ती कोजागृती पौर्णिमा

(15)
  • 57.5k
  • 2
  • 25.2k

ते एकमेकांना जवळ-जवळ पाच वर्षांनी भेटले होते. पाच वर्ष. खुप काही बदललं होत त्यांच्या आयुष्यात पण एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे. 'ती.... कोजागृती पौर्णिमा' आणि आजही तीच रात्र होती.प्रत्येकजण त्या एकाच विचारात होते. आता पुढे काय होणार?आज कुणाचा नंबर असेल? सगळीकडे एकच भीतीच सावट पसरलेलं होत.सगळेजण शांत निशब्द फक्त एकमेकांकडे बघत होते. तेवढ्यात मध्येच रेवती वैतागुन बोलते. "अरे यार!!... पाच वर्ष गाईज पाच वर्षांनी भेटतोय आपण. अस किती दिवस कुढत जगणार आहात? हे बघा प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण हे येणारच आहे मग त्याचा विचार करून तुम्ही आताच आनंद का गमवत आहात. त्यावेळी ती एक चुक आपल्या कडुन

Full Novel

1

ती कोजागृती पौर्णिमा (भाग-एक)

ते एकमेकांना जवळ-जवळ पाच वर्षांनी भेटले होते. पाच वर्ष. खुप काही बदललं होत त्यांच्या आयुष्यात पण एक गोष्ट कॉमन ती म्हणजे. 'ती.... कोजागृती पौर्णिमा' आणि आजही तीच रात्र होती.प्रत्येकजण त्या एकाच विचारात होते. आता पुढे काय होणार?आज कुणाचा नंबर असेल? सगळीकडे एकच भीतीच सावट पसरलेलं होत.सगळेजण शांत निशब्द फक्त एकमेकांकडे बघत होते. तेवढ्यात मध्येच रेवती वैतागुन बोलते. "अरे यार!!... पाच वर्ष गाईज पाच वर्षांनी भेटतोय आपण. अस किती दिवस कुढत जगणार आहात? हे बघा प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण हे येणारच आहे मग त्याचा विचार करून तुम्ही आताच आनंद का गमवत आहात. त्यावेळी ती एक चुक आपल्या कडुन ...Read More

2

ती..कोजागृती पौर्णिमा (भाग-दोन)

लगेच विराज बोलतो. "हे बघा तुम्हाला राग येणार नसेल तर एक सजेस्ट करू का?"सगळे एकदम हसु लागतात. विराज त्यांच्याकडे राहतो. मग हळुच कौस्तुभ म्हणतो. "काय मित्रा? तुला कधी पासुन आमची परवानगी लागु लागली..बोल..बोल" विराज हसत बोलतो. "अरे... तस नाही. काय आहे, ते आता बाहेर सगळं बघितलं न. म्हणल आपण काहीतरी चांगलं सांगायला जाणार आणि परत तेच सगळं होणार त्यापेक्षा आपण आधीच विचारलेलं बर. असो तर प्रोग्रॅम असा आहे की, आता सगळेजण बाहेर जातील मस्त थंडगार वारा सुटला आहे. तेव्हा अंगणात शेकोटी समोर खुर्च्या मांडुन बसुत पण आज नुसतं बसायचं नाहीये तर प्रत्येकांनी एकमेकांबद्दल एक चांगली आणि एक वाईट गोष्ट ...Read More

3

ती कोजागृती पौर्णिमा (भाग-तीन)

रात्रीची वेळ.…सौरभच फार्महाऊस...खोलीत विराजच शव बघुन सगळेच स्तब्ध होतात. वातावरणात एक प्रकारची शांतता पसरलेली असते. प्रत्येकाच्या मनात एक अनामिक पसरलेली असते. सगळेच विचारमग्न होतात. आणि तेवढ्यात सौरभला गतकाळात आपण केलेल्या कृत्याची आठवण होते.भुतकाळात...सकाळची वेळ...कॉलेजचा पहिला दिवस..कॉलेजमध्ये मुलांची वर्दळ असते. कुणी आपली बाईक पार्क करत असत तर कुणी आपल्या गृपबरोबर कॅम्पसमध्ये गप्पा मारत असत. सौरभचा गृप सिनिअर असतो. तो नवीन आलेल्या मुलांची ओळख परेड घ्यायला सुरुवात करतो. सगळे स्टाईलमध्ये उभे असतात त्यांच्या समोर काही मुलं मान खाली घालुन उभी असतात त्यांना सौरभ म्हणतो. "काय रे, तुमची नाव काय आहेत?" एक मुलगा घाबरून उत्तर देतो. "माणिक.. माझं नाव माणिक आहे." लगेच ...Read More

4

ती कोजागृती पौर्णिमा (भाग-चार)

पानांची सळसळ होत असते. सगळीकडे दाट अंधार पसरलेला असतो. आणि अचानक वारा सुटू लागतो. इकडे सौरभचा गृप कब्रस्तानातील पौर्णिमाची खोदत असतात. तेवढ्यात बाजूच्याच कब्रितुन एक हात बाहेर येतो. ते सगळे अजुन घाबरतात आणि एक फूट मागे सरकतात तेवढ्यात त्यांना आपल्या मागे कुणीतरी असल्याची चाहुल लागते. आणि ते परत मागे वळतात. आता मात्र मिनलला ही खुप भीती वाटत असते. ती सगळ्यांना उद्देशुन बोलते. "यार मला वाटतंय आपण इथे नको होतं यायला. ह्या रेवतीच आपण ऐकल आणि आपला जीव धोक्यात घातला आहे. यार तु का सगळ्यांना इथं आणलस? मला वाटतंय इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे आपण इथुन निघायला हवं सोडा ते सगळं." ...Read More

5

ती कोजागृती पोर्णिमा (भाग-पाच)

सौरभ भयाण वातावरणात रात्रभर रेवतीला शोधत फिरतो. तेवढ्यात सकाळ कधी होते हे त्याच त्याला ही समजत नाही. आणि अशातच आवस्थेत असलेली रेवती त्याच्या समोर येऊन पडते तीला त्या अवस्थेत बघून सौरभ खूप घाबरतो तो एकदा आपली नजर इकडे तिकडे फिरवतो पण त्याला कुणीच दिसत नाही.सौरभ रेवतीला उठवायचा खूप प्रयत्न करतो पण रेवती शुद्धीत येत नाही शेवटी कुठे पाणी मिळत का बघावं असा विचार करून रेवतीला तीथेच एका झाडाच्या बाजूला सुरक्षित ठेऊन पाण्याच्या शोधात निघतो.थोडं दूर गेल्यावर त्याला एक विहीर दिसते तो विहिरीतून पाणी काढतो आणि परत रेवती जवळ येतो पण तोपर्यंत रेवतीला शुद्ध आलेली असते.तीला सौरभला बघून आश्चर्य वाटत ...Read More