कादंबरी - प्रेमाची जादू

(215)
  • 358.4k
  • 30
  • 155.1k

कादंबरी- प्रेमाची जादू भाग- १ ------------------------------------------------------------------ ..यश ..एक व्यक्ती -एक माणूस सगळ्यांना आवडेल असाच होता , त्याची family शहरातली सर्व परिचित अशी फामिली. प्रत्येकाने स्वकर्तुत्वाने कमावलेला नावलौकिक “ हे या परिवाराचे विशेष होते . यशचे आई-बाबा दोघेही भाषा-विषयाचे निवृत्त -प्राध्यापक . साहित्य व कला क्षेत्रात एक मान्यवर आणि रसिक जोडपे म्हणून त्यांचा वावर होता यशचा मोठा भाऊ .सुधीर आणि मोठी वाहिनी- अंजली , नव्या पिढीतले हे जोडपे एका मोठ्या सोफ्टवेअर कंपनीत जॉबला आहेत . यशच्या घरात लक्ष्मी –सरस्वती अगदी एकमताने आणि आनंदाने हातात हातात घेऊन रहात आहेत असेच या घरातले वातावरण पाहून वाटते . यशची एकच बहिण ..ती आणि तिची

Full Novel

1

कादंबरी - प्रेमाची जादू भाग -१

कादंबरी- प्रेमाची जादू भाग- १ ------------------------------------------------------------------ ..यश ..एक व्यक्ती -एक माणूस सगळ्यांना आवडेल असाच होता , त्याची family शहरातली परिचित अशी फामिली. प्रत्येकाने स्वकर्तुत्वाने कमावलेला नावलौकिक “ हे या परिवाराचे विशेष होते . यशचे आई-बाबा दोघेही भाषा-विषयाचे निवृत्त -प्राध्यापक . साहित्य व कला क्षेत्रात एक मान्यवर आणि रसिक जोडपे म्हणून त्यांचा वावर होता यशचा मोठा भाऊ .सुधीर आणि मोठी वाहिनी- अंजली , नव्या पिढीतले हे जोडपे एका मोठ्या सोफ्टवेअर कंपनीत जॉबला आहेत . यशच्या घरात लक्ष्मी –सरस्वती अगदी एकमताने आणि आनंदाने हातात हातात घेऊन रहात आहेत असेच या घरातले वातावरण पाहून वाटते . यशची एकच बहिण ..ती आणि तिची ...Read More

2

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - २ रा .

कादंबरी – प्रेमाची जादू भाग-२ रा ------------------------------------------------------------- मैत्री-नात्याला दुसरे कुठले लेबल लावणे , म्हणजे फ्रेंडशीपचा इन्सल्ट केल्यासारखं वाटते", यशची फिलॉसफी काही जणींना पटते काहींना फिफ्टी -फिफ्टी पटते . पण त्यांचे एकच म्हणणे असायचे - यशला आम्ही इथे समोर बसवून आमची शापवणी ऐकवणार , त्याशिवाय हमरे टूटे दिल को थंडक कैसे मिलेगी ? यातल्या काही मैत्रिणींचे “गरम दिमाग थँडे होने का नाम नही ले रहे थे ! पोरं-पोरी जमलेले असतांना, पोरींनी यशला म्हटले- ए हिरो - ऐक जरा तू- - ही आजची पार्टी म्हणजे - आम्ही तुझ्यासाठी एरेंज केलेली "खुन्नस -पार्टी " आहे असे समज , आम्ही आज तुला सामुहिक ...Read More

3

कादंबरी -प्रेमाची जादू - भाग ३ रा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ३ रा ------------------------------------------------------- पहाटेचे पाच वाजले ..आणि यशच्या मोबाईल मध्ये मिस कॉलची रिंग वाजली आवाज ऐकून यश उठला , रेल्वे स्टेशनवर जायचे आहे ..याची आठवण देण्यासाठी बाबांनी आपल्याला उठवले आहे “.हे यशच्या लक्षात आले. तसे तर तो ही जागा झालेलाच होता , साडेपाचला निघू या अस त्यचा हिशेब चालूच होता , पण, त्याचे बाबा वेळेच्या बाबतीत फारच काटेकोर ..सगळ्यापेक्षा अगोदर त्यांचीच घाई-गडबड सुरु असते ..आता सवयीने सगळेजन त्यांचे घाई घाई करणे ऐकून घेत चुपचाप आपापली कामे करीत असतात . यश त्याच्या रूममधून हॉलमध्ये आला. डायनिंग –कम –हॉल अशा नव्या पद्धतीची ही व्यवस्था सगळ्यांना आवडली ...Read More

4

कादंबरी -प्रेमाची जादू - भाग -४ था

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ४ था -------------------------------------------------------- बापू-आजोबा आणि अम्मा –आज्जी यांना येऊन आता आठवडा झाला होता. गाव की हवामान बदलते, पाणी बदलते ..हा बदल लगेच सहन होईल असे नसते .. मोठ्या –आणि वयस्कर माणसाना काही न काही त्रास होतोच असतो , त्यात फारसे काळजी करण्या सारखे काही नसते , गोष्टी अशा सहजपणे घेण्याची सवय यशच्या घरातील सगळ्यांना होती. त्यामुळे .. थोडाफार त्रास झाला तरी तो सहन करीत आजी –आजोबा म्हणत.. अरे पोरांनो ..तब्येतीच्या या सगळ्या कुरबुरी वयोमानानुसार होणार्या आहेत ..त्याचा गवगवा आणि बागुलबुवा न करता .आपलं आपण सहन करीत ,आराम करीत काळजी घेत राहिलं की .आराम पडतो. अगदी ...Read More

5

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -५ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग -५ वा ---------------------------------------------------------------- यशच्या घरची सकाळ अगदी साडेपाचला होते , सकाळचे फिरणे , असे आल्यावर बंगल्याच्या भवती मोठ्या प्रेमाने फुलवलेली बाग, त्या बागेतील झाडांना पाणी देणे , देवपूजेसाठी ताजी फुले तोडून ठेवणे .. या कामात गुंतणे घरातील प्रत्येकला आवडते . त्यामुळे ..या विषयावर त्यांच्यात रोज वाद होतात ..आज माझा नंबर आहे , मी झाडांना पाणी देणार .. कारण .बागेत जी झाडे आणि वेली आहेत ..त्या यातल्या एकेकाने आणून लावल्या आहेत ..त्यामुळे बागेंत फिरून झाडांना पाणी देणे हे सगळ्यांचे आवडते काम. यशचे बाबा रिटायर्ड झाले आणि त्यांनी हे काम स्वतःच्या हातात घेत ..सांगून टाकले .. ...Read More

6

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - ६ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – ६ वा -------------------------------------------------------------------- दिवसभराचे कामे आटोपली की.आजी-आजोबांच्या सोबत चहा-चे राउंड करीत करीत गप्पा नवा टाईमटेबल घरात सुरु झालेला होता. यशला या गप्पा-मैफिलीची आवड होतीच अम्माआज्जी आणि बापूआजोबांच्या येण्याने यशच्या घराचे नाव – गोकुळ “अगदी सार्थ आहे असे वाटत होते . घरातली मोठी माणसे मनमिळाऊ आणि अगत्यशील स्वभावाची असली की भवताली असलेल्या लोकांच्या मनावर याचा खूप चांगला प्रभाव पडतो “. प्रत्येकाला आपलेपणाच्या भावनेतून इथे यावे वाटते . आणि सतत माणसांचा राबता असलेले असे घर पाहून ..सहजतेने म्हटले जाते अगदी नावाप्रमाणे आहे हो हे घर ..भरलेले “गोकुळ “. यश मनाशी विचार करीत असे – ...Read More

7

कादंबरी - प्रेमाची जादू भाग - ७ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ७ वा ------------------------------------------------------ यशचे कार-शॉप म्हणजे एखाद्या ब्रांडेड कंपनीच्या शो -रूम सारखेच अगदी कॉर्पोरेट होते . ऑफिस-स्टाफ , आणि आलेल्या कस्टमर साठीचा वेटिंगहॉल, बसण्यासाठीची लक्झरी सिटींग सिस्टीम आत येणारा नवखा कस्टमर पुरता इम्प्रेस होऊन जातो . गेल्या पाच-सहा वर्षात यशच्या या कार-शॉपीने टू-व्हीलर –फोर व्हीलर वाहनसाठी लागणाऱ्या बारीक-सारीक गोष्टी उपलब्ध करून दिल्याने , कार-कंपनी देखील काही प्रोब्लेम आला तर कस्टमरला यशच्या शो-रूमला जाण्याचा सल्ला देऊ लागले. यशची केबिन मध्ये गेल्यावर मात्र.आतले दृश्य एकदम वेगळे आहे.. एकदम साधे ..एक मोठा टेबल यशला बसण्यासाठी असलेली खुर्ची ..फार भारीची वगेरे नव्हती , यशच्या खुर्चीच्या मागे जी भिंत ...Read More

8

कादंबरी - प्रेमाची जादू भाग -८ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – ८ वा ---------------------------------------------- यशच्या शो-रूम पासून निघालेली मोनिका सरळ तिच्या ऑफिसमध्ये पोंचली . कामे तिच्याच येण्याची वाट पाहत होती .समोरचा लेपटोप सुरु करीत तिने स्क्रीनवर आलेले मेल पाहिले , अगदी तातडीने त्यावर काही करायची गरज नाहीये, हे जाणवून ती खुर्चीत आरामशीरपणे विसावली , डोक्यात आणि मनात मात्र आजच्या दिवसाची झालेली छान सुरुवात घोळत आहे, हे तिला जाणवत होते. अंजलीवहिनीनी तिच्या मावशीला हे यशचे स्थळ सुचवले ..आणि मावशीने दम दिला .. म्हणून नाईलाजाने आपण तयार झालोत ..पण, आता यशला भेटून आल्यावर असे वाटते आहे “यार , सोचा था हमने , उतना तो बुरा नही ...Read More

9

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - ९ वा

कादंबरी –प्रेमाची जादू भाग -९ वा ------------------------------------------------------- १. ---------------------- यशच्या घरची सकाळ , शनिवार दिवस ..अंजलीवहिनी आणि सुधीरभाऊ या सुट्टीचा दिवस , ,त्यामुळे नेहमीप्रमाणे घराच्या इन - चार्ज अंजली वाहिनी . नाश्त्यासाठी सगळे एकत्र आले म्हणजे गेल्या आठवडाभरात काय झाले ? आणि पुढच्या आठवड्यात काय काय करायचे ? या कौटुंबिक चर्चेत हर एक जण सहभागी होऊन ..अपडेट देत असे, त्यामुळे सगळ्यांना झालेल्या आणि होणार्या गोष्टींची कल्पना असायची , या पद्धतीमुळे ..या सगळ्यांत एक उत्तम असा संवाद होता .एखादी गोष्ट ..मग ती कोणतीही असो ..ती सगळ्यांना माहिती असते . त्यामुळे .. “मला काय माहिती नाही ..अशी उत्तरे देण्याची वेळ कुणावर ...Read More

10

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - १० वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- १० वा ------------------------------------ रविवारची सुट्टी ,उगवणारी सकाळ सगळ्यांना खूप छान वाटणारी असते , आठवडाभर एके ऑफिस करणार्यांना ,एक तर आराम करायचा असतो किंवा ..पेंडिंग कामे अगदी निपटून टाकीत मनावरचे ओझे कमी करायचे असते . थोडक्यात काय तर, जो तो आपल्या आपल्या मनाप्रमाणे रविवारच्या सुट्टीचा आनंद घेणार असतो. आजचा रविवार ..यशच्या फामिलीसाठी तर खूपच बिझी असणारा आहे.. आज पहिल्यांदा त्यांच्या घरी -यशला भेटायला म्हणून ..सगळ्या परिवारासोबत राहायला मिळावे म्हणून एक मुलगी –पाहुणी म्हणून येणार ..त्यामुळे सगळेजण तिच्या येण्याची वाट पाहत होते. तसे तर सकाळचे कोवळे –उबदार ऊन, बागेत खुर्च्या टाकून ..पेपर वाचीत चहा ...Read More

11

कादंबरी - प्रेमाची जादू भाग -११ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ११ वा ------------------------------------------------------------------------ यशच्या आई हॉलमधून बाहेर पाहत होत्या , गेट उघडून आत येणार्या त्यांची नजर गेली .ही मुलगी अगदी साधी आहे हे तिच्याकडे पाहूनच त्यांना कळत होते, आत आलेल्या मधुराच्या हातातल्या परडीत ..खाली बागेतून वेचून आणलेली फुले होती . आजीने तिचे स्वागत करीत म्हटले .. ये मधुरा ये , तुझे स्वागत आहे आमच्या घरात . सगळ्यांकडे पाहत आजोबा म्हणाले .. मला ही वाटले की- आपण ही आपल्या एका पाहुण्याला बोलवावे ,आपला रविवार सुटीचा दिवस छान नवे विषय आणि नव्या गप्पा करण्यात जाईल . आणि माझ्या मनात आले की -..ही मधुरा आली म्हणजे अंजलीलासुद्धा ...Read More

12

कादंबरी -प्रेमाची जादू - भाग -१२ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग -१२ वा ----------------------------------------------------------------------------- मधुरा अंजलीवहिनींना म्हणाली - वहिनी -मला एक मोठी प्लेट द्याना प्लीज आत येण्या अगोदर माळीकाकांशी बोलताना मी त्यांच्याकडून ही अबोलीची फुले आणलीत पहा , आता या फुलांचे छानसे गजरे करते .. संध्याकाळी माळूया केसावरती आपण सगळ्याजणी, आजींना ,आईना आवडेल आणि वाहिनी खूप छान दिसेल तुमच्या केसावरती गजरा . मधुराने समोर बसलेल्या मोनिकाकडे पाहत विचारले .. मोनिका मैडम- तुमच्यासाठी करू ना गजरा ? त्यावर झुरळ झटकून टाकावे ..तसे मधुराचे शब्द झटकून टाकल्यासारखे करीत मोनिका म्हणाली .. छे छे ..हे असले काही आवडत नाही आणि चालत पण नाही मला .. यु नो मधुरा ...Read More

13

कादंबरी - प्रेमाची जादू भाग - १३ वा

कादंबरी -प्रेमाची जादू भाग-१३ वा -------------------------------------------------------------------- रात्रीचे जवळपास २ वाजत आलेले होते. यश अगदी टक्क जागा होता .. त्याच्या आणि मनात एकाच वेळी इतका गोंधळ सुरु झालेला होता की ..आता पहाटेपर्यंत झोप येईल असे त्याला वाटत नव्हते . कालचा रविवार मोनिका आल्यामुळे खूप छान होता असे म्हणावे की , आजोबांनी नेमके कालच त्या मधुराला बोलवून गोंधळात भर घातली आणि सगळी मजा घालवून टाकली असे म्हणावे वाटते आहे. आपल्या बाबतीत खरे सांगायचे झाले तर, इतर मुलांच्यासारखं आपल्याला पोरा –पोरींच्या उचापती मध्ये पहिल्यापासून गोडी वाटत नाही , म्हणून इतर पोरं –पोरी थोडेच आपल्यासारखे असणार , ते तर त्यांच्या मनाप्रमाणे वागणार , ...Read More

14

कादंबरी - प्रेमाची जादू भाग-१४ वा

प्रेमाची जादू कादंबरी भाग -१४ वा -------------------------------------------------------------- यश आणि त्याच्या सोबत मागे बसून जाणारी मधुरा ..मोनिकाच्या डोक्यातच गेली होती सगळ्या मुडचा पार कचरा करून टाकला होता तिच्या ,या गावावाल्या पोरीने . त्यात भर म्हणजे.. यशच्या घरातल्या मोठी माणसांचा ,आजी आणि आजोबा यांचा तर तिला जणू पाठिंबाच आहे असे वाटत होते . हा यश पण ना ..त्या फालतू मुलीला तिच्या घरी सोडायला लगेच तयार झाला . काय म्हणावे या मुलाला ..इतका मंदबुद्धी कसा काय असेल हा ? या मोनिकासारखी हॉट मुलगी सोबत आहे , समोर आहे दिवसभर ..पण..माणूस आपल्या दोघात सोशल अन्तर पाळत होता की काय ?असेच वाटतंय , एकूण ...Read More

15

कादंबरी - प्रेमाची जादू -भाग -१५ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग-१५ वा ------------------------------------------------- १. ------------------ मधुरा यशच्या केबिन मध्ये आली ..यश ने तिला खुर्चीत बसण्याची खुण करीत म्हटले .. आज कसे काय येणे केले ? सकाळी सकाळी ? ठीक आहे ना सगळं ? खुर्चीत बसत ती म्हणाली .. सॉरी -मी, तुला अरे यश , असेच म्हणून सुरुवात करू का ? अहो यश ..हे खूप बोजड वाटते आहे मला , तरी पण विचारून घेते ..आणि मगच एकेरी नावाने बोलेन . खुर्चीत आरामशीर बसत यश म्हणाला – आपण समवयस्क फ्रेंड्स आहोत ..आणि हेच मैत्रीचे नाते आपल्यात असायला हवे आहे.. तुला सुद्धा या भावनेतून आपले हे मैत्रीचे नाते आवडेल ...Read More

16

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग-१६ वा

कादंबरी – प्रेमाची जादू -२. भाग- १६ वा ------------------------------------------ कादंबरी –प्रेमाची जादू भाग-१६ वा ------------------------------------------- पहिल्या दिवसाची काम ..ठीक वाजता संपवून ..मधुरा यशच्या केबिन मध्ये आली , मी बाहेर बसलेल्या माझ्या मेनेजर साहेबांना विचारले आहे ..कामाचे स्वरूप ..आणि त्या प्रेमाने आजचे काम संपले ..तू जाऊ शकतेस ,असे सांगितल्यावर मी निघाले आहे . मधुराकडे पाहत यश म्हणाला – ओके ,ठीक आहे ,उद्यापासून मात्र .तू मला रिपोर्ट करण्याची गरज नाहीये , ऑफिस –स्टाफ हा डायरेक्ट मेनेजर –काकांच्या कंट्रोल मध्ये आहे..तू त्यांना रिपोर्ट करीत जा . मी नेहमीच माझ्या केबिन मध्ये असतोच असे नाही , बाहेरची कामे करण्यात माझा वेळ जातो . ...Read More

17

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -१७ वा

कादंबरी -प्रेमाची जादू भाग – १७ वा ------------------------------------------------ १. ------------------ अंजलीवहिनी घरी आल्या , सुधीरभाऊ आणि ,दोघे ही फ्रेश झाले , तो पर्यत यशच्या आईने सर्वांसाठी चहा तयार करून आणला .. आणि पुन्हा एक चहा –मिटिंग टेबला भवती सुरु झाली . तोच आजींना –यश गेटमधून येताना दिसला . त्या म्हणाल्या .. घ्या चिरंजीव देखील कधी नव्हे तो आज लवकर आलेत घरी , आश्चर्यच म्हणयचे हे.. अंजलीवहिनी म्हणाल्या – असा सहजासहजी लवकर येणाऱ्यापैकी आपला यश नाहीये , नक्कीच काही तरी ठरवून आले असणार महाराज . सुधीरभाऊ म्हणाले – किती अंदाज करताय ? आलाय न तो घरात , चहा घेतांना ...Read More

18

कादंबरी - प्रेमाची जादू -भाग-१८ वा.

कादंबरी –प्रेमाची जादू भाग – १८ वा --------------------------------------------------- १. --------- गेल्या महिन्यात अशा काही गोष्टी एका पाठोपाठ घडत गेल्या ,त्यामुळे यश भांबावून गेला होता. घरगुती वातावरण ,बाहेरच्या जगातील व्यावहारिक परिस्थितीत त्याला अनेक नवे झटके दिले , फटके दिले , माणसांतील वेगवेगळ्या स्वभावाचे जे नमुने त्याला पाहायला मिळाले ..त्यामुळे .. आपण या आधी जसे होतो तेच बरे होते ..कारण .. लग्न करावे म्हणून –घरच्यांचा एक सारखा दबाव आणि आग्रह चालू झाला होता . या नव्या गोष्टीने यशला एक शिकवले की .. ऐकीव माहिती आणि समक्ष भेटीत दिसलेली व्यक्ती .हे समजून घेत असतांना जास्त करून त्रास होतो . कारण “आजकाल माणसे ...Read More

19

कादंबरी -प्रेमाची जादू -भाग-१९

कादंबरी – प्रेमाची जादू भाग -१९ वा -------------------------------------------------------------------------------- १. काही दिवसापासून यश मनाशी खूप काही ठरवत होता ,पण त्याच्या विचार प्रत्यक्ष्य कृतीत येऊ शकत नव्हते कारण घरच्या आघाडीवर काही ना काही कार्यक्रम होऊ लागल्यामुळे त्याच्या सुटीचे दिवस भुर्रकन जात होते . अशाच घाई-गर्दीत त्याच्या मित्राचा फोन येऊन गेला .. त्यात मित्रांने यशला सावधगिरीचा इशारा देत म्हटले होते ..की .. तू तुझ्या माणसावर लक्ष ठेवून आहेस अस अजिबात संशय येऊ देऊ नकोस ,हुशारीने काम कर , तुझ्याकडे कामाला असलेल्या माणसात एक संभावित चोर घुसून तुला नुकसान पोन्च्वीत आहे,हे तुला दिसेल . इतक्या वर्षात यशच्या बाबतीत असे पहिल्यांदा घडत होते . ...Read More

20

कादंबरी - प्रेमाची जादू भाग-२०

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- २० वा -------------------------------------------- यशकडे मिळालेली नोकरी सोडून देण्यापेक्षा , सकाळचे ८ ते १२ कॉलेज .. दुपारी २ ते ७ असे पाच तास यशच्या ऑफिस चे काम केले तर चालेल का ? नाही तरी नवख्या मधुराकडे कस्टमर attend करणे हे जबाबदारीचे काम नव्हते , त्यामुळे बील ,पेमेंट , ऑफिस रेकॉर्ड , बँक रेकॉर्ड ..असे स्वरूपाचे काम दुपारच्या वेळेत केले तरी चालण्यासारखे होते . मधुराने यशला ही विनंती केली ..तेव्हा यशने मेनेजरकाकांना केबिनमध्ये बोलावत म्हटले – काका –ही मधुरा काय म्हणते आहे ,तिचे ऐकून घ्या ,आणि त्यवर तुमचे काय मत आहे ते सांगा , योग्य की ...Read More

21

कादंबरी - प्रेमाची जादू भाग -२१

कादंबरी - प्रेमाची जादू भाग-२१ ------------------------------------------------------------------- रविवारची सकाळ उजाडली होती . खूप दिवसानंतर आजच्या रविवारी काहीही कार्यक्रम , त्यामुळेच की काय ..यशच्या घरातील सगळ्यांना चुकल्या-चुकल्यासारखे वाटत होते. हे काही रविवार ..मजेत जाण्यापेक्षा..मनस्तापाचे गेलेत “ असेच सर्वांना वाटत होते . त्यामुळे साहजिकच सकाळ अगदी आरामशीर वाटत होती. यशचे बापुआजोबा , अम्माआजी , आई-बाबा , नाश्ता –पाणी आटोपून पेपर वाचीत बसले होते . अंजली –वाहिनी आणि सुधीरभाऊ संडे - पिकनिक म्हणून ..त्यांच्या दोस्त कंपनीबरोबर जवळच्या एक रिसोर्टला गेले होते. अशा वेळी यशला एका मित्राचा फोन आला . तो सांगू लागला ..यश ..माझ्या घरी एक प्रोब्लेम झालाय .. आमच्याकडे आलेल्या एका ...Read More

22

कादंबरी - प्रेमाची जादू भाग- २२ वा

कादंबरी –प्रेमाची जादू भाग -२२ वा ------------------------------------------------------------ १. यश मित्राच्या घरी पोंचला , त्याच्या पाहुण्यांना हॉस्पिटलमध्ये admit केले परिचयाचे डॉक्टर ,तिथला स्टाफ माहितीचा ,यात आणखी एक गोष्ट महत्वाची ..एका सेवाभावी संस्थेच्यावतीने चालणारे हे धर्मदाय हॉस्पिटल असल्यामुळे ..इथला खर्च डोळे पांढरे करणारा नाहीये .”.हे यशने अगोदरच सांगितले .. त्यामुळे मित्राच्या घरातील चिंताग्रस्त मंडळींना धीर आला. पेशंटची व्यवस्था लावून झाल्यावर ..मित्र म्हणाला .. चल ,बाहेरच्या हॉटेल मध्ये चहा घेत बोलू ,मला बरे वाटेल . यशने घड्याळात पाहिले .. लंच-टाईम होण्यास थोडाच वेळ शिल्लक होता.., त्यामुळे लंच करून सरळ शो रूमला जाऊन कामाला जुंपून घेणे सोयीचे होईल ,या विचाराने - तो मित्राला ...Read More

23

कादंबरी - प्रेमाची जादू भाग -२३ वा

प्रेमाची कादंबरी – जादू --------------------------------------------------- ऑफिसची वेळ संपून गेली होती ..तरी मधुरा घरी जाण्याची घाई करीत नसून ..ऑफिस काही उद्देशाने थांबली असावी का ? हा प्रश्न म्यानेजर काकांच्या मनात कधी पासूनचा येत होता. एरव्ही त्यांना विचारूनच ती ऑफिस सोडीत असते . तिचा आजचा हा मूड पाहून म्यानेजर काकांनी मधुराला विचारलेच . काय ,मधुरा .. आज फारच निवांतपणे चालू आहे कामं ? घाई दिसत तुला नाहीये घरी जाण्याची ? तुझ्या चेहेर्यावरील भाव पाहून मला असे वाटते आहे की.. तुला काही तरी विचारयचे असावे .. पण ते मला की यशला विचारणार आहेस ? हे मात्र मला माहिती नाही .. पण ...Read More

24

कादंबरी - प्रेमाची जादू भाग -२४ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – २४ वा ------------------------------------------------------------------------------------------------ चौधरीकाकांच्या घरात शिफ्ट होऊन ..मधुरा आणि तिच्या तिघी मैत्रिणींना आता महिना होत होता . घराचा बिकट वाटणारा प्रश्न चौधरीकाकां मुळे इतक्या सहजपणाने सुटला होता की , मधुरा आणि मैत्रिणी यांच्या मनावरचे मोठेच ओझे उतरले होते. कोलेज आणि ऑफिस , त्यात सेमिस्टर परीक्षा आलेली, मधुरा जाम बिझी होऊन गेली होती. एवढ्या सगळ्या धावपळीत ..शिफ्ट होण्याच्या दोन –तीन दिवस आधी दीदी म्हणाली .. मधुरा ..तू इथे आल्यापासून मी एकदा ही ..यशच्या आजोबा आणि आजींना भेटायला बोलायला आलेले नाही , ते नक्कीच म्हणत असतील .. पंडितजीची पोरगी मोठ्या शहरात आली की पार बदलून ...Read More

25

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -२५ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – २५ वा --------------------------------------------------- यश तसा तर मधुराला त्याच्या ऑफिसमध्ये रोज पाहत होता , होता ,ऑफिस मध्ये सगळ्याच स्टाफ सोबत तो बोलायचा , त्यापेक्षा काही वेगळे असे तो बोलत नसे . पण दिदिसोबत मधुरा त्याच्या आजी- आजोबांना भेटायला घरी येऊन गेल्यापासून यशच्या मनात तिच्याविषयी अजून खूप काही वेगळे वाटण्यास सुरुवात झाली होती .. अशी भावना मनाला किती छान वाटणारी आहे ..हे त्याने अनुभवले होते. अजून तो त्याच संध्याकाळच्या आठवणीत हरवून जात होता .. किती छान ,सुरेख क्षण होते ते .. वाटते ..तो दिवस खूपच लहान होता, लगेच संपला . यशला ते सारे पुन्हा पुन्हा ...Read More

26

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - २६ वा

कादंबरी - प्रेमाची जादूभाग -२६ वा----------------------१.------------चौधरीकाकाकडे मदतीसाठी म्हणून मधुरादुपारीच गेली होती, आजी -आजोबांनाघरी घेऊन जायचे म्हणून ऑफिस संपले की पण निघून गेले.त्यांना कबूल केल्याप्रमाणे यश तिकडे जाण्यासाठी निघाला, आणि घरी आल्यावरआई-बाबा देखील तिकडेच आहेत हे कळल्यामुळे यश मनोमन खुश झाला,चौधरिकाकांना तो म्हणाला होता की-कुणाला सांगू नका, मी येतोय ",या बद्दल,हे सांगणे मधुरा ला सर्पराईझ देण्यासाठी होते".आता आई -बाबा दोघे ही तिकडेच ,म्हणजेआपल्या तिकडे येण्यास सगळ्यांची मान्यता मिळाल्या सारखे आहे " हे बेस्टच झाले.चौधरीकाकांच्या घरी जाण्याचे प्रसंग तसे फारसे आलेले नव्हते, उलट आज त्यांच्या कडे पहिल्यांदा जातो आहोत, असे यशाला वाटू लागले.ही ओढ, ही अधीरता त्याच्या मनाला लावली ती मधुराने.त्याला ...Read More

27

कादंबरी - प्रेमाची जादू भाग- २७ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – २७ वा ------------------------------------------------------------ १. चौधरीकाकांच्या घरी येण्याचा आजचा हा दिवस आपल्यासाठी खूपच लकी असे यशला वाटत होते . फराळ –चहा झाल्यवर चौधरीकाका सर्वांना म्हणाले , हे बघा ,आता आजचे रात्रीचे जेवण इथे आपल्या गच्चीवर चांदण्यात करायचे आहे . आणि त्यानंतर आपलीच अशी एक छान संगीत मैफिल करू या , मगच आजचा कार्यक्रम संपेल . यश म्हणाला – अहो चौधरी काका ..हे काय अचानक ठरवलंय ..संगीत मैफिलीचे , तुम्हाला माहिती आहे , बाबा छान गातात ,आई सुगम गीतं म्हणते ,आज्जीला जुनी गाणी म्हणता येतात , बाकी आम्ही म्हणजे ..अंजलीवाहिनी ,सुधीरभाऊ , मी पण त्यात ...Read More

28

कादंबरी - प्रेमाची जादू -भाग -२८ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – २८ वा -------------------------------------------------------------- १. यशच्या हातावर ओठ टेकवून .त्याला “आय लव्ह यु “ ..मधुरा .. यशला आजचे हे ,तिचे असे रोमेंटिक रूप अचंबित करणारे होते . त्याने आत्ता पर्यंत पाहिलेली मधुरा , त्याच्या घरी आल्यवर सगळ्यांच्या समोर मर्यादेने वावरणारी ,वागणारी ,बोलणारी मधुरा ,आणि रोज नजरे समोर असणारी .. आपल्या ऑफिसमध्ये स्टाफ म्हणून जॉब करणारी मधुरा “.. आतापर्यंत दिसलेली ही मधुरा ..आज मात्र .. या क्षणी ..त्याच्या प्रेयसीच्या रूपात .त्याला .आय लव्ह यु यश ..! म्हणत होती. त्याच्या नजरेसमोर त्याला रूपसुंदर मधुरा ..दिसत होती . भान हरपून यश तिच्याकडे पहात राहिला ..तिला डोळ्यात आणि ...Read More

29

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - २९ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग-२९ वा ----------------------------------------------------------- गच्चीवर मैफिलीची बैठक व्यवस्था करून झाली ..त्याआधी सर्वांची जेवणे गच्चीवर करायची , ठरलेले होते , त्यासाठीची गडबड सुरु झाली . मधुरा आणि तिच्या मैत्रिणीनी तयार केलेले जेवणाचे विविध पद्रार्थ आणायला सुरुवात केली . त्यांच्या मदतीला अंजलीवाहिनी होत्या . चौधरीकाका –काकु , यशचे आई आणि बाबा , आजी आणि आजोबा , सुधीरभाऊ हे सगळेजण गच्चीवर येऊन बसले ... समोरची सुंदर सजवलेली बैठक , आणि दुसर्या बाजूला , भोजनाची सुरु असलेली तयारी पाहून मोठी मंडळी खुश होऊन गेली . बनवलेल्या भोजनाचा खमंग दरवळ घेऊन .. भूक लागली हो ... ! चला पाने घ्या पटापट ...Read More

30

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - ३० वा

कादंबरी –प्रेमाची जादू भाग- ३० वा ------------------------------------------------------------------------------ १. चौधरीकाकांच्या घरी झालेली ती पार्टी ..यशला एक स्वप्न वाटत होते ..पंधरा होऊन गेले होते .. सगळ्यांच्या भेटीला ..पण त्याचे मन अजूनही हवेत तरंगल्यासारखे ,जणू जमिनीवर येण्यास तयार नव्हते . चौधरीकाकांनी ..हे सगळे करणे “ हे उगीच्या उगीच नाहीये “,अशी शंका यशच्या मनात सारखी येत होती . .कारण .. आपल्या घरातील सगळेजण , आपली मित्रमंडळी ,एकाचवेळी एकत्र येणे , सगळ्यांच्या जेवणाचा खटाटोप ,त्या नंतरची ..गाण्याची मैफिल .. या सगळ्याच्या उद्देश ..मधुरा ‘सगळ्यांच्या समोर यावी हाच होता का . ? आजी-आजोबांना तर मधुरा कशी आहे ? हे नव्याने सांगावे असे काही नव्हते ...Read More

31

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -३१ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ३१ वा -------------------------------------------------------- केबिनमध्ये बसून यशला “यशसाहेब “ या रोल मध्ये बसवत नसे , मेकेनिकच्या सोबत ड्रेस घालून ..मशीनमध्ये डोके खुपसून बसण्यास यश नेहमीच आतुर असतो “. ही गोष्ट गैरेज मधील कामगारांना , तिथे दुरुस्तीसाठी आपली वाहने घेऊन येणार्या कस्टमरना सुद्धा माहितीची होती. चौधरीकाका म्हणयचे .. जेव्हा स्वतहा मालक ..सामान्य कामगार होऊन बरोबरीने काम करू लागतो “ याचे दोन फायदे होतात .. पहिला फायदा म्हणजे – आपल्यावाचून याचे काहीच काम अडू शकत नाही याची जाणीव “सोबतच्या आणि हाताखाली काम करणार्यांना होणे .. दुसरा फायदा म्हणजे –मालक आणि नोकर यांचे संबंध तणावाचे रहात नाहीत ,सोबतच ...Read More

32

कादंबरी - प्रेमाची जादू भाग-३२ वा.

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – ३२ वा -------------------------------------------------------------------- सकाळी सकाळी हॉलमध्ये चहा-आणि नाश्त्यासाठी नेहमीप्रमाणे यशच्या घरातील सगळे मेम्बर होते . नेमका यशच उशिरा आला आणि सगळ्यांना गुड मोर्निंग करीत खुर्चीत बसत म्हणाला .. " आज काय विशेष आहे बुवा ? सगळे कुठे बाहेर जाण्याच्या तयारीत असल्या सारखे दिसत आहेत . मला नाही सांगितले कुणी ? की आज काय शेड्युल आहे आपले ? आज्जी त्याच्याकडे पाहत म्हणाली – तुझे लक्ष तरी असते का आजकाल घरात ? ते असते तर आले असते लक्षात . चौधरीकाकांच्या घरी पार्टी झाल्यापासून तू आमच्या पासून जरा दूर दूरच राहतोय असे वाटते आहे आम्हाला , ...Read More

33

कादंबरी - प्रेमाची जादू भाग- ३३ वा

कादंबरी -प्रेमाची जादू भाग – ३३ वा ------------------------------------------------------------- सकाळी सकाळी येऊन गेलेल्या दोन मोठ्या सेठलोकांनी यशने काही तरी केले अस बोलून दाखवले , तसे तर यश कुणालाही मदत करण्यास तयार असतो हे त्या सेठलोकांना माहिती होते . पण , यावेळी त्याला त्याच्याकडे नोकरीस असणार्या नारायणकांना मदत करायची होती . त्यात ही गोष्ट साधी सुधी नव्हती त्यात लपलेल्या अनेक गोष्टी होत्या , त्या उघडकीस आल्या तर ..त्रास होणार ..! या गंभीर इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते . काकांच्या जावयाने करून ठेवलेल्या पैश्याच्या भानगडी ऐकून ..यशचा मूड पार बिघडून गेला . काय करावे ? काही सुचेना , शांतपणाने आणि विचारपूर्वक यातून ...Read More

34

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग- ३४ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ३४ वा ----------------------------------------------------------------------------- आपल्या वर्कशॉपमध्ये -ग्यारेजमध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक –पापभिरू नारायणकाकांच्या जग्गू या जावयाची चांगलीच लबाडी , चलाखी सुरु होती. सगळ्यांच्या डोळ्यात अशी धूळफेक करणारा बदमाश जग्गू आपल्या उद्योगात .स्वताच्या मामाचा –जो आता त्याचा सासरा झाला होता त्या नारायणकाकांना पुढे करून, त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतो आहे हे कळल्यापासून यश खूपच गोंधळून गेला होता . लंचनंतर त्याने चौधरीकाका आणि सोबत मधुरा , दुसरी स्टाफ –सोनाली ..या तिघांना दुपारच्या वेळी केबिनमध्ये बोलवून घेतले . आणि मार्केटमधल्या दोन मोठ्या सेठ लोकांनी –जग्गू हा इसम काय काय करतो आहे , कसे कसे करतो आहे “, हे या तिघांच्या ...Read More

35

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग- ३५ वा

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ३५ वा ------------------------------------------------------------ १. ******* नारायणकाका आणि जग्गुच्या बाबतीत जो काय निर्णय घायचा आहे घेण्याची जबाबदारी सगळ्यांनी जणू एकमताने यशच्या गळ्यात टाकली होती . त्यामुळे या कारवाईला आपण उशीर करीत गेलोत तर . .यात आपले तर नुकसान होणारच आहे ..आणि - ..मार्केटमध्ये असलेले इतर बिझिनेसवाले ..जे आपले मित्रच आहेत ..यातील काही जणांचे नुकसान जग्गुने आधीच केलेले आहे. म्हणून या मित्रांनी अपेक्षा व्यक्त करतांना म्हटले आहे की - यश – हा प्रोब्लेम तूच चांगल्या पद्धतीने सोडवू शकतोस .., कारण आम्ही जर आमच्या पद्धतीने हा प्रोब्लेम सोडवायचा प्रयत्न केला तर .. सगळा मामला हमरी-तुमरीवर येणार, मग ...Read More

36

कादंबरी - प्रेमाची जादू - अंतिम भाग - ३६ वा

कादंबरी – प्रेमाची जादू अंतिम भाग – भाग-३६ वा ------------------------------------------------------------------------------------ गेल्या रविवारी यशने माळीकाकंना बोलवून घेत म्हटले – तुम्ही नारयणकाकांच्या घरी जा आणि त्यांना सोबतच इथे घेऊन या, त्यांच्याशी मला आज जग्गुच्या संदर्भात बोलायचे आहे –सांगायचे आहे आणि विचारयचे सुद्धा आहे. हे ऐकून माळीकाका म्हणाले- हे बाकी बेस्ट सुचलाय बघा तुम्हाला . कारण आपल्या ऑफिस मध्ये –ग्यारेज मध्ये सगळ्यांच्यासमोर नारायणकाकांची झाडाझडती घेणे “ बरोबर दिसले नसते ..त्यांचा अपमान केल्यासारखे झाले असते . त्यापेक्षा ..इथं बोलवून तुम्ही पार फैलावर घेऊन विचारले तरी ..कुणाला काही समजायचे नाही . आणि नारायानकाकांना पण कळले पाहिजे की- त्याच्या जावयाचे प्रताप लोकांनी येऊन तुमच्यासमोर सांगितले ...Read More