकत होते. अगदी असाच जामात हवा होता या ...Read More

9

सुवर्णमती - 9

9 उतावळ्या स्वभावाच्या चंद्रनागास विचार करत बसणे शक्यच नव्हते. तो तडक गंगानगरी जाण्यास निघाला. अर्थात कोणालाही कसलीच न देता. मोटरगाडी गंगानगरीजवळील एका खेड्यात ठेवून तिथून घोडा घेऊन, वेशांतर करून तो गंगानगरीस पोहोचला. या वेळेस तो अर्थातच राजमहाली जाणार नव्हता. तिथल्याच एका मुसाफिरखान्यात त्याने स्वत:साठी राहण्याची सोय पाहिली. मुसाफिरखान्यात मुद्दामच 'आपण हिऱ्यामोत्यांच्या दागिन्यांचा व्यापारी असून काही खास विलायती दागीने आपल्याजवळ आहेत. इथल्या राजकुमारीस ते आवडतील आणि आपल्यास चांगली किम्मत मिळेल या आशेने आपण आलो असल्याचे त्याने सर्वांना सांगितले.' माझी मुलगी राजकुमारीच्या सखीची सखी असून ती तुझी काही मदत करू शकेल असे मालकाने म्हणताच चंद्रनागास अत्यानंद झाला. मालकाच्या मुलीने त्या ...Read More

10

सुवर्णमती - 10

10 शेषनगरीतून गेलेला चंद्रनाग आणि गंगानगरीतून परतलेला चंद्रनाग या दोन भिन्न व्यक्ती होत्या असेच म्हणावे लागेल. सळसळत्या धबधब्याला अचानक बांध लागल्यासारखे झाले. तो फारसे कोणाशी बोलेना. आपल्यातच मग्न राहू लागला. मनोमनी सुवर्णमतीसाठी झुरू लागला. तो महालातून नाहीसा झाल्यावर सूर्यनागाने गुप्त हेर त्याला शोधण्यासाठी पाठवले होते. त्यांनी चंद्रनाग गंगानगरी जाऊन राजकुवारीस भेटला आणि भेट संपताच तडक शेषनगरीस परतला असा वृत्तांत दिला. ही भेट काही पळांचीच होती असेही त्यास कळले. सूर्यनागास चंद्रनागाचे झुरणे पाहवेना. त्याने चंद्रनागाशी बोलण्याचा प्रयत्न केला. अर्थात तोही निष्फळ ठरला कारण, आता परिस्थितीत कोणताही बदल घडू शकत नाही हे चंद्रनागाच्या मनाने पक्के ठरवले होते. किंबहुना सुवर्णमतीने ते ...Read More

11

सुवर्णमती - 11

11 शेषनगरीही नव्या बहूच्या स्वागतासाठी सजली होती. गुढ्या, तोरणे, कारंजी आणि खास शेषनगरीचे वैशिष्ट्य असलेल्या मोठमोठ्या रांगोळ्या. इथली भव्यता निराळीच होती. ‘आपल्या महालास लाजवतील, अशा भव्य, इथल्या दरबाऱ्यांच्या कोठ्याच आहेत.’ सुवर्णमतीच्या मनी आले. राजमहाल दुरूनच दिसू लागला. रात्रीच्या काळोखात त्यावर केलेली रोषणाई पाहून डोळे दिपून जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभे राहून, नगरवासी जयजयकारात नव्या बहूचे स्वागत करत होते. सगळीकडे जल्लोष सुरू होता. महालात पोहोचताच नव्या बहूस प्रथेप्रमाणे कुंकुमजलात पाऊले बुडवून आत येण्यास राणीसरकारांनी सुचवले. तसेच तळहात कुंकुमजलात बुडवून तिच्यासाठी राखून ठेवलेल्या भिंतीवरील कोनाड्यात उमटवण्यात आले. आता एकच कोनाडा रिता उरला, चंद्रनागाच्या बहूचा! नंतर थोडेसे जलपान झाले ...Read More

12

सुवर्णमती - 12

12 सकाळी दरवाजावर टकटक झाली आणि सुवर्णमती दचकून उठली. भरभर दरवाजाजवळ जात कोण आहे याचा कानोसा घेतला. तिची सेविका आली होती. ‘राणीसरकारांनी चुल्हापूजनासाठी स्नान आटोपून बोलावले आहे, दरवाजा उघडावा’ असे तिने विनवताच ‘कुंवर निजले आहेत, मी तयार होऊन येते’ असे सुवर्णमतीने आतूनच सांगून तिला जायला सांगितले. पार न पडलेल्या सुहागरातीचे गुपित ती तिच्या बाजूने तरी गुपितच ठेवणार होती. पुढील काही दिवस, छोटे मोठे कार्यक्रम, रितीरिवाज, यात पार पडले. यासर्व कार्यक्रमांदरम्यान सुवर्णमतीचे हसून खेळून सर्वांशी वागणे, कोणी चेष्टा मस्करी केली तर प्रसंगी लाजणे, हे सर्व पाहिल्यावर, ही एक उत्तम अभिनेत्री असल्याची गवाहीच सूर्यनागास मिळाली. तो अधिकच सतर्कतेने तिच्या आसपास ...Read More

13

सुवर्णमती - 13

13 दुसरे दिवशी प्रभातीच दोघे सारथ्यासह निघाले. सोबत अर्थातच काही सैनिकही होतेच. काही अंतर उरल्यावर दूताकरवी फौजप्रमुखांच्या परवानगी मागावी आणि मग पुढे जावे असे ठरले. प्रवासात दोघे कामापुरतेच बोलले. ठिकाण जवळ आल्यावर दूतास पाठवून परवानगी मिळवली आणि पुढे कूच केले. सुवर्णमती भेटीस येते आहे हे कळल्यावर जेन चा आनंद गगनात मावेना. तिने तिच्या स्वागताची जय्यत तयारी करवून घेतली. मोटरगाडी बंगलीसमोर पोहोचताच सर्व औपचारिकता बाजूला ठेवून जेन धावतच बाहेर आली आणि आपल्या बालमैत्रिणीला घट्ट आलिंगन दिले. सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची, सडपातळ बांध्याची गुलाबी गोरी जेन सुवर्णमतीपेक्षा चार बोटे उंचच होती. पण तरीही एखाद्या बाहुलीसारखी नाजूक आणि सुंदर होती. चंद्रनागाची ...Read More

14

सुवर्णमती - 14

14 आता काही वेळेस चंद्रनाग आणि जेन दोघेच घोडसवारीस जाऊ लागले. रात्री भोजनानंतर जेन आणि चंद्रनाग नृत्याचे या दोघांना देऊ लागले. प्रथम ते काही पावले नाचून दाखवत आणि मग या दोघांना करावयास सांगत. प्रचंड अवघडलेल्या स्थितीत दोघेही नृत्याचे धडे गिरवू लागले. जेन शेवटी म्हणाली, “कुवंर ती पत्नी आहे तुमची. हक्काने कवेत घेवू शकतां तुम्ही.” चंद्रनाग आणि जेन यावर दिलखुलास हसू लागले. सूर्यनाग आणि सुवर्णमतीने मात्र गोरेमोरे होऊन एकमेकांकडे पाहिले. मग क्षणात त्यांनी नजरा दुसरीकडे वळवल्या. कधीकधी रात्री तिघे मेजवानीविषयी चर्चा करत तेव्हा सूर्यनागही तपशील पाहू लागला, काही वेगळे वाटले तर बदल सुचवू लागला. राज्यासाठी, ही मेजवानी महत्वाची आहे ...Read More

15

सुवर्णमती - 15

15 इकडे शेषनाग आणि राणीसरकारांना हे कसे पटवून द्यावे हे समजत नव्हते. तिने सूर्यनागाशी याविषयी बोलण्याचा केला होता पण मधेच बोलावणे आल्याने बोलणे होवू शकले नव्हते. आता तर तो फारसा मोकळाही भेटत नव्हता. नृत्याची तालीम करताना तर, दोघेही, त्यावेळी होणाऱ्या शारीरिक जवळीकीने इतके अस्वस्थ होत, की नंतर नजरेला नजरही देत नसत एकमेकांच्या. शेवटी धीर एकवटून ती शेषनाग आणि राणीसरकारांशी बोलण्यास गेली. सूर्यनागास तिथे उपस्थित पाहून आधार आणि भीती दोन्हींनी मनात घर केलं. पण आता घाबरून चालणार नव्हते. शेवटी तिने बोलण्यास सुरवात केली. "पिताजी, अत्यंत नाजूक आणि महत्वाच्या विषयावर आपणा दोघांसोबत बोलायचे आहे.” सूर्यनागाचे कान अर्थातच टवकारले. “बोला बहुराणी, ...Read More

16

सुवर्णमती - 16

16 दुसऱ्या दिवशी चंद्रनाग प्रभातीच लॉर्डला भेटण्यास गेला. प्राथमिक बोलाचालीनंतर, रीतसर, जेनचा हात त्याने मागितला. यावर लॉर्ड कार्टन, प्रथम चकित झाले आणि आणि बघताबघता त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांनी जेनला बोलावणे पाठवले. आणि लगेच निघण्याचा आदेश दिला. चंद्रनागास काही उत्तर देण्याची तसदीही न घेता ते आतील दालनात निघून गेले. सुवर्णमतीस हे कळताच ती सूर्यनागाकडे आली, आणि झालेला सर्व प्रकार तिने कथन करून आपणास ताबडतोब तिथे जायला हवे असे सुचवले. पुढे काहीच न बोलता दोघेही लगबगीने लॉर्ड कार्टनच्या कक्षाजवळ पोहोचली. भेटीसाठी आपण आल्याची वर्दी दिली. लॉर्ड कार्टनने त्यांना आत बोलावले आणि आपण लगेचच जेनसह कूच करीत असल्याचे सांगितले. सूर्यनाग ...Read More

17

सुवर्णमती - 17 - अंतिम भाग

17 त्या रात्री कुंवर त्यांच्या दालनात न जाता मुख्य कक्षातच बसलेले पाहून तिला जरा आश्चर्य वाटले. आपण थांबावे की बाहेर जावे, या संभ्रमात ती असतानाच कुंवरने चाहुल लागून वर पाहिले. या वेळेस नेहमीप्रमाणे सुवर्णमतीस पाहून त्याने मान वळवली नाही. उलट तो उठून उभा राहिला. काही क्षण अवघडलेले गेले. हीच योग्य वेळ आहे असे वाटून सुवर्णमती म्हणाली, "कुंवर, आता आपण मला माहेरी परतण्याची अनुमती द्यावी. आपणास हा विवाह इतकाच जर अमान्य होता तर आपण लग्नवेदीवर उभे राहिलातच का? असा प्रश्न मी आपणास विचारणार नाही. आपण राज्यहितास किती महत्व देऊ शकता हे माझ्याइतके इतर कोण समजू शकेल? पण मी आपणाशी ...Read More