दुभंगून जाता जाता...

(30)
  • 56.6k
  • 2
  • 23.1k

( दुभंगून जाता जाता... या कादंबरीतील वस्तू, घटना, पात्रे, प्रसंग, ठिकाण काल्पनिक असून, त्यांचा वास्तवाशी ( सजीव – निर्जीव ) तिळमात्र संबंध नाही. संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. ) आई जग सोडून गेली त्यावेळी माझं वय न कळण्याचं होतं... आई गेली तशी काही दिवसांतच बाबाही गेले. कारण आजारपणाचं असंल तरी खरं कारण काही वेगळंच होतं. ते मला मी मोठं होईल तसं समजत गेलं... मी थोडं मोठं झाल्यावर म्हणजे मला थोडं कळायला लागल्यावर ज्यांच्या घरात आम्ही भाड्याने राहत होतो तेथे जाऊन मी विष्णू मामांकडून सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला...

Full Novel

1

दुभंगून जाता जाता... - 1

लेखक परशुराम माळी 1 ( दुभंगून जाता जाता... या कादंबरीतील वस्तू, घटना, पात्रे, प्रसंग, ठिकाण काल्पनिक असून, त्यांचा वास्तवाशी सजीव – निर्जीव ) तिळमात्र संबंध नाही. संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. ) आई जग सोडून गेली त्यावेळी माझं वय न कळण्याचं होतं... आई गेली तशी काही दिवसांतच बाबाही गेले. कारण आजारपणाचं असंल तरी खरं कारण काही वेगळंच होतं. ते मला मी मोठं होईल तसं समजत गेलं... मी थोडं मोठं झाल्यावर म्हणजे मला थोडं कळायला लागल्यावर ज्यांच्या घरात आम्ही भाड्याने राहत होतो तेथे जाऊन मी विष्णू मामांकडून सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला... बोरगावच्या बस स्थानकावर उतरलो... विष्णूमामाचं हॉटेल ...Read More

2

दुभंगून जाता जाता... - 2

2 आजोबा या सगळ्या घटनेतून थोडेफार सावरले होते. पण आजी मात्र मी नसताना, माझ्या माघारी आईची आठवण काढून रडायची. बायकांसमोर आपलं दु:ख हलकं करायची. माझ्या पोराला माझ्या माघारी कुणाचा आधार नाही. कसं व्हायचं माझ्या राजूचं. या विचारानं ती चिंताग्रस्त व्हायची. ती माझ्या भविष्याची खूपच काळजी करायची. आजोबांचंही याच्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. आजकाल ते दोघेही खुपचं चिंताग्रस्त होते. कारण थोडं वेगळं होतं. खरंतर सुरुवातीपासूनच माझा स्विकार करण्याला – माझा सांभाळ करण्याला मामांचा विरोध होता. पण आजी – आजोबांनी मामांची समजूत काढली. माझ्या आई – बाबांचा संसार सुरळीत सुरु झाल्यानंतर आणि दोघांमधील भांडणतंटा थोडासा कमी झाल्यावर परत मला आई – वडिलांच्याकडे ...Read More

3

दुभंगून जाता जाता... - 3

3 घडलेल्या घटनेने आणि झालेल्या प्रकाराने आजी – आजोबा व्यथित झाले होते. मामाच्या या अशा वर्तणूकीने ते त्रस्त झाले मामापुढे आजी - आजोबांचा नाईलाज झाला होता. वृद्धत्व आणि आजारपण यामुळे ते असहाय्य झाले होते. एकुलता एक मुलगा आणि मुलावर असलेल्या प्रेमापायी ते कोणतेही कठोर पाऊल उचलू शकत नव्हते. निरोप देण्याची वेळ झाली तशी आजोबांचे डोळे भरून आले. जाधव सरांना हात जोडून आजोबा म्हणाले... सर, पोराकडे लक्ष असू दे... आता तुम्हीच याचे आई – वडील. आता आम्ही किती दिवस जगणार... असं म्हणता म्हणता आजोबांचा आवाज कापरा झाला. आजोबांनी सरांच्या पायावर डोके ठेवले. आजही तो प्रसंग मला अस्वस्थ करतो. सरांनी आजोबांना ...Read More

4

दुभंगून जाता जाता... - 4

4 तसा अभ्यासात पहिल्यापासून मी सर्वसाधारण होतो. परीक्षेमध्ये सर्वसाधारण गुणांनी उत्तीर्ण होण्यापलीकडे विशेष अशी माझी प्रगती नव्हती. पण विविध आणि शालेय स्पर्धेमध्ये मात्र मी अव्वल होतो. खेळाच्या सांघिक आणि वैयक्तिक प्रकारामध्ये जिल्हा आणि राज्यस्तरावर शाळेला विजेतेपद मिळवून देण्यामध्ये माझा मोठा वाटा होता. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्येही मी चमकलो होतो. शालेय परीक्षांचे दिवस होते. मी नववीच्या वर्गाची अंतिम परीक्षा देणार होतो. वर्ष संपत आलं की खूप रुखरुख लागून रहायची. शैक्षणिक वर्ष संपायला नको असे वाटायचे. याचं कारण असं होतं की, आम्हां मुलांचे बालसंकुल मध्ये राहून शिकण्याचे एक ठराविक वय होते. ते ठराविक वय संपल्यानंतर आम्हांला बालसंकुल सोडावे लागायचे. साधारण १० ...Read More

5

दुभंगून जाता जाता... - 5

5 जोमाने आणि नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली. पण आयुष्यचं पूर्ण खाचखळग्यांनी आणि संघर्षानी भरलेलं असेल तर नियतीच्या पुढे काय चालणार आहे. ते वय आकर्षणाचं, आपल्या जवळच्या कुणाजवळ तरी मन मोकळं करावसं वाटणार. धुंध – बेधुंद होऊन स्वप्नात भरारी घेण्याचं. या धोक्याच्या वयातून मार्गक्रमण करत असताना... या मार्गावरती कुणीतरी जिवाभावाचं भेटलं तर मग जणू आपल्या मोकळ्या भावनांना पंखच फुटू लागतात. मलाही तसे पंख फुटले हे खरं पण भरारी घेण्याअगोदरच कुणीतरी छाटल्यामुळे परिस्थितीने मेलेल्या माणसाला मन, भावना नसतात. त्याला प्रेम करायचा अधिकार नसतो याची जाणीव झाली. तसं ते प्रेम नव्हतंच बालवयातलं आकर्षण होतं आणि आमच्या दृष्टीने त्याचं दुसरं नाव मैत्री ...Read More

6

दुभंगून जाता जाता... - 6

6 हे बघ राजू, तुझी मावशी तुझ्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. तू कोल्हापूरला जाण्याच्या तयारीला लाग. तुला लवकर ११ वी च्या वर्गात प्रवेश घ्यायला हवा. खरंतर बालसंकुल सोडण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. बालसंकुल प्रशासनाने गुणवत्ता पाहून माझी मुदतही वाढवली होती. आणखी दोन वर्षे मी इथे राहून शिकू शकणार होतो. मला काय करावं काहीच कळत नव्हते. मी जाधव सरांना जाऊन भेटलो. सर , माझी मावशी पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला बोलवते आहे. इकडे बालसंकुलने माझी मुदतही वाढवली आहे. मला काय करावं हेच कळत नाही. यावर जाधव सर म्हणाले... राजू, पुन्हा अशी संधी तुला मिळणार नाही. हवं तर तू दोन वर्षांनी ...Read More

7

दुभंगून जाता जाता... - 7

7 आजी – आजोबा हे जग सोडून गेल्यानंतर जाधव सरांनी एक पालक या नात्याने माझ्यासाठी जे काही करायला लागतं सर्व केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या ओळखीच्या लोकांना भेटून पुन्हा मला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी शिकावं,मोठं व्हावं ही त्यांची तळमळ आणि धडपड होती. माझे आजोबा मला नेहमी सांगायचे, कितीही गरीबी असली, तरी कुणासमोर मन हलकं करू नको, लाचारपणाने, स्वाभिमान गहाण ठेवून कुणापुढेही हात पसरू नको. जे काही करायचं आहे ते कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले पाहिजे. आपली नीतिमत्ता ढळू देऊ नको. चोरी, लबाडी या गोष्टी माणसाला अधोगतीकडे घेऊन जातात. माणसामध्ये नम्रपणा, सहनशीलता आणि धैर्य असेल तरच माणूस प्रगती ...Read More

8

दुभंगून जाता जाता... - 8

8 खरंतर कुठंतरी स्थिर व्हावं, चांगली नोकरी मिळावी आणि इतरांसारखं आपलंही घर व्हावं. छान छोटंसं कुटुंब असावं ही स्वप्न ते वय होतं. मी लहान होतो तेव्हा शाळेत पालक मिटिंग असायची वर्गातील इतर मुलांचे पालक आलेले पाहून मनाला वाटायचं आपलंही कुणीतरी असायला हवं होतं. आज थोडेफार कमवायला लागलो असलो तरी ते पोरकंपण अजूनही संपल नव्हतं. पैशापेक्षा मानसिक आधार आणि मायेच्या सावलीची खरी गरज असते. याची जाणीव मला त्यावेळी झाली. ज्यावेळी मी स्टेजवर बक्षीस घ्यायला जायचो त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि त्या समोरच्या गर्दीत मी आई – बाबांचा, आजी – आजोबांचा चेहरा शोधत रहायचो. आज अनेकांचे आई-बाबा आपल्या मुलांचे कौतुक करायला, ...Read More

9

दुभंगून जाता जाता... - 9

9 आता कुठे जायचं हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता.त्याचं रात्री मी डॉ. दिक्षीत सरांचं घर गाठलं. घडलेली सर्व हकीकत डॉ. दिक्षीत सरांना सांगितली. यावर सर मला म्हणाले, राजू थोडे दिवस माझ्या घरी रहा... पुढं बघू आपण काय करायचं ते... तू चिंता करू नकोस. डॉ. दिक्षीत सरांचं मन मोठं होतं, मी सरांच्या सूचनेचा आदर करत म्हणालो... नको सर,माझी बाहेर कुठेतरी व्यवस्था केली तरी बरे होईल. विद्यापीठामध्ये सरांच्या ओळखीचे मकरंद भावे नावाचे मित्र अर्थशास्त्र विभागात कार्यरत होते. डॉ. दिक्षीत सरांनी भावे सरांना माझी सर्व माहिती दिली. भावे सरांनी दुसऱ्याच दिवशी गोपाळ कृष्ण गोखले विद्यार्थी वसतिगृहात माझी राहण्याची व्यवस्था केली. वसतिगृहात फक्त ...Read More

10

दुभंगून जाता जाता... - 10 - अंतिम भाग

10 आजवर घडलेल्या घटना – प्रसंगांनी मी मजबूत झालो होतो. मी जिद्द सोडली नव्हती. मला पुन्हा संघर्षाला सज्ज व्हायचं मी डॉ. केसरकर सर आणि सुलभा ताईंचा निरोप घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. डॉ. केसरकर सरांना आणि सुलभाताईंना मी नमस्कार केला. आणि म्हणालो... आजवर आपण मला सांभाळलं आई – वडिलांचं प्रेम दिलं. आपण मला खूप मदत केली. आपले उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. मी कायमच आपल्या ऋणात राहीन. यावर केसरकर सर म्हणाले... एका बाजूला तुम्ही आम्हांला आई – वडील मानत असताना, कोणत्या ऋणाची आणि उपकाराची भाषा बोलताय...? तुम्ही कुठंही जाणार नाही. तुमच्या राहण्या – जेवणाची सोय आम्ही आमच्या विद्यार्थी वसतीगृहात ...Read More