नवदुर्गा

(4)
  • 94.5k
  • 2
  • 37.2k

नवदुर्गा भाग १ हिंदु धर्मात भगवती देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरदऋतूच्या प्रारंभी येते. पूर्वीच्या ऋषी-मुनींनी बल संवर्धनार्थ हेच शारदीय नवरात्र पसंत केले असावे असे वाटते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य केले जाते . दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन

Full Novel

1

नवदुर्गा भाग १

नवदुर्गा भाग १ हिंदु धर्मात भगवती देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरदऋतूच्या प्रारंभी येते. पूर्वीच्या ऋषी-मुनींनी बल संवर्धनार्थ हेच शारदीय नवरात्र पसंत केले असावे असे वाटते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य केले जाते . दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन ...Read More

2

नवदुर्गा भाग २

नवदुर्गा भाग २ देवीच्या नऊ रूपांची पूजा करणे म्हणजेच नवरात्र साजरे करणे नवरात्र हा नऊ रंग आणि नऊ दिवसांचा उत्साहवर्धक सण...!! शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव असुन ते देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणजे ते शरद ऋतूच्या प्रारंभी येते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. निसर्गाने पावसाळ्यात ...Read More

3

नवदुर्गा भाग ३

नवदुर्गा भाग ३ उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल मंगळवारचा रंग लाल बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या सात दिवसाचे रंग ठरवले आहेत. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत. मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या नऊ दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा व मानसन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असे. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते. सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा ...Read More

4

नवदुर्गा भाग ४

नवदुर्गा भाग ४ चौथ्या दिवशी संध्याकाळी देवीची मिरवणूक काढून तिचे नदीत कींवा तळ्यात विसर्जन करतात. दुर्गा ही या दिवसात माहेरी आलेली असते अशी समजूत आहे. म्हणूनच बंगालमधल्या गृहिणी या माहेरवाशिणीसाठी नाना प्रकारची पक्वान्ने करतात. दुर्गापूजेच्या प्रारंभी दुर्गेची मातीची दशभुजा मूर्ती बनवतात. तिचे रूप सिंहारूढ महिषासुरमर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिकेय, गणेश, लक्ष्मी व सरस्वती यांच्या मूर्ती असतात. या मुर्ती उंच व अवाढव्य असतात . या मुर्ती बनवण्यासाठी दहा ठिकाणची माती वापरली जाते . यासाठी खास करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या अंगणातली माती आणली जाते . देवीचा सहचर असलेल्या भगवान शंकराला तिच्या मस्तकाच्या वरच्या बाजूला स्थान दिलेले असते. या मुर्ती ...Read More

5

नवदुर्गा भाग ५

नवदुर्गा भाग ५ आयुर्वेद अनुसार प्रथम शैलपुत्री म्हणजे हरड़ हीला मानले जाते . अनेक रोगात रामबाण असलेली ही हरड हेमवती आहे म्हणजे हिमालयात असणारी . जिला शैलपुत्रीचे रूप मानले जाते . ही आयुर्वेदातील प्रमुख औषधि आहे जी सात प्रकारची असते . यामध्ये “हरीतिका “(हरी) भय घालवणारी आहे . “पथया” म्हणजे हित करणारी “कायस्थ” जी शरीर स्वस्थ ठेवते . “अमृता” म्हणजे अमृतासारखी कधीच मृत न होणारी “हेमवती” म्हणजे हिमालयावर असणारी “चेतकी” म्हणजे चित्त प्रसन्न करणारी “श्रेयसी” म्हणजे यश देणारी (यशदाता) “शिवा” म्हणजे कल्याण करणारी. =====दुर्गा देवीचे दुसरे रूप देवी “ब्रह्मचारिणी”===== नवरात्रोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी आई ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ...Read More

6

नवदुर्गा भाग ६

नवदुर्गा भाग ६ जे अध्यात्म आणि आध्यात्मिक आनंदाची आस करतात त्यांना या देवीची उपासना करून हे सर्व सहज मिळते. मनुष्य भक्तीने आई ब्रह्मचारिणीची पूजा करतो, त्याला सुख, उपचार आणि आनंद मिळतो, त्याला भीती वाटत नाही. आई ब्रम्हचारीणीचे रुपात ओळखली जाणारी आयुर्वेदातील दुसरी वनस्पती ब्रह्मचारिणी म्हणजे ब्राह्मी ब्राह्मी ही आयुष्य आणि स्मरण शक्ति वाढवणारी , रक्त विकारांचा नाश करणारी आणि स्वर मधुर करणारी आहे . यामुळे ब्राह्मीला “सरस्वती” सुद्धा म्हणले जाते . ही मन आणि बुद्धी दोन्हीसाठी शक्ति देते . गैस आणि मूत्ररोगासाठी हे प्रमुख औषध आहे . रक्त विकार मूत्राद्वारे बाहेर काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त औषधि आहे . म्हणून या ...Read More

7

नवदुर्गा भाग ७

नवदुर्गा भाग ७ ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते. या देवीचे आठ हात आहेत, म्हणूनच त्यांना अष्टभुजा म्हणतात. सात हातात अनुक्रमे कमंडल, धनुष्य, बाण, कमळ-फूल, अमृत-आकाराचे कलश, चक्र आणि गदा आहेत. आठव्या हातात सर्व सिद्धि आणि निधी देणारी जपमाळ आहे. या देवीचे वाहन सिंह आहे आणि सिंहावर त्यांचे प्रेम आहे. या देवीला कोहळ्याचा बळी प्रिय आहे . संस्कृत मध्ये कोहळ्याला कुष्मांड म्हणतात म्हणून देवीचे नाव कुष्मांडा या देवीचे वास्तव्य सूर्यमंडलाच्या अगदी आतील लोकात आहे . सूर्यलोकात राहण्याची शक्ति किंवा क्षमता ही फक्त या देवीमध्ये आहे. म्हणूनच देवीच्या शरीराची कांति आणि प्रभा सूर्याप्रमाणे दैदीप्यमान आणि तेजस्वी आहे . त्याच्या ...Read More

8

नवदुर्गा भाग ८

नवदुर्गा भाग ८ महर्षि कात्यायन यांनी सर्वप्रथम या देवीची पूजा केली या कारणाने देवीला कात्यायनी म्हणून ओळखले जाते . पण कथा सांगितली जाते की महर्षि कात्यायनच्या मुलीने म्हणजे आई दुर्गेने आश्विन कृष्ण चतुर्दशीला जन्म घेऊन शुक्ल सप्तमी, अष्टमी आणि नवमी तिन्ही दिवशीपर्यंत कात्यायन ऋषींची पूजा स्वीकार करून नंतर दशमीला महिषासुराचा वध केला होता . असा विश्वास आहे की आईची कृपा झाल्यास सर्व कामे पूर्ण होतात . वैद्यनाथ नावाच्या ठिकाणी ती प्रकट झाली आणि तिथेच तिची पूजा केली जाते. देवी कात्यायनी भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. द्वापारयुगात भगवान श्रीकृष्ण हे पती म्हणून मिळावे अशी गोपींची इच्छा असल्यामुळे कालिंदी यमुनेच्या काठावर ...Read More

9

नवदुर्गा भाग ९

नवदुर्गा भाग ९ दुर्गेच्या सातवे रूप कालरात्रि जिला महायोगिनी, महायोगीश्वरी म्हणले गेले आहे . या देवीची वनस्पती म्हणून नागदौन नागदमनी ओळखली जाते . ही नागदौन एक औषधि वनस्पती आहे . सर्व प्रकारच्या रोगांचा नाश करणारी सर्वत्र विजय मिळवुन देणारी मन आणि मेंदूच्या समस्त विकारांना दूर करणारी ही वनस्पती आहे . ही वनस्पती आपल्या घरात लावणाऱ्या भक्ताचे सर्व कष्ट दूर होतात . ही एक सुख देणारी आणि सर्व प्रकारच्या विषांचा नाश करणारी औषधि मानली जाते . या कालरात्रि मातेची आराधना आणि नागदौन वनस्पतीचे सेवन प्रत्येक पीड़ित व्यक्तिने केली पाहिजे . ===== दुर्गा देवीचे आठवे रूप देवी “महागौरी”===== आई ...Read More

10

नवदुर्गा भाग १० - अंतिम भाग

नवदुर्गा भाग १० देवी महागौरीची उपासना केल्याने तुम्हाला अपेक्षित परिणामही मिळतात. देवीची उपासना केल्यास पापांचा अंत होतो,ज्याद्वारे मन आणि शुद्ध होते. अपवित्र आणि अनैतिक विचार देखील नष्ट होतात. देवी दुर्गाच्या या सौम्य स्वरूपाची उपासना केल्यास मनाची शुद्धता वाढते. ज्यामुळे सकारात्मक उर्जा देखील वाढते. ही मनाला एकाग्र करण्यास मदत करते. आयुर्वेदात अष्टम महागौरी म्हणून तुळशीचे नाव घेतले जाते . जिला प्रत्येक व्यक्ति औषधिच्या रुपात ओळखते . तुळस अशी वनस्पती आहे जी प्रत्येक घरात लावली जाते . तुळशीचे सात प्रकार असतात . सफेद तुळस, काली तुळस, मरुता, दवना, कुढेरक, अर्जक आणि षटपत्र या सर्व प्रकारची तुळस रक्त साफ करते ...Read More