खरा मित्र

(133)
  • 114.4k
  • 270
  • 45.6k

एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य होता. त्याला दोन बायका होत्या. एक होती आवडती व एक होती नावडती. जी नावडती होती ती दिसायला चांगली नव्हती. तिला फार कष्ट पडत. कोंबडा आवरल्यापासून ती कामाला लागे. ती दिवसभर सारखे काम करी. विहिरीचे पाणी तीच भरी. नदीवर धुण्याची मोट घेऊन तीच जाई. गुराढोरांचे तीच करी. दळणकांडण तीच करी. खटाळभर खरकटी भांडी तीच घाशी. झाडलोट, सडा-सारवण, दिवाबत्ती, सारे तीच करी. क्षणाचीही तिला विश्रांती नसे. इतके काम करूनही तिच्याजवळ कोणी गोड बोलत नसे. तिला गोड घास मिळत नसे. तिच्या वाटयाला रोज उठून शिळवड असायची. नेसू फाटके जुनेर असायचे. निजायला फटकुर मिळायचे. तिच्या अंगाखांद्यावर मणीमगळसूत्राशिवाय काही नव्हते. हातात नीटसा बिल्वरही नव्हता. दागदागिन्यांचे एक असो मेले. त्याच्यावाचून माणसाचे अडत नाही परंतु फुकाचा गोड शब्द, तोही महाग असावा? परंतु या जगात गोड बोलण्याचाही पुष्कळदा दुष्काळच असतो.

Full Novel

1

खरा मित्र - 1

एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य होता. त्याला दोन बायका होत्या. एक होती आवडती व एक होती नावडती. नावडती होती ती दिसायला चांगली नव्हती. तिला फार कष्ट पडत. कोंबडा आवरल्यापासून ती कामाला लागे. ती दिवसभर सारखे काम करी. विहिरीचे पाणी तीच भरी. नदीवर धुण्याची मोट घेऊन तीच जाई. गुराढोरांचे तीच करी. दळणकांडण तीच करी. खटाळभर खरकटी भांडी तीच घाशी. झाडलोट, सडा-सारवण, दिवाबत्ती, सारे तीच करी. क्षणाचीही तिला विश्रांती नसे. इतके काम करूनही तिच्याजवळ कोणी गोड बोलत नसे. तिला गोड घास मिळत नसे. तिच्या वाटयाला रोज उठून शिळवड असायची. नेसू फाटके जुनेर असायचे. निजायला फटकुर मिळायचे. तिच्या अंगाखांद्यावर मणीमगळसूत्राशिवाय काही नव्हते. हातात नीटसा बिल्वरही नव्हता. दागदागिन्यांचे एक असो मेले. त्याच्यावाचून माणसाचे अडत नाही परंतु फुकाचा गोड शब्द, तोही महाग असावा? परंतु या जगात गोड बोलण्याचाही पुष्कळदा दुष्काळच असतो. ...Read More

2

खरा मित्र - 2

एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य राहात होता. त्याचे नाव होते भिकंभट तो फारच गरीब होता परंतु कुटुंब फार मोठे होते. बायको होती. चार कच्चीबच्ची होती. घरात खाण्यापिण्याची सदैव पंचाईत पडायची. कधी कधी नवराबायकोचे कडाक्याचे भांडणही होई. त्या वेळेस मुले रडू लागत. शेजारीपाजारी मात्र हसत व गंमत बघत. ...Read More

3

खरा मित्र - 3

एका गावात एक ब्राह्मण होता. त्याची बायको होती. त्याला पाचसहा मुले होती. प्रपंच मोठा परंतु घरात एक पै असेल शपथ. घरात नको काय? संसार मांडला की सारे त्रिभुवन हवे. कपडालत्ता हवा, खायला प्यायला हवे, दवापाणी हवे परंतू त्रिंबकभटजीच्या घरात सर्वच गोष्टींची टंचाई. त्याची बायको रमाबाई दिवसभर खपे. कोणाची धुणी धुवी, कोणाकडे दळायला जाई परंतु तेवढयाने एवढे मोठे घर कसे चालणार? ...Read More

4

खरा मित्र - 4

एक होता राजा. त्याला सर्व प्रकारचे सुख होते. त्याला कसली वाण नव्हती. एकच दु:ख होते व ते म्हणजे त्याला नव्हते. राजा व राणी यामुळे नेहमी खिन्न व दु:खी असत. राणीने पुष्कळ उपासतापास केले, व्रतवैकल्ये केली परंतु तिची इच्छा पुरी होईना. राजवाडा संपत्तीने भरलेला होता. दारी हत्ती झुलत होते. घोडे होते, रथ होते. दासदासींना तोटा नव्हता परंतु मूल नव्हते. त्यामूळे सारे असून नसून सारखे असे राणीस वाटे. ...Read More

5

खरा मित्र - 5

एक होता राजा. त्याला दोन राण्या होत्या परंतु दोघींनाही मूलबाळ नव्हते. आपल्या राज्याला पुढे वारस कोण, असा विचार येऊन राजा दु:खी होई. कशाला हे राज्य, कशासाठी ही धनदौलत, ही कोणाच्या स्वाधीन करू, असे विचार सारखे त्याच्या मनी घोळत. राजाचे दु:ख पाहून राण्याही दु:खी होत्या. एके दिवशी कोणी तरी एक बोवा आला होता. एक राणी तेथे होती. राणी रडत होती. बोवाजी म्हणाला, 'राणी, राणी तुझ्या डोळयांत का पाणी? राजाची राणी असून दु:खी का? दासदासी पदरी असून दु:खी का? रथ, घोडे हत्ती असून दु:खी का? तुम्हाला काय कमी? तुम्हाला कसला तोटा? तुम्हासारख्या श्रीमंतांनी रडावे मग गरिबांनी काय करावे? देवाने तुम्हाला भाग्य दिले. रडू नका, रूसू नका, सुखाने नांदा.' ...Read More

6

खरा मित्र - 6

एक होता राजा. त्या राजाचा एक प्रधान होता. राजाला एक मुलगा होता व प्रधानाला एक होता. राजपुत्र व प्रधानपुत्र मित्र होते लहानपणापासून ते एकत्र वाढले. एकत्र खेळले. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. प्रधानाच्या मुलाचे लग्न झाले होते. राजपुत्राचे अद्याप लग्न झाले नव्हते. राजा एके दिवशी त्या दोघांना म्हणाला. 'तुम्ही दोघे जा, जगभर हिंडा व राजपुत्राला अनुरूप वधू शोधून काढा.’प्रधानपुत्र म्हणाला ‘हो आम्ही सर्व जागाची मुशाफिरी करतो.’ ...Read More