जोडी तुझी माझी

(576)
  • 614.1k
  • 51
  • 344k

ती रस्त्यावर रडत रडतच पळत होती, तिला फार मोठा धक्का बसला होता खर तर. पळून दमल्यानंतर ती कुठेतरी एका बाकड्यावर बसली पण डोळ्यातलं पाणी मात्र थांबतच नव्हतं. तिचा विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलाबरोबर आपण लग्न करायला निघालो तो आपल्याला एवढा मोठा धोका देत आहे. रडून रडून डोळे लाल झाले होते आणि सुजले सुध्दा होते. आज जे बघितलं आणि ऐकलं तेच सारखं सारखं तिच्या डोळ्यापुढे फिरत होतं.

Full Novel

1

जोडी तुझी माझी - भाग 1

ती रस्त्यावर रडत रडतच पळत होती, तिला फार मोठा धक्का बसला होता खर तर. पळून दमल्यानंतर ती कुठेतरी एका बसली पण डोळ्यातलं पाणी मात्र थांबतच नव्हतं. तिचा विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलाबरोबर आपण लग्न करायला निघालो तो आपल्याला एवढा मोठा धोका देत आहे. रडून रडून डोळे लाल झाले होते आणि सुजले सुध्दा होते. आज जे बघितलं आणि ऐकलं तेच सारखं सारखं तिच्या डोळ्यापुढे फिरत होतं. ती गौरवी, दिसायला गोरीपान, देखणी, सुंदर टपोरी डोळे, लांब केस, साधी राहणी, तरीही आकर्षक. गौरवी खुप समजदार, समंजस, भोळी थोडी हळवी तरीही खंबीर अशी होती. नोकरी ही करायची कुणालाही एक नजरेत पसंत पडेल ...Read More

2

जोडी तुझी माझी - भाग 2

गौरवी आता शुद्धीवर आली होती आणि आपण हॉस्पिटल मध्ये कसे? कोणी आणलं इथे? म्हणून नर्स ला विचारात होती. तेवढयात औषधी घेऊन तिथे आला. आणि गौरवीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. विवेक - " मी आणलं तुला इथे, कस वाटतंय तुला आता?" गौरवी त्याच्याकडे फक्त बघत होती. वरून शांत दिसत असली तरी खूप राग , प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालत होते. विवेक - (तिला भानावर आणत) काय झालं? असं का बघतेय? मी काही केलंय का? आणि तू कुठे होतीस? तो खर तर परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता की हिला काही समजलंय का ते. नर्स तिथे समोर असल्यामुळे ती फारस काही ...Read More

3

जोडी तुझी माझी - भाग 3

आता त्याला कळलं की ही त्या माणसाला रात्री का सापडली नाही ते. थोडी सारवा सारव करायच्या उद्देशाने विवेक बोलला.विवेक " रडू नको प्लीज शांत हो आधी, अग मी परत आलो तेव्हा तू तिथे नव्हतीस मला वाटलं वॉशरूमला गेली असशील म्हणून मी किती वेळ तुझी वाट बघितली. तरी तू आली नाहीस म्हणून मग तुझी शोधाशोध सुरू केली, किती शोधलं तुला, लॉन मध्ये, हॉटेल मध्ये आजूबाजूचा सगळा परिसर शोधून काढला पण तू मिळाली नाही किती टेन्शन आलं होतं मला माहिती आहे, अशी कशी न सांगता निघून गेली, कुठे गेली विचार करून करून डोकं फाटायला आलं होतं माझं. तुझा फोनही लागत नव्हता. ...Read More

4

जोडी तुझी माझी - भाग 4

गौरावीला त्यांचं लेडिज टॉयलेट मधलं बोलणं आठवते....पण जाऊ दे आधीच खूप अविश्वास दाखवलाय आणखी नको आणि जर विवेक तिथे तर ते बोलणं पण त्याच नव्हतं, असा मनातच विचार करून ती काहीच बोलत नाही. गौरवी - हो झालंय माझं आता कुठलीच शंका नाही. विवेक - हुश्शश्श..... त्यानी मनातच विचार केला आता हिला परत हॉटेलवर न्यायला नको नाहीतर सगळं पितळ उघडे पडायचं. कसतरी संभाळलय पुन्हा विस्कटेल. आता परत खोटं बोलून विवेकनी आणखी एक बाजी जिंकली. गौरवीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि साध्या भोळ्या स्वभावाचा विवेक फायदा घेत होता. विवेक - बरं काही खाऊन घ्यायचं का आता नाहीतर आणखी भोवळ यायची. गौरवी (काहीसं हसत) ...Read More

5

जोडी तुझी माझी - भाग 5

आजची पहिली रात्र आणि हा अस वागतोय 2 दिवसांनी किती दूर जाणार एकटाच. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, तिनी स्वप्न बघितली होती पण सगळी मातीमोल होतांना दिसत होती. ति स्वतःला सावरतच उठली आपला समाज शृंगार उतरविला आणि साधे कपडे घालून त्याच्या बाजूला पडली. तीही थकली होती पण तिला झोप येत नव्हती. तिला तिच्या वडिलांची आठवण येत होती परदेशात राहणाऱ्या मुलाला त्यांना मुलगी द्यायची नव्हती खर तर एकुलती एकच मुलगी आणि ती ही परदेशात नको, री आमच्यासमोर असावी आणि आम्ही तीच सुख बघून समाधानी राहावं अशी त्यांची ईच्छा होती, पण आता लग्न झालंय. उद्या मी सगळ्यांना कस समजविणार याचाच विचार ...Read More

6

जोडी तुझी माझी - भाग 6

आई - ते मला काही माहिती नाही. ती इथे राहणार नाही, तू तुझं तिकीट केलं तेव्हा तुला माहिती होत की आपलं लग्न होणार आहे आणि गौरवी व सोबत असेल मग दोघांचेही तिकीट का नाही केलं तू?विवेक - अग आई तुला कस सांगू अग तिकडे राहायची माझीच अजून नीट सोय नाहीय तर मी तिला कुठे ठेऊ? मी शेअरिंग मध्ये मुलांबरोबर राहणार आहे. आणि अग आम्ही दोघेही गेलो तर तुमच्याजवळ कोण थांबेल? तुमची काळजी कोण घेईल? म्हणून मी तिला नेणार नाहीये.आई - चिढून विवेक तू आमची काळजी नको करू. आम्ही दोघे आहोत एकमेकांसाठी. आणि ती या घरात आमची सून आहेच पण ...Read More

7

जोडी तुझी माझी - भाग 7

विवेकला थोडं शांत झाल्यावर जाणवत की उगाच चिढलो आपण तिच्यावर. तिला खुश ठेवायला हवं नाहीतर तिला संशय येईल उगाच. तो परत खोलीत येतो. गौरवी दरवाज्याकडे पाठ करून बेडवरच्या कपड्यांच्या घड्या घालत असते.विवेक - गौरवी ऐक ना, i m sorry मी उगाच चिढलो तुझ्यावर.त्याच बोलणं ऐकून गौरवीचा राग कुठल्या कुठे पळून जातो, त्याने स्वतःहून बोलावं हेच तर तिला हवं होतं कालपासून. पण ती काहीच बोलत नाही. त्याच बोलणं ऐकून पुन्हा आपलं काम करत राहते.विवेक - खरतर मी आई बाबांना सोडून कधी कुठेच गेलेलो नाही, आणि आता सरळ परदेशात जातोय, खूप सवय आहे मला त्यांची आणि काळजी ही वाटते कारण ते ...Read More

8

जोडी तुझी माझी - भाग 8

गौरवी फ्रेश होऊन येते आणि बाबा सोफ्यावर टीव्ही बघत बसले असतात त्यांच्या बाजूला येऊन बसते. गौरवी - बाबा मला काही सांगायचं आहे, खर तर त्यासाठीच मी येथे आले आहे. पण मला एक वचन द्या की तुम्ही माझी पूर्ण गोष्ट संपल्याशिवाय मधात बोलणार नाही. चिढणार नाही आणि स्वतःला त्रास करून घेणार नाही. गौ बाबा - काय झालं बाळा? सासरी सगळं ठीक आहे ना? त्रास तर नाही ना दिला कुणी तुला? गौरवी - नाही हो बाबा खूप चांगले आहेत सगळे, माझी खूप काळजी घेतात, मला कोण त्रास देईल. गौ बाबा - मग काय सांगायचंय, सांग तू मी नाही बोलणार तुझं झाल्याशिवाय. ...Read More

9

जोडी तुझी माझी - भाग 9

दिवसामाघून दिवस जात होते. गौरवी विवेकच्या आणि तिच्याही आईबाबांची काळजी घेत आपली नोकरी सांभाळत होती तर इकडे विवेक आयशाच्या फिरत होता. कुठलीच भीती नाही, कुणी रोकटोक करणार नाही, म्हणून ते दोघे मस्ती मजा करत होते. पण यात एक चांगलं की विवेक जवळपास रोजच घरी फोन जरूर करायचा. एकदिवस बाबांनी त्याला कधी येतोय म्हणून विचारलं, पण त्याने 'आता नाही जमणार खुप काम आहे' म्हणून टाळलं .4 महिने तिकडे राहिल्यावर आई बाबांच्या रोजच्या प्रश्नाला कंटाळून त्याने भारतात आई बाबांना भेटायला यायचं ठरवलं. आणखी पुढे 2 महिन्यांतरच तिकीट बुकिंग केलं. तस आई बाबांना सांगितलं . गौरवी बाहेर गेली होती. ती घरी येताच आईने ...Read More

10

जोडी तुझी माझी - भाग 10

परदेशात आल्यामुळे गौरवीला तिचा जॉब मात्र सोडावा लागला. इकडे आल्यानंतर विवेकने तिला कुठेच बाहेर नेलं नाही. जवळ जवळ 2 उलटून गेले होते, घरात बसून ती ही कंटाळली होती.... म्हणून एक दिवस ती बाहेर पडली. पण अनोळखी देश, अनोळखी लोक, आणि अनोळखी शहर तिला कुठे जायचे काहीच सुचत नव्हतं. असच चालत चालत ती एका मंदिरापर्यंत पोचली. तिला फार आनंद झाला, काही नाही तर देव आणि मंदिर तर ओळखीचं भेटलं. ती रोज काम आवरलं की रिकाम्या वेळात तिथे जाऊ लागली. हळूहळू तिची तिथे येणाऱ्या काही लोकांशी ओळखी झाली. आणि आता ती ही खुलली. पण तिने विवेकला यातलं काहीच सांगितलं नव्हतं ( ...Read More

11

जोडी तुझी माझी - भाग 11

विवेक आपल्यावर रागावणार तर नाही ना असा विचार तिच्या मनात आला आणि आता तिला आत जायची भीती वाटू लागली. ही इकडे गौरवीचाच विचार करत होता, आपल्याला लागलं तर किती कळवळत होती, आपण किती त्रास दिला तिला तरी सुद्धा अजूनही किती प्रेम करते आपल्यावर, आज माझीच चूक असतानाही स्वतःला दोष देत रडत होती गाडी मध्ये, मी किती मूर्ख होतो की हीच प्रेम समजू शकलो नाही, आजपर्यंत कुठलीच मागणी केली नाही की कुठलाच हट्ट धरला नाही तिने आपल्याकडे , ती करू शकली असती कारण हक्काचा नवरा होतो मी तिचा, पण नाही नेहमी समजून घेतलं मला, आणि आज लागलं मला होतं पण अस ...Read More

12

जोडी तुझी माझी - भाग 12

विवेक आणि गौरवी परत दोघेच होते रूम मध्ये. गौरवी - तु काही खाल्लं नाहीय ना तर मी ज्यूस घेऊन का तुझ्यासाठी? भूक लागली असेल ना. आले मी लगेच तोपर्यंत आराम कर. विवेक - हो पण 2 आणशील हं. गौरवी - बर ठीक आहे. ती लगेच हॉस्पिटलमधून बाहेर गेली आणि जवळच्या मार्टमधून 2 फ्रेश जूस घेऊन आली. विवेक तिचीच वाट बघत होता. गौरवी - अरे आराम करायचा ना थोडा. (आणि जुस त्याच्या हातात देत) घ्या हा झाला की दुसरा देते. विवेक - मला एवढंच पुरे होतो, दुसरा जूस मी तुझ्यासाठी मागवला होता, मला माहिती आहे तू ही काही खाल्लं नसणार ...Read More

13

जोडी तुझी माझी - भाग 13

घराच्या जवळच अगदी एक खूप छान गार्डन असतं. डॉक्टर निघून गेल्यानंतर गौरवी आणि विवेक तयार होतात आणि त्याच गार्डन जातात. तिथे एक बेंचवर बसून दोघेही जण गार्डन ची सुंदरता न्याहाळत असतात. बोलायचं असत पण शब्द सुचत नाहीत.इकडे तिकडे बघता बघता अचानक दोघांची नजरानजर होते आणि क्षणभरासाठी दोघेही एकमेकांत गुंतून जातात. पण लगेच भानावर येत तो नजर फिरवतो आणि पुन्हा इकडे तिकडे बघू लागतो. तीने मात्र तिची नजर त्याच्यावरच रोखून ठेवली असते. त्याची चलबिचल बघून तीच सुरुवात करते,गौरवी - विवेक, तू काही विचारणार होतास ना? विचार न मग.विवेक - अ... अ.. हो म्हणजे अग गेले 8 दिवस घरी राहून मला ...Read More

14

जोडी तुझी माझी - भाग 14

आणि ते दोघेही घरी परत जायला निघतात.दोघेही सोबत घरी पोचतात, रात्रीच्या जेवणाची वेळ झाली असते त्यामुळे दोघांनाही भुकेची जाणीव गौरवी - विवेक 15 मिनीट दे फक्त मी लगेच गरम पोळ्या करते आणि मग जेवायला वाढते. विवेक - मी मदत करू का काही? म्हणजे अग 15 मिनिटांमध्ये कसा काय स्वयंपाक होणार?गौरवी - आपण बाहेर जायच्या आधीच मी सगळी तयारी केली होती बस भाजी फोडणी घातली आणि पोळ्या केल्या की झालं... आणि हो बरा झाला ना की मग करशील मदत आता जरा आराम कर..विवेक - जशी आज्ञा राणीसाहेब... गौरावीला विवेकच्या अश्या बोलण्याचं हसूच येतं... गौरवी - काहीतरीच हा आता हे ... जा आराम कर झालं ...Read More

15

जोडी तुझी माझी - भाग 15

गौरवी किचन आवरत असते तेवढ्यात विवेक चोर पावलांनी येऊन तिच्या मागे उभा राहतो.. ती तिच्या कामात मग्न असते आणि शांतता असते. तो हळूच तिच्या कान जवळ आपलं चेहरा नेतो आणि हलक्या आवाजात "गौरवीss " म्हणतो पण ती मात्र घाबरून जोरात ओरडते आणि वळायला जाते, त्याचा धक्का लागून पडणार तोच तो तिला सावरतो आणि घाबरल्यामुळे गौरवी पटकन त्याच्या मिठीत शिरते... 2 मिनिट तिला काही सुचतच नाही ती तशीच विवेकच्या मिठीत असते पण भानावर आल्यानंतर मात्र त्याला जोरात लांब लोटते आणि त्याला ओरडते....गौरवी - अस कुणी करतं का? मी किती घाबरले माहिती आहे...विवेक - हो माहिती आहे तू मिठी मारली तेव्हा ...Read More

16

जोडी तुझी माझी - भाग 16

फोन उचलला पण फोन वर गौरवी नव्हती... आवाज ओळखीचं वाटला पण हे कस शक्य आहे असा विचार करून त्याने - हॅलो, कोण बोलतंय? आणि गौरवी कुठे आहे?समोरून - ओळखलं नाहीस, इतक्या लवकर विसरलास? इतकी कशी तुझी स्मरणशक्ती कमजोर आहे रे...विवेक - हे बघा सरळ आणि स्पष्ट सांगा कोण आहेत तुम्ही? आणि माझ्या घरात काय करताहेत? आणि गौरवी कुठे आहे?समोरून - हो हो सांगते सांगते, मी आयशा बोलते आहे.. आणि गौरवी इथेच आहे ... आता तरी ओळखलं ना? विवेक आयशा त्याच्या घरी हे ऐकून जरा घाबरलाच.. पण स्वतःला सावरत तो..विवेक - आयशा!!! तू माझ्या घरी काय करतेय? कशाला आली तू? आयशा - ...Read More

17

जोडी तुझी माझी - भाग 17

आयशा - अरे तुला भेटायला, कितीही नाही म्हंटलं तरी मी गर्लफ्रेंड आहे तुझी, तुझी काळजी वाटणारच ना...विवेक - गर्लफ्रेंड नाही होती, 4 महिन्या आधी तूच मला सोडून गेली होतीस, आणि एवढी काळजी वाटते तुला माझी तर तेव्हा का नाही केली काळजी हं? का सोडून गेली मला? पण बरच झालं तू सोडून गेली निदान तुझं खर रूप तर समोर आलं किती लालची आणि स्वार्थी आहेत तू ते... आणि गौरवी ती बिचारी तुझ्यामुळे किती त्रास तिला सहन करावा लागला तरी ती किती समजदार तिनी मला समजून घ्यायचाच प्रयत्न केला नेहमी... आज ती आहे म्हणून मी आहे नाहीतर माहिती नाही माझं काय ...Read More

18

जोडी तुझी माझी - भाग 18

तीची बॅग भरून झाली होती आणि शेेवटच वाक्य म्हणत ती निघत होती.. विवेक - ती परत नाही आलीय ग... मी तिला परत कधी येऊ पण देणार नाहीय आता... तू प्लीज एकदा माझं ऐकून घे.. मला एक चान्स तर दे ना स्वतःला व्यक्त करायचा.. तो तिला अडवत तिच्या समोर जाऊन गुडघ्यावर बसून आणि हात जोडत तिला विनवणी करत होता.. हे बघून गौरावीला वाईट वाटलं पण राग इतका जास्त होता की तिने त्याच काही एक ऐकलं नाही.. आणि सरळ निघून गेली.. तो गेला तिच्या मागे तिला समजवायला पण त्याचा काहीच उपयोग नव्हता.. ती टॅक्सी घेऊन निघून गेली होती..टॅक्सी घेऊन निघाली तर खरं पण ...Read More

19

जोडी तुझी माझी - भाग 19

गौरवी विचार करत ऐरपोर्टवरच कॉन्टॅक्ट लिस्ट चाळत बसली होती.. आणि बघता बघता तिची बेस्ट फ्रेंड रुपाली वर ती थांबली.. फोन केला तर ती ऑफिस मध्ये होती.. पण गौरवीचा फोन बघून लगेच उचलला.. गौरवी - हाय रुपाली, कुठे आहेस? रुपाली - हाय, गौरवी मी ऑफिस मध्ये आहे, किती दिवसांनंतर बोलतोय आपण.. तू कुठे आहे आली का इकडे? आपण भेटुयात हं खूप दिवस झालेत तुला भेटून...गौरवी - तीच सगळं बोलणं टाळत, रुपाली मला तुझ्या कडून एक मदत हवी होती..रूपालीला गौरवी थोडी गंभीर असल्याचं समजतं, आणि ती हीरुपाली - गौरवी तू बोल तर डिअर, काय झालंय? तू एवढी नाराज का वाटते आहे?गौरवी - रुपाली ...Read More

20

जोडी तुझी माझी - भाग 20

राहुल - हम्म... नियती आहे boss.. अशीच खेळते ती..बरं चलं बराच वेळ झालाय, झोपुयात अजून उद्या कामावर जावं लागेल बोलण्यावरून विवेकला क्लिक होत की ऑफिसला पण जायचंय तो लगेच राहुलला पुन्हा आवाज देत..विवेक - राहुल अरे मी मंदिरात कसा जाऊ मग?राहुल - अरे हो, तू अस कर 2 दिवसाची सूटी घे..विवेक - अरे पण आताच 15 दिवस सुटीवर होतो आता लगेच सुटी मिळणार नाही..राहुल - हा ते पण आहे म्हणा, मग अस कर लवकर ये घरी आणि मग मंदिरात जा..विवेक - हो पण माझी आणि त्यांची वेळ सारखी नसली तर... ते आधीच येऊन गेलेले असले तर..राहुल - होऊ शकते.. ...Read More

21

जोडी तुझी माझी - भाग 21

दुसऱ्या दिवशी तो ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तो जुन्या घरी जातो आणि समोरच बघून अवाक होतो.. ते घर आयशाने नावावर कस केलं आणि का हे त्याला तेव्हा समजतं.. घरात हॉल मधेच आयशा आणि त्याचा जुन्या घराचा घरमालक रोमान्स करताना दिसतात.... घराचं दार उघडच असतं त्यामुळे विवेकला दोघही स्पष्ट ओळखू येतात.. त्या दोघांना बघून विवेकच्या पार चढतो तो टाळ्या वाजवतच घरात शिरतो..विवेक - वाह वाह आयशा वाह... आता मला कळलं तुला हे घर कस मिळालं ते.. तरी म्हंटलं तुझी इतकी ऐपत कशी झाली की तू ही प्रॉपर्टी खरेदी केली.. तू प्रॉपर्टी खरेदी नाही केली तर प्रॉपर्टी मालकाकडे स्वतःलाच विकलं..आयशा- (रागातच उभी ...Read More

22

जोडी तुझी माझी - भाग 22

गौरवीला वेकच्या आईचा फोन येत असतो...ते पाहून ती घाबरते, आता काय सांगू तिला सुचत नाही, पण उचलला नाही तर घेतील म्हणून ती उचलते... आणि सगळं नॉर्मल असल्यासारखं बोलत असते, विवेक बद्दल विचारल्यावर तो बाहेर गेला आहे सामान आणायला अस सांगून मोकळी होती आणि थोडं बोलून फोन ठेऊन देते.. तिला खूप वाईट वाटत की तिला नेहमी खोटं बोलावं लागतं त्यांच्याशी पण त्यांना दुखावन्यापेक्षा ठीक आहे असा विचार ती करते...फोन ठेवल्यावर तिला विवेकची खूप आठवण येते पण अजूनही तिचा राग गेलेला नसतो.. ती फोन मध्ये त्याचे फोटो बघत असते... तेवढ्यात रुपाली ऑफिसमधून येते, आणि गौरवी लगेच तोंड फिरवून तिचे डोळे पुसते, ...Read More

23

जोडी तुझी माझी - भाग 23

दुसऱ्या दिवशी विवेक सकाळीच मंदिरात जातो कारण आता थांबण त्याला शक्यच होत नाही.. आणि तिथेच बसून तो गौरवीची किंवा वाट बघत असतो, 4 तास होतात तो तसाच तिथे एक कॉपऱ्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला बघत असतो... 3 वाजेच्या आसपास काका काकू मंदिरात येतात पण सोबत गौरवी नसते.. त्यांना पाहून तो खुश होतो पण गौरवी नाही दिसली म्हणून थोडा नाराजही होतो, तरीही एक आशेचा किरण मिळाला म्हणून तो लगेच उठून त्यांच्याकडे जातो... विवेक - नमस्कार काका काकू, कसे आहात? काका - अरे विवेक तू इथे? आम्ही मस्त मजेत आहोत बेटा, तू कसा आहेस? विवेक - बस ठीक आहे, त्याच्या चेहऱ्यावर नातळराजीचे ...Read More

24

जोडी तुझी माझी - भाग 24

संदीपला त्याच्या मित्राची स्थिती कळते आणि तो मनापासून त्याला मदत करायची म्हणून प्रयत्न करतो.. गौरवी निघून गेल्यावर संदीप एकदा कडे सहज म्हणून एक फेरी घालून येतो , काकाकाकूंना भेटायला आलो असा बहाणा बनवून तो घरात शिरतो, घरात कुठेच गौरवी दिसत नाही... चहा पाणी घेऊन तो लगेच निघतो..दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रुपाली ऑफिसमधून येत असताना रस्त्यात एक ठिकाणी तो तिला बघतो , तो तिला लगेच ओळखून रुपलीच्या मागे जातो.. रुपलीला थांबवत..संदीप - हॅलो, मी संदीप , विवेकचा मित्र.. तुम्ही गौरवी वहिनीच्या मैत्रीण आहेत ना?रुपाली - हो , तुम्ही माझा पाठलाग का करताहेत आणि तुम्हाला कस माहिती की मी तिची मैत्रीण आहे ...Read More

25

जोडी तुझी माझी - भाग 25

गौरवी तिच्या मैत्रिणीकडे आहे आणि सुखरूप आहे. हे कळल्यावर विवेकची काळजी कमी झाली.... पण त्याच्यासमोर आणखी एक कसोटी उभी ती म्हणजे इथलं सगळं आवराआवर करून लवकरात लवकर भारतात परतायची आणि गौरावीला माफी मागायची... इथे पर्मनंट ट्रान्सफर घेतलेली असल्यामुळे त्याला पुन्हा बदली करून घेणं अवघड जाणार होतं... आणि तिथे जाऊनही गौरवीची मनधरणी करायची होती... पण तो आता तयार होता... गौरावीला परत मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार होता... दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन त्याने लगेच बदलीच अर्ज केला पण लगेच बदली मिळणं शक्य नव्हतं, बदलीला किमान 2 महिने तरी लागणार होते आणि इथल्या प्रोजेक्टची जबाबदारी पूर्ण विवेकवर होती... पण 2 महिने आणखी थांबून ...Read More

26

जोडी तुझी माझी - भाग 26

रुपाली गाडी घेऊन गेट पर्यंत येते पण तिला गौरवी दिसत नाही, ती इकडे तिकडे बघते तेवढ्यात पुढे तिला गौरवी गाडीपुढे उभी दिसते आणि लगेच गौरवीच अक्सीडेंन्ट होतो... रुपाली तिची गाडी तिथेच उभी करून गौरवी जवळ पळत जाते... अक्सीडेंन्ट झाला म्हणून आजू बाजूचा बराच जमाव तिथे जमा होतो, त्यात संदीप आणि विवेक दोघेही असतात, रुपाली गौरावीला मांडीवर घेऊन गालावर हलकेच मारत उठवण्याचा प्रयत्न करते पण डोक्याला मार बसल्यामुळे गौरवी बेशुद्ध झाली होती, गौरावीला बघून विवेक एकदम शॉक होतो पण स्वतःला सावरत तो जमवातून पुढे येऊन तिच्याजवळ जातो.. तो ही गौरवीला हाक मारत असतो पण तिचा काहीच रिस्पॉन्स मिळत नाही रुपाली ...Read More

27

जोडी तुझी माझी - भाग 27

थोड्यावेळात डॉक्टर बाहेर येतात...सगळे त्यांच्याजवळ जाऊन गौरवीबद्दल विचारतात... डॉक्टर - ओपरेशन व्यवस्थित झालं आहे... पण अजून शुद्धीवर नाही पेशंट.. 12 तासात पेशंट ला शुद्ध यायला हवी.. आपण वाट बघुयात...विवेक - डॉक्टर आम्ही तिला लांबून बघू शकतो का? डॉक्टर - हो लांबून बघा पण पेशंटला डिस्टर्ब करू नको ..गौरवीची बाबा - हो चालेल डॉक्टर, आपले खूप खूप धन्यवाद...डॉक्टर - धन्यवाद नको काका, ही आमची ड्युटी च आहे... आणि डॉक्टर निघून जातात...सगळे जण भरल्या डोळ्यांनी तिला लांबून बघतात आणि पुन्हा तिच्या रूमच्या बाहेर येऊन बसतात... विवेक गुपचूप आत जाऊन गौरावीजवळ बसतो... नर्स असते तिथे पण ती त्याला काही बोलत नाही... थोडावेळानी नर्स काही ...Read More

28

जोडी तुझी माझी - भाग 28

अगदी घाबरलेल्या अवस्थेत गौरवीने डोळे उघडले, ती मानसिक दृष्ट्या स्थिर नाही हे डॉक्टरांना जेव्हा ती शुद्धीवर येत असते तेव्हाच होतं, पण ती अर्धवट शुद्धीत सारख विवेकच नाव घेत होती, त्यामुळे डॉक्टरांनी विवेकला गौरवी जवळ थांबायला सांगितलं... कदाचित ती विवेकला समोर बघून शांत होईल असा अंदाज डॉक्टर बांधतात...गौरवी शुद्धीवर येते आणि समोर विवेकला बघून शांत होते... विवेक तिच्याशी बोलतच असतो... पण गौरवीने डोळे उघडले बघून तो लगेच डॉक्टरांना हाक मारतो, डॉक्टर जवळच असल्यामुळे लगेच येतात नि गौरावीला तपासतात... डॉक्टर जवळ असल्यामुळे गौरवी काहीच बोलत नाही फक्त विवेक कडे एकटक बघत असते... आणि विवेकच पूर्ण लक्ष तिच्याकडे आणि डॉक्टरांकडेच असत.. ती ...Read More

29

जोडी तुझी माझी - भाग 29

तेवढ्यात विवेक आत येतो, रुपलीला आत बघून विवेक - अरे वाह तू आलीस, तू आणलं का मी सांगितलं होतं - हो जीजू, हे घ्या... रुपाली डबा समोर पकडत त्याच्या हातात देते..डॉक्टरशी बोलून झाल्यावर त्याने रुपलीला कॉल करून रुपलीला गौरवीच्या आवडीचं आणि तब्येतीला सोयीस्कर असं भरली भेंडी च जेवण बनवून आणायला सांगितलं होतं..विवेक - अरे वाह , ग्रेट... चल गौरवी थोडं खाऊन घे तुला बरं वाटेल... डॉक्टरांनी काही पतथ्य सांगितली आहेत आणि औषधी पण घ्यायची आहे तर थोडं खाऊन घे... तो तिच्यासमोर टेबल लावतच तिच्या कडे न बघता बोलत असतो... रुपाली हळूच गौरवीच्या आईला हाताच्या इशाऱ्याने खुणावत बाहेर जाऊयात अस म्हणते, आणि ...Read More

30

जोडी तुझी माझी - भाग 30

फोन ठेऊन तो परत गौरवीच्या खोलीत येतो, गौरवी शांत झोपली असते आणि रुपाली तिच्या बाजूनी बसून पुस्तक वाचत असते...आज हृदय आक्रंदत असतं, गौरवी असा काही विचार करेल अस त्याला वाटलंच नव्हतं, चिढली आहे, रागात आहे, काही दिवसांनी राग शांत झाला की बोलेल माझ्याशी ऐकून घेईल मला असंच त्याला वाटत होतं...त्याला रुपलीशी बोलायचं असतं, म्हणून तो तिला बाहेर बोलावतो..विवेक - तू आत गेल्यावर काही बोलली का गौरवी तुझ्यासोबत??रुपाली - अ.. हो मी तिला विचारलं की तू रस्त्यावर काय करत होतीस?विवेक - मग... काय बोलली ती?रुपाली - तिने त्या हॉटेलमध्ये तुम्हाला बघितलं होत आणि भावनेच्या भरात तुमच्याकडे पळत सुटली इकडे तिकडे ...Read More

31

जोडी तुझी माझी - भाग 31

गौरवी - तुला बोलायचं आहे ना माझ्याशी!!! ठीक आहे बोल.. पुन्हा तुझी तक्रार नको कि तुझं एकदाही ऐकून घेतलं बघू तरी अस काय सांगणार आहे तू मला नवीन जे मला माहिती नाही...विवेक - आता बोलू का? तू बरी हो ना आधी मग बोलूयात ना निवांत... सद्धे तुला आरामाची गरज आहे... उगाच हा विषय नको... त्रास होईल ग तुला...गौरवी - त्रास आजही होणार आहे, उद्याही होणारच आहे आणि आता मला त्रास होत नाहीय अस वाटत का? तुला पुढे पाहून मी जे विसरायचा प्रयत्न करत होते ते आणखी परत परत आठवतंय मला, स्वतःचाच राग येतोय की एवढं सगळं घडत असतानाही मी ...Read More

32

जोडी तुझी माझी - भाग 32

मग तो आयेशाने कस त्याला घरा बाहेर काढलं आणि पुढचं सगळं तिला सांगतो.. ते ऐकून तिलाही थोडं वाईट वाटतं, पूर्ण न ऐकताच तीला भोवळ आली होती आणि अर्धवट ऐकून त्याच गैरसमजात ती निघून गेली होती...गौरवी - अरे पण त्यादिवशी तर ती तुझी गर्लफ्रेंड असल्याचा मोठा आव आणत होती ना मग अस अचानक..विवेक - अग त्यादिवशी ती हेच सांगायला आली होती की 2 दिवसात तू घर खाली कर... ती आली नि माझी वाट लावून गेली त्या दिवंसापासून आजपर्यंत माझं आयुष्य नरक होऊन बसलंय..गौरवी - मला वाटलं मी निघून आल्यावर ती पुन्हा तुला मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.. मला तुमच्याबद्दल पुराव्या सकट सांगणं ...Read More

33

जोडी तुझी माझी - भाग 33

विवेक तिला एका टेकडीवर, निसर्गरम्य ठिकाणी घेऊन गेला... तिथे जाताच तिची सगळी मरगळ दूर झाली आणि तिला फ्रेश वाटू थोडावेळ निसर्गाच्या, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर विवेक ने आपला विषय हाती घेतला.. टेकडीवर एका मोठ्या दगडावर दोघेही बसले होते... विवेक तिच्याकडे बघत बोलू लागला..विवेक - गौरवी, मला जे सांगायचं आहे ते बोलू का??गौरवी - हम्म, त्यासाठी तर आलोय ना... तुझं ऐकून घेणार आहे मी.. विवेक - थँक्स, गौरवी खर तर मी हे सगळं तुला आधीच सांगणार होतो पण ते सांगण्या आधीच तुला ते कळलं आणि तेही खूप विचित्र पद्धतीने... मी आणि आयशा एका पार्टी मध्ये भेटलो जवळपास 4 वर्षाआधी. त्यानंतर ...Read More

34

जोडी तुझी माझी - भाग 34

विवेक आशेने तिच्याकडे बघत होता, पण ती शांत होती काय बोलावे तिलाही सुचत नव्हतं, मनाची परिस्थिती सावरायच्या ऐवजी आणखीच होती.. थोडा वेळ दोघेही शांत बसले होते... थोडावेळणी गौरवीनी बोलायला सुरुवात केली.. गौरवी - तुझं बोलणं सगळं ऐकलं मी विवेक पण मला सद्धे काहीच निर्णय करता येत नाहीये.. पुन्हा तीच मनःस्थिती आहे तुझ्यावर विश्वास ठेवू की नको... मी थोडं स्पष्टच बोलते, होऊ शकते तुला वाईट वाटेल पण मी तुझं ऐकलं ना थोडं तू ही ऐकून घे..विवेक पलटून तिच्याकडे बघत असतो, त्याच्याकडे बघून तिला समजतं की हा ऐकायला तयार आहे आणि मग ती बोलायला सुरुवात करते...बघ ना विवेक आधी तुला वाटत होतं ...Read More

35

जोडी तुझी माझी - भाग 35

दोघेही उठतात व निघता निघता..विवेक - गौरवी मला बदली मिळायला वेळ लागेल आणि तुलाही तुझा वेळ हवा आहे.. मी बदलीच आटोपून इकडे परत आल्यावर सांगितलं तर चालेल का?? गौरवी - चालेल, तुझं तू ठरव..विवेक - ठीक आहे.. मला भेटत तर जाशील ना ग कधीतरी..गौरवी - हम्मम..गाडीवर बसून ते घराकडे निघतात.. घरी रुपाली गौरावीला भेटायला आलेली होती आणि त्यांची वाटच बघत असते..त्यांना आलेलं बघून रुपाली त्यांच्याकडे येते आणि हळूच बोलते... रुपाली - अरे वाह.. झालं बोलून?? झालं का मग तुमचं मॅटर solve??विवेक - नाही अजून.. तुझ्या मैत्रिणीला पुन्हा पटवायला यावेळी फार कष्ट घ्यावी लागणार आहेत मला..गौरावी - तू केव्हा आलीस??? आणि आल्या ...Read More

36

जोडी तुझी माझी - भाग 36

विवेक जेवण करतो आणि आपल्या खोलीत निघून जातो.. इकडे गौरवी च सुद्धा जेवण होतं.. आणि ती तिच्या खोलीत जात की तिचे बाबा तिला बोलावतात....गौ बाबा- बेटा... कस वाटतंय??गौरवी - आता बरं आहे बाबा... उद्यापासून आता ऑफिसला पण जाणार आहे मी..गौ बाबा - हो ते कळलं मला, तुझी काही हरकत नसेल आणि तुला काही काम नसेल तर थोडं फिरायला जाऊयात का ? थोडं बोलायचं होत बाळा तुझ्याशी..गौरवी ला आता मात्र फार धडधडत.. तरी पण ती तिच्या बाबांसोबत जाते.. घराच्या पुढे छान छोटासा गार्डन सारख केलेल असत तिथे ते दोघे फिरायला जातात..बाबा - तू पुन्हा जॉब करणार आहेत ऐकून मला खरच खूप ...Read More

37

जोडी तुझी माझी - भाग 37

विवेकला आता खूप टेन्शन आलं उद्याच सांगायचं म्हणजे , आणि खरच मी आता सांगून गेलो तर तिकडून आल्यावर सगळे झालेले असतील का?? गौरवी म्हणते तस माझ्यावरच राग गेलेला असेल का ?? काय करू ? मी इथे असतांना सांगितल तर मला रोज त्या रागाला सामोरं तर जावं लागेल पण मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न तर करू शकेल तिकडे निघून गेल्यावर फोनवरून मी काय बोलणार आहे?? पण नाही सांगितलं तर गौरवी तिला उगाच त्रास होत राहील.. काय करू??? गौरवी राहील उद्या सोबत सांगताना अस करतो देतो सांगून माझी मन हलकं होईल.. हम्मम कितीतरी वेळ असाच काहीतरी विचार करत विवेक बसला होता त्याला झोप ...Read More

38

जोडी तुझी माझी - भाग 38

सगळे डोळ्यात प्राण आणून सासर्या सुनेचा हा प्रसंग बघत असतात.. गौरवी विवेंकच्या बाबांना घेऊन घरात येते आणि आईला म्हणते - आई सगळ्यांना पाणी दे ना ग एकदा... मला थोडं विवेकशी बोलायचं आहे ..आणि विवेकला एक बाजूला घेऊन जाते..गौरवी - विवेक तुला आज निघायचं आहे ना बराच काही आवरायचं असेल , तू अस कर तू घरी जा आणि तुझं आवरून घे.. आई बाबा येतील थोडावेळानी.. विवेक - अग पण सगळे चिढले आहेत आणि मी असा निघून गेलो तर सगळ्यांचा राग चुकवण्यासाठी पळून गेला म्हणतील ना मला सगळे.. गौरवी - विवेक मला बोलायचं आहे त्यांच्याशी.. आणि ते तुझ्यासमोर नाही बोलता येणार म्हणून तू जा ...Read More

39

जोडी तुझी माझी - भाग 38 -1

इकडे विवेक घरी तर आला होता पण अतिशय टेन्शन मध्ये तो बसला होता... काय होईल काय नाही त्याची भीती गणिक वाढत होती, गौरावीला फोन लावून विचारू का असा विचार करत कितीदा फोन हातात घेतला नं. ही लावला पण नको नको काही झालं तर तीच फोन करेल मला म्हणून ठेऊन दिला... त्याला त्याच्या बाबांचे शब्द आठवले.. आणि लगेच त्याच्या डोळ्यात पाणी दाटल.. "किती दुखवलय मी सगळ्यांना किती मूर्ख आहे मी.. इतकं सगळं चांगलं होतं माझ्याकडे पण मी कधी कशाचीच कदर नाही केली, ना कधी गौरवीची , ना कधी आई बाबांची.. एखादी धुंदी माणसाला कितपत वाईट बनवू शकते याचा खूप चांगला प्रत्यय ...Read More

40

जोडी तुझी माझी - भाग 39

गौरवी आणि विवेकच रोजच रुटीन सुरू असतं... गौरवी तिच्या नोकरीत मन लावून काम करत असते आणि विवेक तर कामाच्या आधीपासूनच खूप सिंसीयर असतो.. काही दिवसांनी गौरवीची कंपनी काही कारणास्तव विवेकच्या कंपनीमध्ये merge होते ... पण दोघही या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ असतात.. विवेकला तर गौरवीच्या कंपनीच नाव पण माहिती नसतं.. दोन्ही कंपन्या एकत्र झाल्या असतात पण त्यांचे एम्प्लॉयी त्यांच्या त्यांच्या ठिकाणीच बसत असतात.. विवेकच्या कंपनीच्या 3 ब्रांचेस असतात त्याच शहरात.. ४ महिन्यांनंतर.... गौरवी ज्या प्रोजेक्टवर काम करायची तो प्रोजेक्ट पूर्ण होतो आणि पुढे तिला लीड कंपनी मधला प्रोजेक्ट दिल्या जातो म्हणजे विवेकच्या कंपनीमधला.. आणि तिची रेपोर्टइंग कंपनी बदलते, जी विवेकच्या ...Read More

41

जोडी तुझी माझी - भाग 40

आज गौरवीला सृष्टीने बरिच काम दिलेली असतात, ऑफिस सुटायच्या वेळेपर्यंत पण गौरवी चं काम होत नाहीत म्हणून ती थांबते, ऑफिस खाली होत पण गौरवी एकटीच काम करत बसली असते.. ती निघाल्याशिवाय विवेक कधीच ऑफिसमधून निघत नसे, आज पण तो तिथेच होता, बराच उशीर झाला म्हणून तोच आज उठून तिच्याकडे जातो..विवेक - गौरवी.. अग बराच उशीर झालाय सगळे निघून गेलेत तू एकटीच का बसलीय काम करत ?? राहू दे ते सगळं बाकीच उद्या कर चल आता..गौरवी - बस विवेक थोडावेळ आणखी झालाच माझं, तुम्ही नका थांबू मी जाईल, तू निघा don't worry.. माझं झालं की मी पण लगेच निघते..त्याच्याकडे ना ...Read More

42

जोडी तुझी माझी - भाग 41

आई - अहो पण आज विवेकला सांगून आली असती किंवा त्याच्या सोबत तर काय बिघडत होतं?? अजून तरी तिने संपवलं नाही आहे ना मग नवरा होता ना तिचा.. आणि तो काळजी करतो ते चूक आहे का?? तिला कळायला नको का? अस त्याला तिथेच तातकळत ठेऊन निघून आली.. बरोबर आहे का हे?? त्याच फोन आला नसता तर आतापर्यंत आपल्या जीवाला घोर लागला असता, किती जबाबदारीने त्याने आपल्याला कळवलं... आणि मधून मधून पण आपली विचारपूस करत असतो..बाबा - अग ती एकटी नाहीच आली , विवेकची गाडी तिच्या मागेच होती, फक्त हिला माहिती नव्हतं ती तुझ्या शी बोलत असताना मी खिडकीतून बघितलं ...Read More

43

जोडी तुझी माझी - भाग 42

थोडावेळणी गौरवीच काही काम असत म्हणून ती विवेकच्या कॅबिनमध्ये येते.. तो ही काम करतच असतो..गौरवी - मी येऊ का विवेक - हो ये ना.. आणि तू नाही विचारलं तरी चालेल.. गौरवी - ती आत येत.. थोडी अडचण होती विवेक, हा एक पॉईंट मला क्लिअर होत नाहीये, सृष्टीकडे गेले असते पण ती आज जर जास्त कामात आहे आणि सकाळपासून थोडी अपसेट पण.. म्हणून मग तुझ्याकडे आले..विवेक - ये ना बस.. ती विवेकच्या बाजूच्या खुर्चीत बसते.. आणि त्याच्या कडून पॉईंट क्लिअर करून घेते. काम झाल्यावर ती निघून जात असते.. विवेक तिला बघतच असतो ती काही बोलेल अस त्याला वाटत पण ती उठून जात असते.. ...Read More

44

जोडी तुझी माझी - भाग 43

संध्याकाळी तिघे पण एक चांगल्या हॉटेल मध्ये जेवायला जातात.. ऑर्डर देतात.. ऑर्डर देताना विवेक सगळं गौरवी च्या आवडीचं मागवतो.. सृष्टीला तिच्या आवडीचं मागावं बोलतो.. सृष्टीला आणखी एक प्रश्न पडतो विवेकला गौरवी च्या आवडीबद्दल कस माहिती? ...ऑर्डर यायला थोडा वेळ असतो .. सृष्टीचे सकाळचे सगळे प्रश्न अनुत्तरित असतात आणि आता हा आणखी एक नवा प्रश्न.. तिला त्याची उत्तर हवी असतात.. तर तीच सुरू करते बोलणं..सृष्टी - विवेक मला खूप प्रश्न पडले आहेत विचारू का??विवेक - विचार विचार..सृष्टी - चिढणार नाहीस नाविवेक - नाही ग चिढणार आणि हो सकाळसाठी i m really sorry .. सृष्टी - तुला गौरवीच्या आवडी निवडी इतक्या कश्या माहिती?? ...Read More

45

जोडी तुझी माझी - भाग 44

दोघेही हॉटेल मध्ये बाहेरच्या लॉन मध्ये असलेल्या बाकड्यावर जाऊन बसतात..विवेक - कस वाटतंय तुला ऑफिस आणि काम? आधीपेक्षा काही कसला ताण वगैरे आहे का??गौरवी - नाही रे कसला ताण, सगळं छान आहे.. सृष्टी थोडी विचत्र वागायची पण आता तीचा पण गैरसमज आज दूर झाला..विवेक - हम्म.. ?पुन्हा दोघांमध्ये शांतता काय बोलावे काळात नाही.. विवेक - गौरवी तू रागावणार नसशील तर एक विचारू का??गौरवी - तू काय विचारतो त्यावर निर्भर करते रागवायच की नाही.. बर विचार..विवेक - गौरवी अजूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल राग तसाच आहे का ग?? तू मला माफ करू शकशील ना ग?? तुला मी हवा तेवढा वेळ देईल बोललो ...Read More

46

जोडी तुझी माझी - भाग 45

असेच दिवसामागून दिवस जात होते विवेक आणि गौरवी कामात गुंतलेले होते.. आता त्यांच्यात कुठलाच गैरसमज नव्हता आणि सृष्टी पण व्यवस्थितच वागत हाती.. दोघांचही ऑफिस काम घर अस सुरू होत.. एक रविवारी गौरवी विवेकच्या आईवडिलांना भेटून आली.. काही दिवसांनी विवेक आणि संदीप भेटतात.. बऱ्याच वेळा गप्पा केल्यानंतर विवेक - संदीप, तू काही लपवतोयस का माझ्यापासून?? संदीप - नाही तर, का रे?? विवेक - नाही आज मला तस जाणवतंय की तू काही तरी लपवतोयस.. संदीप - नाही रे , मी काही लपवत नाहीय, खर तर मी तुला आज काही सांगणार आहे, पण कस सांगू हा विचार करतोय.. विवेक - एवढा काय ...Read More

47

जोडी तुझी माझी - भाग 46

गौरवी सगळं ऐकत होती पण कुठेतरी हरवली होती.. तीच रुपलीच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं..रुपाली - (गौरवीला हलवत ) गौरवी, सगळे कडे बघत होते.. गौरवी तू ठीक आहे ना?? काय झालं?? काय विचार करतेय??गौरवी - अ.. अ ... काही नाही ग मी तर ऐकत होते..रुपाली - बर मग सांग तुझा काय निर्णय आहे.. तूला संदीप माझ्यासाठी पसंत आहे का??गौरवी- (थोडं स्वतःला कसंबसं सावरत) आता मिया बिवी राझी तर क्या करेगा काझी ना.. पण मला विचारलंच आहे तू तर मला संदीपशी जरा एकांतात बोलायचंय..रुपाली - ठीक आहे आम्ही बाहेर थांबतो आणि हा रेस्टो वाला स्टार्टर वरच पळवणार आहे वाटत, आम्ही ऑर्डर कुठे ...Read More

48

जोडी तुझी माझी - भाग 47

आज संगीता चा कार्यक्रम असतो इतक्या दिवसाच्या प्रॅक्टिस नंतरही गौरवीच्या मनात थोडाफार दुःख आणि वागण्यात awkwardness असतोच.. दोन तीन नंतर गौरवी आणि विवेकचा नंबर असतो आणि रुपाली आणि संदीपचा परफॉर्मन्स सर्वात शेवटी असतो.. जस जसे वेळ जात असतो गौरवी चा नर्वसनेस वाढतच असतो.. विवेक तिला धीर देत असतो पण तो स्वतः पण तर नर्वसच असतो.. गौरवी आज सिंड्रेल्ला गाऊन मध्ये खूप गोड दिसत असते विवेकला तिला बघायचा मोह आवरत नाही.. डोळ्याच्या एका कोपऱ्यातून तो सारखा सारख तिला बघत असतो..आता गौरवी आणि विवेकचा डान्स... सगळे मनात आतुरता आणि थोडी भीती घेऊन दोघांचाही डान्स बघायला सज्ज झाले असतात आणि गौरवी आणि ...Read More

49

जोडी तुझी माझी - भाग 48 - अंतिम भाग

हळदीच्या कार्यक्रमाला थोडा वेळ होता.. गेल्या गेल्या त्यांना नाश्ता मिळाला.. तो खाऊन दोघेही कामाला लागले.. हळद लागण्याची वेळ झाली पाहिले गौरवी ने संदीपला हळद लावली आणि मागून सगळ्यांनी.. नंतर सगळ्यांनी धम्माल हळद खेळली.. त्यात गौरवी आणि विवेकनेही हळदीने एकमेकांना पिवळ केलं होतं.. मनसोक्त हळद खेळून झाली आणि तिथला कार्यक्रम आवरला नंतर ती रुपाली कडे आली अर्थातच विवेकने सोडलं, रुपलीला भेटून तो निघाला.. रुपलीची पण हळद आटोपली.. मग गौरवी ने विवेकला फोन केला तर विवेक आधीपासूनच बाहेर येऊन तिच्या फोनची वाट बघत होता.. गौरवी रुपालीकडे फ्रेश झाली होती हळदीचे कपडे काढून दुसरा पल्लझो कुर्ती आणि जॅकेटचा भारी ड्रेस घातला.. त्यातही ...Read More