मी एक मोलकरीण

(59)
  • 130.7k
  • 12
  • 59.4k

लहान असतानाच वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांच्या प्रेमाचे छप्पर माझ्यावरून दूर झाले. इतक्या लहानवयात मला माझ्या आईचा आधार तर छोट्या बहिण - भावासाठी बाबा बनायचे होते. आईने तर स्वतःला आमच्या तिघांसाठी सावरले होते. मी पाचवी मध्ये शिकत होते. खरं तर मी पुस्तकापेक्षा आई कडून जास्त शिक्षण घेत होते. कदाचित म्हणून मला तेव्हा पासून शिक्षणामध्ये कमी असल्याची जाणीव झाली.

Full Novel

1

मी एक मोलकरीण - 1

( भाग 1) लहान असतानाच वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांच्या प्रेमाचे छप्पर माझ्यावरून दूर झाले. इतक्या लहानवयात मला माझ्या आईचा तर छोट्या बहिण - भावासाठी बाबा बनायचे होते. आईने तर स्वतःला आमच्या तिघांसाठी सावरले होते. मी पाचवी मध्ये शिकत होते. खरं तर मी पुस्तकापेक्षा आई कडून जास्त शिक्षण घेत होते. कदाचित म्हणून मला तेव्हा पासून शिक्षणामध्ये कमी असल्याची जाणीव झाली. मी अकरा वर्ष, माझी बहिण पाच आणि भाव दोन वर्ष असताना आईला बाबा एकटे सोडून गेले होते. माझं शिक्षणाची आणि आमच्या तिघांची पालन पोषण करण् ...Read More

2

मी एक मोलकरीण - 2

( भाग 2) आज मी एक विद्यार्थी तर होतेच पण घरकाम करणारी मुलगी म्हणून जास्त होते. आईसाठी मी मोलकरीण जगणे लाजास्पद होते पण त्या ही पेक्षा चिंताजनक होते. तिला माझं भविष्य तिच्यासारख नको होतं. ती वारंवार मला अभ्यास करायला लावी. पण तिला सुमा जाण्याचा धक्का जास्त लागला होता म्हणून तिला मी कामाला जाण्यासाठी मनाई केली होती. तिचा नाईलाज होता पण ती खचून गेली होती. मी सहा महिने शाळा आणि घरकाम व्यवस्थित पार पाडले. आईने स्वतःला पूर्णपणे सावरले होते फक्त माझ्यासाठी आणि मदनसाठी ! या सर्व मध्ये मी आता सातवीमध्ये गेले आणि आता मला शिष्यवृत्तीची परीक्षा हि होती. मी काहीही ...Read More

3

मी एक मोलकरीण - 3

(भाग 3) मी एक मोलकरीण आहे सर्व वर्गामध्ये समजल होतं. ज्यांना मी माझ्या जवळच्या मैत्रिणी समजत होते, त्या आज एकदम वेगळ्या नजरेने बघत होत्या. मला कळत नव्हतं या मध्ये नक्की कोण चुकिच आहे ? मी आईला मदत करण्यासाठी स्वतः घरकाम करते,माझी चुकी हि आहे का ? मला समजून न घेता हि मोलकरीण आहे अस बोलून माझ्यापासून दूर जाणं हि त्यांची चुकी आहे का ? खुप विचार, प्रश्न माझ्या मनामध्ये तयार झाले होते. आपल्या स्वतःला कुटुंबाला सांभालण्यासाठी दुस-याच्या घरातील काम करणे, खरचं ईतक वाईट असतं का ? आई ईतके दिवस एक मोलकरीण म्हणून हेच सहन करत असेल का ? त्या ...Read More

4

मी एक मोलकरीण - 4

( भाग 4 ) मी खुप उत्साहित होते. आमच्या गावामध्ये माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. मला आता चिडवण्याच्या दृष्टिने बघत नव्हते तर अभिमानाने ओळखत होते. आई ला खूपच बरं वाटायचं जेव्हा लोक आईला माझी आई म्हणून ओळखली लागले. आता मदन हि तिसरी मध्ये जाणार होता आणि मी अकरावी मध्ये ! आई आणि मी ब-यापैकी तयार होतो. मदनचं तर शाळेमध्ये प्रवेश व्यवस्थित झाला होता. फक्त मला एक चांगल्या कॉलेजची गरज होती म्हणून मी सरांची मदत घेण्याचे ठरवले. सरांनी माझ्यासाठी कॉलेज बद्दल चोकशी केली. सरांच्या म्हणण्यानुसार मी विज्ञान शाखेतून प्रवेश घ्यावे. त्यांनी तसे आईला बोलून ही दाखवले. माझ्या भविष्याचा ...Read More

5

मी एक मोलकरीण - 5

( भाग 5 ) मला हात लावला तर चटका बसेल अशा अवस्थेत मी होते. तरी हि मी बोलत होते, पुस्तक द्या, सराव करायचं आहे. आई आणि सरांना खूप काळजी वाटत होती. त्यांनी डॉक्टर ला सांगितले की जास्त लक्ष द्या, परीक्षा आहे दोन आठवड्यावर ! डॉक्टर ही चांगले होते, त्यांनी पण खरचं मनापासून माझी ट्रीटमेंट पुर्ण केली. तीन ते चार दिवसांमध्ये माझ्या तब्येतमध्ये बरीच सुधारणा वाटत होती. मग आई आणि सरांनी डॉक्टर सोबत बोलून मला घरी आणले. आई माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेत तर सर अभ्यासाची ! मी वाचन करून डोक दुखेल म्हणून सर वाचन करीत आणि मी ते ऐकत! असं ...Read More

6

मी एक मोलकरीण - 6

( भाग 6 ) मी एक आय. पी.एस. झाले, माझं सर्वात मोठ ध्येय आज पूर्ण झालं पण ते परिपूर्ण होणार होतं जेव्हा मी माझ्या पदाचा, हक्काचा योग्य वापर करणार होते. मग आता माझा पुढचा ध्येय गुन्हेगारांना शिक्षा करणे हे होतं. मला पुढच्या ट्रेनिंगसाठी शहरामध्ये जावं लागणार होतं तसं मला पत्र आलं होतं. मदनचे शिक्षण अजून चालू होतं म्हणून आई आणि मदन माझ्या बरोबर शहरामध्ये नव्हते येऊ शकत. माझा जाण्याआधी गावामध्ये सत्कार ठेवला होता. माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी सन्मानीय गोष्ट होती. मी माझ्या सोबत आई, मदन, आणि सर यांना ही घेवून गेले होते. माझं सत्कार झाल्यानंतर, मी एक छोटसं ...Read More

7

मी एक मोलकरीण - 7

( भाग 7 ) शहरामध्ये सहा महिने राहिले पण कधी ईतक एकट एकट नाहि वाटलं, आता सर कधीच सोबत मला गरज असेल तरीही, मी अडचणी मध्ये असले तरीही ते नसणार. मला या कल्पनेने भरून येत होतं. मी सरांच्या फोटोकडे बघत होते त्यामधून मला फक्त त्यांचे स्वप्न, माझे स्वप्न, कोणत्याही संकटाला कसे सामोरे जायचे, कधीच हार नाहि मानायची असे वाक्य कानावर येत होते. जे त्यांना आवडत नाहि ते मी कधीच केल नव्हतं आणि आतापासून ही फक्त तेच करणार जे त्यांनी सांगितले होतं. मी पहिल्या दिवशी कामावर गेले पण सतत सर समोर येत होते म्हणून काही कामावर जास्त लक्ष नाहि देता ...Read More

8

मी एक मोलकरीण - 8

( भाग 8) आज माझं लग्न होत. मला कळत नव्हतं, नक्की ! मी खुश आहे का नाही ते ? कदाचित शरीराने तिथे होते पण मनाने मात्र तिथे नव्हते. पण आई खुश होती म्हणून मी खुश होते. लग्नाची तयारी चालु होती, सर्व व्यस्त होते तितक्यात माझा फोन जोरजोरात वाजत होता. मी फोन उचलण्यासाठी गेले पण आईने फोन माझ्या हातातून घेवून बाजुला ठेवून दिलं. मी तिला समजावत होते,' काहि महत्वाचे काम असेल म्हणून फोन करत असणार, एकदा बोलून तर बघू दे !' पण आई ऐकायला तयार नव्हती तिने माझा फोन बंद करून ठेवून दिला. आता आई मला लग्न मंडपामध्ये घेवून गेली. ...Read More

9

मी एक मोलकरीण - 9

(भाग 9) आजपासून केस माझ्या हातात होती. मी सर्व शोध नव्याने करण्याचे ठरवलं. केस ची फाईल बघून कळलं की मुलगी महिनाभर गायब होती नंतर तिच्या वर अत्याचार करून तिला एका ठिकाणी फेकून दिले होते. हि पुर्ण केस मला सुमाची आठवण करून देत होती फरक इतकाच होता सुमा वयाने लहान होती आणि हि मुलगी वयाने वीस वर्षाची होती. मला आधी मुलीची सर्व माहिती नव्याने हवी होती म्हणून तिच्या घरी जाण्याचे ठरवले. मी आणि एक पोलिस ऑफीसर दोघेही तिच्या घरी पोहचलो. घर जास्त मोठ नव्हतं आणि छोटं ही नव्हतं, मध्यम आकाराच होतं. आम्ही घरामध्ये गेलो तर घरामध्ये फक्त तिचे आई बाबाच ...Read More

10

मी एक मोलकरीण - 10 - अंतिम भाग

( भाग 10 ) क्षणभरात सर्व शांतता पसरली. मग मी थोड्या वेळाने त्याला समजावलं आणि विश्वास दिला, तुला काहीच होणार नाहि याचा ! मग तो सांगु लागला, ती मला खुप आवडायची, ती सतत कोणाला तरी मदत करत असायची, तिच्या अशा वागण्याने तिचे सौंदर्य अजून खुलून दिसायचं. एकदा मी ठरवलं आज काहीही करून तिला आपल्या मनातील भावना व्यक्त करून दाखवायच्या ! ती त्या दिवशी क्लास मधून निघाली, मी तिला पुढे जाऊन दिले आणि मग मी तिच्या मागून निघालो. ती पुढे जात होती पण सतत मागे, इकडे, तिकडे बघत होती. मग मीच थोडा पुढे गेलो आणि तिला थांबावलं. ती मला बघून ...Read More