पाच रुपये

(4)
  • 17k
  • 0
  • 6.3k

आभाळ गच्च भरून आलं म्हणून रेल्वे स्टेशनला जाण्याच्या घाईत तो ऑटो पाहू लागला. पावसाच्या धास्तीने प्रत्येकजण मिळेल त्या ऑटोमध्ये बसून जात होते थोड्याच वेळांत त्याला देखील ऑटो मिळालं. तसं तो रेल्वे स्टेशनला चला म्हणून ऑटोमध्ये बसून घेतलं. ऑटोत बसल्याबरोबर जोराचा पाऊस सुरू झाला. ऑटोमध्ये बसून देखील त्याच्या अंगावर पावसाचे पाणी पडतच होतं. पाऊस तसं खूप जोरदार पडत होता. काही वेळात तो रेल्वे स्टेशनवर पोहोचला. जोरात पाऊस चालूच होता पण ऑटो मधून उतरणे गरजेचे होते. सोबत छत्री नव्हतं आणि पावसात भिजत स्टेशनमध्ये जाण्याशिवाय पर्याय देखील नव्हता. ऑटोमधून उतरून धावत-पळत पावसात भिजत कसेबसे स्टेशनमध्ये पोहोचला. पाऊस मोठा असल्याने एका मिनिटात पावसाने त्याला ओलेचिंब

New Episodes : : Every Saturday

1

पाच रुपये - 1

आभाळ गच्च भरून आलं म्हणून रेल्वे स्टेशनला जाण्याच्या घाईत तो ऑटो पाहू लागला. पावसाच्या धास्तीने प्रत्येकजण मिळेल त्या ऑटोमध्ये जात होते थोड्याच वेळांत त्याला देखील ऑटो मिळालं. तसं तो रेल्वे स्टेशनला चला म्हणून ऑटोमध्ये बसून घेतलं. ऑटोत बसल्याबरोबर जोराचा पाऊस सुरू झाला. ऑटोमध्ये बसून देखील त्याच्या अंगावर पावसाचे पाणी पडतच होतं. पाऊस तसं खूप जोरदार पडत होता. काही वेळात तो रेल्वे स्टेशनवर पोहोचला. जोरात पाऊस चालूच होता पण ऑटो मधून उतरणे गरजेचे होते. सोबत छत्री नव्हतं आणि पावसात भिजत स्टेशनमध्ये जाण्याशिवाय पर्याय देखील नव्हता. ऑटोमधून उतरून धावत-पळत पावसात भिजत कसेबसे स्टेशनमध्ये पोहोचला. पाऊस मोठा असल्याने एका मिनिटात पावसाने त्याला ओलेचिंब ...Read More

2

पाच रुपये - 2 - संशय

अमेयच्या मनातील संशयाने सृष्टीचा अंत झाला. त्याच्या मनातील संशय दूर करण्यात सृष्टी असफल ठरली आणि अमेयने रात्रीच्या गाढ झोपेत गळा आवळून खून केला. तिच्या मृत्यूची बातमी त्याने स्वतःच पोलिसांना दिली आणि झोपेच्या जास्त गोळ्या खाल्याने तिचा मृत्यू झाला असावा असे पोलिसांना सांगितले. पण पोलीस सर्व घटनेचा आढावा घेतला आणि काही क्षणात अमेयला हातकडी टाकून तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगाची हवा खाल्यावर अमेयला आपल्या केलेल्या कर्माविषयी पश्चाताप वाटू लागला. पण वेळ पुरती संपून गेली होती. आता ती वेळ पुन्हा परत थोडीच येणार होती. त्याच्या डोळ्यासमोरून तो वीस वर्षांपूर्वीचा काळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकू लागला. अमेय एक हुशार आणि दिसायला देखणा मुलगा होता. बारावीला ...Read More