पुनर्भेट

(137)
  • 200.7k
  • 19
  • 103.1k

पुनर्भेट भाग १ घड्याळाचा काटा साडेनऊ कडे गेलेला पाहताच रमाने हातातली पोळी तव्यावर टाकली आणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या मेघनाला हाक दिली , “मेघु ये ग लवकर गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे तुझे . जवळच्या छोट्या टेबल वर एका ताटात रमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती . शेवटची गरम पोळी ताटात वाढून रमाने ग्यास बंद केला . आणि मेघनाच्या पोळीवर तुप वाढले . तोपर्यंत मेघना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच रमा बसली . दोघींनी एकत्रच खायला सुरवात केली . मेघु माझी जायची वेळ झाली बर का आज सुजाता नाही येणार तेव्

Full Novel

1

पुनर्भेट भाग १

पुनर्भेट भाग १ घड्याळाचा काटा साडेनऊ कडे गेलेला पाहताच रमाने हातातली पोळी तव्यावर टाकली आणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या मेघनाला दिली , “मेघु ये ग लवकर गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे तुझे . जवळच्या छोट्या टेबल वर एका ताटात रमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती . शेवटची गरम पोळी ताटात वाढून रमाने ग्यास बंद केला . आणि मेघनाच्या पोळीवर तुप वाढले . तोपर्यंत मेघना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच रमा बसली . दोघींनी एकत्रच खायला सुरवात केली . मेघु माझी जायची वेळ झाली बर का आज सुजाता नाही येणार तेव्हा मलाच दुकान उघडायला हवे इथे तुझा डबा भरून ठेवलाय ...Read More

2

पुनर्भेट भाग २

पुनर्भेट भाग २ थोड्याच वेळात सुजाता आली .. दोघी कामात गर्क होऊन गेल्या यानंतर सहा कधी वाजले तिला समजलेच . सुजाता आणि ती दोघी दुकान बंद करून बाहेर पडल्या . सुजाता जवळच रहात होती ,रमाचा निरोप घेऊन ती निघून गेली . उद्या रविवार असल्याने आता सोमवारीच दोघी भेटणार होत्या . रविवारी तेथील कॉलेज शाळा बंद असत . शिवाय रविवारी रमाला इतर कोरडे पदार्थ ,त्यांची तयारी ,आणि ते तयार करणे ही कामे असत . मेघना पण रविवारी घरीच असे . त्यामुळे रमा रविवारी दुकान बंदच ठेवत असे . रमा घरी पोचली तेव्हा मेघना काही वाचन करीत बसली होती . आईला ...Read More

3

पुनर्भेट भाग ३

पुनर्भेट भाग ३ रमाही खुप हुशार होती . लहान वयात पाहिलेल्या आईवडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे जास्तच समंजस झाली होती . असलेल्या रमाचे काका काकुंवर खुप प्रेम होते . आई वडिलांच्या माघारी ते दोघेच तिची “दुनिया” होते . उत्तम मार्काने रमा दहावी उत्तीर्ण झाली . त्यानंतर तिने जिल्ह्याच्या गावी जाऊन आपले शिक्षण पुरे केले . पदवीधर झाल्यावर नोकरी करावी आणि घरात हातभार लावावा असा तिचा विचार होता . नोकरीसाठी जिल्ह्याच्या गावी जायची तिची इच्छा होती . पण काकांना ते मान्य नव्हते . रमाला ते आपल्यापासून लांब जाऊ द्यायला इच्छुक नव्हते . आता काका काकू बरेच वृद्ध झाले होते . त्यामुळे जी ...Read More

4

पुनर्भेट भाग ४

पुनर्भेट भाग ४ अनाथ आश्रमातच लहानपणापासुन तो वाढला होता . त्याचे शिक्षण तिथेच पूर्ण झाले होते . एकदोन प्रयत्नात नोकरी पण मिळाली होती . पगार चांगला होता . त्याचे दोन खोल्याचे एक घर सुद्धा होते गावाबाहेर.. थोडे पैसे शिल्लक टाकल्यावर आता त्याला लग्न करायचे होते . त्याच्या बाजुने लग्नाचे पाहायला कोणीच नव्हते. म्हणून त्याने स्वतःच ही स्थळे पाहायची मोहीम सुरु केली होती . आज तो ऑफिसमधील आपला मित्र मोहन याच्यासोबत आला होता . रमाचे स्थळ त्याला असेच समजले होते . त्याने गावातच रमाला पाहिले होते . साधीसुधी पण आकर्षक दिसणारी रमा त्याला आवडली होती . म्हणूनच तिच्या घरच्यांकडे तो ...Read More

5

पुनर्भेट भाग ५

पुनर्भेट भाग ५ मेघना रितूकडून परत घरी आली तेव्हा आठ वाजले होते . आली तेव्हा खुपच खुशीत होती ती “आई इतकी मजा आली न रितुकडे . आणि जेवण सुद्धा मस्त केले होते मावशींनी, खुप पदार्थ केले होते . संध्याकाळी पण आम्हा मुलींसाठी बाहेरून पिझा ,केक, पास्ता असे पण मागवले होते . अगदी पोट फुटेपर्यंत खाल्ले बघ . आणि खुप दंगा ,धमाल केली ग .. कसला जबरदस्त वाढदिवस साजरा झाला रितूचा ..!! बर आई तु जेवलीस का ? आणि हा केक दिलाय बघ तुझ्यासाठी डब्यात रितुने रितुच्या आई तर बरेच पदार्थ देत होत्या पण तु फक्त केक दे म्हणलीस न ...Read More

6

पुनर्भेट भाग ६

पुनर्भेट भाग ६ तिने सतीशच्या ऑफिसला चौकशी केली तर तो रजेवर होता आहे समजले . जवळ जवळ तीन आठवडे तो परतलाच नाही रमाची अतिशय वाईट अवस्था झाली तेव्हा . काका काकुंना पण काही सांगायची सोय नव्हती . नंतर एके दिवशी सतीश परतला.. जणु काय काहीच घडले नाही असे वागू लागला . इतके सगळे झाल्यावर रमाला आता आपले आणि मेघनाचे भविष्य अंधारात दिसायला लागले . सतीश मात्र मजेत होता , कधीकधी त्याचे पिणे वगैरे कसे काय पण बंद असायचे . त्यावेळी रमाला तो म्हणत असे ,”तु काळजी नको करू तुला पाहिजे ते दागिने ,घर सगळे सगळे मी तुला घेऊन देईन ...Read More

7

पुनर्भेट भाग ७

पुनर्भेट भाग ७ घराच्या आजूबाजूला कोणीच राहणारे नसल्याने घरातला नेहेमी होणारा सतीशचा आरडाओरडा आणि दंगा कुणाला कळायचा प्रश्न नव्हता हे सर्व कमी म्हणून की काय एक दिवस एक गृहस्थ संध्याकाळी दारात उभे राहिले . रमाला विचारले त्यांनी ती कोण आहे ..बायको म्हणल्यावर ते म्हणाले असे आहे काय ,लग्न झाले म्हणूनच या सतीशने घर भाड्याने घेतले वाटते . नाहीतर धर्मशाळेत राहत होता . त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या घराचे गेले वर्षभराचे भाडे दिले गेले नव्हते . रमाने जेव्हा हे घर आमचे स्वतःचे आहे असे सांगितले तेव्हा ते हसु लागले . तुम्ही बायको असुन सुद्धा सतीशने तुम्हाला पण थापा मारल्या वाटते . असे ...Read More

8

पुनर्भेट भाग ८

पुनर्भेट भाग ८ ऑफिस मध्ये जाऊन मोहनला भेटावे आणि हे सारे सांगुन पैशाची काय व्यवस्था होते का ते पहावे तिला वाटले .पण ती ऑफिसमध्ये आली होती हे सतीशला नुसते समजले जरी असते तरी तिची खैर नव्हती .. आणि शिवाय त्या दिवशीच्या मोहनच्या बोलण्यात सतीशने ऑफिसच्या मित्रांकडून पण बरेच पैसे उसने घेतले आहेत हे समजलेच होते . त्यामुळे तो मार्ग तर आता बंदच झाला होता . दिवस चाललेच होते ,प्रत्येक दिवस रमासाठी कठीण जात होता . त्य गुंडांनी दिलेली मुदत कधीच संपली होती पण भीतीची टांगती तलवार अजुन तशीच होती . पैशाची काय व्यवस्था झालीय समजत नव्हते . काही विचारावे ...Read More

9

पुनर्भेट भाग ९

पुनर्भेट भाग ८ रमा मात्र हे अजिबात ऐकेना हे पाहून आता काकांनी या संभाषणात भाग घेतला . “रमा पोरी तुझी काकु काय म्हणते ते .. तुझ्या पगारात कर्जाचा हप्ता नको लावुन घेऊस .. आता तुझ्या पदरात ही लहान लेक आहे .. तुझा नवरा परत कधी येईल ठाऊक नाही उगाच तुझ्या कमाईत खंड पाडून घेऊ नकोस .. मध्ये मेघना आजारी होती तेव्हा किती गोंधळ झाला होता आठवते न ? तुझी नोकरी असल्याने तु दवाखान्याचे बिल भागवू शकलीस नाहीतर आमची काहीच ऐपत नव्हती ग तुला मदत करायची . आणि लग्नाआधी तूच तर हे घर चालवत होतीस . आता सुद्धा बारीक सारीक ...Read More

10

पुनर्भेट भाग १०

पुनर्भेट भाग ९ रमा मात्र हे अजिबात ऐकेना हे पाहून आता काकांनी या संभाषणात भाग घेतला . “रमा पोरी तुझी काकु काय म्हणते ते .. तुझ्या पगारात कर्जाचा हप्ता नको लावुन घेऊस .. आता तुझ्या पदरात ही लहान लेक आहे .. तुझा नवरा परत कधी येईल ठाऊक नाही उगाच तुझ्या कमाईत खंड पाडून घेऊ नकोस .. मध्ये मेघना आजारी होती तेव्हा किती गोंधळ झाला होता आठवते न ? तुझी नोकरी असल्याने तु दवाखान्याचे बिल भागवू शकलीस नाहीतर आमची काहीच ऐपत नव्हती ग तुला मदत करायची . आणि लग्नाआधी तूच तर हे घर चालवत होतीस . आता सुद्धा बारीक सारीक ...Read More

11

पुनर्भेट भाग ११

पुनर्भेट भाग १० रमाला मनातून खात्री होती की ऑफिसमधले पैसे घेऊन सतीश ते त्या गुंड लोकांना परत करायला गेला . पण ती माणसे कोठे होती तेही तिला माहित नव्हते . आणि मुळात ही जुगारात पैसे हरल्याची आणि गुंडांच्या धमकीची गोष्ट तर फक्त तिलाच माहित होती. दिवस कठीण झाले होते . असाच आणखी एक महिना गेला . आता एकूण दोन महिने झाले होते तरीही काहीच पत्ता नव्हता . आणि एके दिवशी संध्याकाळी रमा ऑफिसमधून परत येताच घराचे मालक भाडे मागायला दारात आले . भाडे थकीत झाले होते . कसेतरी इकडचे तिकडचे पैसे गोळा करून तिने थकीत पैसे मालकांच्या हातात ठेवले ...Read More

12

पुनर्भेट भाग १२

पुनर्भेट भाग ११ आणि मग चार पाच दिवसातच काकांनी दवाखान्यात प्राण सोडला . शेवटपर्यंत ते शुद्धीवर मात्र आलेच नाहीत त्यांच्याशी कोणाचेच बोलणे होऊ शकले नाही . काकुने तर रडून नुसता गोंधळ घातला होता . काकु आणि मेघनाकडे लक्ष देता देता रमाला स्वतःचे दुख्ख: मनातच दाबायला लागत होते . रमाने आता तिच्या घरचे बांधुन ठेवलेले सर्व सामान काकांच्या घरी आणले आणि घरमालकांना उरलेले पैसे देऊन ते घर सोडले . काय काय स्वप्ने पाहिली होती या घरात प्रवेश करताना आणि काय होऊन बसले होते . घर सोडताना रमाचा जीव तीळतीळ तुटत होता . त्यानंतरची वर्षे रमासाठी खुप कठीण होती . काकु ...Read More

13

पुनर्भेट भाग १३

पुनर्भेट भाग १२ हळूहळू नव्या आयुष्याला रमा आणि मेघना दोघीही सरावत गेल्या . इतके दिवस आयुष्याचे भयंकर रंग पाहिल्यानंतर मात्र सगळे काही खरेच बरे चालले होते . पाच सहा महिन्यात रमा दुकानच्या कामात चांगली तयार झाली . तिची हुशारी आणि कामाचा वेग पाहून मालक पण खुष झाले . रमाने आता मेघनाला पहील्या वर्गात दाखल केले . शाळा जवळच होती . संध्याकाळी जरी रमाला दुकानाच्या कामामुळे उशीर झाला तरी वाड्यातील सर्व जण मेघनाकडे लक्ष देत . त्यामुळे रमाला घराची काळजी वाटत नसे . मोहन अधून मधून चौकशी करीत असे ,येत जात असे . दुकानात पगार बरा होता,दरवर्षी थोडा वाढवत असत ...Read More

14

पुनर्भेट भाग १४

पुनर्भेट भाग १३ दुसऱ्या दिवशीपासून दोघींचे नेहेमीचे रुटीन चालू झाले . दिवस गडबडीत जात असल्याने सतीशचा विषय थोडा मागे मनातून . दोन तीन दिवसांनी रमाच्या लक्षात आले अजुन मोहनचा काहीच फोन आला नाही सतीशसंबंधात . करावा का फोन मोहनला ? विचारावे का त्याला काय झाले असे ? विचार जरी मनात आला तरी तिला मात्र स्वतः फोन करायचे धाडस होईना असेच एक दिवस संध्याकाळ होत आली होती . दुकानातले काम आवरून सुजाता थोडा वेळापूर्वीच घरी गेली होती आता आपण पण आवरून कुलूप लावावे अशा विचारात असताना रमाचा फोन वाजला . मोहनचा असेल अशा विचाराने ती थोडी धास्तावली . फोन वाजत ...Read More

15

पुनर्भेट भाग १५

पुनर्भेट भाग १४ रिक्षात बसताच तिने रिक्षावाल्याला पत्ता सांगितला आणि मेघनाला फोन करून दुकानातून निघाले आहे असे सांगितले . उद्या सकाळी सतीश येऊन दाखल होईल .. कसे कसे करायचे सगळे .? मुख्य प्रश्न मेघनाचा होता तिला काय आणि कसे सांगायचे . त्यात मोहनचा फोन लागत नव्हता . काहीही करून त्याला रात्रीतून इकडे बोलावून घ्यायला हवे परिस्थिती तोच आटोक्यात ठेवू शकेल . घर जवळ येताच रमाने पैसे दिले आणि ती खाली उतरली . काहीतरी कारण काढुन घराबाहेर जाउनच मोहनशी बोलायला फोन करायला लागणार आता असा विचार करते तोच फोन वाजला . फोन मोहनचा होता ..बघताच तिला हायसे वाटले !! “वहिनी ...Read More

16

पुनर्भेट भाग १६ - अंतिम भाग

पुनर्भेट भाग १५ रात्रभर मेघनाच्या शेजारी रमा झोपली होती . पण नुसते डोळे मिटून पडले तर झोप थोडीच येणार विचारांचा भुंगा नुसते डोके खात होता .. झोप न लागलेल्या अशा कैक रात्री रमाच्या आयुष्यात आजपर्यंत आल्या होत्या . पण ही आजची रात्र मात्र सगळ्याचा कळस होता . रात्रभर नुसते विचार विचार आणि विचार .. भविष्यात काय घडणार आहे याचे फक्त तर्क वितर्क ..! कशी असेल आपल्या तिघांची ही पुनर्भेट ..? त्या लांबलचक रात्रीनंतर सकाळ उजाडली इतकेच घडले . उजाडताच रमा उठली आणि कामाला लागली . कामाच्या नादात थोडेसे विचार तरी मागे पडतील असे तिला वाटले . नेहेमीची कामे होता ...Read More