बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा

(108)
  • 131.6k
  • 29
  • 72.1k

हिरव्या रंगाच्या नानाविध छटांनी नटलेल्या नी जरीचा शालू पांघरलेल्या डोंगराआडून आकाशमणी सूर्याचं तेजबिंब हळूहळू आकाशमंडलात वर चढू लागलं. सोनेरी रंगांची मुक्त उधळण करीत सूर्यकिरणे धरतीवर हात पाय पसरू लागली. दिवस होता भाद्रपदातल्या चतुर्थीचा. शिवाय, याच शुभ मुहूर्तावर आलेला बैलपोळा. गावकऱ्यांच्या उत्साहाला एक वेगळंच उधाण आलं होतं. लोकांनी आपापली घर फुला तोरणांनी सुशोभित केली होती. गावातील घरे, मंदिरे, वाडे आणि गावचे प्रवेशद्वारही झेंडू, जास्वंद, शेवंता अशा नाना फुलांनी शृंगारली होती. कालच, गावकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आपली दूधदुभती, वासरं, बैलं नदीच्या पाण्यात दगडा मातीने घासून पुसून स्वच्छ चकचकीत केली होती. त्यांच्या नैसर्गिक काळ्या, पांढुरक्या, तांबड्या रंगाला एक वेगळीच झळाळी आली होती. त्यांची बाकदार शिंगे नाना रंगांनी सुरेख रंगवून काढली होती. आपल्या वाडवडिलांपासून वापरत असलेल्या लाकडी / लोखंडी पेटाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे जपून ठेवलेल्या रंगीबेरंगी नक्षीदार झुली धुवून स्वच्छ केल्या होत्या. त्या आता जनावरांच्या पाठीवर विराजमान झालेल्या होत्या. बैलांची, खोंडांची डौलदार वशिंडं , शेपट्या, पाय विविध नैसर्गिक रंगांनी रंगवलेली होती. गळ्यांत चामड्याचे पट्टे असलेल्या घुंगरा घंट्यांच्या माळा चढवल्या होत्या. त्याच बरोबर आपल्या घरच्यांनी रात्री स्वतः बनवलेल्या झेंडूच्या फुलांचे हार त्यांच्या गळ्यांत आणखीनच आकर्षक दिसत होते. सर्व जनावरांच्या कपाळावर घरच्या सुवासिनींनी भरलेल्या कुंकवा गुलालाचा रंग उठून दिसत होता.

Full Novel

1

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 1

१. झुंज हिरव्या रंगाच्या नानाविध छटांनी नटलेल्या नी जरीचा शालू पांघरलेल्या डोंगराआडून आकाशमणी सूर्याचं तेजबिंब हळूहळू आकाशमंडलात वर चढू सोनेरी रंगांची मुक्त उधळण करीत सूर्यकिरणे धरतीवर हात पाय पसरू लागली. दिवस होता भाद्रपदातल्या चतुर्थीचा. शिवाय, याच शुभ मुहूर्तावर आलेला बैलपोळा. गावकऱ्यांच्या उत्साहाला एक वेगळंच उधाण आलं होतं. लोकांनी आपापली घर फुला तोरणांनी सुशोभित केली होती. गावातील घरे, मंदिरे, वाडे आणि गावचे प्रवेशद्वारही झेंडू, जास्वंद, शेवंता अशा नाना फुलांनी शृंगारली होती. कालच, गावकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आपली दूधदुभती, वासरं, बैलं नदीच्या पाण्यात दगडा मातीने घासून पुसून स्वच्छ चकचकीत केली होती. त्यांच्या नैसर्गिक काळ्या, पांढुरक्या, तांबड्या रंगाला एक वेगळीच झळाळी आली होती. त्यांची ...Read More

2

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 2

२. दवंडी निसर्ग देवतेच्या कुशीत वसलेलं गाव, आजूबाजूला हिरव्या रंगाचा पदर ओढून सज्ज असलेल्या सह्याद्रीच्या मुशीत, बाजूनेच खळाळत वाहणाऱ्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून निजल होत. पक्ष्यांच्या कलकलाटाने हळूहळू जागं होऊ लागलं होत. पूर्वेकडून सुर्यादेवताही आपल्या असंख्य रंगीबेरंगी कुंचल्यांनी आकाशाचं छत नानाविध रंगात रंगवून टाकण्यासाठी प्रकट होऊ लागला होता. त्याच्या तांबूस सोनेरी किरणांनी अवघा भवताल उजळून टाकण्यासाठी डोंगरा आडून वर सरकत होता. नदीपासून आणि घाटावरच्या मंदिराच्या मागच्या बाजूने अर्धा एक फर्लांग अंतरावर निंबाच्या झाडामध्ये रामोश्यांची वस्ती होती. मोजून दहा बारा घर होती. मातीच्या भिंती आणि गव्हाच्या, किंवा नदीतल्या पानगवताने शाकारलेली छप्पर असलेली, ...Read More

3

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 3

३. शिकार नदीच्या मधोमध एका लहान खडकावर शंभू महादेवाचं एक प्राचीन मंदिर होतं. त्याच्या आजूबाजूला पसरलेल्या जमिनीवर लहानसहान वृक्षराईंनी ते हिरवंगार छोटंसं द्वीप जणू नदीच्या पांढुरक्या निळ्या कोंदनातील पाचूच्या खड्यासारखं भासत होतं. किनाऱ्यावर असलेल्या दगडी घाटावर तिथपर्यंत जाण्यासाठी मार्गात मोठमोठाले खडकांची एकसंघ माळ होती. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला लागली कि, मंदिरातल्या शंभू देवाचं दर्शन दुरापास्त होऊन जायचं. दैनंदिन जीवनात, देव कार्यात अडचण येऊ नये म्हणून गावातील लोकांनी घाटालगतच एक छोटंसं मंदिर उठवलं होतं. रोजच्या देवकर्मात येणारी बाधा दूर झाली होती. सकाळ संध्याकाळ देवालयातली घंटा महादेवाच्या आराधनेत तल्लीन होऊन जायची. तिचा टनत्कार चुहुदिशांना एक मंगलमय स्वरणाद सोडून जायचा. ...Read More

4

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 4

४. लाल महाल सूर्य डोक्यावरून ढळू लागला होता. दिवे घाटाच्या डोंगरावरून खाली उतरून पुण्यात बहिर्जी आणि मारत्याला दुपार टळून गेली. दोघेही आता कसब्यात पोहोचले होते. देवी देवतांची मंदिरे, वाडे, घरे पाहत लोकांना विचारत वाड्याच्या दिशेनं चालत होते. काही वर्षांपूर्वी आदिलशाही फौजेने पुण्यावर, त्यातही मुरार जगदेव या मराठा सरदाराने पुणे जाळून बेचिराख केले होते. पुण्याच्या वेशीवर पहार रोवून त्यावर चपला टांगल्या होत्या. याचा अर्थ, कुणीही या जागेवर वस्ती करू शकत नाही. शेती करू शकत नाही. आणि असे आढळल्यास त्याचं मुंडकं धडा वेगळं केलं जाईल. ज्या पुण्यात आधी आनंदाने लोक राहायचे तिथं बाभळी, गवत आणि जंगली ...Read More

5

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 5

५. वाघाची शिकार भल्या पहाटे शिवबा अन त्याच्या मावळ्यांनी गुंजन मावळातल्या गावाला निरोप अन पुण्याकडे परतीचा प्रवास चालू झाला. हवेतला गारवा अंगाला झोबत होता. शिवबाने अंगावर शाल घट्ट बांधून घेतली होती. घोड्यांच्या टापांचा आवाज अन त्यामुळे मागे उडणारी धूळ हवेत मिसळून जात होती. हळू हळू सूर्य नारायणाचे दर्शन होऊ लागले होते. अंगावर सूर्याची सोनेरी कोवळी किरणे पडू लागली होती. पक्षांचा किलबिलाट आता ऐकू यायला लागला होता. मधूनच एखादा हरणांचा कळप हुंदडताना दिसे. तर मधेच मोरांचा "म्याऊऊउ........ म्याऊऊऊउ ....." आवाज कानावर पडे. समोरच काही माणसं हातात काठ्या घेऊन धावत जाताना नजरेस पडत होती. मागून ...Read More

6

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 6

६. सुरवात... लाल महालात येऊन बहिर्जी आता चांगलाच रुळला होता. वाड्याच्या जवळच त्याला एक खोली देण्यात आली. मित्रांच्या ओळखी लागल्या. सवयी, स्वभाव माहित होऊ लागले. विटीदांडू, सूरपाट्या, सूरपारंब्या, लगोरी, हुतूतू, कुस्तीचे डाव सकाळ संध्याकाळ रंगू लागले. त्याचबरोबर तलवारबाजी, भाले, बरचे, दांडपट्टा, विटा, तिर कमान अशा ना नाविध शास्त्रांचे हात होऊ लागले. सकाळ संध्याकाळ नदीच्या काठी दाट झाडीमध्ये कसून सराव होऊ लागला. कुस्तीचे डाव रंगू लागले. सोबतीला व्यायाम आणि घौडदौड त्यामुळे शरीरही आकार घेऊ लागलं. स्वराज्याविषयीचे आऊसाहेबांचे, शिवबाचे विचार मनात घर करू लागले. दिवसाचा तिसरा प्रहार सुरु झाला होता. संध्यासमयी सूर्याच्या तांबूस सोनेरी प्रकाशाने आकाश उजळून ...Read More

7

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 7

७. श्रीगणेशा कृष्ण पक्षातला अष्टमीचा दिवस. साल होतं १६४५. प्रभू श्रीरामांची पत्नी सीता यांचा जन्मदिवस. जानकी अष्टमी असेही म्हणत. उन्हाच्या झळा जाणवू लागल्या होत्या. पहाटे आणि रात्रीच काय ती थंडी वाजायची. सकाळचा प्रहार उलटला कि, सूर्य डोक्यावरून खाली पश्चिमेच्या तोरण्यागडाच्या डोक्यावर येई पर्यंत ऊन चांगलंच चटकायचं. सूर्य नुकताच आपली सोनेरी किरणांची धूळफेक करत हिरव्या सह्याद्रीवर आपलं प्रकाशाचं पांघरून घालण्यासाठी सज्ज होऊ लागला. शिवबाराजे आणि त्यांचे मित्रमंडळी आज रायरेश्वराच्या रावळात जमले होते. बरोबर वडीलधारे दादोजी नरसप्रभू आणि नेताजीही होते. बाकीचे आपले नेहमीचेच! राजांनी कमरेच्या निळ्या जरीच्या दुशेल्यात खोवलेल्या म्यानातून खसकन तलवार बाहेर काढली.त्याचं धारदार पातं पिंडीसमोर ...Read More

8

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 8

८. गुंजनमावळ सुरुवात तर झाली होती. श्री रायरेश्वर मुक्त करून! आपल्या हाती एखादा बळकट किल्ला असावा आता सर्वांना वाटू लागले. चर्चा, मसलती झडू लागल्या. शिवापूरचा वाडा मावळ्यांनी गजबजून गेला. मावळ्यांची संख्या वाढू लागली. तान्हाजी, येसाजी, नेताजी यांच्या हाताखाली कसरती होऊ लागल्या. राजांचा मुक्काम गुंजवणे भागात वाढू लागले. आता लक्ष होतं, तोरणा आणि मुरुंबदेवाचा डोंगर. रायरेश्वरावरून पुण्याच्या दिशेने पाहिलं कि, सिंहगड दिसायचा.त नजर थोडी डावीकडे वळवली कि, आकाशाला गवसणी घालणारा तोरणा नजरेत भरायचा. त्याला लागूनच होता मुरुंबदेवाचा डोंगर! बहिर्जीने मारत्या, सुंदऱ्या, राणोजीला या कामाला लावले होते. पुणे प्रांतातील सर्वांत ...Read More

9

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 9

९. मोहीम तोरणा तोरणा! कानद खोऱ्यातील बुलंद, बळकट आणि अभेद्य असा गड! ढगांशी स्पर्धा करणारा वाऱ्याशी झुंजणारा! जेवढा उंच तेवढाच रुंदही! गडाला दोन माच्या होत्या. मैल अर्धा मैलावर दोन्हीही माच्या पसरलेल्या. एक झुंजार तर दुसरी बुधला! तेलाचा बुधला उपडा करून ठेवला कि, त्याच्यासारखा दिसायचा म्हणून बुधला माची! त्यावर मध्यभागी एक डोंगराचा सुळका होता. त्याच्यावरचा प्रचंड खडक लक्ष वेधून घ्यायचा! भक्कम कातळी तट आणि खाली खोल खोल दऱ्या म्हणून दुसरी माची, झुंजार माची म्हणून ओळखली जायची!झुंजार माचीवरून गडाखाली उतरायला एक वाट होती. अतिशय भयंकर, अवघड आणि चिंचोळी! उतरताना थोडा जरी पाय घसरला, तोल गेला तर कडेलोटच! ...Read More

10

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 10 - अंतिम भाग

१०. निशाणाचा हत्ती तोरण्यापाठोपाठ त्याच्या जवळचा मुरुंबदेवाचा डोंगरही थोडासा प्रतिकार करताच हाती लागला. राजांना हिरा, मोहरांनी भरलेले हंडे सापडले. गडांच्या डागडुजीसाठी तोरणेश्वराचा आशीर्वाद मिळाला. राजांनी बुद्धी चातुर्याच्या जोरावर लढाई न करताही चाकण, पुरंदर, तिकोना आणि आजुबाजुचा परिसरही आपल्या अधिपत्याखाली आणला. रायरेश्वराजवळचा रोहिडा किल्लाही जास्तीचा विरोध न करता आपला केला. रोहीड्यावर राजांनी बाजी - फुलाजी हि प्रभू देशपांड्यांची जोडी तर जावळी खोऱ्यामध्ये मुरारबाजी असे एकना अनेक हिरे आपले केले. बाजी पासलकरांच्या आन कान्होजी जेधेंच्या सेनाधिपत्याखाली फतेहखानाची स्वारीही यशस्वीपणे परतवून लावली. पण या वेळी स्वराज्यासाठी पहिले बलिदान बाजी पासलकर आपल्या नावावर करून गेले. ...Read More