तुझा विरह - एक काव्यसंग्रह

(9)
  • 40k
  • 2
  • 13k

पाऊसओल्या सांजवेळी आला गार वारातुझ्या स्मृतींसह मला भेटण्याला ।।गारवा तो आठवांचा स्पर्शीता मनालाहृदयात माझ्या पाऊस दाटून आला ।।मनही माझे त्या पावसात चिंब भिजलेस्मृतींच्या ओझ्याचे गाठोडे रिते झाले ।।हीच तर खास बात असते ना पावसाचीसोबतीने त्याच्या भिजूनी आसवांना लपविण्याची।।-----------------------------------तू सोडून गेलास पणसोडून तू गेलास मला ज्या अनोळखी , एकट्या वाटेवर आजही मी तुला तिथेच उभी दिसेल तुझ्या परतीच्या मार्गावर..असेल जरी हा वियोगाचा कर्दनकाळ काळीज हे माझं फक्त तुझ्यासाठीच झुरणारहे तुझं माझं नातं अगदी पवित्र ,खंबीर, प्रबळ तूच सांग इतकं सहज कसं तुटणार??कुठलाच अडसर ना कधी आपल्या नात्याला शिवलापण निष्ठुर नियतीनी अगदी अचूक घाट घातला..तू म्हणाला होता ना श्वास असेल तोवर मी फक्त तुझाचबघ त्या नियतीने तो श्वासच आज काढून घेतला..तू

New Episodes : : Every Saturday

1

तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 1

पाऊसओल्या सांजवेळी आला गार वारातुझ्या स्मृतींसह मला भेटण्याला ।।गारवा तो आठवांचा स्पर्शीता मनालाहृदयात माझ्या पाऊस दाटून आला ।।मनही माझे पावसात चिंब भिजलेस्मृतींच्या ओझ्याचे गाठोडे रिते झाले ।।हीच तर खास बात असते ना पावसाचीसोबतीने त्याच्या भिजूनी आसवांना लपविण्याची।।-----------------------------------तू सोडून गेलास पणसोडून तू गेलास मला ज्या अनोळखी , एकट्या वाटेवर आजही मी तुला तिथेच उभी दिसेल तुझ्या परतीच्या मार्गावर..असेल जरी हा वियोगाचा कर्दनकाळ काळीज हे माझं फक्त तुझ्यासाठीच झुरणारहे तुझं माझं नातं अगदी पवित्र ,खंबीर, प्रबळ तूच सांग इतकं सहज कसं तुटणार??कुठलाच अडसर ना कधी आपल्या नात्याला शिवलापण निष्ठुर नियतीनी अगदी अचूक घाट घातला..तू म्हणाला होता ना श्वास असेल तोवर मी फक्त तुझाचबघ त्या नियतीने तो श्वासच आज काढून घेतला..तू ...Read More

2

तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 2

प्रीत हीसुरांचीही परीक्षा होते स्वररागिनीच्या महालीप्रीतीची तर वाटच मुळी कसोटीने भरलेलीमला चोरून बघणारी तूझी नजर मला कळलीहृदयात प्रेम असताना तू प्रीत ही नाकारली?खुल्या डोळ्यांत प्रेमाची किती मी स्वप्ने रंगविलीजमलेल्या त्या प्रेमरंगांची पाठवणी अश्रूंनी केलीतुझ्या आठवांची कसर अजून नाही सरलीमुक्या त्या प्रत्येक क्षणांनी वाट तुझी धरिलीहवी होती जागा तुझ्या मनाच्या कोपऱ्यातलीपण अमूल्य माझ्या प्रेमाची तू स्वार्थाशी तुला केली?-----------------------------------------------------साज केला लोचनी हा आज आसवांनीझाली नजरा नजर तरी धरिले मौन शब्दांनीमनीची घालमेल या जाणली का तुझ्या मनानी??मधाळ गोड क्षण सारे स्मरतात रे अजुनीस्वप्न हरवली कुठे पण साथ दिली स्मृतींनीवाट मनाची मंतरलेली मायेच्या मंत्रांनीहुरहूर ही संपेना जीवही लागला झुरनीउधळून टाकले डाव सारे प्रीत ...Read More

3

तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 3

साज केला आसवांनी आज पापण्यांवरओल्या मिठीत तुझ्या होते बेधुंद रातभरझुरते अजूनही ही वेडी त्या मधुर क्षणांवरघाव घातला कोरूनी विश्वासाचे चढत गेला कसा यातनांचा थरभावनांची कोंडी नि आठवांची दरड मनावरसाज केला आसवांनी आज पापण्यांवर...---------------------------------------------विरहाचे क्षणभावनांचा हा गोंधळ कसा मांडू कळेनाप्रेमाच्या या गुलाबी नावेत डोलु लागले सखी साजनासमीप तुझ्या असताना मन बहरून जातेविरहात तुझ्या हा क्षण जणू युगाचा भासेक्षणाक्षणाला का असे मौन पाळतात हे शब्द मौनातूनच मनाचे भाव खुलवतात हे शब्दनभ ओथंबून येता नयनी ही सावट आलेमिलनाचा या वाटेचे चित्र धूसर झालेआठवणींच्या या हिंदोळ्यात दिवसेंदिवस रंगत चाललेपसरलेल्या या गुलाबी रंगात मन नकळत दंगत चाललेउत्सुक आतुर हृदयाची ओढ प्रेमाची ती आर्त हाकमनाने मनाला ...Read More

4

तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 4

कुणासाठी ग सये..??उशीची कुशी भिजवताना ती मला पुसतेकुणासाठी ग सये तू रोज आसवं गाळते??या अश्रूंना सामावताना तिला ही कधीतरी उगाच दिलासा देण्याचा प्रयत्न ती करतेचंद्राकडे बघताना मन माझे द्वंद्व खेळू पाहेकुणासाठी ग सये तू इतकी विचलित आहे??साजनाच्या एका भेटीची आस लागली आहेसांगतो मला तो ही तुझी ओढ व्यर्थ आहेगार झुळूक आली आणि मी तिथेच गोठून गेलेकुणासाठी ग सये तुझे मन माझ्यासंगे झेपावले??सांग माझ्या साजनाला आठवांची ती कसर अजून आहेअजुनी त्याच स्मृती डोळ्यातून अश्रू बनूनी वाहेकशी सांगु यांना माझी अविरत अपूर्ण आशामाझ्या या अबोल अश्रूंची त्यांनाही कळेल का भाषा?!!----------------------------------------------------------स्वप्न आणि सत्यएक किनार सत्याची तर दुजी स्वप्नांचीअशीच आहे बिकट वाट या ...Read More