पेरजागढ- एक रहस्य....

(113)
  • 305.9k
  • 19
  • 134k

पेरजागढ- एक रहस्य....भाग...१...१) पवनचे सोनापुरात आगमन...मनात कितीतरी प्रश्नांचा विचार चालु होता, तीचं काय झालं असेल ...? तीने आत्महत्या तर केली नसेल ....? माझे मित्र ज्यांनी मला शोधण्यासाठी किती कष्ट घेतले असतील ....?आज दिवस कोणता आहे? कोणता वार आहे? काहीच सुचत नव्हते. सगळ्या मनाची घालमेल झाली होती. पण स्वतःची घृणा मात्र होऊ लागली होती.मी तुच्छ आहे आणि असणारच. कारण सत्व म्हणजे परब्रम्ह आहे. त्याची उपासना, त्याचे अस्तित्व असे शब्दात सांगायचे नाही. त्याचे आवाहन म्हणजे माझे फक्त कुतुहुल होते पण त्यापोटी मी काय करून बसलो होतो? स्वतः चे अस्तित्व विसरुन गेलो होतो.विसरून गेलो होतो की ज्याने आम्हाला घडवले आहे,त्याच्या समोर आपण एक

New Episodes : : Every Saturday

1

पेरजागढ- एक रहस्य.... - 1

पेरजागढ- एक रहस्य....भाग...१...१) पवनचे सोनापुरात आगमन...मनात कितीतरी प्रश्नांचा विचार चालु होता, तीचं काय झालं असेल ...? तीने आत्महत्या तर नसेल ....? माझे मित्र ज्यांनी मला शोधण्यासाठी किती कष्ट घेतले असतील ....?आज दिवस कोणता आहे? कोणता वार आहे? काहीच सुचत नव्हते. सगळ्या मनाची घालमेल झाली होती. पण स्वतःची घृणा मात्र होऊ लागली होती.मी तुच्छ आहे आणि असणारच. कारण सत्व म्हणजे परब्रम्ह आहे. त्याची उपासना, त्याचे अस्तित्व असे शब्दात सांगायचे नाही. त्याचे आवाहन म्हणजे माझे फक्त कुतुहुल होते पण त् ...Read More

2

पेरजागढ...एक रहस्य...भाग 2

२) पवनचे सोनापुरात आगमन आणि शुरुवात... तितक्यात समोर गणेशाची मुर्ती दिसली, तिला ही नमन मी सुखरूप घरी पोचवण्याची विनंती करु लागलो. माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्याचं असचं होत. आता माझंच बघा ना!!! किती देवांच्या पायी पडत आलो. कित्येकांना स्मरलं मी माझं जीव वाचवण्यासाठी. इतरांसारखी माझी अवस्था होवु नये म्हणुन .... आता नेमकं एखाद किलोमीटर अंतर उरलं असेल. मला जगण्यासाठी पुरेसे काही क्षण.पुरेशी काही वाट. अख्खं जीव एकवटुन मी धावत होतो. नाकातून,तोंडातून श्वास जोरा जोरात घेतला जात होता. त्याचा आवाज दुर दूर पर्यंत घुमत होता.... आणि आता माझं एकवटलेल शरीर साथ ...Read More

3

पेरजागढ- एक रहस्य.... - 3

३) मृत्यूचे आगमन...पेरजागडची छवी मनात ठेवून मी त्या दुसऱ्या दिवशी सकाळीच परत आलो. आज कितीतरी दिवसांनी मनामध्ये परत एकदा जाणवत होती. खरं तर ती माझं प्रेम होती. आणि आजही मी तिच्यावर तितकंच प्रेम करत होतो जितकं आधी करत होतो. मी कित्येक वेळा तिला विसरण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमलं ... जेव्हां आज इतक्या दिवसांनी ती मला भेटली तर साहजिकच ती माझ्या मागावर असणार.आणि शेवटी ती माझ्या मित्राला घेवुन ती माझ्या घरी आलीच.काय झालं काय आहे?काय चाललंय तुझं?मी तुला कालच सांगितलं गडावर.ते माझं उत्तर नाही पवन.. आज खरं खरं सांग ... चार वर्ष झाली आज... मी पण निश्चय केला आहे... ...Read More

4

पेरजागढ- एक रहस्य.... - ४

४) पवनला हॉस्पिटलला नेणे...गडाच्या पायथ्याशी एक मंदिर बसलं आहे.कालांतराने गड जेव्हा फॉरेस्टच्या हद्दीमध्ये गेलं, तेव्हा खाली असलेली दोन ते एकर तेवढीच जागा फक्त देवस्थानच्या नावे राहिली.आणि तिथे रखवालदार फक्त एक माणूस राहतो.सकाळी रोजच्यासारखा तो जेव्हा झोपून उठला, तेव्हा रोजच्याप्रमाणे त्याने फेरफटका मारण्यास सुरुवात केली. अचानक गडाच्या प्रवेशद्वारापाशी, त्याला मी निपचित पडलेला आढळून आलो.तो घाबरत घाबरत माझ्यापाशी आला. डोक्यातून आणि गुडघ्यातून घरंगळत आल्यामुळे थोडेफार रक्तसंचार होऊ लागले होते. आधी त्याने मला पालथ्या पडलेल्या स्थितीतून सरळ केले. आणि मी जिवंत आहे की मेलो आहे याची जाणीव केली.अत्यंत कमी प्रमाणात माझा श्वासोच्छवास चालू होता. त्यामुळे त्याला जरा हायसे वाटले. आणि ...Read More

5

पेरजागढ- एक रहस्य.... - ५

५)मृत्यूचे रहस्य....जेव्हा पेरजागडच्या ट्रीपवर मला नमन मिळाला नाही.त्याची शोधमोहीम मी चालूच ठेवली होती. कारण त्यानंतर या त्याचं किंवा माझं होणे हे अटळ होतं. कुणाला फोन लावावा? काय करावं? काहीच कळत नव्हते. जर कुणाला घरी वगैरे बोलवून त्याला सविस्तर काही सांगितलं तर तो मला खुळा समजेल असं मला वाटत होतं. एखाद्या ढोंगी बाबा ने तुम्हाला काहीतरी सांगावं, आणि तुम्ही त्यावर विश्वास करावा. काय खेळ चाललाय काय? असे लोक म्हणायचे आम्हाला. खरंच ज्याचं जळतं त्यालाच कळतं. दिवसेंदिवस माझ्यातला उत्साह कमी होत जात होता. घरच्यांना माझ्याबाबत काळजी वाटू लागली होती. रोजच्या दिनचर्येचा सूर्य जसा पश्चिमेला जात होता. तसतसं ...Read More

6

पेरजागढ- एक रहस्य.... - ६

मला जाग आली तेव्हा मी जंगलात नव्हतो.बदामाच्या झाडाखाली एका चारपायी वर लेटलेलं स्वतःला बघितलं. आजूबाजूला बघितलं तर दोन-तीन झोपळ्या मोहक फुलांचे बाग सजल्याप्रमाणे जिकडेतिकडे फुलांची झाडे होती.समोर काही अंतरावर पटांगणात कबुतरे दाणे टिपत होती.आणि त्या कबुतरासोबतच इतर पक्षी पण प्रेमाने बागडत होते. किती सुंदर वातावरण होतं तिथलं.इथे भेदभाव नव्हता, गर्दी नव्हती, अहंकार नव्हता आणि मुख्य म्हणजे तिथली वस्तुस्थिती अगम्य होती, प्रेक्षणीय होती. सूर्य जरा बराच डोक्यावर आला होता. मी किती वेळ झोपून होतो याचे मला भान नव्हते, आणि मघापासून झोपूनच मी इकडे तिकडे बघत होतो.किती वेळ झाला? असे म्हणत मी उठायचा प्रयत्न केला, आणि सहज हात डोक्यावर गेला. ...Read More

7

पेरजागढ- एक रहस्य.... - ७

७)पवन...एक कुतूहल...हॉस्पिटलमध्ये होत असलेली धावपळ सगळ्यांच्या निदर्शनास येत होती. रितूला एक प्रकारे मानसिक धक्का बसल्यासारखा होता. कदाचित ऐकताना तिला काही वाटले नव्हते, पण आज प्रत्यक्षात बघतांना ती अनुभवत होती. रात्रीची ती जी काही परिस्थिती होती.तिला समोरही काय करावं? काय नाही ?हा विचार गुंतत चालला होता.भिंतीवरच्या येशूला डोळ्यातले अश्रू देऊन ती सारखी मला मागत होती.तिच्या जीवनाची मनीषा अशी विझु नको देऊस, सतत हीच प्रार्थना तिच्या अंतर्गत गाजत होती. रात्री झालेल्या धावपळीमुळे बिचारी ती माझ्या बाजूलाच निशब्द होऊन बसली होती.जिवाचं पण लावायला सुद्धा ती मागेपुढे बघणार नव्हती.तिच्या मनाची ती कठोर निष्ठा,खरंच दगडाला सुद्धा पाझर आणणारी होती. सकाळी आई आली.आल्या आल्या तिने ...Read More

8

पेरजागढ- एक रहस्य.... - ८

८)नमनची भेट.... साधु महाराजांशी बोलून झाल्यावर, माझ्या मनाची पूर्तता झाली होती.नकळत त्यांनी मला खूप काही होते.अस्तित्वाचा पुरावा हा मला त्यांनी डोळ्यादेखत दिला होता. ज्यामुळे सत्य आणि सत्व यामध्ये काय अंतर आहे हे मी जाणू शकलो.गावाकडे परतल्यावर माझ्यावर थोडाफार झालेला बदल सगळ्यांनी अचूक हेरला होता.पण नेमकं काय झालं?अशी विचारणारी फक्त रितू होती. त्यादिवशी कुठेतरी जायला निघालो होतो, की दरवाज्यात तिचे पाऊल पडले.काय मालक कुठे चालले? तिचा पहिलाच प्रश्न. अगं कुठे नाही.... मला नमनचा शोध घ्यायचा आहे ना... त्याच्यासाठी सोशल मीडियावर काहीतरी प्रयत्न करतो. अच्छा..... प्रवास कसा झाला? काही मनासारखे घडले ना!!! की काही अजून विपरीतच होणार.भेटला काय तो माणूस? ...Read More

9

पेरजागढ- एक रहस्य.... - ९

९)मृत्यूची आणि नमनची गाठ....(पूर्ववत...)घरी जाताना आटो पकडली.आणि थैली विसरली की काय?म्हणून सतत त्यावर माझी लक्ष जात होती. कितीतरी दिवसानंतर माझ्या चेहऱ्यावर असणारा उदय खरच चित्रफिता मध्ये टिपण्यासारखा होता. असं वाटत होतं की ही वेळ केव्हा जाते? आणि केव्हा घरी जाऊन मी ती थैली उघडून बघतो?उत्सुकता माझी शिगेला पोहोचली होती. पण इकडे मात्र काही वेगळेच वारे वाहू लागले होते. नमनला त्या गोष्टीचा पूर्वाभास केव्हाच झाला होता. पण जसं घरच्यांपासून त्याने लपवलं होतं. तसंच ती गोष्ट त्याने माझ्यापासून देखील लपवली होती.दोन दिवस त्याने ते चाबकाचे फटके स्वीकारले होते.पण मी त्याला सामोरी भेटलो असून सुद्धा त्याने मला त्या गोष्टी ...Read More

10

पेरजागढ- एक रहस्य.... - १०

१०) पवनची आणि इन्स्पेक्टर राठोडची गाठ... मला या गोष्टीची पूर्वकल्पना आलीच नाही.ऑटोतून उतरल्यावर मी सगळ्यात आधी आलो आणि ति थैली व्यवस्थित कपाटात ठेवून आधी आंघोळीला गेलो.मठात विभूतीचा कसला ना कसला अंगारा अंगास येऊन चिकटलेला होता.ज्यामुळे मला कसंतरी वाटायला लागले होते. माझी रूम म्हणजे स्पेशल अशी बाजूला होती.मला विचारल्याशिवाय घरचे सुद्धा त्यात प्रवेश करत नव्हते. आणि माझं अस्तित्व म्हणजे ती माझी खोली असायची.माझं अभ्यास करण्यापासून माझं मनन, चिंतन, शोकसभा त्या रूममध्ये व्हायची.त्यामुळे एकाच घरात दोन तुकडे या प्रमाणे माझं होतं. शिवाय मला बहीण अशी नव्हती ज्यामुळे कोणी मला भावनांची देवाणघेवाण केलं असतं. आई वडील होते पण ते सुद्धा स्वतःच्या ...Read More

11

पेरजागढ- एक रहस्य.... - ११

११)इन्स्पेक्टर राठोडची आणि रितुची पूर्वतयारी...सततच्या होत असणाऱ्या शारीरिक यातना, मला होत्या की नाही हे मला माहिती नाही, पण रितूला प्रत्येक दिवस हा एक चॅलेंज होता.इतक्या भयानक वेळीसुद्धा तिने क्षणभरही अंतर मला दिला नव्हता. आणि मी मात्र नेहमी तिला विरहात ठेवलं होतं. या दोन ते तीन दिवसात माझ्यात काहीच बदल पडलेला नव्हता.याउलट माझ्यावर नको त्या वळांचे जखम मात्र झाले होते.स्वतः डॉक्टरच्या मागे एकच नवे आव्हान उभे राहायचे. आणि माझी आई एका मुलाच्या मायेने त्यांच्या पाया पडत होती. परत एकदा तो व्हिडिओ सगळेच बघू लागले. जे राठोड ने रात्री बघितले होते. ज्या वेळेस रात्री हे घडत होते ...Read More

12

पेरजागढ- एक रहस्य.... - १२

१२) पेरजागढ संशोधन... नमनच्या मृत्यूनंतर मी फार प्रमाणात एकटा पडलो होतो.त्यामुळे सतत कुठे जावे? काय याचा विचार नेहमीप्रमाणे येतच होता. अशात एक विचित्र घटना माझ्यासोबत घडली होती. शेतात जाताना मी एका शेपटी गळलेल्या नागाचा वध केलेला होता. त्यामुळे मला सतत नाग दिसत असायचे. कधी स्वप्नात तर कधी सत्य रूपात.कित्येकदा कुठे बाहेर जरी फिरायला पडलो तरी दर्शन व्हायचे. या दोन-तीन दिवसाच्या सहवासात "बदला नागिन का" हा सिन चांगलाच अनुभवला. त्यामुळे घरी सगळे ओरडू लागले होते, की नको तसले उपद्रव कशाला करतो हा मुलगा. आता जीव घेतलं त्या बीचाऱ्याचा. कोप झालाय त्या नागमातेचा. आता मागे तर लागणारच आहे. उपासना ...Read More

13

पेरजागढ- एक रहस्य... - १३

१३) रहस्याचा थोडाफार खुलासा आणि पवनचे सोनापुरात आगमन...काही दिवसांपूर्वीच मला आपले नातेवाईक सोनापूरला असतात मला असे कळले.आधीपासूनच मी रिलेशनमध्ये गेलो नसल्यामुळे माझी कित्येकांची ओळखी अशी अर्धवटच होती. त्यामुळे तिथले नाते माझ्यासाठीतरी अपरिचितच होते. काही दिवसांपूर्वी ते गावाकडे आले होते. त्यावेळी माझा आणि त्यांचा परिचय झाला. मला त्यांनी आवर्जून आपल्या गावाकडे यायला सांगितलं आणि यावेळी तशी संधी पण चांगली होती. त्यांचा नंबर बघत मी त्यांना कॉल केला आणि मी येत असल्याचा खुलासा केला. मी येत असल्यामुळे त्यांनी पण आनंदाने मला, अगदी आवर्जून ये म्हणून म्हटलं. कारण त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी तरी मी पहिल्यांदाच तिथे चाललो होतो. त्यामुळे जितका आनंद मला तिथे ...Read More

14

पेरजागढ- एक रहस्य.... - १४

१४)स्वारी पेरजागढाची... तिरीपीचा सूर्य केव्हाच वर निघून गेला. तरी माझी झोपेतून उठायची वेळ होईना.चुलीवरचा चहा थंड पडून गेला होता, आणि सकाळचे आठ वाजले तरी उठायचं नाव नाही.म्हणून काकूने अंगावरील चादर ओढली, इतकं कुणी झोपतोय का... जा तोंड धुवून घे आधी... चहा थंड पडून गेल कवाचं. माझ्यासाठी गावाकडची मजा म्हणजे पहिल्यांदाच झाली होती. त्यामुळे पहिल्यांदा मला फार नवल वाटलं होतं. कारण आपल्याकडची सकाळ म्हणजे फक्त माझी रूम, त्या पलीकडे असलेला सूर्यनारायण बघणे कधी आयुष्यात जमलेच नाही. सगळे काही आवरता आवरता 10 केव्हा वाजून जायचे कळायचेच नाही. जेवण करून कुठे बाहेर निघावं म्हटलं तर अर्धा दिवस घरीच निघालेला असायचा. आणि ...Read More

15

पेरजागढ- एक रहस्य... - १५

१५) रितुला ताईत मिळणे... इन्स्पेक्टर राठोड... जेव्हापासून त्यांनी माझ्या केस वर लक्ष द्यायची वेळा चालू केली होती. एक त्यांच्या जीवनात एक वेगळाच प्रवास चालू झाला होता. कधी त्यांनाही वाटले नव्हते की जगात अस्तित्वाच्या बाहेरही विशाल जग आहे म्हणून. कारण दंतकथा पेक्षा तंतोतंत उदाहरण त्यांना फार अधिक प्रमाणात आवडायचे. तसं राठोडला म्हणजे पोलिसांना बघण्याचा प्रत्येक गावकऱ्यांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यामुळे साधा माणूस जेवढा जनसामान्यात मिसळून हवी ती माहिती काढून घेतो तसा ह्या पोलिसाला जमले नसते. पण प्रयत्न आधी त्याचे चालू होते. मी कोणाची भेट घेतली? कुठे वगैरे जायचो? वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी नोंदी केल्या होत्या. ...Read More

16

पेरजागढ- एक रहस्य.... - १६

१६)शेवटी रितूचा विश्वास जिंकला...इकडे इन्स्पेक्टर राठोड आज जरा सुट्टीवर होता.सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज परत त्याने चिकन बनवली होती.त्यामुळे त्यालाच चौकीवर पोचायला वेळ झाला होता.अन्यथा सगळेजण केव्हाच पोचले होते. मागाहून जाऊन सुद्धा इतरांवर जरा राठोड खेकसला.माझ्या अगोदर येऊन जमा झाले. चांगली गोष्ट आहे. पण इथे तोंड काय पाहता माझं.काढा ती जीप. आपण येथे कशासाठी आलो हे ठाऊक नाही काय तुम्हाला? चला लवकर.. तोंड बघताय नुसती... आणि पोलीस चौकीतून गाडी निघाली पेरजागडाच्या दिशेने. काही तासात सोनापूर ओलांडून गाडी पेरजागडाच्या खालच्या आवारात जमा झाली. रोजच्या सारखं तसं गडावर कोणी नव्हतं.मंदिरात असणारा गृहस्थ पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे गेला असल्यामुळे मंदिरात असं कुणीच नव्हतं.त्यामुळे ...Read More

17

पेरजागढ- एक रहस्य.... - १७

१७) गडाविषयी काकांचं मनोगत...त्या दिवशी पेरजागडावरून येताना बऱ्याच काही शंका मनात धरून मी आलो होतो.ते सुन्न जंगल,आणि ते भयानक ते छम छम् तर माझ्यासाठी एक कोडंच होतं.घरी परतल्यावर सगळ्यांनीच तसं माझी खुशहाली विचारली...काय मग?कसा वाटला पेरजागड? मी म्हटलं... बरंच आहे...कारण थकून असल्यामुळे मी फार तर बोलूच शकणार नव्हतो.पण गावात कसं असतं, गप्पांचा विषय चालू करण्यासाठी एखादं विषय लागतो.कदाचित घरी येता येता पेरजागड हाच एक विषय झाला होता.अलीकडे घडलेल्या बऱ्याच गोष्टी याच्या त्याच्या मुखातून बरेचदा ऐकत होतो.काही दिवसांपूर्वी म्हणे ट्रॅक्टर उलटली होती.ज्यामुळे बऱ्याच प्रमाणात जीवितहानी आली होती.त्याचे कारण चालकांनी बऱ्याच प्रमाणात दारूचे सेवन केले होते आणि काही स्त्रिया मासिक पाळीवर ...Read More

18

पेरजागढ- एक रहस्य.... - १८

२)आयुष्यातला दुसरा वाघ आणि भ्रमंती...सकाळी थोडं लांब जायचं आहे म्हणून मी थोडं लवकरच झोपून गेलो होतो.पण अंथरुणावर पडल्या फक्त मिटून होतो.कारण कानात गुंजणारे ते छम छम शेवटी काय होतं? हेच मला कळत नव्हते.कुणाला विचारावं म्हटलं तर काही वाईट समजतील या विचाराने मी कुणाला काही सांगितलं पण नव्हतं.आणि उद्या ज्या भागावर जाणार होतो.तो भाग नकाशात एक गुणाकार(खतरा) म्हणून दाखवला होता.लाल रंगाने रंगवलेला तो लखोटा म्हणजे नक्की काय होतं?उद्या मी तेच बघण्यासाठी चाललो होतो.जिथून माझी शुरुवात होती.पण एक होतं.गडाच्या बाबतीत प्रत्येकजण वेगळाच बोलायचा.त्यामुळे खरं काय ते मला समजण्यासाठी थोडं अवघड वाटायचं.पण प्रयत्न करत होतो उद्या काहीतरी करायचं म्हणून.सकाळी काकाने मला त्या ...Read More

19

पेरजागढ- एक रहस्य.... - १९

तिथून तयारीला मी निघालो.मनामध्ये एक विचार घोळत होता, की आज आपण ज्या दिशेला जात होतो. त्या दिशेला शंखाची कलाकृती नक्षावर दाखवली होती.आणि ते सगळं नजरेत असावं म्हणून मी मोबाईलचं मॅप ओपन करून चालत होतो.मी,मधुकर मामाजी आणि आदल्या दिवशी पेरजागडावर भेटलेला एक धनगर, ज्याला पैसे देऊन मी सोबतीसाठी आणले होते.असे तिघेजण मजल दरमजल करीत निघालो. सोनापुर पासून जवळपास तीन किलोमीटर अशा अंतरावर एक सारंगड नावाचे छोटेसे गाव आहे.आमच्या प्रवासाचा हा पहिला टप्पा.जंगलात जाण्यासाठी आम्ही सोनापुरवरूनसुद्धा निघू शकत होतो.पण सारंगड पासून काही मजेशीर बघायला मिळणार आहे, असे मधुमामाजी म्हटल्यामुळे आम्हाला पायी पायी सारंगडला जावे लागले.तिथून पुन्हा अर्ध्या एक किलोमीटरच्या अंतरावरून, जंगलाची ...Read More

20

पेरजागढ- एक रहस्य.... - २०

२०)नव्या गोष्टींची माहिती आणि भ्रमंती...आपण बघतो की मृगाची पहिली सरी जेव्हा भूमीवर ओझरते तेव्हा त्या मृदेचा सुगंध अगदी हवाहवासा असं वाटते की मुठभर माती घेऊन त्याचा बक्का मारावा. तशाचप्रकारे जंगलातील काही वन्यप्राणी पण माती खातात.भर जंगलात बराचसा मैदान पायाखाली आला होता.आणि मधूमामांना विचारल्यावर ते म्हणाले... इथे सांबरांची पलटण असते माती खायला...यावेळेस चालताना एक आनंद मनात येत होता.जवळपास माझा मॅप बंद होता पण जंगलातील काही आकृत्या मात्र मी बारकाईने टिपल्या होत्या.ज्याचा उलगडा मात्र मला या काही दिवसांतच करायचं होतं.जाताना जसे आम्ही थांबत थांबत जात होतो.तसेच परतीच्या प्रवासाला आम्ही न थांबता चालत होतो.आम्ही दोघेही त्या चालण्यामूळे थकलो होतो.ज्यामुळे प्रत्येकाच्या तोंडून एकही ...Read More

21

पेरजागढ- एक रहस्य... - २१

२१)तास आणि गुप्ती महादेव....घोळपाकच्या डोंगरावर चढताना अंगाला चिकटणाऱ्या वनस्पती इथे नव्हत्या पण कुसराचे गवत असल्या कारणाने पायांच्या संपर्कात येताच अलगद आत जायचे.आणि त्याचे निमुळते टोक असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात त्वचेला खुपायचे.त्यामुळे इथे चालताना त्या गवताचा मात्र खूप त्रास व्हायचा.जुत्यांवर असला कुसरांचा जमाव जमा व्हायचा आणि दर दहा पावलांवर मला पाय झटकत राहावे लागायचे.शेवटी कसंतरी करत आम्ही तो मार्गक्रमण केला आणि निघालो.इकडे पाहिजे तेव्हढे दाट जंगल नव्हतं.पण जिथे तिथे असलेले मोकळे मैदान होते. दुरून बघावं तर जंगलामुळे दिसत नव्हते.चालताना जवळच एक मोहफुलाचं वृक्ष दिसलं.ज्याला बघुन "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे "....ही ओळ आठवली.कारण अगदी त्या ओळी प्रमाणेच त्या झाडावर एक पाकळीचा झाड ...Read More

22

पेरजागढ- एक रहस्य.... - २२

२२)हत्तीखोयाळ भ्रमंती...दोन दिवसांच्या अनुभवापोटी त्या धनगराची मला चांगलीच अनुभूती आली होती.ज्यामुळे आज तरी मला त्याला न्यावेसे वाटले नाही.कारण एकटा माझ्यासाठी प्राणदाता होता हे मी केव्हाच ओळखलं होतं.त्यामुळे आज आम्ही दोघेच निघायचं ठरवलं होतं. तसं पण जंगलाच्या आत तर जायचं नव्हतंच.गडाच्या मागच्या बाजूला पायथ्याशीच जायचं होतं.त्यामुळे आज सकाळी तयारी करून जरा गडाच्याच रस्त्याने निघालो होतो.तिथून अर्ध्या रस्त्यातून जंगलात प्रवेश केला.झुडूपी जंगलातून जाताना पायथ्याशी एक नाला लागला.ज्यात बऱ्याच प्रमाणात अभ्रकांची संख्या होती.सहज एक दगड उचलला आणि बॅगेत टाकला.आणि परत एकदा ते प्रवास शूरू झालं.. निशानांचे निरीक्षण करणे,विष्ठेचे परीक्षण करणे,कधी नागमोडी,तर कधी आडीमोडी अशा पद्धतीचे प्रवास चालू होते.चालताना मी कित्येकदा मागेच असायचो.मग ...Read More

23

पेरजागढ- एक रहस्य.... - २३

२३)रितूची शोधमोहीम...इकडे रितूचं एक ठरलेलंच होतं.कारण तिच्याही मनात माझ्या बद्दलचं एक न्यूनगंड साचलं होतं.ज्याची जबाबदारी ती दुसऱ्यावर सोपवू शकत जाणारा माझा जीव,जितका माझा जीव जात होता तितकाच तिचा पण, माझ्यासाठी जीव जात होता. आणि स्वतःचं जीव कुणालाच देवघरून अमरत्वाचा मिळत नसतो.त्यासाठी त्यालाच पाप आणि पुण्यरहित कार्य करावे लागते.त्या दिवशीच्या प्रसंगामुळे पेरजागडाच्या नावाने एक अनामिक हुरहुर निर्माण झाली होती.आणि ती कुणाला,तर इन्स्पेक्टर राठोडला.कारण मधूमाश्यांचे डंख आजही त्यांच्या अंगावर डिवचत होते.आजपर्यंत केलेली ही सगळ्यात मोठी चूक आहे, असं त्यांना वाटत होतं.पण रितुकडे बघुन त्यांना परत परत त्या घेतलेल्या प्रणाची आठवण व्हायची.आणि या रहस्याचा शोध लावायचाच असं विचार करून, परत नव्या जोमाने ...Read More

24

पेरजागढ- एक रहस्य.... - २४

२४)काही प्रमाणात नक्षाचा खुलासा....अलगद बॅगेला बाजूला ठेवून रितू माझ्या शेजारी बसली.आई घरी नुकतीच जाण्यासाठी वाट बघत बसली होती.आणि तिला तिचीही चिंता मिटल्यागत झाली होती.डॉक्टरने सांगितलेल्या काही सूचना समजावून शेवटी आई तिथून निघून गेली.आणि एकटी रितू परत मला बघत माझ्यापाशी येऊन बसली.केव्हा उघडशील रे डोळे?तिच्या मनात असलेला सततचा प्रश्न अलगद चेहऱ्यावर वाचून घेता येईल, अशा पद्धतीने प्रगट होत होता.आणि डोळ्यात आसुसलेल्या प्रेमाची धगधगलेली प्रीती ओसंडून वाहत होती.अगदी हात धरून मला उठवण्यासाठी तिचे हात तरसत होते.आणि हात हातात घेऊन तो निर्जीव असल्यागत झालेला स्पर्श स्वतःच्या मनाला सांत्वनत होती. तिचं प्रेम अजूनही जिवंत आहे याची साक्ष करून घेत होती.कारण तिला आता रहस्य ...Read More

25

पेरजागढ- एक रहस्य.... - २५

२५. पवन चकव्याच्या तावडीत.... मला त्या गडाबद्दल समजून घेण्यासाठी एक एकांत हवा होता.आणि इतक्या येरझारा घालून मी बऱ्यापैकी माहिती केली होती.घरी परतताना काकाने काही दिवस राहण्याची खूप विनंती केली होती.पण मी लवकरच परतणार म्हणून असं समाधानपूर्वक त्यांना सांगितलं होतं.त्यासाठी त्यांचे दोन ते तीन वेळा कॉल येऊन गेले होते. तितक्यात बहिणींचा लागलेला जिव्हाळा ,काकुंचे मायाळू प्रेम आणि असं बरंच काही होतं.जे मला कधीच परकं वाटत नव्हतं.अगदी आपल्यात घेतल्या प्रमाणे वाटत होतं. दिवसेंदिवस एक माह चालला गेला होता.पण अजूनही मी तिथेच होतो.मृत्यूचे काहीच रहस्य माझ्या हातात आलं नव्हतं.मनामध्ये एक प्रकारचं संताप उसळ्या मारू बघत होतं.उगाच रिकाम्या खोलीत येरझारा टाकून मन कुठेतरी ...Read More

26

पेरजागढ- एक रहस्य.... - २६

२६. पवनची सुटका आणि आकाशची भेट .. तीन वाजून गेले होते आणि मी तिथेच अडकून बसलो होतो.इथे थांबण्यापेक्षा हातपाय बरे असे समजून मी चालण्यास सुरुवात केली.काही झाडांना सारत, वाकत,बागत एखादी पायवाट शोधण्याचा प्रयत्न करत होतो.तोच समोर पाण्याचा खळखळ असा आवाज कानावर आला.जवळपास ओढा किंवा नाला असावा या आशेने मी जरा पावले तेजीने मापली. पावसाळी दिवसांत इथून तिथून पाण्याचे छोटे छोटे ओहोळ तयार होतात.पुढे घसरणीला लागून त्यांचा एका ओढ्यात रूपांतर होतो.आणि परत त्यांचा रूपांतर एका नाल्यात होतो.आणि पुढे जाऊन हाच नाला एखाद्या तलावाला जाऊन मिळतो.जोपर्यंत त्याचे रूपांतर ओढ्यातून नाल्यात होत असते तोपर्यंत इतरही जागून छोटे छोटे ओहोळ त्याला येऊन मिसळत ...Read More

27

पेरजागढ- एक रहस्य.... - २७

२७.आयुष्यात पुन्हा एकदा मैत्रीचे आगमन... जवळपास दोन ते तीन तासांचा प्रवास केल्यावर घरी पोहोचलो.मी आल्याची वार्ता रितुला कळताच ती आली.मी तेव्हाही ती तिला कधीच समजू शकलो नाही.आपला प्रिय व्यक्ती जेव्हा कालावधीने डोळ्यांच्या समोर येतो.आणि त्याला बघताच सुखावलेल्या डोळ्यांवर पाऊस पडायचा सुरू होतो.स्पंदन सेकंदाला वाजू लागतात.आणि हृदय जोरजोराने धकधक करू लागतं.हे तिच्या बाजूने अक्षरशः वाटायचे.तिच्या भाषेत सांगायचंच राहिलं तर दर वेळेस मी तिच्या समोर जीवन मृत्यूचा संघर्ष करून येत होतो. तिचं हे माझ्यासाठी तडफडणें अगदी सराहनिय होते.कारण ती तसं वेडे प्रेम करत होती माझ्यावर.पण तिचे असे तडफडणे मला तिच्यासमोर यायला बऱ्याचदा घाबरं करून जायचा.समोर माझं मृत्यू आहे की नाही हे ...Read More

28

पेरजागढ- एक रहस्य.... - २८

२८.भ्रमंती.... मी आकाशच्या मागोमाग जाऊ लागलो.जसजशी गुंफेची पायरी चढत होतो. आतमधला गर्द अंधार पुसट पुसट डोळ्यात साठवू लागला.कसं आहे?आपण उजेडात असतो ना दारातून घरातलं सगळं काही अंधारच वाटते.पण आपण जसजसं दाराच्या आत पाऊल टाकतो तेव्हा सगळं काही वेळाने स्पष्ट होत जाते.गुंफेत वावरायला फार कमी जागा होती.अगदी गुंफेच्या तोंडाशी येता एक दाराशी असलेली घंटी समोर होती.आकाशने तिला वाजवताच गुंफेमध्ये बरीच हालचाल चालू झाली.ती हालचाल होती वटवाघळांची.आतमध्ये वटवाघळे कळपाने होते.आणि ते सारखे आतबाहेर येरझारा मारत होते.त्यामुळे कानांशी त्यांचा आवाज, शिवाय त्यांचा समोरून मागाहून येणे जाणे थोडं फार भयानक वाटत होतं. गुंफेच्या आत जाताच उजव्या बाजूला काही चित्रफीत दिसल्या.आणि काही दगडांच्या मुर्त्या ...Read More

29

पेरजागढ- एक रहस्य.... - २९

२९.सात बहिणींचे अगोदरचे वास्तव्य.... पेरजागडापासून काही अंतरावरच नवतळा नावाचे एक छोटेसे गाव होते.ज्यात माना जमातीचे एक कुटुंब वास्तव्य करत करणे आणि पोट भरणे हेच त्यांचं उदरनिर्वाहाचे साधन होतं.मुलाच्या हव्यासापोटी एका पाठोपाठ एक अशा सात मुली त्यांना जन्मास आल्या.आधीच्या युगात असं होतं की वारसान जपायला मुलांचं महत्त्व तितकंच जपलं जायचं. ज्याचं बळी कित्येकदा मुलगी किंवा तिची आई व्हायची.त्यामुळे समाजात काय रूप दाखवणार? जेव्हा माझा वारस नसणार, ही चिंता त्याला सतावू लागली होती. काबाडकष्ट करायला दोन हात असायचे.आणि खायला आठ तोंड.त्यामुळे अन्नाविषयी आणि कपड्याविषयी नेहमीच घरात रडारड चालायची.त्यामुळे कुणाला काय करावे? काहीच सुचत नव्हते.अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी वादविवाद वाढायचे.बऱ्याच वेळा असं ...Read More

30

पेरजागढ- एक रहस्य.... - ३०

३०. रितूची आणि मृत्युदेवाची गाठ.... इकडे आचार्य निघून गेल्यावर हॉस्पिटलमध्ये रितू एकटीच माझ्यापाशी बसली होती.आचार्यांना बघून तिच्यात एक तरतरी असल्याची, खूण मात्र तिच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होती.आता लवकरच आणि निश्चितच काहीतरी मार्ग निघणार असे वारंवार तिला वाटत होते.खिडकीतून येणाऱ्या मंजुळ हवेचे चेहऱ्यावर झोत घेत ती बेडपाशी आली.जवळ असूनसुद्धा पुन्हा नव्याने ती माझ्या शरीराकडे बघत होती.कधी श्वास घेताना सुई...असा आवाज आला की डोळे एकवटून चेहऱ्याकडे बघायची.कदाचित मी डोळे उघडणार हा भास मनी घेऊन. इतक्यात दंडावरच्या ताईताने माझ्यावरचा यमराज घालवला होता.त्यामुळे शरीरावर बराच फरक जाणवत होता.शरीरावर पडलेल्या बऱ्याच वळांना उभारतांना बघून रितू थोडीफार निश्चिंत झाली होती.हळूच तिने ओढणीचा चंबू घेऊन माझ्या ...Read More

31

पेरजागढ- एक रहस्य.... - ३१

३१. पवनला स्वतःच्या अस्तित्वाची ओढ.... मी फार प्रयत्न केले पण त्या दिवशी आकाशने मला शहराकडे जाऊच दिले नाही.त्यामुळे दुसऱ्या मी शहराकडे गेलो.शिवाय रितुचे सारखे फोन मला येतच होते.आणि काहीतरी नवीन प्रयत्न करण्यासाठी मला परतीला जाणे आवश्यकच होतं.त्यामुळे सकाळी फार वेळ न दवडता मी शहराकडे परतलो.मी आल्याची वार्ता रितुला न सांगताच कळते हे मला माहीत होतं.त्यामुळे बॅग बाजूला ठेवून मी तिचीच वाट बघत होतो. खरंतर ज्या दिवशीपासून हे मृत्यू प्रकरण माझ्या मागे लागले होते, त्या दिवशीपासून तिच्यातल्या प्रेमाची जागा फक्त एका काळजीने घेतली होती.तिच्या डोळ्यांत असणारं आकर्षण ज्यात आता नुसते चिंतेचे भाव दिसत होते.पूर्वी जेव्हा कधी यायची तिचा लाजाळूपणा कधी ...Read More

32

पेरजागढ- एक रहस्य.... - ३२

३२. पवनच्या वडिलांचे मनोगत... जवळपास तीस वर्षे होतात या गोष्टीला.माझं लग्न होऊन चार ते पाच वर्षे झाली तरी आम्हाला प्राप्तीचे सुख नव्हते.मी एक प्राध्यापक असलो तरी त्या सुखाकरिता कित्येक अंधश्रद्धाचं, मी त्या वेळेस खतपाणी घालून पालन केलं होतं.कित्येक उपास तपास पोटाला आळी मारेपर्यंत घालवले होते.कित्येक देव्हारे अंगठे झिजेपर्यंत तुडवले होते.पण हातात निराशेचे कौल घेऊन परतल्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हतं.त्यावेळेस देव देवळे,पूजा अर्चना,वैद्य नैवैद्य या सगळ्यांशी मी त्रासून गेलो होतो.जगाला दाखवण्यासाठी आम्ही सुखी तर होतोच पण समाधान नव्हतेच आम्हांत. हिंडता फिरता जेव्हा आम्ही इथे स्थायिक झालो तेव्हा बऱ्याच डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती.अशाच एका ट्रीटमेंटला जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यावेळेसची ही घटना ...Read More