ती चं आत्मभान..

(207)
  • 88.9k
  • 30
  • 31.9k

"ती"च आत्मभान - आत्मभान म्हणजे काय तर स्वत्वाची जाणीव, स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार!! जे केल्याशिवाय आयुष्य जगण्यातली मजा येतंच नाही. प्रत्येकालाच आत्मभान असण्याची नितांत गरज असते आणि स्त्री जी समाजाचा एक महत्वाचा घटक आहे तिला तर आत्मभान असण अतिशय गरजेच आहे. स्त्रीला जेव्हा आत्मभान येत तेव्हा ती स्त्री खऱ्या अर्थाने तिचं आयुष्य जगायला लागते आणि स्त्री जगायला लागली की समाज सुद्धा बदलायला वेळ लागत नाही. आत्मभान ह्या कथासंग्रहासाठी १४ वेगवेगळे लेखक एकत्र आले आणि सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हे पुस्तक तयार झाले. आत्मभान ह्या पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरच्या १५ कथा आहेत. त्या साऱ्या कथा स्त्री च्या आयुष्याभोवती फिरतात. प्रत्येक स्त्री ही एक रोल मॉडेल असतेच आणि तेच ह्या वेगवेगळ्या गोष्टीतून दाखवायचा आम्ही प्रयत्न केला आहे. ह्या पुस्तकातल्या प्रत्येक गोष्टीतून वेगळाच पैलू मांडायचा प्रयत्न झाला आहे. स्त्री ही अगदी जन्मापासूनच लढा देत जगते, स्त्री कधी स्वतःशी लढत असते तर कधी समाजाशी! प्रत्येक क्षणी आयुष्यात काहीतरी नवीन शिकत असते आणि शेवटी ती जिंकतेच!! 'स्त्री जन्म भोगण्यासाठी आहे' ही विचारसरणी बदलायची गरज आहे. जुने दिवस गेले. आता नवीन वारे वाहू लागले आहे. स्त्रीच्या अस्तित्वाचा स्वीकार होतो आहे. आता स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. स्त्री अबला नाही हे ती जगाला दाखवते आहे. जेव्हा एक मुलगी, एक बाई स्वतः मधले गुण ओळखून तिची प्रगती करायला पुढे सरसावते तेव्हा तिच्या प्रगती सोबत समाजाला सुद्धा सशक्त बनवण्यास हातभार लावत असते. अश्या आपल्यातल्या प्रत्येक स्त्री ने आपल्यातले सुप्त गुण ओळखून अधिकाधिक प्रगती करावी आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्री ला खंबीर बनवण्यासाठी प्रेरणा घ्यावी हाच ह्या पुस्तक मागचा उद्देश आहे. जन्म घेणारा प्रत्येकजण खंबीर आहे आणि तो खंबीरपणा टिकवून ठेऊन आयुष्य उत्तम बनवावं म्हणून प्रत्येक स्त्री साठी आणि स्त्री ला साथ देणाऱ्या सगळ्या पुरुषांना हे पुस्तक समर्पित आहे. ह्या पुस्तकात मी संपादकाच काम केलं आणि आणि प्रत्येकवेळी मी काहीतरी नवीन शिकत गेले. वेगळे विचार असलेल्या लेखकांचा सहभाग असलेले हे पुस्तक वाचकांसमोर ठेवतांना मला विशेष आनंद होत आहे. मला खात्री आहे की हे पुस्तक वाचतांना तुमचे विचार, तुमचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल आणि स्वतःची क्षमता नव्याने कळेल. जाता जाता, पुस्तक कसं वाटलं हे सांगायला विसरू नका. आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या सुद्धा जरूर कळवा. अनुजा कुलकर्णी.

Full Novel

1

ती चं आत्मभान..

प्रस्तावना- ती चं आत्मभान.... ह्या कथासंग्रहासाठी १४ वेगवेगळे लेखक एकत्र आले आणि सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हे पुस्तक तयार झाले. ह्या पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरच्या १५ कथा आहेत. त्या साऱ्या कथा स्त्री च्या आयुष्याभोवती फिरतात. प्रत्येक स्त्री ही एक रोल मॉडेल असतेचं आणि ते ह्या वेगवेगळ्या गोष्टीतून दाखवायचा आम्ही प्रयत्न केला आहे. १. आव्हान- हे पहा वैशाली! आपल्या कॉलेजमध्ये नृत्यामध्ये पारंगत तू एकटीच आहेस, त्यामुळे कॉलेजतर्फे स्पर्धेसाठी मी तुलाच पाठवणार यात शंका नाही पण स्पर्धेत फक्त नृत्याविष्कार पाहिला जात नाही तर एकूण व्यक्तिमत्वही पाहिले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये तू स्वतःची काळजी घेतलेली दिसत नाही. वजन खूप वाढलेलं दिसतंय! नृत्यासाठी शरीर लवचिक असणे आवश्यक आहे नाहीतर हालचाली बेढब दिसतात. तू पुढच्या दीड महिन्यात स्वतःला फिट बनवू शकशील का तेवढं केलंस तर नृत्यात तुझा हात कोणी धरू शकणार नाही याची मला खात्री आहे. ...Read More

2

ती चं आत्मभान... 2

२. एक कमाल मुलगी- राधिका! सुंदर आणि बुद्धिमान मुलगी! तिला विद्वत्तेचे वरदानही तसेच मिळालेले! शिवाय academics मध्ये कायम आलेली. कारण विषयाचे पाठांतर न करता कन्सेप्ट आधी समजाऊन घ्यायचे ही तिची खोड. त्यामुळे अवघड प्रश्नही तिला फारसे जड जायचे नाहीत. ह्याच सवयीचा तिला खूप फायदा होत होता. ...Read More

3

ती चं आत्मभान... 3

३. राणी माशीचा विजय- गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवीत येई कड्यावरुनी घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या घे लोळण खडकावरती, फिर गरगर हळूहळू वळसे घेत लपत-छपत हिरवाळीत, मस्त आयुष्य झोमू आणि पीहू माश्या जगत होत्या. कोणतीच बंधने त्यांना अडवू शकत न्हवती. गाण गात झोमू आणि पीहू माश्या महालात शिरल्या. त्या दोघी महालात शिरल्या खऱ्या पण त्या स्वतःच्या धुंदीतच होत्या. आपण पोळ्यात आलो आहोत ह्याच भानही त्यांना न्हवत. ...Read More

4

ती चं आत्मभान .. 4

४. नित्या- विश्व हिंदू विद्यालयाच्या गेट मधून गाडी आत गेली. पार्किंग मध्ये त्यावेळी तशी फारशी वर्दळ नव्हती गाडी पार्क केली आणि ती तशीच बसून राहिली. तिची नजर काहीतरी शोधत होती आणि छातीत कमालीची धडधड होत होती. टेन्शन वाढलं की नखांच्या बाजूला असणारी क्युटिकल्स कुरतडण्याची तिला वाईट सवय होती नकळत आताही ती तेच करत होती. गाडीत पुन्हा एकदा मागे वळून तिने खात्री करून घेतली की, सोबत आणलेल्या साऱ्या वस्तू नीट मागच्यासीट वर तर आहेत ना.. हंम्म...! सारे व्यवस्थित होते. ...Read More

5

ती चं आत्मभान ... 5

५. परिवर्तन घडतांना- प्रत्येक मुलगी काही स्वप्न उराशी बाळगून जगत असते. कधी झटत असते कधी समाजाशी लढा देत असते. सुद्धा बरीच स्वप्न उराशी बाळगून जगत होती. अनिशा दिसायला तशी रूपवान. कोणावरही सुंदर छाप पडेल अस वागण बोलण अनिशाच होत. अनिशाचं कॉलेज पूर्ण झाल ते अगदी आरामात. आणि तिला मनासारखा जॉब लगेचच मिळाला. अनिशा खुश होती. मनासारखं शिक्षण पूर्ण झाल्यावर मनासारखा काम करता येणार ह्या गोष्टीचा अनिशाला आनंद झाला होता. जॉब चालू होऊन थोडे दिवस झाले. काही दिवसातच तिला प्रमोशन मिळाल. ...Read More

6

ती चं आत्मभान... 6

६. स्वज्योत- गार्गी आणि जुई दोघी जिवाभावाच्या मैत्रीणी, अगदी लहानपणापासूनच्या. शाळेत जी घट्ट मैत्री जमली ती छान जमलीच. दोघी वाढल्या. शिकल्या, स्वप्ने पाहीली. दोघीही हुशार , मनमिेळाऊ, बोलक्या. यथावकाश दोघींची लग्ने झाली. दोघी दुरावल्या. दोघींना एकमेकींची इतकी सवय होती त्यामुळे दोघींना सुरुवातीला जड गेले. पण त्यावरही दोघींनी मार्ग शोधला. पत्रे लिहून भेटीची तहान पत्राद्वारे भागवू लागल्या. पहिली काही महीने लंबीचवडी पत्रे आणि त्या मधे नवऱ्याच्या , सासरच्या गोष्टी असायच्या. दोघी पत्रातून मन एकमेकींसमोर मन मोकळ करायच्या. ...Read More

7

ती चं आत्मभान... 7

७. स्वयंसिद्धा- अंतहीन चालेल अशा वाटणाऱ्या ह्या स्वतःच्या गोष्टीचा अंत करणारी शाल्मली ही स्वयंपूर्ण, स्वयंप्रकाशी, स्वयंसिद्धा नायिका आणि आत्मविश्वासाची ही देणगी तिला कोणतीही परिक्षा पास व्हायला कायम पुरेशी ठरणार होती. ...Read More

8

ती चं आत्मभान... 8

८. वेगळ्या वाटेवर- प्रत्येक आई आपल्या मुलाच चांगल व्हाव ह्यासाठी झटत असते पण माधवी सारख्या काहीच आया मुलाला वेगळी निवडायला पाठींबा देतात. अश्याच एका वेगळ्या वाटेवर मुलाला पाठींबा देणाऱ्या आईची हि गोष्ट. ...Read More

9

ती चं आत्मभान... 9

९. अजूनही लढा चालू आहे..- गिरीजाच लग्न तिच्या पसंतीच्या मुलाशी झालं आणि गिरीजा नवीन घरात सुखाने संसार करायला लागली. आयुष्य एकदम मस्त चालू होतं. तिच्या घरातले सगळे लोकं म्हणजे तिचा नवरा- निकेतन, तिचे सासू सासरे सगळेच एकदम मस्त होते. पाहता पाहता लग्नाला दोन वर्ष होऊन गेली आणि बाळाची चाहूल लागली. बाळाची चाहुल लागल्यावर गिरीजा तर इतकी खुश झाली. आता त्यांचा परिवार पूर्ण होणार होता. त्यांच्या घरातले सुद्धा सगळे खुश होते. ...Read More

10

ती चं आत्मभान .. 10

१०. झरोक्यातला एक कवडसा..- आर्याने शालेय शिक्षण तर पूर्ण केलेच पण नाट्यशास्त्राची पदवी घेतली. आज तर तिला नाट्यशास्त्र विषयातल पदवीसाठी असलेल विद्यापिठाच सुवर्णपदक मिळत आहे. धन्य झाले मी! माझ्या आर्याने करून दाखवल. जी मुलगी शाळेत जाण्यास तयार नव्हती ती आज उच्चपदवीधारक झाली. इतक्यात स्कूटीचा हॉर्न वाजला आणि मालतीताई भानावर आल्या. आर्या उत्साहाने धावत घरात आली आणि म्हणाली आई तुला आज दोन आनंदाच्या बातम्या आहेत आणि त्या म्हणजे मला इंग्लंडमधील नाट्यशास्त्राची मानाची ३ महिन्याची शिष्यवृत्ती मिळतीय आणि परत आल्यावर मला एका मोठ्या निर्मितीसंस्थेकडे काम करण्याची संधी मिळतीय. ...Read More

11

ती चं आत्मभान .. 11

११. वळण..- “आमची गुरुदक्षिणा एकच ती म्हणजे तुझ्या आजूबाजूच्या प्रत्येक मुलीला अथवा बाईला तु तुझ्यासारखेच आचार आणि विचाराने समृद्ध हो ना ग मावशी ..” नितीका म्हणाली . “अगदी बरोबर बोललीस तु ..काय ग भार्गवी देशील न. ताई म्हणाल्या “हो ताई ..हेच माझे तुम्हा दोघींना “वचन राहील. एवढे बोलून भार्गवी बाहेर पडली.. आता एका नवीन वळणा वरून तिचा प्रवास सुरु झाला होता. हे अनपेक्षित वळण तिला खुप सुखावणारे होते. ...Read More

12

ती चं आत्मभान .. 12

१२. पाझर सुखाचा...- ‘मावशी, मी आशा बोलतेय. संगीताची मुलगी आशा. या विकेंडला तुम्हाला वेळ आहे का तुमच्याकडे आले असते,’ फोनवरचे बोलणे ऐकून माधुरीला आनंदाचा धक्काच बसला. ‘हो, नक्की ये,’ असे म्हणून तिने आशाला तिच्या घराचा पत्ता नीट सांगून कसे यायचे याविषयी सूचना दिल्या आणि , ‘ये मग नक्की, बाय’ असे म्हणून फोन ठेवला. आशा तिच्या माहेरी काम करणाऱ्या संगीताची मुलगी. सॉफ्टवेअर इंजिनिअर झाल्यावर एम.एस.करण्यासाठी अमेरिकेतल्या नामवंत विद्यापीठात आली होती, हे माधुरीच्या आईकडून तिला कळलेच होते. ती फोन करुन भेटायला येईल, हे सुध्दा आईने सांगितले होते. आज तिचा फोन आल्यावर माधुरीचे मन 30 वर्षे मागे, तिच्या बालपणात गेले. ...Read More

13

ती चं आत्मभान - 13

१३. तिचा तो ..- एक गोष्ट तिची, तिची म्हणजे एकाच तिची नव्हे बरं तिच्या सारख्या तिची . तर ती म्हणजे तुमच्या आमच्या सारखीच खूप सारी स्वप्न पाहणारी, आई बाबाच्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारी आणि त्यात जरासा वेळ काढून तिच्या त्या राजकुमाराची ती दिवा स्वप्न पहाण्याची तिचीती हौसच खूप भारीच असत तिला. प्रेम म्हणजे खूप आवडता विषय तिचा पण प्रण मात्र प्रेमात न पडण्याचा होता.... ...Read More

14

ती चं आत्मभान ... 14

१४. लिटमस..- यावेळी देखील देवाकडे कोणताही कौल न मागता अनघा देवाने लिहिलेल्या स्क्रिप्ट नुसार जगायचं ठरवते. केवळ आठवड्याभराच्या ओळखीत मरायला तयार असणाऱ्या विशालचे प्रेम स्वीकारण्याचा ती निर्णय घेते. यावेळेस अनघाच्या मनातला लिटमस रंग बदलत नाही. तिला न्यूट्रल वे सापडतो. विशाल आणि अनघाला घेऊन हेलिकॉप्टर हवेत भराऱ्या घेत दिसेनासे होते. ...Read More

15

ती चं आत्मभान - 15

१५. सौदामिनी..- २१ डिसेंबर २०१७ संध्याकाळी ७ ची वेळ. तिरुपती रेल्वेस्टेशन मध्ये कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत बसले होते. पतीमहाशय मला सर्व सामनासह तिथेच बसवून बाहेर फेरफटका मारण्यास निघून गेले. आमची परतीची गाडी रात्री ९ वाजता होती. तितक्यात रेल्वे सहा तास लेट आहे अशी घोषणा झाली अरे बाप रे! ...Read More