जैसे ज्याचे कर्म

(26)
  • 93.7k
  • 6
  • 36.4k

डॉ. गुंडे यांच्या प्रशस्त, टोलेजंग दवाखान्यातील भव्य वातानुकूलित शस्त्रागारामध्ये एका वीस वर्षीय युवतीवर गर्भपाताची शस्त्रक्रिया आटोपून डॉ. गुंडे यांनी हातमोजे, चेहऱ्यावरील मास्क काढला. कोपऱ्यामध्ये असलेल्या बेसीनमध्ये हात स्वच्छ धुतले. बाजूलाच असलेल्या खुर्चीवर बसून त्यांनी जवळच असलेल्या भिंतीतले कपाट उघडले. कपाटातील एक रजिस्टर काढताना त्यांना जाणवले की, ते त्या शस्त्रक्रियेच्यावेळी नेहमीप्रमाणे प्रसन्न नव्हते. त्या युवतीजवळ गेल्यापासूनच एक विचित्र जाणीव त्यांच्या शरीरामध्ये पसरली होती. वातानुकुलित दालन असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. खिशातील रुमाल काढून त्यांनी घाम टिपला. त्यांच्यासमोर असलेल्या फॉर्ममधील माहिती त्यांनी त्या गुप्त रजिस्टरवर लिहिली. क्रमांक लिहिताना ते मनाशीच म्हणाले,

Full Novel

1

जैसे ज्याचे कर्म - 1

जैसे ज्याचे कर्म! (भाग १) डॉ. गुंडे यांच्या प्रशस्त, टोलेजंग दवाखान्यातील भव्य शस्त्रागारामध्ये एका वीस वर्षीय युवतीवर गर्भपाताची शस्त्रक्रिया आटोपून डॉ. गुंडे यांनी हातमोजे, चेहऱ्यावरील मास्क काढला. कोपऱ्यामध्ये असलेल्या बेसीनमध्ये हात स्वच्छ धुतले. बाजूलाच असलेल्या खुर्चीवर बसून त्यांनी जवळच असलेल्या भिंतीतले कपाट उघडले. कपाटातील एक रजिस्टर काढताना त्यांना जाणवले की, ते त्या शस्त्रक्रियेच्यावेळी नेहमीप्रमाणे प्रसन्न नव्हते. त्या युवतीजवळ गेल्यापासूनच एक विचित्र जाणीव त्यांच्या शरीरामध्ये पसरली होती. वातानुकुलित दालन असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. खिशातील रुमाल काढून त्यांनी घाम ...Read More

2

जैसे ज्याचे कर्म - 2

जैसे ज्याचे कर्म! (भाग २) "साहेब... साहेब..." गणपतने पुन्हा आवाज दिला. तसे गुंडे वास्तवात परतले. समोरच्या रुमालाने त्यांनी कपाळावरचा घाम पुन्हा एकदा टिपला. ते पाहून गणपतने विचारले,"काय झाले साहेब? तब्येत बरी नाही का? नाही म्हटलं सारखा घाम येत आहे... ए. सी. चालू असताना घाम येणे बरे नाही.""तसे काही नाही रे. तब्येत चांगली आहे पण का कोण जाणे आजची केस हातात घेतल्यापासून कशी वेगळीच मनःस्थिती झाली आहे. गणपत, तुला इथे काम करुन किती वर्षे होत आहेत रे?""कुणी मोजली साहेब? ...Read More

3

जैसे ज्याचे कर्म - 3

जैसे ज्याचे कर्म! (३) शस्त्रक्रियेच्या दालनातून बाहेर पडलेल्या गणपतला दवाखान्याची स्वच्छता रखमा दिसली. तो तिच्याजवळ जाऊन म्हणाला, "रखमा, थोडे नदीपर्यंत जाऊन येतो." "बरे. जाऊन या. पण जरा सांभाळून हं. आज जरा कसुनकसं होतेय बघा." "अग, मी काय नवीन आहे का? काळजी करू नकोस. पण आज तुम्हाला झालंय तरी काय? साहेब पण घामाघूम होत आहेत, अस्वस्थ वाटतय असे म्हणत आहेत. तू बी आस बोलती... बरे, मला जास्त वेळ थांबता येणार नाही. कुणी हा माझ्या हातातील आहेर पाहिला तर अवघड ...Read More

4

जैसे ज्याचे कर्म - 4

जैसे ज्याचे कर्म! (भाग ४) डॉ. गुंडे विचारात गुंतलेले असताना टेबलावरील युवतीची करणारी नर्स म्हणाली, "डॉक्टर पे..पे..पेशंट..." "काय झाले?" नर्सचा कंपायमान आवाज ऐकून डॉक्टरांनी विचारले. "बघा ना, कशी अस्वस्थ वाटतेय, डोके हलवतेय. गळ्यातून वेगळाच आवाज येतोय. हातपाय ताठ करतेय..." नर्स बोलत असताना डॉ. गुंडे टेबलाजवळ आले. त्यांनी मुलीची नाडी पाहिली. ती व्यवस्थित होती. तितक्याच त्यांचे लक्ष मुलीच्या चेहऱ्याकडे गेले. चेहऱ्यावर बांधलेला रुमाल पाहून ते म्हणाले, "असे का करतीय ही? नाडी तर व्यवस्थित आहे. मग घाबरल्यासारखी का करतीय? आजपर्यंत मी एवढ्या गर्भपाताच्या ...Read More

5

जैसे ज्याचे कर्म - 5

जैसे ज्याचे कर्म! (भाग ५) पंचवीस वर्षांपूर्वी वैद्यकशास्त्रातील पदवी घेवून आलेल्या अजय गुंडे तरुण डॉक्टरने त्या शहरात एका छोट्या खोलीमध्ये स्वतःचा दवाखाना सुरु केला. एका नव्या जाणिवेने आणि समाजसेवेचे व्रत घेवून वेगळ्याच स्फूर्तीने तो युवक काम करू लागला. हळूहळू व्यवसायात त्याचा जम बसत होता. हातगुण चांगला यासोबत एक सकारात्मक दृष्टीकोन असलेला, आर्थिकतेपेक्षा माणुसकी जपणारा डॉक्टर अशी त्यांची ख्याती होत होती. दूरवरचे पेशंट त्यांच्या दवाखान्यात येत होते. असे सारे सुरळीत चालू असताना एका रात्री सोबतचा कर्मचारी निघून गेलेला असताना अचानक एक जीप डॉ. गुंडे ...Read More

6

जैसे ज्याचे कर्म - 6

जैसे ज्याचे कर्म! (भाग ६) आगलावे यांनी महत्त्वाच्या कामासाठी फोन केला असेल हे डॉ. गुंडे यांनी समोर बसलेल्या पेशंटला आणि नर्सला बाहेर बसायला सांगून म्हणाले, "बोला आगलावे साहेब, बोला. आज कशी काय आठवण झाली?" "काय करता गुंडेसाहेब, कामच तसे महत्त्वाचे आहे म्हणूनच तुमची आठवण आली..." "बोला ना बोला. फोनवर तुमचे नाव पाहिले आणि सर्वांना बाहेर बसायला सांगितले. सध्या मी एकटाच आहे. सांगा. कुणाचे अबॉर्शन..." "दुसरे काय असणार? पण फोनवर नाही बोलता येणार. तातडीने भेटायला येऊ शकाल का?" "तातडीने? अहो, पण..." "गुंडे, ...Read More

7

जैसे ज्याचे कर्म - 7

जैसे ज्याचे कर्म! (भाग ७) छाया! श्रीमंत आईबापाची एकुलती लाडात वाढलेली हट्टी मुलगी! तिने एखादी गोष्ट मागावी आणि ती तिला न मिळावी असे कधीच होत नसे. किंबहूना एखादे वेळी आईबाबांकडून नकार मिळणे तर सोडा पण तशी शक्यता दिसताच ती आकाशपाताळ एक करायची. डॉ. गुंडे शहरातील एक प्रतिथयश आणि तितकेच श्रीमंत असे डॉक्टर! छाया जसजशी मोठी होत गेली तसतसे तिच्या आईचे लक्ष तिच्यावरून कमी होत गेले. दिवस दिवस त्या दोघींची भेट होत नसे. तिची आई सतत बाहेर असायची. अनेक संस्था, मैत्रिणींचे ...Read More

8

जैसे ज्याचे कर्म - 8

जैसे ज्याचे कर्म! (भाग ८) डॉ. अजय गुंडे यांचे लग्न झाल्यावर गर्भपाताच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या त्यांच्या पत्नीची तलवार केव्हा म्यान झाली हे तिलाही कळले नाही. हळूहळू तिने सामाजिक कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली. सार्वजनिक कामे, महिला मंडळाच्या बैठका- कार्यक्रम या निमित्ताने घराबाहेर पडलेली तिची पावले रात्री उशिरा घरी परतू लागली. रात्री उशिरा घरी परतली तेव्हा छाया झोपलेली असायची आणि सकाळी छाया लवकर उठून शाळा-कॉलेजला जाताना तिची आई झोपलेली असायची. साहजिकच तिचे छायाकडे दुर्लक्ष होऊ लागले. लहान असताना ती रखमाच्या ...Read More

9

जैसे ज्याचे कर्म - 9

जैसे ज्याचे कर्म! (भाग ९) असेच दिवस जात होते. केवळ डॉ. गुंडे शहरातच नव्हे तर राज्यातील अनेक शहरातील दवाखान्यांमधून 'नको असलेले मुलीचे गर्भ' काढून टाकण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढीस लागले होते. नवविवाहित तरुणीला गर्भ राहताच अनेक कुटुंबातून 'गर्भलिंगनिदान' करण्याचा प्रकार वाढत होता. या चाचणीतून गर्भाशयात नुकताच फुलू लागलेला गर्भ मुलीचा आहे असे समोर येताच तो गर्भ पाडून टाकण्याकडेही अनेक कुटुंबीयांचा कल वाढत होता. विशेष म्हणजे 'तसा' आग्रह धरण्यात ती तरुणीच पुढे असायची. दिवसेंदिवस गर्भलिंगनिदान आणि गर्भपात ह्या प्रक्रिया वाढत ...Read More

10

जैसे ज्याचे कर्म - 10 - अंतिम भाग

जैसे ज्याचे कर्म! (भाग १०) सायंकाळचे सहा वाजत होते. डॉ. मुंडे हे त्यांच्या जाण्यासाठी तयार होत होते. परंतु त्यांना पुन्हा नैराश्याने घेरले. निशाचा गर्भपात केल्यापासून त्यांची अस्वस्थता, तळमळ, तगमग कमी होत नव्हती. स्वतःची झालेली तशी स्थिती ती कुणाला सांगूही शकत नव्हते.सांगणार कुणाला तर पत्नीला! परंतु एकतर तिला वेळच नव्हता आणि ज्या ज्या वेळी नवऱ्याने छायाबद्दल तिच्याजवळ विषय काढला त्या प्रत्येकवेळी बायकोने त्यांनाच दरडावले. वास्तविक पाहता निशा प्रकरणानंतर छायाच्या बाबापेक्षा तिच्या आईने जास्त सावध व्हायला हवे होते. छायाला विश्वासात घेऊन हे ...Read More