रेशमी नाते

(2k)
  • 1.4m
  • 319
  • 861.8k

विराट ?पिहु दे‌खमुख परीवार... सुमन देखमुख:- देशमुख परीवाराची लहान सुन‌,विराटची आई.. विराट १९वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले...कोवळ्या वयात वडिलांचे छप्पर गेले ..जे दिवस मस्ती करायचे होते त्या दिवसात घराची जबाबदारी येऊन पडली,घरातला,सर्वात मोठा मुलगा....त्यात वडिलांचा,आधार नाही...त्याने त्यांचा फॅमिली बिझनेस जॉईन केला...बिझनेस कडे लक्ष देता देता...शिक्षण पुर्ण केले...त्याचे वडील असताना चार हॉटेल होते....त्याने,बिझनेस जॉईन केल्यावर त्याने स्वतःच्या,हिमतीवर अजुन तीन हॉटेल उभे केले...लहान वयात त्याने,खुप‌ नाव,कमवलेले, होते.‌‌.. वीरा-विराटची छोटी बहिण कॉलेज मध्ये शिकते.त्याचा,जीव कि,प्राण त्याची बहिण एका वडिलांसारख त्याने तिला,जपलं तिला कधीच वडीलांची उणीव,भासु दिली नाही... रोहिणी- दामोदर (विराटचे मोठे काका -काकु)विराट त्यांना मोठी आई मोठे बाबा म्हणत होता.घरात तो त्यांना

Full Novel

1

रेशमी नाते - १

विराट ?पिहु दे‌खमुख परीवार... सुमन देखमुख:- देशमुख परीवाराची लहान सुन‌,विराटची आई.. विराट १९वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन वयात वडिलांचे छप्पर गेले ..जे दिवस मस्ती करायचे होते त्या दिवसात घराची जबाबदारी येऊन पडली,घरातला,सर्वात मोठा मुलगा....त्यात वडिलांचा,आधार नाही...त्याने त्यांचा फॅमिली बिझनेस जॉईन केला...बिझनेस कडे लक्ष देता देता...शिक्षण पुर्ण केले...त्याचे वडील असताना चार हॉटेल होते....त्याने,बिझनेस जॉईन केल्यावर त्याने स्वतःच्या,हिमतीवर अजुन तीन हॉटेल उभे केले...लहान वयात त्याने,खुप‌ नाव,कमवलेले, होते.‌‌.. वीरा-विराटची छोटी बहिण कॉलेज मध्ये शिकते.त्याचा,जीव कि,प्राण त्याची बहिण एका वडिलांसारख त्याने तिला,जपलं तिला कधीच वडीलांची उणीव,भासु दिली नाही... रोहिणी- दामोदर (विराटचे मोठे काका -काकु)विराट त्यांना मोठी आई मोठे बाबा म्हणत होता.घरात तो त्यांना ...Read More

2

रेशमी नाते - २

विराट ?पिहु (मागच्या भागात सुजाता हे नाव मी विराटच्या काकुला दिल होतं नंतर मी ते चेंज करुन रोहिणी ठेवले.सॉरी ठिकाणी नाव चेंज कारयचे राहीले त्यामुळे गोंधळ झाला..) पिहु:-आई तुम्ही‌ प्लिज रडू नका...मला कळतंय‌... सुमन:- पिहुला मिठी मारतात. तु आराम कर काही लागलं कि सांग..सोनिका आहे वीराच्या रूममध्ये उद्या सकाळी लवकर निघणार आहे .ते दोन दिवसांनी आमवस्या आहे ना म्हणून उद्याच माहेरी जावे लागेल.पाच दिवसांनी परत‌ घ्यायला येते..(त्या,पिहुच्या चेहरयावरून हात फिरवत निघुन जातात..) पिहु उठुन दरवाजा लावते..परत एक नजर रुमभर फिरवुन घाबरतच सगळ बघु लागली. समोर स्लाईडींगचा डोर होता...ती उघडु कि नको विचार करत होती..तिने हळुच उघडला.तर स्टडी रुम होती.. ...Read More

3

रेशमी नाते - ३

पिहु आवरुन किचन मध्ये येते. सुमन:- ये बाळा,आज पुजा कर ...मग काहीतरी गोड कर तुला जे बनवता येते ते तुला देवघरात कशी पुजा करतात ते सांगते... पिहु:- हम्म ...पिहु पुजा करायला घेते.ती जप म्हणत सगळे देव धुवुन कोरडे करते .सगळ्या देवांना गंध लावते...छान फुलांनी सजवते छोटीशी वृदांवनची रांगोळी काढते.दिवा धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता.. आजी :- किती छान पुजा करते गं सुमन ‌.. सुमन:- हसत)हो ना आई ..मी काहीच सांगतिले नाही.‌आणि रांगोळी किती छान काढली.पुजा बघुन मन प्रसन्न झाले. पिहुने घंटी वाजवुन शुक्रवार असल्याने गणपतीची,मग महालक्ष्मीची आरती म्हणून संगळ्यांना आरती दिली. विराट आवरुन खाली आला . रोहिणी:- पिहु आरतीच ...Read More

4

रेशमी नाते - ४

विराटने स्लाइडींगचा डोर ओपन केला .समोर पिहुला आवरताना तो तिलाच बघत होता . तिने नुकतीच अंघोळ केली होती कलरची साडी,ओले केस कपाळाला रेड कलरची छोटीसी टिकली तीच ती मीरर मध्ये बघुन आवरत होती.ती वळाली समोर विराटला बघुन तिला कालच आठवलं .रागाच्या भरात आपण काहीही बोलुन गेलो. विराट तिला रागात एक लुक देऊन पिलो नीट बेडवर ठेवतो. पिहु जवळ येत:- मी ....मी...काल .. विराट तिच्या कडे रागाने बघतो. पिहु हळुच म्हणाली ...सॉरीsss मला तसं म्हणायच नव्हतं. विराट काही न बोलता वर्कऑऊट करायला गेला. तो आत गेला कि पिहु रिलॅक्स होत, काय रे देवा हसायच बटण म्यूट करुन पाठवला का.. सकाळ ...Read More

5

रेशमी नाते - ५

पिहु लेक्चर अटेंड करते. ब्रेक झाल्यावर तिने वीरा ला कॉल केला. वीरा:- वहिनी मी कंटीन मध्ये आहे ये इकडेच . पिहु:- वीरा घरी जायच ,माहीत नाही का घरी गेस्ट येणार आहे. वीरा:-हो माहीत आहे.माझ काय काम‌ तु जा मी नंतर येते.. पिहु:-बरं बाय,पिहु घरी जाते.गाड्या तर बाहेर दिसतच होत्या‌ .तिला धाकधुक लागली होती. घरात कस जायच ....तशीच भीत भीत घरात येते...सगळे गप्पा मारतच बसले होते.ती आल्यावर सगळ्यांच्या नजरा तिच्या कडे वळल्या.ती इकडेतिकडे न बघता सरळ‌ जात होती... दामोदर:- पिहु, पिहु ने आवाज ऐकून थांबली. दामोदर:- पिहु ये‌ इकडे.... पिहु हळु हळु जात सुमन च्या शेजारी जाऊन थांबली. दामोदर:- मोरे ...Read More

6

रेशमी नाते - ६

पिहु विराट आवरतात.पिहुने पिंक कलरची कुर्ती व्हाईट कलरची लेगिंग घातली. केसांचा छोटा पफ करुन मोकळे सोडले होते. विराट पण व्हाईट कलरचा शर्ट जीन्स घातली‌... दोघे एकमेकांसमोर येत नजरानजर होते...दोघेही डोळ्यात‌ आरपार बघत होते. सुमन रुममध्ये येत: विराट झालं का...दोघे आवाजने दचकुन इकडेतिकडे होतात.. मॉम..हहहह. अरे झालं का लवकर निघा .ड्रायव्हर ला सावकाश गाडी चालावायला सांग रात्री उगाच उशीर नको होयाला ..पोहचल्यावर फोन करा.पिहु सगळं घेतलं का... हो‌ आई दोघेही निघुन जातात. पिहु विराट मागे बसले असतात..विराट लॅपटॉप‌ घेऊन बसला.पिहु रागानेच बघत होती...तिने रागात हेडफोन काढलं आणि कानाला लावलं.डोक्यतल्या विचारामुळे ??गाणं तर ऐकु येत नव्हतं ( मनात ) लॅपटॉप घेऊन बसायच ...Read More

7

रेशमी नाते - ७

दुपारी सगळे रिसोर्टला येऊन जेवण करुन रुममध्ये गे ल ‌..पिहु एकटीच रुममध्ये गेली विराट मला काम होते . सगळे आवरून फंक्शन अटेंड करायला गेले .विराटने पिहुची ओळख करुन दिली. ओळखीचे मिळाले ..श्रेया आर्यन गप्पा मारत बसले श्रेयांनची तिथल्या काही किड्ससोबत ओळख झाली होती त्यांच्याबरोबर खेळत होता .विराट हि बॊलण्यात बिझी झाला. पिहू एकटीच इकडेतिकडे बघत बसली होती.समोर हळदीचा कार्यकम चालू होता .विराट ने एक नजर पिहू वर टाकली दोघांची नजरानजर झाली .पिहू लगेच मोबाईल बघू लागली . पिहूच लक्ष श्रेया आर्यन कडे गेले .आर्यन ने एकमिनटांसाठी पण श्रेयाचा हात सोडला नव्हता ..नंतर विराट कडे बघितले विराट मस्त हसत गप्पा मारण्यात ...Read More

8

रेशमी नाते - ८

सकाळी विराट लवकरच तयार होऊन बसला होता... विराट वेळ असेल तर पिहुला इकडे घेऊन ये .मग जेवण करून जा...विराटची बोलते. हम्म ,बघु जीजी कशी आहे...(सूमनची आई)इकडे‌ आली नाही का.. नाही आल्या, गावाकडेच आहे या बोललं तर करमत नाही इथे. मी फोन लावला तर‌ फोन उचलत नाही विराट बोलतो. नाही उचलणार रुसल्या त्या तुझ्यावर तुझ्या मॉमवर विराट हसतो.काय केलं मॉमने .. लग्न घाईत केलं त्यांना बर नव्हतं तर‌ मॉम येऊ नको बोलली तर‌ रुसुन बसली.आणि तु पण फोन केला नाही .तर राग आलाय. (विराट तेव्हा रागात असल्याने त्याचं ऐवढ कोणाकडेच लक्ष गेलं नाही‌.) आता तु आणि पिहु एकदा जाऊन ये ...Read More

9

रेशमी नाते - ९

दोघेही गाडीत बसुन घराकडे वळाले. विराटचा मोबाईल वाजला. वीराचा कॉल होता.त्याने कॉल रीसीव केला हा बोल दादा वहिनीला कुठे गेला..मी घरी येऊन तास झाला ,तिने चाचरतच विचारले. घरी येतोय त्याने पिहुकडे बघितले. पिहु त्याच्याकडे बघुन गोड हसली. दादा,वहिनीची सॅक मोबाईल कुठे आहेत वीरा हसतच बोलु लागली. तु घेऊन आली ना,मग हो‌ घेऊन आले पण त्या बदल्यात‌ मला काहीतरी हवयं. तु जास्तच डिमांडीग झाली नाही.अस वाटत‌‌ नाही तुला. मग बहिण कोणाची आहे.. एक हात‌ से लो एक हात दो,सुमन तिथेच बसून हसत होत्या.त्यांना वीराने सगळ सांगितले होते. काही नाही ,फोन ठेव...त्याने फोन कट केला. हहहहअ.?,मॉम बघ दादा ऐकत पण नाही ...Read More

10

रेशमी नाते - १०

विराट देवेशचा फोन होता. अर्धा तासात येतोय बोलला.-मानव विराटने मानव कडे बघितले.हम्म दोन तासाच्या सगळे मिटींग कॅन्सल कर ... ‌तुला काय वाटत देवेशला का भेटायच असेल. आय डोन्ट नो,..(त‌ो थोडा विचार करत मानव कडे बघतो,)बहुतेक परत माझ्या बरोबर डील साईन करायची असेल.. तो परत तीच डील घेऊन आला तर मानव थोड्या शंकेतच विचारतो. मला अजुन ती पाटर्नर शिप कुठल्याही किंमतीत हवीच आहे . विराट तु विचार कर .मागच्या वेळेस त्याने कंडीशन ठेवली होती.आणि आता परत कुठली दुसरी ठेवली तर तु तयार होणार... विराट हसतो...मानव बिझनेस करताना घाबरत करायचा नसतो.मला जे हवे ते मी कुठल्याही परीस्थितीत मिळवुनच राहतो.आणि मला माहीत होते.देवेश कधी ...Read More

11

रेशमी नाते - 11

पिहु सकाळी उठली तर विराट,पालथा झोपला होता. झोपेतच तिच्या जवळ आला होता.त्त्याचा एक हात तिच्या पोटावर होता.‌दररोज सारखी त्याची थोडी खाली तर ‌थोडी वर पिहुला स्वतःशीच हसली.कोणाला वाटेल का हे असे झोपतात.... त्या पिलोचा काही़ उपयोगच नाही,सगळ्या अस्थाव्यस्थ झाल्या होत्या??? पिहुने हळुच त्याचा हात काढला....आणि आवरुन बाहेर आली.गॅलेरीत बाऊल मध्ये बर्डसला पाणी ठेवत होती..थोड ढगाळ मधेच सुर्याची कोवळी किरणे डोकावत होती.... विराटला जाग आली..तो डोळे चोळतच गॅलेरीच्या दिशेने बघु लागला.त्याची नजर पिहुवर गेली..कोवळ्या ऊनाची सोनेरी किरणे तिच्यावर पडली होती.त्यात‌ तिच रुप अधिकच खुलुन दिसत होते.नुकतीच अंघोळ केली होती...ओल्या केसामंधुन पाण्याचे थेंब टपटप गळत तिच्या पाठीवर,दंडावर पडत‌ होते...अंगावर एकही दागिना ...Read More

12

रेशमी नाते - 12

उशिरा झोपल्यामुळे विराटला सकाळी लेट च जाग आली....आज ऑफिस नव्हते म्हणून तो निवांत आवरून खाली आला. सकाळपासून पिहू दिसलीच मॉम, पिहू कुठे आहे. ती कॉलेजला गेली. तेव्हा त्याच्या लक्षात येते. तो ब्रेकफास्ट करून देवेश बरोबर साईट वर निघून जातो. संध्याकाळी विराट घरी आला. आत आल्या आल्या पिहू चा हसण्याचा आवाज आल्याने विराट चा चेहरा खुलला. सकाळ पासुन बघितल नव्हत तिचा आवाज ऐकला नव्हता तर चुकचुकल्यासारखे वाटत होते. विराट फ्रेश होऊन खाली आला. पिहू सगळ्याबरोबर गप्पा मारत बसली होती .विराट तिच्या जवळ चालला होता की पिहू चा मोबाइल वाजल्याने ती कॉल रिसीव करत बाहेर जाते. विराट ही तिच्या मागे जाणार ...Read More

13

रेशमी नाते - 13

सुमन विराटला रुममध्ये बोलवतात.., मॉम तु बोलवलं तो सुमनच्या मांडीव‌र डोक ठेवुन आडवा होतो. पिहुच्या वडीलांचा फोन आला होता. म्हणत होते. तिच्या कॉलेजला आता सुट्टया आहेत ना,मग .. तो नजर रोखुन बघतो..मग तो पटकन उठुन बसतो... मग ते पंधरा वीस दिवस घेऊन जाऊ का विचारात होते.. नो मॉम!!!!! तो जोरातच ओरडला.. ये हळु....मॉम हसत बोलतात. मॉम हे काय मधुनच ...मी पिहुला कुठेही पाठवणार नाहीये...तु नाही म्हणून सांग .. अरे विराट वेडा आहेस का काही तरी बोलत असतो काय म्हणतील मी नाही बोलले तर... मॉम ह्यावर आता परत डिसकशन होणार नाही तुला बोलता येत नसेल तर‌ मी बोलतो... सुमन कापाळालाच ...Read More

14

रेशमी नाते - 14

विराट मॉमला कॉल करतो..मॉम कॉल उचलतात... मॉम .. (त्या तुटकच बोलतात )हा बोल.. मॉम पिहुला फोन दे ...रूममधला पण नाही आणि कॉल पण लागत नाहीये... ती असयाला तर हवी तुझा फोन उचलायला... तो थोडा दचकतो...मॉम...पिहु.. हो गेली घर सोडून कायमची,आता परत येणार नाही.. मॉम,...तो ओरडुनच बोलतो... हो विराट ती गेली आहे...तु तिच्याशी अस वागशील वाटलं नव्हतं मला ...(.त्या शांत होतात)तु घरी आल्यावर बोलू तू काम करत बस...मला माहित आ‌हे कळालं तरी तु तुझ काम करूनच येणार .अस बोलून सुमन फोन ठेवून कंठ दाठुन रडू लागतात.. व‌ि‌राट ही शांत डोळे झाकुन बेडवर स्वतःला झोकून देतो..त्याच्या एका चुकिच्या गोष्टी मूळे एवढ ...Read More

15

रेशमी नाते - 15

विराटला कामामुळे दोन दिवस पिहुशी बोलताच आलं नाही...इतके दिवस पिहुच्या टेंशनमध्ये कामामरलक्षं लागत नव्हतं जस तिच्याशी बोलुन आलां तेव्हा मन शांत होऊन कामाकडे वळलं...आणि पिहु कधी फोन करणार त्याला? ते ही माहित होतं .रात्री यायला उशीर होत होता..पिहु पण झोपली असेल म्हणुन तो करत नव्हता. इकडे पिहुला राग येत होता..एक दिवस नाटकं केली ...परत त्या नंतर फोन सुध्दा केला नाही.काय ‌‌खर काय खोट काही कळतच नाही... पण़ हे ही तिला कळत होते...त्याच्या वर खुप जबाबदारया आहेत..तिने स्वत: बघितलं होते.... आई,...नमनचा कॉल आला होता दोन दिवसाने येणार आहे..विराट बोलतो. रोहिणी ,सूमन विराट कडे बघतात. कस काय,तो दोन महिन्याने येणार होता ...Read More

16

रेशमी नाते - 16

पिहुला त्रिशाचा फोन येतो...पिहु ब्लँक होत तिचा फोन उचलते... हॅलो पिहु मला तुझ्याशी बोलायच आहे... आत्ता मी बाहेर आहे... माहित आहे मी पण लग्नालाच आले आहे. पिहु नजर फिरवून बघते..हम्म मग मी काय करू... मला विराट आणि माझ्या नात्याबद्दल बोलायच होते... पिहुचे डोळेच भरुन येतात..ती स्वतःला सावरते..हे बघ त्रिशा मला काही इंटरेस्ट नाहीये..ते तु आणि विराट,बघुन घे... पिहु खूप महत्वाच आहे..विराट बद्दल एक गोष्ट सांगायची आहे.. त्रिशा.... पिहु एक ना,प्लिज मी स्टोरेज एरीया समोरच्या रूममध्ये तुझी वेट करत आहे...मला लवकर निघायच आहे....ती एवढं बोलुन फोन कट करते.. पिहु ब्लँक होते..त्रिशाला काय बोलायच आहे...ते पण विराट बद्दल ....जाऊ कि नको...ती ...Read More

17

रेशमी नाते - 17

प्रांजु ...जा पिहुला बोलावुन आण उठल्यापासुन वरच बसलीये, मी गरम गरम शिरा केला जा, मम्मी ,आता तु विलन बनु दोघांमध्ये बसलेत तर बसु दे... अग विचीत्र मूलगी,जा बोलावुन आण,अजुन काही खाल्ल नाही तिने उशिरा काही खाल्ल कि जेवणार नाही...तुमच्या दोघींची नाटकं ऐवढी असतात ना खाताना,कि बस्स....जा आता .. मग तु जा ना, तु ऐका शब्दात का ऐकत नाही,रेवती तिच्या कानातून हेडफोन काढुन रागानेच मोबाईल घेते... मम्मीईईई...प्रांजल चिडुनच उठते... जा आता...दोघांना बोलव.. प्रांजल तणतण ‌करतच वर गेली....प्रांजल टेरेसवर येताना आवाज देतच ‌येऊ लागली... अहो,सोडा प्रांजु येतेय... हम्म,....,तो अजुन जवळ घेत गळ्यावर ओठ ठेकवुन किस‌ करत म्हणतो‌. पिहु शहारुन जाते....हे..हे..‌ काय ...Read More

18

रेशमी नाते - 18

सकाळी सगळे शांत ब्रेकफास्ट करत होते.. विराट न्युज पेपरमध्येच बघत होता.. त्याने एक नजर सगळ्यांवर टाकली सकाळ पासुन कोणीच बोललं नव्हतं. मॉम माझा शेक , गीता .... ह.हो..हे धरा भैय्या. दादा आज,कोणीही तुझ्याशी बोलणार नाही आजीची ऑर्डर आहे नमन ‌हसत सांगतो. ते दिसतच आहे ,विराट दात ओठांवर घासतच बोलतो. मग कळत‌ंय ना,मग तयार हो ना लग्नाला जीजी ओरडुनच बोलते. जीजी लग्न काय दहा वेळा करायची गोष्ट आहे विराट चेअर वरुन उठुन हॉल मध्ये जातो.त्याच्यामागे सगळे येतात. अरे,पोरा लग्न किती घाईगडबडीत केलं किती जणांना माहीत पण नाही तुझ लग्न झालं सगळ्या विधीने नीट लग्न कर म्हणतेय मी जीजी कंठ दाटतच ...Read More

19

रेशमी नाते - 19

विराट घरात आल्यावर आजी बरसतेस..विराट,तुला घरातच बजावुन सांगितले होते ना,लग्न होईपर्यंत पिहु तिकडे आणि तु इकडे राहणार मग का तो एक नजर रागाने सूमनकडे बघतो..सुमनला त्याच्या नजर‌ेनेच कळालं हा आता शांत बसणारयातला नाही. आजी पिहुच आणि माझ लग्न झालयं आणि ती माझी बायको आहे...हे तुम्हाला लग्नाच वेड लागलयं ना मग करा ना,मी काही बोललो का,पण पिहु मला उद्या ह्या घरात हवी तो ऑर्डर दिल्यासारखा बोलुन निघुन गेला. अगं सुमन हा कोणाच ऐकत कस नाही,जीजी सुमनवर चिढते. आई मी काय सांगु आता तो ऐकणार सुध्दा नाही, ते मला माहित नाही कस समजावायच तु बघ, आई मी काय म्हणते,(सुमन जवळ येऊन ...Read More

20

रेशमी नाते - 20

सकाळी पिहु ला जाग आली तर विराट तिला कुशीत घेऊन झोपला होता..पिहुने वर एक नजर बघुन त्याच्या कपाळावर कीस त्याचे केस हाताने मागे सारले...झोपेत किती क्युट दिसतात...नाही तर चेहरयावर आट्याच पडल्या असतात पिहु मनातच बोलुन हसत होती....पिहुने,अलगद त्याचा हात पोटावरुन बाजुला केला.आणि बाथ घ्यायला गेली....विराटला ही नुकतीच जाग आली आणि तो मोबाईल चेक करु लागला....पिहु बाहेर आली तर दोघांची नजरानजर झाली पिहुने लाजुन चेहरा फिरवत मिरर मध्ये बघु लागली..ती केस पुसतच होती.कि विराट ने तिला मागुन मिठी मारत केस मागे घेतलं... अ..हो, हहह , तो तिच्या ओल्या केसांचा गंध घेत बोलला.. सकाळ झाली आहे,उठा तो डोळे झाकूनच होता तर ...Read More

21

रेशमी नाते - 21

‌संगीत फंक्शन संपून सगळ्यांना एक दिड वाजले झोपायला... पिहुला झोपच येत नव्हती.प्रांजल तर आल्या आल्याच झोपुन गेली. विराट ही दिवसभर ओढाताण झाल्याने त्याला ही झोप लागली.होती..पिहु ह्या कुशीवरुन त्या कुशीवरून होत विचार करत होती .विराट ला कॉल करु का,नको झोपले असतील...ती विचार करतच उठुन बसली.... विराट झोपला होता...अचानक दार दोन वेळा नॉक झाल्याने त्याने हुळ हुळ डोळे उघडझाप करत वॉच कडे बघितलं रात्रीचे तीन वाजले होते...परत दार नॉक झाले...तो दचकुन घाईतच उठुन दार उघडले...तर समोर पिहु होती... पिहु,वॉट हॅप्पन.. का...य त्रास होतोय‌ ..का तो तिच्या कपाळावर गळ्यावर हात ठेवत घाबरून विचारु लागला.... पिहु त्याच्या कुशीत शिरुन डोळे झाकते..मला झोप येत ...Read More

22

रेशमी नाते - 22

पहाटे उठुन पिहुने पुजा केली...देवापुढे दिवा अगरबत्ती करत सुखी संसाराची प्रार्थना केली... पिहु जा आवरुन ये निघायच आहे.सुधा बोलते... आई दिसत नाहीये... वहीनी थोड्यावेळापुर्वीच निघाल्या पुजेची तयारी करायची ना,तु ही आवर निघायच आहे आपल्याला... पिहु हो म्हणत रुममध्ये आली ,विराट रुममध्ये नव्हता..ती विचार करत दाराबाहेर बघु लागली....विराट स्टेप्स उतरुन ‌खाली येत होता.. अहो ,ही वेळ आहे का,त्याच्या टीशर्ट ओला होता आत्तापर्यंत तो जिममध्येच होता...म्हणुन ती चिडली. विराट हसतो..किती घाई हहहं ,मुबंईला जायची...जाणारच आहोत...तु उठली़ मग म‌ला पण जाग आली...आता पुजा तर मला करता येत नाही मग म्हटलं जे काम मला येते तेच कराव अस म्हणत तो जवळ जाणारच किती ...Read More

23

रेशमी नाते - 23

दहाच्या आसपास विराटला जाग आली... डोळे चोळतच नजर‌ पिहुवर टाकतो....पिहु शांत दोन्ही हाताचा विळखा घालुन त्याला बिलगुन झोपली होती..विराट हसत तिच्या चेहरयावरुन हात फिरवत गालावर‌ किस करतो. रात्री पिहुला झोप लागतच नव्हती ..खुप उशीराने झोप लागली होती...त्याने अलगद तिचे हात काढुन तिला ब्लँकेट नीट ओढली.. फ्रेश होऊन सगळे कर्टन उघडुन स्लाईडींग उघडुन बाहेर आला. रिमझिम पाऊस चालु होता..तिच्या वर नजर टाकून तो खाली आला... मेन डोर उघडला..सर्वंट आत येऊन सगळ आवरु लागली...विराट पिहूसाठी दूध घेऊन वर आला .पिहु अजुन झोपलीच होती. विराट तिच्या जवळ आला आणि मानेखाली हात घालत तिच्या चेहरयावरुन ,एक हात फिरवु लागला....पिहु...उठायच नाही...का...त्याने तिच्या गालावर हलकेच ...Read More

24

रेशमी नाते - 25

पिहु पेपर वर साईन कर...विराट ‌तिच्यासमोर पेपर ठेवत बोलतो.. कसले ,पिहु ब्लँक‌ होत पेपरला बघत बोलते. साईन कर प्रोसिजर पुर्ण करायच्या आहेत.पिहु काहीच न बोलता चेहरा दुसरीकडे फिरवते. माझ्यावर ट्रस्ट नाही का,तो तिला जवळ घेत बोलतो‌..अहो,ती आठ्या पाडतच बोलते... हो तसच आहे,तु मला पूर्णपणे स्वतःच मानलच नाही... तुम्ही काय बोलतोय....(विराट तिचा हात पकडुन बेडवर बसवतो.) पिहु,मी तुला काही घेतलं तर तुला का प्रॅाब्लेम आहे..हे नको ते‌ नको का करत असते....माझ जे आहे ते तुझच आहे ना.तुझ्यानावाने जी इनवेस्टमेंट करतो..ते फ्युचरमध्ये तुला किंवा मला उपयोगीच पडणार ना... हहं पण,तुमच्या नावाने घेतलं तर चांगलच आहे ना...तुम्ही तुमच्या नावाने घ्या... पिहु,साईन कर..ति‌‌ला ...Read More

25

रेशमी नाते - 24

रात्री अकरा साडे अकराच्या आसपास दोघे घरी येतात...सुमन त्यांची वाट बघत बसल्याच होत्या.. मॉम,तु झोपली नाही,अजून ..विराट आत येत बघत बोलतो... दोघांना बघुन सुमनला आंनद होतो...तूम्ही आल्याशिवाय झोप लागणार आहे का..(विराट सुमनला हग करत गालावर किस केला. गुड नाईट मॉम म्हणुन वर निघून गेला.) सुमन पिहुच्या डोक्यावर हात फिरवत बोलते..पिहु हसुन पाया पडुन हग करते..सुमन पिहुला वरुन खाली निहाळते..तशी पिहु लाजुन नजर खाली घेते.‌तिच्या चेहरयावरची चमक सांगत होती. दोघे आता संसाराला लागले. आई ,आराम करा..पिहु हसुन बोलते.. हो आता सुखाचीच झोप येणार आहे...सगळ डोक्यावरच टेंशन गेलं.विराट आणि तु खुश आहेस हेच महत्वाच आहे...(पिहु हसुन डोळ्यानेच दिलासा देते...) पिहु सकाळी ...Read More

26

रेशमी नाते - 26

मी नाही जाणार ,पिहु चिडुनच बोलते....विराट काही‌ न बोलता त्याच आवरत‌ होता... अहोssमी का‌य बोलले ऐकु येते ना... पिहुsss वेळ एकाच टॉपिक वर बोलणार आहे... (कॉलेज झाल्यावर एकस्ट्रा क्लासेस लावले होते..पिहूला जॉईन नव्हते करा‌यचे...) पिहु घरात स्टडी होत नाही...(तो तिला मागुन मिठी मारत बोलतो..)ऑनलाईन क्लासेस बंद‌ झाल्याने किती प्रॅाब्लेम येतोय. पिहु त्याच्याकडे वळते...हह,पण घरी किती लेट होईल .. फोर मंथच त्रास होईल ना...घरी येऊन तुूझ मन तर बुक्स कडे वळतच नाही....(पिहु रागाने च बघते...)विराट हसत तिच्या गालावर चावतो...? आहहं ,?पिहु चिडुन त्याच्या दंडावर मारत मिठीत शिरते. . . . . . . . विराट कामानिम्मित पुण्याला येतो...तसेच सुमनला ही ...Read More

27

रेशमी नाते - 27

पिहुला दररोजच्या वेळीच जाग आली.........तिने टाईम बघितला सहा वाजले होते.........आलार्म कसा वाजला नाही म्हणुन तिने चेक केलं तर बंद विराटवर नजर टाकली अन् गालत हसत हळुच त्याच्या हात काढुन बाजुला झाली....... .....विराटने तिच्या पोटावर हात टाकत परत जवळ ओढलं... झोप ना....तो झोपेतच तिला बोलला... पिहु त्याच्या कडे टर्न होऊन त्याच्या केसामधुन बोट फिरवु लागली...तिची नाजुक बोट त्याच्या केसांमधुन फिरत होती....तर त्याला परत झोप लागली.......पिहू थोड्यावेळाने अलगद बाजुला होत बाथ घ्यायला गेली........तिने बेडवर नजर टाकली तर विराट नव्हता........तिच लक्ष गॅलेरीत गेलं.......तो आज स्वतः बर्डसला पाणी ठेवत होता....... पिहू हसत गॅलेरीत गेली......अहो, अहहं आज दिवस कुठुन उगवला तुम्ही चक्क .......पाणी,हहं पिहु ...Read More

28

रेशमी नाते - 28

पिहु कॉलेजवरुन येऊन क्लासेस साठी रेडी होते...तिची इच्छा तर नव्हती......विराट त्या बाबतीत तिच काहीच ऐकत‌ नव्हता..त्याने पिहुला नविन ड्रायव्हर सांगितलं होते.....पण तो बाडीगार्ड च काम करत होता.....बॉडीगार्ड पिहुला क्लासला सोडुन बाहेर नजर ठेवुनच होता.....विराट ऑफिसमध्ये होता.....मोबाईल ब्लिंक झाल्याने त्याने हातातली फाईल ठेवुन कॉल रीसीव केला.....सर,देवेश मोहीतेची कार मॅडमच्या क्लास बाहेर आहे.......आर्धा तास झाली......किती वेळ आहे क्लास अजुन.....विराट घाईतच लॅपटॉप बंद करुन ब्लेझर घेऊन क्षणात केबिनच्या बाहेर येत बोलला......( विराटला त्याच्या लॉयर कडुन कळाले होते...पिहु स्वतः केस मागे घेईल....तर त्रिशाला सोडवायला देवेशला सोप जाईल.....तो पिहुला भेटण्याचा प्रयत्न करेलच हे विराटला माहितच होते)देवेश ,पिहुचा क्लास सुटण्याची वाट बघत कार मध्ये,बसला होता.....कारच्या ...Read More

29

रेशमी नाते - 29

मॅडम काय बनबु लंच ला रीना पिहुला विचारते‌‌‌.....पिहु काय बनवायच सांगते ....रीना किचन मध्ये जातात....पिहु ही त्यांच्या मागे आंटी तुम्ही कधीपासुन काम करता.... मी ,पाच वर्ष झाले....सकाळचा ब्रेेकफास्ट आणि रात्रीचा डिनर ....लंच तर विराटसरांच्या घरातुनच येतो...विकमधुन तीन चार वेळा सुट्टी पडतेच रात्रीची ...... तशी पिहु हसते.... तूम्ही ओळखता....ह्यांना...तस रीना प्रश्नार्थक नजरेने बघतात.... अम्म,सॉरी म्हणजे विराट ह्यांना म्हणायच होते...पिहुला आता नाव घ्यायची सवय नव्हतीच‌‌‌‌‌...तिला बोलताना ऑकवर्डच वाटत होते..... रीना हसतात....हो,त्यांना कोण नाही ओळखत......ते सारखे इथे येतात...... हम्म, बेल वाजते प्रांजल दार उघडते.... वीराssप्रांजल ऐक्साईटेड होतच गळ्यात पडते....पिहू किचनमधुन बाहेर येते..... वीराची नजर पिहुवर पडते...तिला सकाळच आठवुन चेहराच उतरतो....दादा चा राग ...Read More

30

रेशमी नाते - 30

पिहु गॅलरीत फोनवर बोलत बसली होती.....विराट एक नजर बघून फ्रेश होऊन येतो...अजून पिहू फोनवरच बोलत होती स्टडी मध्ये जातो..... विराट जोरात पिहु ला हाक मारतो...पिहु पन थोडक्यात बोलून आत येते अहो किती जोरात हाक मारता....तुला किती वेळा सांगितले रूम क्लीन करताना समोर थांबत जा हे बघ फाईल कसे ठेवलेत...त्याने सगळ्या फाईल रागात बाहेर काढल्या होत्या....अहो मी समोरच होते...अणि...ते...ते.....मीच लावले होते...पिहु हळू आवाजात त्याच्या जवळ येत बोलते...ओह्ह, ग्रेट मस्त काम केले.....मला वाटले फोनवरच बिझी असतेस...त्याने फाईल नीट रॅक मध्ये प्रॉपर गॅप ठेवत लाइन मध्ये ठेवल्या....पिहु,बारीक डोळे करून रागात त्याने लावलेल्या फ़ाइल ढकलून देते....पिहु sss,? वेड लागलेय,... तो परत लावत बोलतो....ते बुक्स ...Read More

31

रेशमी नाते - 31

मम्मी तू येणार आहे, का पिहू विचारते.... हो मानव सारखाच फोन करून करून नको करून ठेवलेय.....रेवती हसत सांगतात.... ह्म्म, पिहू हसते.... पप्पा पण जाऊ बोले.....पप्पा दोन दिवस राहतील...मी रहते तुझी exam होईपर्यंत....मावशी डब्बा देते बोली...... ठीक ये....कधी येणार आहे..... मानव कामासाठी येणार आहे त्याच्या बरोबर च येणार आहे.... हहह.....पिहू मोबाइल ठेऊन स्टडी करत बसते....मोबाइल मध्ये टाइम बघते अकरा वाजले होते..पिहू आवरून बेडवर येते...अन् विराट ला कॉल करते..... डीड यू फिनिश्ड यूऊर स्टडी ... , हो..हो....हो....हो....पिहू जोरात चिडूनच बोलतो.... विराट डोळे झाकून फोन कानाचा काढत परत लावतो कशाचा राग आला...हहहह तो हसत बोलतो. .अहो,.... हहह,..विराट लॅपटॉप बंद करत गॅलरी ...Read More

32

रेशमी नाते - 32

सॉरी ,पिहू आम्ही लवकरच निघालो होतो...मधेच सुधाला त्रास होत होता....मग हॉस्पीटल मध्ये वेळ झाला.... काय झाल?कुठे आत्याला पिहू काळजीने नजर फिरवत बोलू लागली..... विराट ही ब्लँक होत बघू लागला.... आई घरी आहे आराम करतेय..... हातावर पडली होती फंक्शनमध्ये सांगितले नाही.....हात खूपच ठणकत होता येताना गाडीत बोलली....मग काय हॉस्पिटल मध्ये उशीर झाला....रिषभ वैतागत बोलला...... जास्त लागल आहे का विराट सिरियस होत बोलला.. नाही रे दादा सुजला आहे सगळ चेक केले....15 दिवस हात सांभाळायला लावला.... आई आपण भेटून येऊ.... आता नको झोपली आणि काळजीच कारण नाहिये....जा जाऊन आराम करा.....रात्र झाली आहे..... वहिनी एक मिनीट, नमन जवळ आला.... पिहू ब्लँक होत बघू ...Read More

33

रेशमी नाते - 33

आई मी जाऊ ना तुमची इच्छा .... पिहू बोलतच होती की सुमन अडवत बोलतात...पिहू आम्हाला कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही.....विराट डिसीजन घेतला आहे तो बरोबरच असणार आहे....पन तुझी इच्छा असेल तर कर विराट ने विचारल नसेल तुला म्हणून विचारते...पिहू ब्लँक होत बघते..... अशी बघू नको मला माहीत आहे विराट कसा आहे...सुमन हसत बोलतात.....तुला ऑफिस मधे काम करायच आहे ना सुमन तिच्या हनुवटी ला धरून विचारतात.... पिहू मानेनेच हो म्हणते....आई मी या आधी कधीच स्वतः तिचे डिसीजन घेतले नाही....आणि अस बाहेर जाऊन काम करायचा विचार अजून पर्यंत केला नाही....म्हणून ह्यांनी विचारले नसेल....पण मला आवडले माझ्या पेक्षा हे माझा विचार करत आहेत ...Read More

34

रेशमी नाते - 34

विराट, दिल्लीला नमन आणि रिषभ गेले होते. विराट शॉक होत मानव कडे बघतो. What did you said?... ब्लँक होऊन दोघांकडे बघू लागली . नमन आणि रिषभ दिल्ली गेले होते .आणि डील फाइनल करून आले. नमन ने विश्वासात घेत mr. मेहता ला समजवले . Mr. मेहता ही तयार झालेत. काल फोन आला होता. फक्त आता तुझ्या बरोबर बोलून प्रोजेक्ट चालू करायच. विराटचा चेहरा पूर्णपणे ब्लँक झाला होता. नमन अस काही करेल त्याने विचार केला नव्हता. कुणापुढे न झुकणारा आज त्याची चूक सुधारली. स्वतः हॅन्डल पन करून आला. विराट चेहर्‍यावर इमोशनल, आनंद, डोळ्यात चमक सगळे भाव मिश्र झाले होते. पिहू ही ...Read More

35

रेशमी नाते - 35

पिहूला जाऊन दोन महिने झाले होते. ती छान रमली होती. दिवस भर विराट ने तिला कामात अडकवले ती कधी वेळ नाही देत म्हणत नव्हती. ती असल्यामुळे तो एक काम कमी करून लवकर घरी यायचा. ती जवळ असल्याने कामाला किती वेळ पण लागु दे अस झाले होते. ...त्यात पिहू ला ही कुठला धाक नव्हता तर आरामात रहायची .... संडे ला फूल एन्जॉय करत होते... कुठे बीच वर जा तर कुठे स्पा, नाही तर साईट वर फिरून यायच....दिवस छान नोकझोंक मजेत जात होते. विराटला रोहिणी चा फोन येतो. हा बोल आई.... विराट दिवाळी आहे.... आई, मला जमेल की नाही अजून ...Read More

36

रेशमी नाते - 36

पिहू ,प्रांजल खूप दिवसानी एकत्र घरी होत्या. ....म्हणून घर भरल्यासारखं वाटत होते......आठ दिवस कसे कळलेच नाही. प्रांजल तू गावाला येणार आहे का... नाही, ग मम्मी मी मुंबई ला जाते दी बरोबर .. अग जाऊन काय करते. अजून महिना भर सुट्टय़ा आहेत .रेवती चिडून म्हणते. मम्मी मी घेऊन जाते... काय आहे गावाकडे , पिहू बोलते. हो ग खूप वर्ष गेलो नाही म्हणून चाललो तुझ्या पप्पांनी पण पंधरा दिवस रजा काढली आहे मग म्हटले जाऊन यावे...प्रांजल काय करणार मुंबईला जाऊन. तू ही परत केरळ ला जाशील मग.... मी दादा कडे जाईल...तू नको माझ टेन्शन घेऊ. ...तिकडे गावाकडे ओळख ना पाळख मी ...Read More

37

रेशमी नाते - 37

सगळे केरळला जाण्यासाठी निघाले .आलीशा तर हवेतच होती. किती दिवस तिने ह्या दिवसाची वाट बघितली होती. आता बिनधास्त बरोबर फिरू शकत होती. दोघे जण एयरपोर्ट वर मस्त सेल्फी काढ कुठे किस कर मस्ती चालूच होती. Oye ,लैला मजून हे असे चाळे करू नका ?? तुमच अरेंज मॅरेज आहे पण हे अस करुन शक येईल ...वीरा वैतागून बोलते . अग, वीरा फॅमिली ला hide करून status ठेवतो. रिषभ मोबाइल बघत बोलतो. (वेड्यांच्या सिरियस गप्पा ???) सगळे फ्लाइट मधे बसले. वीरा प्रांजल दोघी एकमेकींना सोडतच नव्हत्या...आणि इकडे रिषभ आलीशा बिचारा नमन गाल फुगवून बसला होता. ?? नमन,शांत का ?बसला रिषभ त्याच्या ...Read More

38

रेशमी नाते - 38

पिहू तीच आवरून किचन मधे येऊन पूजा वैगेरे आटोपून सगळ्यांच्या आवडीचं ब्रेकफास्ट लावते .. प्रांजल नमन दोघे ही घरी येतात.... गुड मॉर्निंग वहिनी,नमन बोलून रूम मध्ये जातो...पिहू हसत एक नजर बघत प्रांजल कडे बघते...कुठे गेले होते तुम्ही.. जॉगिंग ला इथेच जवळ गार्डन आहे. प्रांजु अस जात जाऊ नका कुठे?मी तर आल्यापासून गेट च्या बाहेर एकटी जात नाही आणि तूला कसली भीतीच नाही. दी, मी लहान आहे का?हरवायला.. जा आंघोळ कर, तुझ्यासाठी मी तुझ्या आवडीचे पराठे केलेत.... दि,...माझ्या डायट मध्ये नाहिये....तू विचारात पण प्रांजल चिडून बोलून गेली. पिहू हसते ...डायट आणि माझ्या समोर मी करून देईन तर ना. सगळे ब्रेकफास्ट ...Read More

39

रेशमी नाते - 39

सकाळी सगळे आवरून आले. पिहू पण बाहेर आली सगळे तिला एकटक च बघत होते.... दी, नीट झोपली ना...काल.... हो,.... अस का विचारते.... काल पडली असती स्टेपवरून प्रांजल टेंशन मध्ये येत बोलते.... पिहू चे डोळे च ताठ होतात.... क... काय?? हू... हो जिजू ने पकडलं नसत ना.... प्रांजल बोलत विचार करत पिहुला हग करत बोलते. वीरा ,आलिशा एकमेकींना कडे बघत ब्लँक होत पिहुकडे बघत होत्या. प्रांजल कोण कोण बघितलं मला पिहु दोघींचे चेहरे बघत हळूच कानात बोलते. सगळेच तुला बघून शॉक मोड मधे गेले होते. प्रांजल खिखी हसत बोलते.पिहू तिच्या कडे रागाने बघते. सगळे ब्रेकफास्ट करायला येतात. वहिनी तुला कालच ...Read More