सलाम-ए-इश्क़

(108)
  • 115k
  • 9
  • 46.7k

महानगर विकास मंडळाचे सभागृह उपस्थितांनी खच्चून भरले होते.प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.’आम्ही पुणेकर–आम्ही उद्योजक’ या संस्थेतर्फे दरवर्षी पुण्यातील नव्याने भरारी घेणाऱ्या १० निवडक तरुण उद्योजकांना देण्यात येणारा- ‘न्यूबीझ’ पुरस्कारचा आज वितरण सोहळा पार पडत होता. पुरस्कार वितरणाला सुरुवात झाली.निमंत्रितांच्या रांगेत बसलेले समस्त शिर्के कुटुंबीय आतुरतेने वाट बघत होते ते त्यांच्या लाडक्या आदित्यच्या नावाची.यंदाच्या १० उद्योजकांच्या यादीमध्ये त्याचे ही नाव होते.त्याचा हा पहिलाच पुरस्कार असल्याने शिर्के कुटुंबीयांचा उर अभिमानाने भरून आला होता.स्वतःची कंपनी असलेल्या संजय शिर्केंचा हा धाकटा मुलगा.मोठा मुलगा अभिमान..... ‘शिर्के इंजिनिरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी वडिलांच्या बरोबरीने सांभाळत होता.संजय शिर्के त्यांची पत्नी विभा,मुलगा अभिमान ,सून ऋतुजा व नातू

Full Novel

1

सलाम-ए-इश्क़ - भाग -१

महानगर विकास मंडळाचे सभागृह उपस्थितांनी खच्चून भरले होते.प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.’आम्ही पुणेकर–आम्ही उद्योजक’ या संस्थेतर्फे पुण्यातील नव्याने भरारी घेणाऱ्या १० निवडक तरुण उद्योजकांना देण्यात येणारा- ‘न्यूबीझ’ पुरस्कारचा आज वितरण सोहळा पार पडत होता. पुरस्कार वितरणाला सुरुवात झाली.निमंत्रितांच्या रांगेत बसलेले समस्त शिर्के कुटुंबीय आतुरतेने वाट बघत होते ते त्यांच्या लाडक्या आदित्यच्या नावाची.यंदाच्या १० उद्योजकांच्या यादीमध्ये त्याचे ही नाव होते.त्याचा हा पहिलाच पुरस्कार असल्याने शिर्के कुटुंबीयांचा उर अभिमानाने भरून आला होता.स्वतःची कंपनी असलेल्या संजय शिर्केंचा हा धाकटा मुलगा.मोठा मुलगा अभिमान..... ‘शिर्के इंजिनिरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी वडिलांच्या बरोबरीने सांभाळत होता.संजय शिर्के त्यांची पत्नी विभा,मुलगा अभिमान ,सून ऋतुजा व नातू ...Read More

2

सलाम-ए-इश्क़ - भाग-२

आदीचा चेहरा खुलला होता. अभिमान आदिला बघतच राहिला....- ‘आपण आपल्या आदिला इतकं खुश खूप वर्षांपासून पाहिलंच नाही’ . ...अभिशी ओळख करून दिल्यावर excuse me! म्हणून अभी निघून गेला ..त्याला आज आदीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद काहीवेळ दुरूनच बघायचा होता. अभिमान गेल्यावर थोडं रील्याक्स होत शलाका म्हणाली- ‘सो मिस्टर इत्यादी शिर्के.....इतक्या दिवसांनी भेटलास फायनली....झालं असं की माझे ‘अहो’ ह्या संस्थेचे मेंबर आहे सो.. त्यांच्या सोबत मी आले होते आणि त्यांच्याकडे सर्व अवार्डींची नाव होती, त्यात मग नाव दिसलं....म्हटलं अरे हा तर आपला इत्यादी...तुला स्टेजवर बघून कधी एकदाची भेटतेय तुला असं झालं होत, मग नवऱ्याला सांगितलं- तू तुझ्या मित्रांसोबत एन्जॉय कर ...मला ...Read More

3

सलाम-ए-इश्क़ - भाग-३

#सलाम-ए-इश्क़ पार्ट-३ आदि त्याच्या रूममध्ये त्याच्या आवडत्या आराम खुर्चीवर डोळे मिटून बसला होता... रूममध्ये अंधार होता.काळाची चक्र जणू वेगाने फिरत होती...आदिने जे आठवायचं नाही असं खूप वेळा मनोमन ठरवलं नेमकं आज तेच त्याच्या बंद डोळ्यात साठत होत....आठवणी अश्रू बनून गालावर ओघळत होत्या. काळ मागे गेला ....खूप मागे.....कदाचित १४ वर्षांपूर्वी.... सेकण्ड इयर इनटीसी-ब डिविजनचा क्लास कधी नव्हत तो आज पूर्ण भरला होता.प्राचार्यांच मार्गदर्शनपर लेक्चर होतं आणि नेहमीप्रमाणे उपस्थिती अनिवार्य होती.प्राचार्य डॉ.प्रा.देसाई पुढील ३ वर्षांचा इनटीसी इंजिनिअरिंगचा प्रवास कसा असणार आहे त्याबद्दल माहिती देतांना म्हणाले-“Students see to it that you should cover 75% attendance in each semester otherwise you likely to ...Read More

4

सलाम-ए-इश्क़ - भाग-४

पहाटेचे पाच वाजले होते. ‘स्वप्नशिल्प’ बंगल्याच्या आवारात असलेल्या पारिजातकाचा गंध पहाट गारव्यात मिसळत होता.आदीच्या रूमच्या खिडकीतून पहिलं दर्शन त्या व्हायचं.सकाळी ९ वाजेशिवाय डोळे न उघडणारया आदीला आज पहाटेच जाग आली...चेहऱ्यावरून..एक तलम अबोली ओढणी हळुवारपणे सरकते आहे असा भास त्याला एक अनामिक हुरहूर लावत होता.ह्या नव्या अनोळखी...अनामिक भावनेने त्याला अस्वस्थ व्हायला झालं.तो उठून बसला.त्याच्या बेड जवळची खिडकी अर्धवट उघडी होती.त्याने खिडकी उघडली तसा पारिजातकाचा मोहक सुगंध दरवळला.त्याने एक दीर्घ श्वास घेत तो दरवळ श्वासात भरून घेतला.विस्कटलेले केस,जडावलेले डोळे,अर्धवट जाग-झोप....तो एकटक खाली पडलेल्या पारिजातकाच्या फुलांच्या सड्याकडे बघत होता. ‘किती नाजूक आणि गोड दिसतात ही फुलं...आपण या आधी असं मन भरून ह्याचा ...Read More

5

सलाम-ए-इश्क़ - भाग-५

#सलाम-ए-इश्क़ भाग-५ ‘आशुडे मला सोडून का आलीस?’ क्लासमध्ये आल्यावर शलाका चिडून आशुला म्हणाली...तिने उत्तर द्यायचं टाळल...... मोठ्या मोठ्या डोळ्यात पाणी दाटल होत.शलाकाने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला थोपटलं..... ‘ये वेडाबाई....काय झालं? का रडतेस? मानेनेच ‘काही नाही’ म्हणत तिने डोळे टिपले. ‘आदित्य ने काहीतरी बकवास केली ना? खरं सांग....’ ‘नाही ग शले ..मीच मूर्ख आहे ...’ तिचे डोळे पुन्हा भरून आले. ‘अरे यार निट सांग ना काय झालं ?’ काकुळतीला येऊन शलाकाने विचारलं. ‘ माझ्याकडून उगाचं काहीतरी बोलल ...Read More

6

सलाम-ए-इश्क़ - भाग-६

#सलाम-ए-इश्क़आशु त्याच बोलणं ऐकून थोडी गोंधळली ....आपलं खरच चुकल का...? ती संभ्रमात पडली..ती काही बोलणार तसं तो तुटकपणे म्हणाला-‘चल बोलून झालय...सोडतो तुला.....’ ‘तू जा मला दर्शन घ्यायचंय मी जाईल रिक्षाने.....’ ती उदासपणे म्हणाली.‘मी शलाकाला प्रॉमिस केलं होत...तेव्हा तू लवकर दर्शन घे तुला सोडतो मग त्यानंतर आपला काही सबंध नाही....’ तो शांतपणे म्हणाला...पण मनात उठणाऱ्या वादळांना शांत करणं त्याला जड जात होत.दोघांचेही डोळे भरून आले होते....पण माघार घ्यायला कुणीही तयार नव्हतं.त्याने तिला वाकडेवाडीला सोडल आणि तो निघाला.......खरा संघर्ष तर आता सुरु झाला होता..... त्या दिवसानंतरचा आदित्य पूर्णपणे वेगळा झाला.त्याचा पूर्ण वेळ त्याने अभ्यासाला वाहून घेतला.आशुचा विषय त्याने पूर्णपणे बंद केला होता.ती जवळून ...Read More

7

सलाम-ए-इश्क़ - भाग-७

भाग- ७ काही दिवसांपूर्वी झालेलं भांडण,वाद.. त्यानंतरची चिडचिड सगळं शांत झाल होतं आणि शब्दांनी सांगता येणार नाही की डोळ्यांनी होणार नाही अशी एक जाणीव गुलाबी रंग लेऊन गालांवर सांडली होती. आता टर्म संपायला एकच आठवडा शिल्लक होता,सबमिशनच वारं वहायला लागलं होत.एका महिन्यापासून घेतलेली मेहनत आणि जिद्दीमुळे आदित्यचं सर्व सबमिशन पूर्ण होतं. ‘आदित्य एक मिनिट बोलायचं होत तुझ्याशी....’ ‘बोल...’ ती चाचरत होती तिचे शब्दच हरवले.मग पेपरमधून लक्ष काढत आदि हातची घडी घालून तिच्याकडे बघत उभा राहिला. ‘तेव्हा....तेव्हा मी जे काही बोलले ते.....ते...I really didn’t mean it. मी खूप घाबरले होते...सो मला काही सुचलं नाही... आणि मी उगाच काहीतरी बोलून गेले....होप ...Read More

8

सलाम-ए-इश्क़ - भाग-८

आशुच्या चेहऱ्यावर पसरलेल लाजेच चांदण त्या भर उन्हातही चमकत होत...म्हणूनच की काय शलाकानेही तिला काही विचारायचं टाळलं आणि ते ‘आशुडे तू सॉरी बोललीस की नाही आमच्या इत्यादीला? ‘ohh my god….look at you baby…you are blushing………….’ ‘जाडे बास ना आता...........चल जाते मी घरी उद्यापासून दुसरा विषय घेऊ अभ्यासाला.’ शलाकाला एक चापट मारत ती निघाली. रात्री कितीही प्रयत्न केला तरी आशुचे डोळे लागत नव्हते आणि तिकडे स्वप्नशिल्पमध्ये ही परिस्थिती वेगळी नव्हती. खिडकीतून दिसणारी चंद्रकोर तिलाच गालातल्या गालात हसतेय असं जाणवून तिकडे एकटक बघत ती डोळ्यांनीच त्या चंद्रालाच जणू जाब विचारात होती- ‘बघ तो तुझ्यापासून दूर आहे पण मला दिसतोय की इतक्या ...Read More

9

सलाम-ए-इश्क़ - भाग- ९

आतल्या खोलीच्या दरवाज्यालगत बायका बसल्या होत्या.उंबरठ्याला टेकून आशु,सीमा आणि तिच्या आणि काही दुसऱ्या चुलत बहिणी बसल्या होत्या. भाऊकाकांनी आपल्या नजरेने एकदा सगळ्यांकडे पहिले आणि एक गंभीर आवाज गरजला.- कोपऱ्यात बसलेला दिन्याकाका आता मात्र धीर सुटल्यावर चवताळून बोलला-“ ...केलं हुतं..पोरीन लगीन..चूक झाली होती तिची,पण पोरगा जातीचा होता,मराठा होता, चांगला इंजेनेर होता मंबईत...भाऊ पोरीन बघितलय ट्रक सरळ अंगावर घुसला तो....काय चूक व्हती हो त्याची,एकुलता एक होता आईबापाला....तिच्या संग नात तोडलं व्हतच ना आपुन,हे काय राजकारण,समाजकारण नव्हत भाऊ तिचं आयुष्य होत्याचं नव्हतं करायला.. जागेवर संतापाने थरारात भाऊ जणू कडाडलेच – अन राहिला प्रश्न आमच्या तायडीचा माझ्याच घरात नासक फळ आहे म्हटल्यावर कापून ...Read More

10

सलाम-ए-इश्क़ - भाग - १०

मध्यरात्री केव्हातरी आदीचे डोळे उघडले..खोलीतले दिवे चालूच होते.कितीवेळ तो तसाच पडून राहिल्याने अंग ठणकत होतं.तो उठून बसला.डोकं अजूनही भणभणत फोन बंद येत होता.आता मात्र त्याला वास्तवाची जाणीव झाली....हे सगळं आपल्यासोबत खरच झालय आणि आपण आशुला आयुष्यातून कायमच गमावलय ह्या जाणिवेने तो हतबल झाला. मागे टेकून बसला...श्वासांची गती वाढली होती....डोक्यात विचारांची गर्दी गर्दी झाली होती- आशु तू का बोलली नाहीस ह्याबद्दल माझ्याशी...आपण काहीतरी मार्ग काढला असता रे पिल्ल्या...प्रत्येक अडचणीवर मार्ग असतो ना आणि हे असं एकट्याने निर्णय घेण्याचा अधिकार तुला कुणी दिला गं?...तुझं आयुष्य तुझ्या एकटीच राहिलं होतं का? तुझ्या सोबत आता माझंही आयुष्य बांधल गेलं होत ना? मग का ...Read More

11

सलाम-ए-इश्क़ -  भाग - ११

कालचा कार्यक्रम,त्यानिमित्ताने झालेली धावपळ यामुळे आदिला जाग आली तेव्हा सकाळचे ९ वाजून गेले होते. ऑफिसला जायला उशीर होणार तो स्वतःवर चिडला आणि त्याने आवरायला घेतलं. ‘आका तुला माहित आहे आजीमॉम माझ्यासाठी एक न्यू काकी आणणार आहे...........’ “डॅडी ! मी आत्ताच आलोय ना..मला आकाला न्यू काकीबद्द्ल सांगायचंय ….माझा फ्रेंड ओम आहे ना त्याची काकी त्याला डान्स,ड्रॉईंग शिकवते ..तर न्यू काकी पण मला शिकवेल का हे विचारायचंय...आणि ती मला .....” खुर्चीला हळूहळू हेलकावे देत अगस्त्य बोलत होता तसं त्याला अलगद उचलून खाली ठेवत अभिमान म्हणाला-“अगस्त्य चल पळ बाळा आजीमॉम ओरडेल नाहीतर” म्हणून त्याने अगस्त्यला खाली पिटाळलं आणि दरवाजा लाऊन घेतला. आदीच्या ...Read More

12

सलाम-ए-इश्क़ - भाग - १२

भाग-१२ “All India NGO Conference and Exhibition” चा पहिला दिवस उद्घाटन आणि अध्यक्षीय भाषणं यातच गेला.The Social Engineering Ltd.चा स्टॉल अगदी मोक्याच्या जागेवर होता. प्रमुख पाहुणे भेट देणार म्हणून पहिल्या दिवशी स्टॉलवर अमित सोबत आदित्यही जातीने हजर राहिला. नंतरचे दोन दिवस ठरल्याप्रमाणे बाकीचे स्टाफ मेंबर असणार होते. दुसऱ्या दिवशी नची आणि पिहू कंपनीला चांगल्याप्रकारे रिप्रेझेंट करत होते. त्यांच्या प्रोडक्टची बऱ्यापैकी इन्क्वायरी वाढत होती.सकाळपासून व्हिजिटर्सचा राबता असल्याने त्यांची दमछाक झाली होती. दुपारी लंचब्रेक नंतर ते जरा निवांत बसून गप्पा मारत होते.समोरचा स्टॉल जो सकाळच्या सेशन पर्यंत रिकामा होता त्याठिकाणी व्हॅलेंटिअर्स टीम स्टोलची अरेंजमेंट करत होती. शेजारी एक वयस्क महिला आणि ...Read More

13

सलाम-ए-इश्क़ - अंतिम भाग

पाण्याचा एक घोट घेत शांतपणे तिने बोलायला सुरुवात केली- “शले...तुला आणि आदिला चिठ्ठी लिहून मी माझ्या घरी काय प्रॉब्लेम हे सांगितलंच होत आणि तुम्हाला हा ही विश्वास दिला होता की माझं लग्न होतंय पण माझ्या मनात भलताच प्लान होता,आत्महत्या......हे शरीर,हा आत्मा...माझं असलेलं आणि नसलेलं अस्तित्व फक्त नि फक्त माझ्या आदीच होतं. मी ठरवलं स्वतःला विहिरीत जाणूनबुजून झोकून द्यायचं. ते कसं अमलात आणायचं हे ही ठरवलं...त्या दिवशी मी आरतीच ताट घेऊन विहिरीकडे निघाले होते तोच पंकजने,माझ्या चुलत भावाने मध्येच थांबवलं,तो म्हणाला भाऊजींना म्हणजे विक्रम जाधव,माझ्या चुलत आत्याचा मुलगा,माझा होणारा नवरा..त्याला बोलायचंय म्हणे महत्वाचं. दुसऱ्या दिवशी लग्न म्हणजे त्याला जावायचा मान मिळायला सुरवात झाली ...Read More