गोट्या

(19)
  • 103.4k
  • 5
  • 35.1k

आज दूरदर्शनवरील पुनः प्रक्षेपित होत असलेले रामायण मालिका पाहतांना गोट्याला म्हणजे सोहमला त्याचे 20-25 वर्षापूर्वीचे बालपण आठवून गेले. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाले होते. कोणीही घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावे म्हणून सरकारने सक्तीचे आदेश काढले. घरात बसून बसून लोकांना कंटाळा येऊ नये म्हणून सरकारने पुनश्च एकदा जुनी मालिका रामायण दाखविण्यास प्रारंभ केले होते. आज ती रामायण मालिका पाहतांना गोट्याला ती मजा येत नव्हती, जी मजा त्याने लहानपणी अनुभवली. तो आपल्या भूतकाळात रमला.

New Episodes : : Every Monday, Thursday & Saturday

1

गोट्या - भाग 1

आज दूरदर्शनवरील पुनः प्रक्षेपित होत असलेले रामायण मालिका पाहतांना गोट्याला म्हणजे सोहमला त्याचे 20-25 वर्षापूर्वीचे बालपण आठवून गेले. कोरोना संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाले होते. कोणीही घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावे म्हणून सरकारने सक्तीचे आदेश काढले. घरात बसून बसून लोकांना कंटाळा येऊ नये म्हणून सरकारने पुनश्च एकदा जुनी मालिका रामायण दाखविण्यास प्रारंभ केले होते. आज ती रामायण मालिका पाहतांना गोट्याला ती मजा येत नव्हती, जी मजा त्याने लहानपणी अनुभवली. तो आपल्या भूतकाळात रमला. खरं तर त्याचे नाव सोहम होते पण घरात, दारात, गल्लीत सर्वत्र तो गोट्या या नावानेच प्रसिद्ध होता. त्याला कारण ही तसेच होते. सोहम अगदी लहान म्हणजे शाळेत ...Read More

2

गोट्या - भाग 2

एक दोन वर्षानंतर गावातच एकाने टीव्ही आणली मग गोट्याचे बाहेरगावी बघायला जाणे बंद झाले. मात्र शाळा बुडवून फिल्म बघण्याचा चालू झाला. या शाळेत मात्र एक कडक शिस्त होती. रोज दोन वेळा हजरी व्हायची. गैरहजर असलं की दुसऱ्या दिवशी हातावर छडी पडायची. रोज वही पूर्ण करणे, शब्द पाठ करणे, शुद्धलेखन लिहिणे ही कामे करावे लागत असे त्यामुळे त्याला गोट्या खेळायला खूपच कमी वेळ मिळत असे. तरी देखील तो गोट्या खेळणे सोडत नसे. रिंगणात सर्व गोट्या टाकायचे आणि सांगितलेली गोटी उडवायची, एक खोल गड्डा करायचा त्यास गल म्हणायचे, रेषेच्या आत सर्व गोट्या टाकायचे, गलीत जर गोटी पडली तर तीन वेळा मारण्याची ...Read More

3

गोट्या - भाग 3

कॉलेजचे जीवनशालांत परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने गोट्याने जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्याचे निश्चित केले. त्याला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला. अगदी खेडेगावातून गोट्या एकदम मोठ्या शहरात गेल्यावर त्याची धांदल उडाली. तेथील घरे, वाहने आणि लोकं पाहून तो चक्रावून गेला. कॉलेजच्या जीवनाचे औत्सुक्य त्याला अगोदर पासून होते. पण तो त्या कॉलेजमध्ये अगदी नवखा होता. सारी मुले अगदी टीप टॉप मध्ये दिसत होते, त्यांचे राहणीमान देखील खूप छान होते. त्या कॉलेजमध्ये त्याला ओळखणारा एकच मित्र होता, तो म्हणजे चिंटू. त्यांचे खरे नाव चिंतामण असे जरी असले तरी त्याला सर्वजण चिंटू असेच म्हणायचे. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याची ओळख झाली आणि चांगली मैत्री जमली. चिंटूची ...Read More

4

गोट्या - भाग ४

नशीबबारावीची परीक्षा देऊन गोट्या आपल्या गावी परत आला होता. त्याला लहानपणीचे सारे खेळ आठवत होते मात्र त्याला ते खेळ आता लाज वाटत होते. सकाळचे जेवण संपवून तो पलंगावर आराम करत होता. त्याला त्याचा भूतकाळ आठवू लागला. दहाव्या वर्गात शिकताना गोट्याला एका अनोख्या संकटाला।तोंड द्यावे लागले होते. दहावीचा वर्ष म्हणून त्याचा जोमाने अभ्यास चालू होता. गोट्या शरीराने जरा हाडकुळा होता. त्यामुळे बघणाऱ्याला हा आजारी आहे की काय ? अशी शंका मनात येत असे. तसा तो भित्रा देखील होता. कोणत्याही गुरुजींचे मार पडू नये म्हणून तो गृहपाठ आणि दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करत असे. कधी कोणत्याही शिक्षकांची गोट्या विषयी अजिबात तक्रार ...Read More

5

गोट्या - भाग ५

गोट्याचे शिक्षक होण्याचे स्वप्नबारावीची परीक्षा दिल्यानंतर गोट्या आपल्या गावी परत आला. दोन वर्षे शहरात राहिल्याने त्याचे राहणीमान पूर्ण बदलून होते. तो सहसा घराबाहेर पडत नव्हता. घरातील जुने वृत्तपत, पुस्तके, मासिके वाचत होता. दुपारच्या वेळी रेडिओवर विविधभारती लावून हिंदी गाणे ऐकण्याचा काम करायचा. सायंकाळच्या वेळी तळ्याच्या काठावर मित्रांसंगे फिरायला जात असे. असा त्याचा दिनक्रम चालू होता. बारावी पास झाल्यावर काय शिकावं याबाबत तो काही ठरवू शकत नव्हता. कारण मार्क कसे मिळतात ? यावरच त्याचे भविष्य अवलंबून होते. मार्क कसे ही मिळो त्याच्या सोबत शिकत असलेले सारेचजण इंजिनिअरिंग करण्याचा ठाम निर्धार केला होता. अखेर निकालाचा दिवस उजाडला. प्रेसच्या कार्यालयात एका रूपायाला ...Read More

6

गोट्या - भाग 6

डी. एड. ला नंबर लागल्यामुळे घरातील सर्वजण खूप आनंदी होते. गोट्या देखील मनोमन खुश झाला होता. पण त्याचा नंबर भागातील कॉलेजमध्ये लागल्याने त्याची आई जरा चिंताग्रस्त झाली होती. आदिवासी भाग म्हणजे सर्व जंगली जनावरांचा भाग. माणसं देखील तशीच जनावरांसारखे जंगलात राहतात असे तिला वाटायचे. गोट्याला घराबाहेर राहण्याचा तेवढा अनुभव नाही. ती तिथे कसा राहील ? काय करून खाईल ? या विचाराने ती जरा काळजी करत होती. गोट्या मात्र आता आपण लवकरच गुरुजी होणार याचे स्वप्न पाहू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी आदिवासी भागातील कॉलेजला जाण्यासाठी कागदपत्रे आणि सोबत जेवण्याचा डबा घेऊन तो आपल्या वडिलांसोबत घराबाहेर पडला. त्याच्या घरापासून ते कॉलेज 200 ...Read More

7

गोट्या - भाग 7

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गोट्या आणि वडिलांनी थेट बस स्थानक गाठले आणि दुसऱ्या शहराला जाण्यास निघाले. गाडी वेगात धावत त्याच वेगात गोट्याचे मन देखील धावू लागले. अनेक विचार त्याच्या डोक्यात येत होते. काय होईल आणि कसं होईल ? या विचारांच्या तंद्रीत एकदाचे चार पाच तासाच्या प्रवासानंतर त्या शहरात बस पोहोचली. दोघा-तिघांना विचारत विचारत ते कॉलेजकडे जाणाऱ्या बसजवळ जाऊन पोहोचले. शहरापासून दहा किमी दूर अंतरावर उंच डोंगरावर वसलेले एक छोटेसे गाव आणि त्या गावात ते कॉलेज होते. मुख्य रस्त्यापासून अर्धा किमी दूर कॉलेज होते. बसमधून उतरून ते पायी कॉलेजकडे निघाले. सर्वत्र नीरव शांतता होती. पक्ष्याचा तेवढा किलबिल आवाज ऐकू येत ...Read More

8

गोट्या - भाग 8

डी. एड. चे दोन वर्षे अगदी मजेत सरले. प्रथम श्रेणीत गोट्या पास झाला. त्याला आता नोकरीची प्रतीक्षा होती. त्यासाठी निवड मंडळाची परीक्षा पास होणे गरजेचे होते. त्यातल्या त्यात त्याच्या संवर्गासाठी खूपच जागा कमी राहत असत. त्यामुळे त्याला जास्त अभ्यास करणे आवश्यक होते. त्याच्या अनेक मित्रांनी जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्रात जाऊन अभ्यास करू लागले तर गोट्या आपल्या गावी राहून अभ्यास करू लागला. अभ्यास म्हणजे काय ? गावातील मुलांना तो सर्व विषय शिकवू लागला. यात त्याचा दुहेरी फायदा होत होता एक तर त्याला शिकविण्यासाठी अभ्यास करावे लागायचे आणि शिकविताना तीच माहिती परत एकदा सांगितल्याने त्याचे दृढीकरण होत गेले. त्यामुळे त्याचे ...Read More

9

गोट्या - भाग 9 - माझ्या गुरुजीची दस्ती

माझ्या गुरुजीची दस्ती शाळेच्या सहलीत गुरुजींचा रुमाल पाण्यात पडतो तेव्हा एक विद्यार्थी ते रुमाल आणून सरांना देतो. गुरू-शिष्याची अनोखी शाळेच्या मैदानात सारी मुले गोळा झाली होती. शाळेला नियमितपणे न येणाऱ्या मुलांचे चेहरे देखील आज दिसत होते. साऱ्यांच्या चेहऱ्यावर खुशीची एक लहर दिसत होती. पाचव्या वर्गातील राम, विकास, उत्तम, शीला, सीमा हे विद्यार्थी सर्व मुलांना एका झाडाखाली बसवून पवार सरांच्या येण्याची वाट पाहत होते. आज निमित्त होते निसर्ग सहलीचे. रामपूर हे गाव सीता नदीच्या काठावर वसलेले दीड हजार लोकसंख्या असलेले गाव. त्या गावातील जिल्हा परिषदेची पाचवी पर्यंतची शाळा आणि त्या शाळेत पवार सर हे एकटेच शिक्षक त्या 35 मुलांना शिकवण्याचे ...Read More

10

गोट्या - भाग 10 - स्वच्छतेचा वसा

स्वच्छतेचा वसा लेखक - नासा येवतीकरबऱ्याच दिवसानंतर रामेश्वर आणि सोमेश्वर या जिवलग भेट झाली. सोमेश्वर म्हणतो, " हाय राम्या, कसं हायेस तू ? " यावर रामेश्वर त्याला उत्तर देताना म्हणतो " हाय सोम्या, मी मजेत हाय आणि तू.. "" म्या भी.."" लय दिसं झाले कुठं गेलं होतास तू ? दिसलाच नाहीस.." सोमेश्वर म्हणतो" मी गेलोतो मामाचा गावाला..."" बरं, अजून काय चाललंय मग.." यावर रामेश्वर मामाच्या गावाला गेल्यावर काय बघितलं होतं ते सांगतो " काय नाय, मामाच्या गावात ते काही तरी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान चालू हाय.." या अभियानाबाबत अजून काही जाणून घेण्याच्या उद्देशाने सोमेश्वर म्हणतो " म्हणजे ? ...Read More